उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टिका...
मित्र
December 31, 2008 - 8:35 pm
नमस्कार,
आज सकाळी भटकत असताना हे छायाचित्र काढता आले. कसे वाटले सांगावे.
याच माध्यमातून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
मूळ छायाचित्रामध्ये काहीही बदल केला नाही. फक्त शुभेच्छा टाकल्या आहेत.
-मित्र
दुवे:
Comments
छान
फोटो चांगला आहे. मजकुराची मांडणी आवडली. तुम्ही वापरलेले हे फाँट कुठे मिळतील? आणि ते उच्चारा प्रमाणे टंकणारे फाँट्स् आहेत का?
नविन वर्षाच्या शुभेच्छा!
धन्यवाद
कोलबेर, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! हो मी वापरलेले फॉण्टस् उच्चारप्रमाणे वापरायचे आहेत. किरण नावाचे फॉण्टस् आहेत. http://www.kiranfont.com या संकेत स्थळावर मिळतील.
मित्रा
चित्र छान आले आहे.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
छान
छान चित्र. नववर्षाच्या शुभेच्छा!
नूतन वर्षाभिनन्दन!
नूतन वर्षाभिनन्दन!
प्रकाशछायाचित्र अप्रतिम आले आहे.
हैयो हैयैयो!
मस्त
प्रकाशचित्र उत्कृष्ट आहे. कुठे काढले आहे? गवताच्या वाळलेल्या काडीवर हिमकण (फ्रॉस्ट) जमले आहेत असे दिसते.
शिवाय फाँटही उत्तम.
(अधिक बारकाईने निरीक्षण केले असता सॉफ्टवेअरने शार्पन केलेले आहे असे वाटले. चुभूद्याघ्या. कदाचित आंतरजालावर चढवताना संघट्टीकरण (काँप्रेस) करताना तसे झाले असावे. ते प्रकाशचित्र कृष्णधवल केले असता प्रकर्षाने जाणवते.)
कल्पना, मांडणी, गवत, हिम, लेखन
सर्वच मस्त.
फोकस थोडासा गंडला आहे काय?
कृष्णधवल केल्यास अधिक चांगला परिणाम साधेल का? मी हा प्रयोग केला - करड्या पार्श्वभूमीवर शुभ्र हिमकण हिरकणीसारखे चमकत होते. (फिकट हिरवा रंग मला तितका आनंददायी वाटला नाही, पण याबाबत माझे मन द्विधा अवस्थेत आहे.)
कृष्णधवल केल्यास अधिक चांगला परिणाम
मी फोटोशॉप् मध्ये हे प्रकाशचित्र कृष्णधवल करून पाहिले. नक्कीच चांगला फरक पडला. मूळ चित्रातील पार्श्वभूमी तितकीशी गडद नसल्याने रंगीत चित्रापेक्षा कृष्णधवल चित्रात ऑब्जेक्ट जास्त आकर्षक वाटते.
बाकी गवताच्या काडीवरील हिमकण....Mindblowing!!!
सहमत
सहमत.. मलाहि हिरवट पार्श्वभूमी फारशी रुचली नाहि. मात्र हिमकण आवडले :)
बाकी नववर्षाच्या चित्रमय शुभेच्छांबद्दल आभार आणि
आपल्याला तसेच सर्व उपक्रमपंत, सर्व उपक्रमी, वाचक आणि कुटुंबियांना २००९च्या हार्दिक शुभेच्छा!
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
मित्रा...
चित्र छान आले आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
थोडी तांत्रिक माहिती हवी होती. कॅमेरा कुठला? लेन्स कुठली? पार्श्वभूमी चांगली नाही आली. अजून धूसर पाहिजे होती.
-सौरभ
==================
स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.
चित्राची माहिती....
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.....
हवी असलेली माहीती इथे एकतत्रितपणे देत आहे.
हे प्रकाशचित्र इंग्लंडमध्ये बक्स् टन नावाच्या शहराजवळच्या टेकडीवर काढले आहे. सकाळच्या वेळी गवताच्या वाळलेल्या काडीवर हिमकण (फ्रॉस्ट) जमले असताना काढले आहे.सॉफ्टवेअरने शार्पन केलेले नाही पण विसूनाना म्हणतात तसे कदाचित आंतरजालावर चढवताना काँप्रेस झाल्यामुळे झाले असावे.
कृष्णधवल केल्यास अधिक चांगला परिणाम साधतो, अगदी खरे आहे. कृष्णधवल केलेले चित्र इकडे जोडत आहे.
तांत्रिक माहीती -
कॅमेरा - Panasonic Lumix DMC FZ-28
(लेन्स नाही कारण 18 X ZOOM पॉइंट एण्ड् शूट कॅमेरा आहे)
फोकल लेन्ग्थ् - ६४ मिमि
एपरचर् - - ३.७
एक्स् पोजर् - १/८००
आय एस् ओ - १००
दिसून नाही राहिले
मित्रा,
चित्र दिसून नाही राहिले. जरा बघतोस का.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
परत देत आहे.....
हो बरोबर आहे. मला हे चित्र मोझिला मधे दिसत होते पण इंटरनेट एक्सप्लोरर वर दिसत नाही. इकडे पुन्हा डकवत आहे. बघुया दिसतं का!
अजूनही चित्र दिसत नाही रे मित्रा !
मित्रा, चित्र अजूनही दिसत नाही रे