शाउटकास्ट इंटरनेट टीव्ही

मला या प्रकाराचा शोध काल-परवाच लागला. कदाचित हे सर्वांनाच माहित असेल. विंडोज आणि लिनक्स दोन्हीमध्ये तुम्हाला शाउटकास्ट टीव्ही आणि रेडिओ फुकट उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला विनअँप किंवा व्हिएलसी यापैकी एक प्लेअर इन्स्टॉल करावा लागेल. (लिनक्समध्ये अर्थातच फक्त व्हिएलसी)
नंतर प्लेलिस्टमध्ये जाऊन ऍडिशनल सोर्सेस - शाउटकास्ट टीव्ही किंवा रेडिओ यावर टिचकी मारा.
मग प्लेलिस्टमध्ये जाउन शो प्लेलिस्ट. इथे तुम्हाला शाउटकास्टचे सर्व च्यानेल दिसतील. यातला हवा तो निवडा आणि टिचकी मारा. टिव्ही सुरू.
यात टिव्हीमध्ये जवळजवळ २५० च्यानेल आहेत. काही चित्रपटांचेही आहेत. काल एकामागून एक ज्युरासिक पार्क-ओशन्स ११-पायलेट्स ऑफ क्यारिबियन-म्याट्रिक्स असे चित्रपट होते. चित्रांची क्वालिटीही उत्तम आहे. याशिवार साइनफेल्ड, स्टार ट्रेक वगैरेसारख्या मालिकाही आहेत.
काही च्यानेल पॉर्न आहेत तेव्हा लहान मुले असल्यास यासाठी काळजी घ्यावी. विनअँपमध्ये प्रथम ऍडल्ट फिल्टर हवा की नको असे विचारले जाते. तिथे योग्य तो पर्याय निवडता येईल.
याखेरीज रेडिओमध्ये बरेच हिंदी गाण्याचे च्यानेल आहेत. बर्‍याच दिवसांनी विविधभारती ऐकल्यासारखे वाटले. :)

टीप : हे सर्वांनाच माहित असले तर लेखक काळाच्या बर्‍याच मागे आहे असे म्हणून सोडून द्यावे :)

लेखनविषय: दुवे:

Comments

सही

विंडोज आणि लिनक्स दोन्हीमध्ये तुम्हाला शाउटकास्ट टीव्ही आणि रेडिओ फुकट उपलब्ध आहेत.
वॉव...

यासाठी तुम्हाला विनअँप किंवा व्हिएलसी यापैकी एक प्लेअर इन्स्टॉल करावा लागेल. (लिनक्समध्ये अर्थातच फक्त व्हिएलसी)
व्हीएलसी आहेच

यात टिव्हीमध्ये जवळजवळ २५० च्यानेल आहेत. काही चित्रपटांचेही आहेत. काल एकामागून एक ज्युरासिक पार्क-ओशन्स ११-पायलेट्स ऑफ क्यारिबियन-म्याट्रिक्स असे चित्रपट होते. चित्रांची क्वालिटीही उत्तम आहे. याशिवार साइनफेल्ड, स्टार ट्रेक वगैरेसारख्या मालिकाही आहेत.
क्या बात है!!

काही च्यानेल पॉर्न आहेत
उत्तम!

तेव्हा लहान मुले असल्यास यासाठी काळजी घ्यावी.
त्याची काळजी नाही..

याखेरीज रेडिओमध्ये बरेच हिंदी गाण्याचे च्यानेल आहेत. बर्‍याच दिवसांनी विविधभारती ऐकल्यासारखे वाटले. :)

सुंदर

मला ही माहिती नव्हती. वेबसाईटींवर जाऊन च्यानेले शोधण्यापेक्षा हे सोयीचे आहे. व्हीएलसी तसा फार छान प्लेअर आहे.

माहितीसाठी धन्यवाद.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यू

त्यातल्या desync.com: awesome movies (HQ) नावाच्या च्यानेलवर आत्ता ओशन्स ११ चालू आहे तो (परत) बघतो आहे. :-)
आणि Green screen? BurntTV.com/codec: Seinfeld - On-Demand वर साइनफेल्ड बघता येईल. याशिवाय सिंपसन, रोम, एक्स फाइल्स यासारख्या मालिकाही आहेत.
बघा आणि आनंद लुटा. :)
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

म्हणजे

काही च्यानेल पॉर्न आहेत तेव्हा लहान मुले असल्यास यासाठी काळजी घ्यावी.
हा हा हा!!!
अजून मुले होवू नयेत म्हणून कॉशन?!?

हलके घ्यालच ही अपेक्षा!

आपला
गुंडोपंत

हा हा

अजून मुले होवू नयेत म्हणून कॉशन?!?

आपल्या देशाची लोकसंख्या बघता याचा उपयोग होईल असे वाटत नाही. :-)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

निर्यात

आवांतरः
आपल्याकडे खुप माणसे आहेत हीच आपली ताकद आहे.
आपण त्या स्कील्ड मनुष्यबळाची निर्यात केली पाहिजे जगभर. (हे आपण सॉफ्टवेयर हमालीत पाहिलेच आहे!)
त्यासाठी केंद्र सरकारने एक दिशा ठरवली पाहिजे!

हा एक फार मोठा फायदेशीर व्यापार ठरेल. यातून भारताकडे चांगले लाँग टर्म साठी पैसे येतील. त्या लोकांना भारतीय पदार्थ, भारतीय गोष्टी, भारतीय करमणूक देण्यातून निर्यात वाढेल - आणि तीही जगभर!
इतर निर्यात असेलच!
आणि प्रत्येक देशात मोठ्या संख्येने स्कील्ड भारतीय असणे यातून भारताची जगावर प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सत्ता प्रस्थापीत होईल.
आपला
आशावादी आणि स्कील्ड मनुष्यबळासाठी मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्र शिक्षण हेच भविष्य मानणारा
गुंडोपंत

हे

फारच अवांतर वाटते आहे. :-)
----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

हो ना!

हो ना, पण आता 'अति' आवांतर असेही संपादन करता येणार नाही...
:)
यावर अजून काही लिहिले तर ते अति अति आवांतरही ठरेल!
आपला
वायफळ
गुंडोपंत

शाउटकास्ट

शाउटकास्टवरच एके जागी (मर्यादित काळापुरती) ज्ञानेश्वरी तर एका जागी हॅरी पॉटर ऐकण्यात आले होते.

लाइव्हस्टेशन ही बरा पर्याय आहे. तो मात्र इन चा चाहता आहे. मराठी बातम्या तो इथे ऐकतो.

अरे वा!

लाइव्हस्टेशनबद्दल माहीत नव्हते. धन्यू. वापरून बघतो.
यात तोटा एकच आहे. आधीच आंतरजालावर खूप वेळ जातो असे वाटत होते. आता टीव्हीही इतक्या सहजतेने उपलब्ध आहे म्हटल्यावर इथून हलण्याचा प्रश्नच मिटला. :)
----
"This is Linus Torvalds. I announce Linux."

खो खो...

यात तोटा एकच आहे. आधीच आंतरजालावर खूप वेळ जातो असे वाटत होते. आता टीव्हीही इतक्या सहजतेने उपलब्ध आहे म्हटल्यावर इथून हलण्याचा प्रश्नच मिटला. :)
मजा आली ;-)

-सौरभ.

==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

हम्म...

>मजा आली ;-)
यू टू? ;-)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

वेळ्

आंतरजालावर खूप वेळ जातो असे वाटत होते..

वेळ वाचवायचा असेल तर गूगल रीडर वापरत असाल अशी आशा आहे.

सहमत

सहमत आहे. गूगल रीडर खूपच सोईस्कर आहे.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

मस्त!

छान माहिती दिलीत.
मला माहितीच नव्हते हे सगळे प्रकार.
आत्ताच हिंदी रेडियो ऐकला... शिवाय चित्रपटही.
पण मला चित्रपट चित्रपटगृहातच पहायला आवडतात.

आपला
गुंडोपंत

दर्जा

काल दिवसभर शाऊटकास्टवर 'डिसिन्क ऑसम मूवीज्' या चॅनेलवर तीन चार चित्रपट पाहिले. प्रसारणाचा दर्जा फारच उत्तम आहे. फ्यामिली गायचेही एकदोन भाग पाहिले. मात्र बऱ्याच चॅनेलांवर हेच चित्रपट पुनःप्रसारित होत आहेत असे वाटते. उदा. अँकरमॅन हा चित्रपट कालपासून तीनदा झाला.

पण फुकट ते पौष्टिक ः))


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पुनःप्रसारण

मलाही तोच अनुभव आला. ठराविक काळानंतर ते चित्रपट बदलतील अशी आशा आहे. स्टार ट्रेकचा मी फ्यान नाही नाहीतर त्याचे बरेच एपिसोड दाखवीत आहेत. पण साइनफेल्ड कितीही वेळा पाहिले तरी मला चालते. :-)

पण फुकट ते पौष्टिक ः))

सहमत आहे. :-)

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

फुकट ते पौष्टिक

अनेक हॉलिवुडपट (अगदी लेटेष्ट सुद्धा) इथे ऑनलाइन फुकट बघायला मिळतात.

शाऊटकास्ट बघीतले. मस्तच आहे!

पॉज़ कसे करायचे

या सायटीवर एखादा पिच्चर बघत असताना मध्येच तहान वगैरे लागली तर पाणी पिण्यासाठी जाताना पॉज़ कसे करायचे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पॉज

पडद्यावर खालच्या बाजूला माउस* फिरवल्यास पॉज बटण दिसते. बहुधा पहिलेच असावे.
ही साईट फारच मस्त आहे. अनेक आभार.

*याचे उंदीर असे मराठीकरण करायची विलपॉवर आमच्यात नाही. क्षमस्व.

----
रंध्रात पेरीली मी, आषाढ दर्द गाणी

सापडले

पडद्यावर माऊस ऐवजी कर्सर फिरवावा लागेल असे वाटते. ;) ह.घ्या.

मात्र बटण सापडले. थ्यांक्यू.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

नंतर या...

दिलेले पान आत्ताच पाहिले. म्हणतात की सध्या आम्ही नवीन चित्रपट भरतो आहोत. पाच मिनिटांनंतर भेट द्या.;-)

-सौरभदा

==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

अरेरे...

माझ्या जालाचा वेग फारच कमी आहे. तरी देखील प्रयत्न करुन पाहिला. मजा आली.
आपल्याच संगणकावर अशा करता येण्याजोग्या हजारो गोष्टी असतात पण त्यांची माहितीच नसते. आजकाल उपक्रमावर इतकी माहिती मिळते आहे, त्याला माहितीचा विस्फोट किंवा सुवर्णयुग म्हणता येईल. हा लेख आवडलाच आणि आ.कर्ण यांनीही सध्या असल्या लेखांचा धडाका लावला आहे.
सर्वांचा आभारी आहे.
आ.कर्ण, दिवसात तीन चार चित्रपट कसे काय पाहता येतात? तुमचा नेटचा प्लॅन कोणता? कोणत्या कंपनीचा? डाऊनलोड लिमिट वगैरे काही भानगड नसावी.

-सौरभदा ( पुण्यात आताकुठे मस्त थंडी पडली आहे. टंकताना बोटं चालतच नाहीत )
==================

स्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.

योजना

जीपीआर एस साठी एअरटेल ची अमर्याद योजना (मोबाईल ऑफिस) आहे मासिक ४०१ रुपयात. (याचा शाउटकास्ट साठी उपयोग होण्याची शक्यता कमीच.) अमर्याद ब्रॉड-बॅन्ड च्या पर्यायात यू-टेलीकॉम स्वस्त ठरावा.

(दिवसात चार चित्रपट पाहण्यासाठी वेळ हाती असण्याच्या कोणत्या योजना उपलब्ध आहेत?)

मोबाईल ऒफीस

प्रिपेड धारकांना मोबाइल ऒफीस परवडत नाही. रुपये १५ रुपये ९९ पैसे पर दिवस आणि स्पीडच्या नावाने बोंब. स्पीड पहिल्यासारखा राहिला नाही. पेजेस इतके हळू उघडतात की दर सेकंदाला ऐअरटेलवाले शिवी खातात. त्यामुळे मोबीवरुन पीसीला नेट जोडणा-यांनी ऐअरटेलच्या नादी लागू नये हे आम्ही नम्रपणे सुचवू इच्छितो.

-दिलीप बिरुटे
(ऐअरटेलला वैतागलेला)

एअरटेल खरंच पूर्वीसारखं नाही राहिलं.....:-(

मी ३ वर्षांपासून एअरटेल वापरत होतो(२००८ च्या सुरुवातीपर्यंत). एज असलेला मोबाईल(नोकिया ६३००) होता त्यामूळे डाउनलोड चा वेग २५ ते ३० KBps असायचा. मजा यायची तेंव्हा! पण त्यानंतर अतिवेगवान राहुद्या, जोडणी होतानाही त्रास व्हायला लागला. मग मी ते बंद करून भा.सं.नि.लि. चा होम प्लान(दरमहा ७५० किंवा दरवर्षी ७५००) घेतला आहे.

छान

शाऊकास्ट वापरुन पाहिले. मजा आली. माहितीसाठी आभार.
--लिखाळ.

 
^ वर