आर्थिक मन्दि , भारत व आपण

जागतिक मन्दिचा भारतावर काही परीणाम झाला काय ?
आपले अनुभव आपण येथे माण्डूया .

मी स्वतः एक छोटा फब्रिकेशन करणारा बिझिनेसमन आहे. ऊत्तर भारतातील छत्तीसगड येथे मला , तीन कम्पन्यामधे सुमारे ८० लाख रुपयान्ची कामे मीळाली आहेत. या मन्दीचा परीणाम म्हणून दोन कम्पनीनी , आपली कामे पुढे ढकलली आहेत , तर एका कम्पनीने फक्त ३०% रक्कम आगाउ देउन तेवढेच काम सध्या करा असे सान्गितले आहे.

मला अशी चिन्ता आहे की बहुधा पुढे ढकललीली कामे कम्पनी करतील की नाही.

नोकरी तून कमी केले असे आपण वाचतो , पण वर दिलेल्या वस्तुस्थितीत नुसार मला काही कर्मचार्याना कमी करण्याशिवाय दूसरा मार्ग दिसत नाही.

असा प्रसन्ग आपण कोणावर आला आहे का ? आपले अनुभव वाचून मी माझे थोडे सान्त्वन करुन घेइन.

कळावे

आपला

अविनाश रायकर

लेखनविषय: दुवे:

Comments

नक्कीच परिणाम

आर्थिक मंदीचं हे संकट जागतिक आहे आणि भारताचीही यातून सुटका नाही. नशिबानी आपली आर्थिक स्थिती मुळात बरी असल्यामुळे अगदी दिवाळखोरीची पाळी आपल्यावर आलेली नाही. पण निदान पुढचे चार सहा महिने तरी हे संकट टळेल अशी शक्यता नाही. इंग्रजीत "होप फॉर द बेस्ट अँड प्लान फॉर द वर्स्ट" असं म्हणतात. तुम्ही पण सध्या या तत्वावरच तुमच्या धंद्याची पुढची रणनीती ठेवावी असं वाटतं.

मिलिंद

तीन टक्के!

आमच्या बंधूचा पगार तीन टक्क्याने कमी! :-(
माझंतरी सध्या शिक्षण चालू आहे. मंदी येऊनही मार्क तेवढेच किंवा आधीपेक्षा जास्त मिळवावे लागतील असे दिसते!
बाकीच्यांवर काही परिणाम?

-सौरभ.
==================

'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'

पैसे वाचवित राहणे.

कोणताही वायफळ खर्च न करणे आणि जास्तीत जास्त पैसे वाचविणे हेच या मंदीवरचे उत्तर आहे.

यकदाचित नौकरी गेलीच तर जास्त चिंता न करता आपल्या आवडत्या छंदाची जोपासणा करणे ( वाचन, श्रवण इत्यादी).

माझ्यामते मार्च'०९ नंतर परिस्थितीमधे सुधारणा होईल.

+१

यकदाचित नौकरी गेलीच तर जास्त चिंता न करता आपल्या आवडत्या छंदाची जोपासणा करणे ( वाचन, श्रवण इत्यादी).

ब्यांका

ब्यांका

ऐ.सी.ऐ.सी.ऐ. / ष्टांडर्ड् चार्टर्ड् / एच्च्.डी.एफ्.सी / कोटक महिंद्रा / इ.इ. ब्यांकांमध्ये कॉस्ट् कटिंग् चा अतिरेक चालला असून सदरील ब्यांकांनी ॠण वसूली दावे संबंधित न्यायाधिकरणांमधून काढून घेण्यास प्रारंभ केला आहे असे ऐकून आहे.

हैयो हैयैयो!

प्रश्न

>> दरील ब्यांकांनी ॠण वसूली दावे संबंधित न्यायाधिकरणांमधून काढून घेण्यास प्रारंभ केला आहे असे ऐकून आहे.
थोडे विस्ताराने सांगाल का ? दावे मागे काढल्याने कॉस्ट् कटींग कसे होईल / किंवा कॉस्ट कटिंग मधे भर कशी पडेल ? याचा अर्थ या बॅंकानी ही दिलेली कर्जे आता परत मिळणार नाहीत असे धरले आहे काय ??

उत्तर

उत्तर

ऋण वसूली संबंधीचे दावे काढून घेतल्याने (ते दावे चालविण्यासाठी) येणारा खर्च उणा होईल. तात्पर्य कॉस्ट् कटिंग् होईल. दिलेली कर्जे परत मिळविण्यासाठी ब्यांकांनी द्विपक्षी 'सेटल्मेण्ट्' हा मार्ग अंगिकारण्यास प्रारंभ केला आहे. दावे चालविण्यासाठी वकीलांची फी देण्यापेक्षा ऋण वसूली दावेच सोडून देणे हा ब्यांकांना परवडणारा मार्ग झाला आहे.

हैयो हैयैयो!

मराठी साहित्य संमेलनावर परिणाम

परदेशात होणार असलेले मराठी साहित्य संमेलन जागतिक मंदीच्या भयंकर विळख्यामुळे भव्यपणाने न होता केवळ शानदारपणे होईल असे कौतिकराव ठाले पाटील यांनी कळवले असल्याचे काल/परवा पेप्रात वाचले. भव्य न होता शानदार होईल म्हणजे काय हे कुणी स्पष्ट केले तर बरे होईल. ;-)

==================

'उलट ही लेणीबिणी, ताजमहाल लवकर फुटून जाईल तर बरं. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे.'
'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'

 
^ वर