तळागाळा पर्यंत तंत्रज्ञान
नमस्कार,
आज दै. सकाळमध्ये ही बातमी वाचली. मला हा प्रयोग आणि त्यासंबंधीत वापर पाहून खुपच आनंद झाला. तंत्रज्ञान तळागाळापर्यंत गेले तरच खरा फायदा झाला म्हणायचा. पण हे तंत्रज्ञान मला कुठेतरी आणखीन चांगले बनवता येऊ शकते असे वाटले. मुळातच दोन मोबाईल संच वापरायची गरज आहे का? दोन सिम कार्डांची गरज आहे का? हेच तंत्रज्ञान आणखी सोपे बनवता येईल काय? अथवा अशाच उपयोगाचे दुसरे काही बनवता येईल काय? मला स्वतःला या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याची भीती जास्त वाटते. आपल्याला एकत्र येऊन असेच काही उपकरण बनवता येईल काय?
भारतीयांना कमी खर्चाच्या अशा उपकरणांची खुप गरज आहे. शेती पंपांचे व्यवस्थापन, तंत्रज्ञानाधारीत शेती ही काही अशी क्षेत्रे आहेत जेथे आपण संशोधन करुन उत्पादकता वाढवू शकतो. आपल्या पैकी कोणाला हे तंत्रज्ञान विकसीत करायची इच्छा असल्यास आपल्याला नक्कीच काही सामुहिक प्रयत्न करता येतील. असे प्रयत्न करायची इच्छा असल्यास मला व्यक्तिगत निरोपाने संपर्क करा अथवा आपले विचार येथे मांडा.
Comments
उत्साहवर्धक
बातमी उत्साहवर्धक आहे हे नक्की.. मात्र् हे तांत्रिकदृष्ट्या नक्की कसे काम करते हे अजून लक्षात आले नाहि. मोबाईल फक्त चालु/बंद बटण (स्वीच) सारखा काम करतो किंवा कसे?
कुणाला तांत्रिकदृष्ट्या कार्यप्रणालीवरयाधिक प्रकाश टाकता येईल का?
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
बातमी नुसार
बातमी नुसार विचार केला तर कदाचित मोबाईल वरुन मोबाईलवर संपर्क होतो. त्यावरुन पुढे काही तंत्र आहे ज्याची चावी या मोबाईल्सच्या संपर्कात आहे. माझ्या डोक्यात जे विचार येतात ते असे ...
असेच म्हणतो
वाचलेल्या बातमीप्रमाणे -
मोबाईल रिंग केल्यास मोटर चालू/बंद होते याचा अर्थ हे अत्यंत प्राथमिक अवस्थेतले उपकरण आहे.
या प्रकारे वापर करण्यासाठी दोन सिम कार्डांची गरज आहेच. शक्यतो 'टाईम डिले रिले' या तंत्रावर हे उपकरण काम करत असावे.
रिंग होताच मोबाईलच्या व्हायब्रेटरमधून जो विद्युतप्रवाह वाहतो त्याचा वापर करून एक रिले (विद्युतनियंत्रित विद्युतकळ) सुरू होतो.
तो दुसर्या रिंगने बंदही होतो. अर्थात सुरू झाल्यानंतर काही काळ (जसे १० मिनिटे) आलेल्या रिंगच्या आदेशाला तो जुमानत नाही.
(टाईम डिले रिले). त्यानंतर रिंग केल्यास तो बंद होतो.
हे उपकरण बनवण्यास सोपे आहे आणि आता ७०० रु.ला हँडसेट मिळू लागल्यावर तर स्वस्तही. अर्थातच वीज नसल्यास त्याचा उपयोग नाही हे वेगळे कशाला सांगायला पाहिजे?
याहीपेक्षा उच्च तंत्रज्ञानावर आधारित रिमोट स्टेशन्स बनवली गेली आहेत ज्यात आपण वापरतो तो 'टीसीपी-आयपी ' प्रोटोकॉल वापरून सर्वर्स बसवलेली असतात. ही छोटी (टायनी) सर्वर्स उपकरणांकडून माहिती घेऊन ती नियंत्रक व्यक्तीला कळवतात. ती माहिती पाहून मग नियंत्रक व्यक्ती उपकरणांच्या प्रक्रियेत दूरनियंत्रणाद्वारे हवे तसे बदल करू शकते.
उदा. एखादी इंडक्शन फरनेस सुरू/ बंद करणे, तिच्या तापमानात फरक करणे या गोष्टी प्रत्यक्ष प्लांटवर न जाता दुरूनच करता येऊ शकतात.
प्रत्यक्ष संपर्क केबल अथवा बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे (जसे सीडीएमए / जीएसेम / डब्ल्यूसीडीएमए / अगदी व्हीसॅट वापरून) करता येऊ शकतो.
हे तंत्रज्ञान शेतीतही वापरता येते - जसे एखादा बागाईतदार आपल्या फ्लोरीकल्चर / टिशूकल्चर / ग्रीन हाऊसचे तापमान, दमटपणा, पाणीपुरवठा, सुरक्षा निरीक्षण इ.इ. घरबसल्या करू शकतो. फक्त सुरुवातीचा गुंतवणूक खर्च भरपूर येऊ शकतो.
धन्यवाद
विसुनाना, सविस्तर प्रतिसादा बद्दल धन्यवाद. कमी गुंतवणूक खर्च आणि जास्त उपयुक्तता हा निकष घेउन उपकरणे बनायला हवीत. त्या सोबतच सुरक्षीत सुद्धा...
फारच मस्त!
(बर्याच दिवसांनी) छान बातमी वाचायला मिळाली! असे मोबाईलचे अनेक उपयोग असू शकतील. अजून माहीती करून घेयला आवडतील.
विशेष
विशेष आश्चर्य वाटले नाही बातमी वाचुन. अश्या प्रकारचा प्रयोग २००२ मधेच औरंगाबादजवळील गंगापुर या गावी पाहिला होता. अन तेव्हाही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगचे बरेच् विद्यार्थी अश्या प्रकारचे प्रोजेक्ट करायचे. जसे होम ऑटोमेशन - संध्याकाळी एक एसेमेस पाठवुन् घरातील लागेल तेवढे दिवे चालु/बंद् करा. एसेमेस मधे जे टेक्स्ट असेल् ते इंटरप्रेट करुन योग्य ते दिवे/उपकरणे बंद चालु केले जातील् असे.
विसुनानांनी चांगले स्पष्टीकरण दिले आहे.
वा!
वा! आयडीयाची कल्पना आवडली :)
ऋषिकेश
------------------
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे
हिच तर गंमत आहे
हे प्रयोग हे प्रयोगच का राहातात? जर हवे ते सगळे कमी पैस्यात शक्य आहे तर ते सर्वांना उपलब्ध का नाही होत?
उदाहरण ?
>>जर हवे ते सगळे कमी पैस्यात शक्य आहे तर ते सर्वांना उपलब्ध का नाही होत?
यासाठी एखादे उदाहरण ??
हेच तंत्रज्ञान
हेच तंत्रज्ञान अजुन बातमी देण्या एवढे दुर्लभ आहे. असो, तु एखादे उदाहरण दे पाहू माझ्या म्हणण्याला छेद देणारे...
छेद !!
बातमी तर लोक आमचा चिंटु उच्चशिक्षणासाठी परदेशात गेला याचीही देतात हो. त्यामुळे त्याचे काही विशेष वाटले नाही असे लिहले होते.
इलेक्ट्रॉनिक्स किंवा एम्बेडेड्ड् इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमेशनमधले आत्ता तरी लगेच् लक्षात येत नाही.
विन सीई असलेले हँड हेल्ड टर्मिनल्स वापरुन मेडिकल रिटेल दुकानांवर जाउन ऑर्डरी नोंदवणारे सॉफ्टवेअर्स् मी लिहली आहेत.
जीपीआरएस वापरुन ती सॉफ्टवेअर्स मुख्य सर्वर्सशी जोडलेली असायची. (सॉफ्टवेअर सहित हँड हेल्ड टर्मिनल १० हजाराच्या आत)
शेती?
शेती अथवा तत्सम क्षेत्रात? १०००० रु. किमंत सर्व सामान्यांसाठी जास्त नाही वाटत?
नाही
नाही वाटत चाणक्य.
अन दो बिघा जमिनवाला शेतकरी अशा सुविधा मागत नाही. जसे मला मर्सिडीज घेणे शक्य नाही, पण माझ्या कंपनीच्या मालकाला प्रायवेट जेट घेणे शक्य् आहे अन त्याची बातमीही तो पुणे टाईम्स मधे छापुन् आणतो !!
मग आत्महत्या का?
मग आत्महत्या का होतात त्यांच्या?
जुनी बातमी
अश्या प्रकारचा प्रयोग २००२ मधेच औरंगाबादजवळील गंगापुर या गावी पाहिला होता. अन तेव्हाही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींगचे बरेच् विद्यार्थी अश्या प्रकारचे प्रोजेक्ट करायचे.
हो, ही बातमी फारच जुनी आहे, बातमीचे विशेष वाटले नाही.
-दिलीप बिरुटे
विशेष
बातमीचा दुवा विषेश वाटण्यासाठी नाहीच दिलेला. चर्चेचा मुद्दा आहे तो असे तंत्रज्ञान सुलभ, स्वस्तात आणि सुरक्षीत बनवुन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे. असो, बरेच मुद्दे लिहिता येतील पण विषयांतर नको म्हणून टाळतो.
उपक्रमावर अनेक तंत्रज्ञ आहेत, तसेच सर्व क्षेत्रातले सदस्य आहेत. त्यांच्या माहितीच्या देवाणघेवाणीने काही चांगले उत्पन्न झाले तर आम्हाला आनंद आहे. तुम्हाला नसेल कदाचित. त्यात आम्हाला विषेश नाही वाटत. काय? हे एक व्यासपीठ आहे त्याचा वापर आम्हाला करावासा वाटला. त्यात गैर ते काय ?
सहमत आहे
>> हे एक व्यासपीठ आहे त्याचा वापर आम्हाला करावासा वाटला.
सहमत आहे. माझे वरचे विधान "विशेष वाटले नाही" असे म्हणनारे फक्त आणी फक्त ते तंत्रद्न्यान सहज उपलब्ध आहे अशी माहिती असल्यामुळे होते. कृपया गैरसमज नसावा.
गैरसमज नाहीच
गैरसमज अजिबात नाही. या विषयावर विसुनानांनी व्य. नि. ने बरिच माहिती देऊ केली आहे. :) असे आणखी काही माहित असल्यास कृपया येथे द्यावे.
व्यासपीठाचा वापर
हे एक व्यासपीठ आहे त्याचा वापर आम्हाला करावासा वाटला. त्यात गैर ते काय ?
व्यासपीठाचा कोणी कसा वापर करावा या बाबतीत आम्ही सांगणारे कोण ? तेव्हा त्याचा आपण उत्तम वापर करत आहात असे अनेकांना वाटू शकते तेव्हा त्यात काही गैर नसावे.
चर्चेचा मुद्दा आहे तो असे तंत्रज्ञान सुलभ, स्वस्तात आणि सुरक्षीत बनवुन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे.
हम्म, चर्चेसाठी चांगला मुद्दा आहे, शुभेच्छा !!!
-दिलीप बिरुटे
बातमी आणि चर्चा विषय चांगला आहे.
बातमी आणि चर्चा विषय चांगला आहे. यात भर घालण्याजोगे माझ्याकडे काही नाही. पण तंत्रद्न्यानाचा कुशलतेने वापर तळागाळातल्या माणसाला करता यावा आणि तो स्वस्त असावा असे मला सुद्धा वाटते. खरेतर अभियांत्रीकिच्या विद्यार्थ्यांकडे असे नव-निर्माणाची बरीच उर्मी आणि क्षमता असते. व्यावसायीकांनी त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे. तसा उपयोग ते करतच असतील तर मला कल्पना नाही.
--लिखाळ.
धन्यवाद
धन्यवाद लिखाळ. भर घालायची इच्छा असल्यास तंत्रज्ञानाच्या उभारणीत मदत होऊ शकेल. याच तंत्रज्ञानात असे नाही. इतर काही कल्पना असतील तरीही लिहावे.
योग्य मत
मूलभूत विज्ञानाकडून उपयोजित तंत्रज्ञानाकडे हा प्रवास खर तर अपरिहार्य असतो. जर सुयोग्य झाला तर तरच तंत्रज्ञान तळागाळात पोहोचणार आहे. अभियांत्रिकी विद्यार्थ्या़त ही क्षमता नक्की आहे. बस कुणी तरी शाब्बासकी देण्याची व पाठीशी राहण्याची गरज आहे.
प्रकाश घाटपांडे
प्रेरणादायक
रेडीफमध्ये हे लेखन वाचले आणि भारतात असे प्रेरणादायक काम करणारे कोणी आहेत हे पाहून आनंद झाला.