मराठी विश्वकोश फक्त ऍडोबच्या दावणीला...?

मराठी विश्वकोश फक्त ऍडोबच्या दावणीला
मराठी मध्ये अप्रतिम अशी माहिती संग्रहीत झालेले विश्वकोश वर्धीत होऊन १८ वा खंडही आता उपलब्ध असल्याची माहिती मी मटाच्या स्थळावर वाचली.
वाटले की आपणही यांचे स्थळ कसे आहे ते पाहू. पण पाहतो तर काय हे स्थळ चक्क फक्त ऍडोबच्या फ्लॅश प्लेयरवर चालते. अन्यथा नाही. इतकेच काय, 'हे प्लेयर डाउन-लोड करा' या शिवाय येथे कोणतीही माहिती दिली जात नाही. अगदी डिस्क्लेमर, संपर्क सुद्धा नाही!

कुणी यांना सांगेल का की हे विश्वकोश आहेत. आणि ते तुमच्या फालतू ऍनिमेशनसाठी फक्त ऍडोबच्या दावणीला बांधणे योग्य नाहीये हे? हा त्यांचा पत्ता -
http://www.vishwakosh.org.in/

मी हे सांगु शकेन पण त्यांचा इ-मेल, किंवा फोन वगैरे तरी मिळायला हवा.
किंवा पुण्यातले कुणी सदस्य हे करू शकतील का?
कोणत्या माणसाला/व्यक्तीला हे नक्की सांगितले पाहिजे?

वाचक्नवी, चित्तरंजन भट, सर्किट, विकास, नीलकांत, वरदा, राधिका, यनावाला...कुणीही वाचक, सदस्य या संदर्भात काही मदत करू शकेल का?

तसेच हे जाडजूड खंड आता मस्तपैकी सिडी ज् वरही उपलब्ध करून दिले आहेत. ही सिडी फक्त रू.१००० ला उपलब्ध आहे. या बद्दल मात्र मंडळाचे अभिनंदन केलेच पाहिजे. यावरील सर्व मजकूर पीडीएफ या फॉरमॅट मध्ये आहे.
आशा आहे काही दिवसात हे खंड आपल्या साध्या सोप्या सर्चेबल युनिकोडमध्येही मिळतील.
त्याच वेळी http://vishwakosh.org/ हे नाव मात्र गुजराती भाषेने घेऊन टाकल्याचे आढळले. हे खरे तर सर्व भाषीक स्थळ असेल असे वाटले होते.

अजून काही माहिती सूचवण्या असल्या तर मात्र नक्की कळवा, म्हणजे एकत्रीत पणेच देता येतील.

आपला
गुंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

वाड

विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. विजया वाड आहेत असे कळले.
पण त्यांचा संपर्क काही सापडला नाही.

तसेच ही साईट पुजासॉफ्ट नामक कुण्यासंस्थेने बनवली आहे असा दावाही जालावर वाचायला मिळाला. पण त्यांची स्वतःची साईटही ऍडोबसाठी अडकली!

१)असे भंपक कंसल्टंट कसे काय निवडले जातात?
२)काय निकष लावले जातात अशी सार्वजनिक महत्वाची स्थळे बनवतांना?

आंतर जालावर शोधतांना काही लोक सिडी च्या भयंकर प्रकारच्या इंटरफेसलाही वैतागलेले दिसले.

म्हणजे मंडळाने कोणत्याही प्रकारे हे विश्वकोशाचे ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर काळजीच घेतली आहे असे जाणवले!

आपला
गुंडोपंत

बहुदा

हे स्थळ बहुतेक एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाच्या धरतीवर बनवण्याचा प्रयत्न झाला असवा असे दिसते.
http://www.britannica.com/
कारण तेथेही फ्लॅश प्लेयर वापरलेले आहे.
बरोबर आहे, ब्रिटनच्या मान'सिक' गुलामीतून सुटणार कसे हो आपण?
आपले डोके चालवण्याचा प्रश्नच नको!
आपला
गुंडोपंत

याला

बरोबर आहे, ब्रिटनच्या मान'सिक' गुलामीतून सुटणार कसे हो आपण?

याला जावईशोध म्हणायला हरकत नसावी. या न्यायाने सर्व अत्याधुनिक संकेतस्थळे ब्रिटनच्या गुलामीत आहेत.
उदा.
स्वीनी टॉड
मादागास्कर
स्पायडरम्यान
इंडियाना जोन्स

----

म्यान?

स्पायडरम्यान की स्पायडरमॅन?

तुमच्या समोर तलवार म्यान!!!

तुम्ही थोर विचारवंत...
मी आपला एक सुमार बुद्धीचा, अतिसामान्य इसम. तुमच्या समोर मी काय बोलणार?

आपला
गुंडोपंत

मराठीकरण

स्पायडरम्यान की स्पायडरमॅन?

स्पायडरम्यान हे स्पायडरमॅन चे मराठीकरण असावे. जसे टॅक्सी => ट्याक्सी
बॅट => ब्याट

((अ)विचारवंत) ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे

सीडी

विश्वकोशाचे खंड सीडी वर उपलब्ध होणार असून त्यासाठी आगाऊ नोंदणी केल्यास कमी किंमतीत मिळतील अशी जाहिरात मटामध्ये वाचल्यावर मी माझ्या (पुण्यातील) नातेवाईकांना माझ्यासाठी ह्या सीडीसंचाची नोंदणी करायला सांगितले होते. त्यांनी ती केली. त्यानुसार आता हा संच उपलब्ध आहे, मात्र तो प्रभादेवीच्या हापिसात जाऊन घ्यावा लागतो म्हणे. म्हणजे मुंबईव्यतिरिक्त इतरत्र राहणार्‍यांनी त्यासाठी खास मुंबईची फेरी करायची का? सरकारी कारभार असल्याने पोस्टाने संच पाठवण्यास नकार मिळाला आहे असे समजते. ह्याबद्दल कोणाला अधिक माहिती असल्यास कळवावे.
विश्वकोश महामंडळाच्या संकेतस्थळावर जाण्याचा योग आलेला नाही, आणि आला तरी त्याचा उपयोग नाही हे ही चर्चा वाचून लक्षात आलेच आहे.

नाशकातही

हा संच नाशकातही उपलब्ध आहे.

तिथला एक अनुभवः

तिथे गेलो तर ५-७ मंडळी निवांतपणे एका टेबलावर गप्पा मारत बसली होती.
त्यांनी डिस्काऊंट मध्ये मिळेल ही सिडी याची माहिती दिली. आता हजारची ७०० ला.
त्यांच्याकडे फक्त एकच प्रत आली होती.
विश्वकोशाचेही सगळे खंड उपलब्ध नव्हते. कधी मिळतील याची कोणतीही माहिती नव्हती.
चौकशी केली नसती तर याच ठिकाणी हे खंड मिळतात याची सुतराम कल्पनाही येणार नाही.
बहुतेक पुस्तके बाहेरच्या भागात धूळीत पण निट रचून ठेवलेली होती.

त्यांना विचारले की, हा सिडीचा संच नक्की कसा चालतो?
तर त्यांनाच ते माहिती नाही...

त्यांच्यापैकी कुणालाच युनिकोड हा शब्द माहिती नव्हता.

पाठ्यपुस्तक मंडळाची जुनी पुस्तके संदर्भ म्हणून बघायला मिळतील का असे विचारले तर
उत्तरः "साहेब, रद्दीत विकून टाकतो आम्ही ती पुस्तके"

मी: आहो पण एखादे संदर्भासाठी वगैरे?
उत्तरः कशाला? झाले ना साहेब त्याचे काम आता. आता कशाला ठेवायचे?

मी: अहो पण एखाद्याला वाटले की पहावा कसा आहे इतिहास मंडळाच्या कामाचा तर?
उत्तरः कोनाला पहिजे आहे? तुमी कुठे काम करता? ऑडिटलाये का तुमी?

मी: अहो मी एक जुना विद्यार्थी आहे...
उत्तरः ओ! तुम्ही हे घेणारे का? नाही ना? रामभाऊ हे ठेऊन द्या परत- साहेब, तुम्ही ना आमच्या पुण्याच्या ऑफिसला जा तिकडे असली तर प्रत असेल.

मी: पुण्याचा पत्ता-
उत्तर: पुस्तकावर आहे ना तोच.

मी: अहो पण पुस्तक कूठे आहे माझ्याकडे?
उत्तरः काय कटकट आहे अशा अविर्भावात पेनाने एका कागदावर लिहून पत्ता देतो आणि काय म्हणत होते तुम्ही, असे म्हणत मी तिथे आहे की नाही याची कोणतीही दखल न ठेवता जुने संभाषण सुरु होते.

ही मंडळी आमच्या क्रमिक पाठ्यपुस्तकाच्या विभागात काम करतात आणि फ्रंट ऑफिसला बसतात याची लाज वाटली पाहिजे!

आपला
गुंडोपंत

शरीयतचा कायदा.

अशा लोकांसाठी शरीयतचा कायदा हवा. अशा लोकांमुळेच मराठीचा र्‍हास होत आहे.

पत्ता

कृपया नाशिकच्या कार्यालयाचा पत्ता इथे द्याल का?

पत्ता

बालभारती,
लेखा नगर कार्यालया जवळ,
सिडको,
नाशिक -४२२००९

लेखा नगर, शिवाजी चौक, पांडवलेणे, अंबड अशा कोणत्याही बसने
आलात तर "लेखा नगर" या स्टॉप ला उतरा
दोन मिनिटावर चालत हे कार्यालय आहे. आसपास चौकशी केल्यावर नक्की सांगतील असे वाटते.
गेट वरचा वॉचमन बहुदा अडवतो व चौकशी करून मगच आत सोडतो.

बाहेर 'किशोर दिवाळी अंक मिळेल असबेक छोटा बोर्ड पण आहे'.

या कार्यालयाच्या समोरच्या बाजूला पेठे नगरला जाणारा रस्ता आहे.

आपला
गुंडोपंत

जुनी क्रमिक पुस्तके

जुनी क्रमिक पुस्तके परत विक्रीस आणून खरं तर चांगला फायदा मिळवता येईल असे वाटते. कारण खुप जणांना आपण नक्की काय शिकलो हे परत जाणून घ्यायला आवडेल असे वाटते.

असो,
परत विश्वकोशाविषयी बातमी आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3867793.cms#write

आपला
गुंडोपंत

संकेतस्थळावरील् संपर्क व इतर नोंदी

वरील चर्चेतील दुव्यातून विश्वकोश महामंडळाच्या संकेतस्थळावर जाता संकेतस्थळावर् बरीच् माहिती उपलनब्ध असल्याचे दिसले.संपर्कासाठीचा पत्ता वर दूरध्वनी क्रमांकही दिलेला आहे. तो असा -
प्रशासकीय कार्यालय -
महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ
रवींद्र नाट्य मंदीर, दुसरा मजला
सयानी मार्ग, प्रभादेवी,
मुंबई ४०००२५
दूरध्वनी - २४२२९०२०
इमेल - info@vishwakosh.org.in

उप कार्यालय
सहाय्यक सचिव, मराठी विश्वकोश कार्यालय
गंगापुरी, वाई ४१२८०३ (जिल्हा सातारा)
दूरध्वनी - ९५२१६७/ २२००५३
vishwai@sancharnet.in

खालील गोष्टींवर संस्थळावर लेखन दिसले -
खंड सतरा - प्रकाशन, परिचय व नमुना नोंदी
विश्वकोश मंडळाची आजपर्यंतची वाटचाल
आजपर्यंतचे अध्यक्ष
विद्यमान अध्यक्षांचे मनोगत
मान्यवरांचे संदेश
विश्वकोश लेख - शीर्षकांची सूची
विश्वकोशाचा आराखडा
भविष्यकाळातील योजना
विश्वकोश नमुना नोंदी
विश्वकोश मंडळाचे - सदस्य
छायाचित्र गॅलरी
संपर्क

गुंडोपंतांना हे काहीच कसे दिसले नाही असे आता आश्चर्य वाटते आहे.

कारण

मला काही दिसले नाही कारण मला या स्थळाने ऍडोबचे काही माझ्या संगणकावर टाकण्याचा प्रयत्न केला.
मला ते नको होते! मी 'डू नॉट इंस्टॉल' या ऑप्शनचा वापर केला, तर त्याने मला फक्त कोरे स्थळ दाखवले!

मग कसे मला काही दिसावे?

आपला
गुंडोपंत

स्तुत्य प्रयत्न

गुंडोपंत,
कदाचित त्या स्थळाने तुमच्या मशिनवर ऍडोब फ्लॅश प्लेयर टाकण्याचा प्रयत्न केला असावा. हे संस्थळ पाहाण्यासाठी त्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडे फ्लॅश प्लेयरची जुनी आवृत्ती असण्याची शक्यता आहे, आणि म्हणूनच तुम्ही हे स्थळ पाहू शकत नाही.
फ्लॅश/जावास्क्रिप्ट वगैरे वापरून संस्थळ अधिक आकर्षक व इंटरॅ़क्टिव्ह बनवता येते व या तंत्रज्ञानावर आधारित संस्थळांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे इथे मराठी विश्वकोष ऍडोबच्या दावणीला बांधला आहे वगैरे असे काही वाटत नाही. किंबहुना इतर काही सरकारी संस्थळांच्या अतिशय रटाळ व नीरस पानांकडे पाहाता विश्वकोषासाठी फ्लॅश वापरण्याचा प्रयत्न स्तुत्यच आहे असे म्हणता येईल.

काहीच्या काहीच!

कदाचित त्या स्थळाने तुमच्या मशिनवर ऍडोब फ्लॅश प्लेयर टाकण्याचा प्रयत्न केला असावा.
सहमत आहे, हेच केले.

म्हणूनच तुम्ही हे स्थळ पाहू शकत नाही.
कारण मान्य पण मूळ कारण अमान्य - का म्हणून असे असावे?

फ्लॅश/जावास्क्रिप्ट वगैरे वापरून संस्थळ अधिक आकर्षक व इंटरॅ़क्टिव्ह बनवता येते व या तंत्रज्ञानावर आधारित संस्थळांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

हे स्थळ आकर्षक हवे आहे की युझरफ्रेंडली हवे आहे? उपयोगितामुल्य नसेल तर काय करायची ती जावास्क्रिप्ट? आणि फ्लॅश म्हणशील तर ते कोणत्याही गंभीर स्थळावर दिसता कामा नये...

त्यामुळे इथे मराठी विश्वकोष ऍडोबच्या दावणीला बांधला आहे वगैरे असे काही वाटत नाही.
अरे बाबा ऍडोब नसेल तर तुला हे स्थळ पाहताच येत नाही! मग दावणीला नाही का बांधलेले? काही दुसरा प्लेन टेक्स्ट वगैरे पर्याय तर द्याल?
किंबहुना इतर काही सरकारी संस्थळांच्या अतिशय रटाळ व नीरस पानांकडे पाहाता विश्वकोषासाठी फ्लॅश वापरण्याचा प्रयत्न स्तुत्यच आहे असे म्हणता येईल.

भारतातल्या फ्लॅश वापरा विषयी माझे मत मी वर दिलेच आहे!

आपला
गुंडोपंत

हा

हा फक्त मराठी विश्वकोशाचा प्रश्न नाही. अडोबची सध्यातरी मोनोपोली आहे. तुमच्या स्थळावर एम्बेडेड व्हिडिओ असेल तर अडोबला पर्याय नाही असे म्हणतात. (चुभुद्याघ्या. तज्ञांनी खुलासा करावा.)
मागच्या वर्षी त्यांचे ९९% मार्केट होते. सध्याची परिस्थिती माहित नाही.

----

धन्यवाद

सिल्वरलाईट आणि जावा एफ एक्स बद्दल "/." वर बरेचवेळा चर्चा पाहिली आहे पण हा विषय नसल्यामुळे यातली तांत्रिक माहिती फारशी कळत नाही. दर वेळी व्हिस्टा अपडेट करताना मासॉ सिल्वरलाईट दाखवते पण अपडेट ऑप्शनल असल्याने (आणि यामुळे नक्की काय होते ते माहित नसल्याने) अजून इन्स्टॉल केलेले नाही. :)
खुलासा केल्याबद्दल धन्यवाद.
----

उपयोग आणि सौंदर्य

मला वाटते की या स्थळाचे उपयोगिता मूल्य जास्त आहे.
शिवाय त्यांना ही पुस्तके या स्थळावरून विकायचीही आहेत.

मग अशा वेळी जास्तीत जास्त लोक येथे येऊ शकतील हे पाहणे महत्वाचे ठरावे.
आणि त्यांना पुस्तक लगेच 'विकत' घेता यावे!

तेच नसेल तर कशासाठी स्थळ बनवायचे इतके पैसे वाया घालवायचे हे कळले नाही?

आपला
गुंडोपंत

दुव्याबद्दल धन्यवाद

यातील काही नमुना नोंदी वाचल्या.

पारिभाषिक शब्द शिकायला मला चांगला फायदा होईल.

फ्लॅश वापरल्याने स्थळ खरंच सुंदर बनते का?

सुंदर स्थळ बनवण्यासाठी फक्त ऍडोबच आहे असे का मानावे?

फ्लॅश वापरल्याने स्थळ खरंच सुंदर बनते का? की त्याचे डिस्ट्रॅक्शन (उपद्रव) मुल्यच जास्त होऊन बसते आहे? -

पहा एम टी एन एल चे स्थळ http://www.mtnl.net.in/ - नेव्हिगेशन साठी स्थळ कसे "नसावे" याचा हा आदर्श आहे!

मुळात या एम टी एन एल च्या स्थळावर माणूस का येईल?
१. बिल भरणे - तत्संबंधी माहिती
२. नंबरचा शोध -डिरेक्टरी

या पैकी काही पहिल्या २ क्लिच्क् मध्ये सापडत नाही.
आणि त्रासदायक फ्लॅश 'न्यु' आपले लक्ष विचलित करत राहतात.

अर्थात विश्वकोशाचे स्थळ असे नाही हे मला मान्य. पण पुस्तक लिहिणारे पीस किती काळ बघत बसायचे हे मात्र कळत नाही...
अजून इतर तंत्रज्ञानांचे झरे आटले की काय?

मला वाटते भारतातली आमच्या सारख्या सामान्यांची परिस्थिती आणि नेट चा वेग पाहता स्थळ सहजतेने उघडणारे असवे. त्यात टेक्स्टचा वापर असावा.

(माझ्या मते 'वाय जनरेशन' स्थळ उघडायला १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल तर तोवर दुसर्‍या स्थळावर निघून जाते.)

तुमचे मत काय ते माहिती नाही...

सर्किट चे काय मत आहे?

आपला
गुंडोपंत
अर्थात मराठीतले संदर्भ कुणाला हवे आहेत म्हणा?
जिथे भाषाच मरत चालली तिथे गुंडोपंत संदर्भासाठी विचार करत आहेत. :(

सावधानतेचा गंभीर इशारा

मी गुगल क्रोमवर उघडायचा प्रयत्न केला तर, "visiting this site may harm your computer" असा सावधानतेचा गंभीर इशारा आला. या बाबत आयटी तज्ञ जास्त प्रकाश टाकू शकतील.

नेट चा वेग पाहता स्थळ सहजतेने उघडणारे असवे.
मराठी विश्वकोष आंतरजालावर आणणे चांगले आहे. पण त्याचबरोबर त्याचा अधिक प्रसार होण्यासाठी, इंटरनेटचा कमी वेग असलेल्या ठिकाणी स्थळ सहजतेने उघडणारे असावे हि त्यातली मूलभूत गरज आहे.

सफारी

मलाही सफारी वापरताना असा इशारा मिळाला.

सावधानतेचा गंभीर इशारा

बहुधा, ही सगळी वेबपेजेस बनविताना आय ई ६.५ वर तपासले जातात.
इतर ब्राउजर्सवर कशी चालतील ते तपासले जात नाही. त्यामुळे असे इशारे मिळतात.

नेट चा वेग पाहता स्थळ सहजतेने उघडणारे असवे.

अगदी बरोबर आहे !

फ्लॅशच्या वापराने फाईलची साईज वाढते व संकेतस्थळावरील मजकूर दिसायला वेळ लागतो.
सीएसएस (Cascading Style Sheets) वापरुन संकेतस्थळ आकर्षक तर होतेच शिवाय जलदगतीने उघडते.

 
^ वर