एक योजना

नमस्कार मंडळी

गेल्या आठवड्यात काय झालं हे आपल्याला माहित आहे.. यातूनच एक भयंकर सत्य समोर आलं की सध्याच्या नेत्यांना देशापेक्षा त्यांच्या राजकारणातच जास्त रस आहे.
एकूणच सगळ्यावर मी आणि अदिती इतरांप्रमाणेच दु:खी होतो.. हे सारं करताना काहितरी करायला हवं हे जाणवत होतंच.. नक्की काय करावं हे मात्र समजत नव्हतं...यातूनच खरडा खरडी चालु झाली... हे सगळं बदलायचं तर आहेच.. पण कसं?
अनेक उपाय आहेत.. उपाय असु शकतील....पण कुठून तरी सुरूवात झाली पाहिजेच..

सुदैवाने लोकशाहिचा "बदल "हा पाया आहे. यासाठी कोणत्याहि यादवीची गरज नाहि.. गरज आहे एका मताची.. एका विचारपूर्वक दिलेल्या मताची..

पण हा विचार कशाच्या आधारावर करणार, आणि सगळे प्रतिनीधी इथून तिथून सारखेच!!... पण खरंच सगळे इथून तिथून सारखेच? आमच्या मते नाहि. लोकांना आपल्या मतदारसंघात निवडणूकीला कोण उभं आहे हे देखील माहित नसतं.. त्याची पात्रता तर सोडाच!!

मग लोकांना जर सहजतेने- विषेश कष्ट न करता -कळलं की मतदारसंघात कोण उभे आहे तर निकाल वेगळे लागू शकतात. या अश्या विचारांतून डोक्यात एक योजना उभी राहिली आहे.

प्रतिनीधींबद्दलची माहिती योजना

या अंतर्गत अशी वेबसाईट तयार केली जाईल ज्यात महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा/लोकसभा निवडणूकीसाठी कोण उभे आहे, आणि त्या प्रत्येकाची विस्तृत माहिती दिली जईल. या माहितीत ढोबळपणे: नाव, जन्मस्थान, घोषित मिळकत, घोषित स्थावर, पुर्वरेकॉर्ड, अनुभव आणि गुन्हेगारी रेकॉर्ड (खरंतर बोलता येणार्‍या भाषा ही , पण त्या गोळा कशा करणार?)!! थोडक्यात अशी माहिती ज्यावरून लोकांना त्यांचा निर्णय घेता येईल.

या योजनेचे मुख्यत्त्वे करून ४ भाग करता येतील
१. मराठी व इंग्रजी अश्या दोन भाषांत साईट बनवणे [तांत्रिक बाजू]
२. विदा संकलन (निवडणूक आयोगाकडून काहि माहिती प्रकाशित होते, त्याच बरोबर माहितीच्या अधिकारा अंतर्गत बाकीची महिती शोधणे)
३. विदा संगोपन (विदा वेळोवेळी अपडेटेड ठेवणे)
४. प्रचार आणि प्रसार

असे डोक्यात आले की नुसत्या साईटने काम होणार नाहि कारण शहरी भाग सोडल्यास इतरांना जालाचा ऍक्सेस नाहि.
त्यासाठी काहि पर्यायः
१. एकदा साईट बनली की या कामात वेगस्वेगळे एन्जीओ, प्रभावी व्यक्ती वगैरेंची मदत घेता येईलसे वाटते..
२. दुसरा पर्याय सध्यातरी टार्गेट ऑडीयन्स फक्त जालावरील मतदार ठेवायचा.. पुढचं पुढे

हा केवळ डोक्यात आलेला विचार आहे.. अधिक चर्चेने विस्तार करता येईलच. त्यासाठीच हा काथ्याकूट
अर्थातच हे काम एकट्याचे नाहि. तेव्हा

  • प्रत्येकाची मदत तर लागेलच
  • या शिवाय जर अशी सुविधा जालावर असेल तर पुन्हा करण्यात काहिच पॉइंट नाहि. तेव्हा अशी सुविधा पाहण्यात माहितीत असेल तर कळवा
  • मला या संबीधीचा कायद्याचा अँगल माहित नाहि. अशी माहिती गैरसरकारी व्यक्तीने / समुहाने देणे कायद्यात बसते का??.. हे कोणी शोधू शकले तर उत्तम

स्वाभाविक पुढे येणारा प्रश्नः हिच योजना का?:
कारण काहि नाहि.. कुठूनतरी सुरवात करायलाच हवी.. कोणतीतरी काडी उचलायलाच हवी.. तुमची काहि पुरक योजना असेल तरी हरकत नाहि. इथे जरूर कळवा. मात्र पूर्ण वेगळी योजना असल्यास कृपया वेगळा धागा सुरू करा म्हणजे दोन्हीस न्याय देता येईल.
एक नक्की की आता आपणहि काहितरी केलेच पाहिजे ही जाणीव प्रकर्षाने झाली आहे (असेल अशी अपेक्षा)..

इथे यावर ठोस आणि भरपूर चर्चा झाली कीपुढील संपर्कासाठी एक गुगल ग्रुप तयार केला आहे. ज्यांना वाटते त्यांनी विरोपाचा पत्ता (शक्यतो गुगल) मला विरोपातून कळवला की मी तुम्हाला ग्रुप मधे ऍड करेन

टीपः
या योजनेमधे कोणत्याहि संस्थळ-प्रशासनाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. मात्र प्रशासनातील व्यक्ती वैयक्तीक रित्या भाग घेऊ शकतात हे वे सां न ल

लेखनविषय: दुवे:

Comments

जागो रे

चांगला विचार आणि कृती आहे. पुढे जाण्या आधी हे जागो रे संकेतस्थळ पहा. शक्य असल्यास जागो रे च्या चमू सोबत काम करता आले तर पहा. याच ध्येयाने काम करणारे अनेक आहेतच. पण भारताच्या लोकसंख्येसमोर हि संख्या नगण्य आहे. माझे काही विचार पुढच्या काही प्रतिसादांमध्ये मांडतो आहे.





हेच म्हणणार होतो

'जागो रे' कडे सर्व साधने आहेत. तेव्हा त्यांच्याशी या विषयावर अधिक चर्चा करता येईल.
त्यांनी निवडणुकीच्या मतदार यादीपर्यंत आणि निवडणूक दिवसापर्यंत माहिती देण्याचे ठरवले आहे.
उमेदवारांबाबत माहिती असेल की नाही हे माहित नाही.
त्यांच्याशी विचारविनिमय करावा आणि आम्हालाही कळू द्यावे.

धन्यवाद

जागोरेबद्दल माहिती नव्हती. दुवा दिल्याबद्दल आभारी आहे.

----

प्रसार -प्रचार

जागोरे चा शक्य तेवढा प्रसार - प्रचार करणे हे देखील आपल्या खारीच्या वाट्या प्रमाणेच आहे.





सहमत

आहे. मीही याचा दुवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन.

----

जागोरे

धन्यवाद!
जागोरे हिच साईट बघूनच/बघतानाच हि कल्पना डोक्यात आली होती :) त्यांना काँन्टॅक्ट करता येईल का?/ करावा का ? / कसा करावा वगैरे वर चर्चा करता येईलच

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

पाठिंबा

योजनेला पूर्ण पाठिंबा आहे आणि शक्य ती मदत करण्यास तयार आहे.

----

+१

असेच म्हणते. शक्य ती सर्व मदत करीन.

लेख

ऋषिकेश, संघटना तयार करणे आणि चालवणे हे मोठे काम आहे. मग ते संकेथस्थळ संबंधीत का असेना. सुरुवात तर तु केली आहेसच. मला एक योजना सुचली आहे जी आपल्या सर्वांच्या आवाक्यातली आहे. लेख लिहा.
तु म्हणतोस त्या प्रमाणे कुठुन तरी सुरुवात करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण हे जाणतो की भारतातील लोकशाही, नेते इत्यादी अनेकदा कुचकामी ठरतात. १०० कोटी पेक्षा जास्त वेगवेगळ्या धर्माचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने नांदवणे वाटते तेवढे सोपे नाही. पण या अफाट लोकसंख्येला शिस्त लावणे अशक्य सुद्धा नाही. भारताला दुरदृष्टी असणारा राजकिय नेता नाही. दुरदृष्टी असलेले लोकं आहेत. पण ते राजकारणात नाहीत. या अफाट लोकसंख्येचे व्यवस्थापन हे येर्‍यागबाळ्याचे काम नाही. मुळातच लोकशाही म्हणजे काय? लोकांचे काम काय? लोकांचे अधिकार काय? आणि असेच अनेक मुद्दे आहेत जिथे लोकशिक्षणाची सर्वात मोठी गरज आहे. या संकेतस्थळांवर वावरणारे आपण अनेक विषयांवर लेखन करत असतो. वाचन करतो. पण हे लेखन-वाचन महाजालापुरते सिमीत राहाते. मला असे वाटते की उपक्रमासारखे संकेतस्थळ आहे, जिथे अनेक समुदाय आहेत. या घडीला राजकारण - समाजकारण समुदाय आपल्याला नक्कीच उपयोगी पडू शकतो. तु केलेल्या गुगल समुदायाचा वापर करून आपण विषय ठरवू शकतो. ते येथे जाहीर करून लेखन करू शकतो. त्यावर चर्चा करून एखादी लेखमाला तयार करू शकतो. उपक्रमावर तसेच महाजालावर अनेक वृत्तपत्र संबंधीत सदस्य आहेतच. मी त्यांना विनंती करतो की हे वृत्तपत्रांमध्ये छापण्यास मदत करावी. कशासाठी? तर वृत्तपत्र हे माध्यम सर्व थरातल्या लोकांपर्यंत पोहोचते. भारताच्या आजच्या गरजांची जाणिव ही लोकशिक्षणाच्या प्रयत्नातुन तळागाळा पर्यंत जाणे गरजेचे आहे आणि वृत्तपत्र हे त्यासाठी प्रभावी माध्यम आहे. तसेच हे लेख विरोपाच्या माध्यमातुन पाठवता येतील. मुद्रीत करुन आपपल्या मित्रमंडळात/नातेवाईकांच्यात वाचून दाखवता येतील.

भारतात गरजेचे आहे ते लोकशिक्षण. विविधतेत एकतेचे गोडवे गाण्याची नसती सवय लागलेल्या लोकांना हि जाणिव करून देण्याची गरज आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विविधतेत असलेले अवगुण, कमकुवत मुद्दे अगदी ठळक दिसतात. त्याचा वापर समाज कंटक, राजकिय नेते आणि आंतरराष्ट्रीय समुह त्यांच्या फायद्यासाठी कसा करुन घेतात हे जाणवून देणे गरजेचे आहे. असे नाही केले तर भारतातील राज्यघटना ही मुठभर लोकांच्या हातात जाऊन आपण त्यांचे गिनीपीग बनण्याशिवाय काहीच करु शकणार नाही.





वाचायला हवे

योजना चांगली आहे. जागो रे बद्दल वाचायला हवे. वाचून अधिक लिहिता येईल. तूर्तास, अशा आधीच स्थापन झालेल्या संस्थांना हातभार लावणे योग्य वाटते.

मदतीला तयार आहे

तुमची योजना एकदम योग्य आहे. जागो रे मीही पाहिले आहे. मात्र त्यात उमेदवाराचा गुन्हेगारी पूर्वेतिहास इ. बाबी नाहीत. यासंबंधात अधिकाधिक लोकांपर्यंत तुमचे म्हणणे जावे आणि संघटनांनी मदत करावी, यासाठी आमच्या वृत्तपत्रातून प्रसिद्धी देण्यास मी तयार आहे.

मस्त - लागा कामाला

हे मस्त आहे. आपले आणखी काही पत्रकार/संपादक मित्र असतील तर त्यांची मदत घेता येईल काय?





नक्कीच.

होय. नक्कीच. आणखी इतरत्र बातमी जावी, यासाठी संपर्क देईन.

अनेक आभार

अरे वा! यामुळे प्रचारात खूपच हातभार लागू शकतो. अनेक आभार डीडी!

ऋषिकेश

चांगली योजना

काही मदत करू शकल्यास सांगा - प्रचार-प्रसार तर करताच येईल.

जागोरे बद्दल माहिती मिळाली - धन्यवाद. याचाही प्रचार-प्रसार केला पाहिजे.

आभार

या चर्चेसाठी आणि जागो रे च्या दुव्यासाठी सर्वांचे आभार! चर्चाप्रस्तावासाठी ऋषिकेश यांचे विशेष आभार! ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापल्या अनुदिनीवर हा मुद्दा नियमित प्रकाशझोतात ठेवला तर बरेच काही साध्य होऊ शकेल.

स्नेहांकित,
शैलेश

प्रकाशन

आता या विषयावर चांगले प्रतिसाद जमा झाले आहेत. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱया सदस्यांनी आपली छायाचित्रे व माहिती पाठविल्यास उत्तम होईल. त्यानुसार ती आमच्या वर्तमानपत्रात प्रकाशित करता येईल.

इथे पाहा

इथे सध्याच्या खासदारांची यादी आहे. त्यांच्याबद्दलच्या माहितीसाठी स्वतंत्र पाने देखील आहेत. हीच माहिती अद्ययावत करता येईल. इथे माहिती कुणीही भरू शकते, पाहू शकते. यातील बदलांवर लक्ष ठेवता येणे देखिल शक्य आहे.
अशीच यादी उमेदवारांबद्दल बनवता येऊ शकते. हवीच असल्यास स्वतंत्र विकिया बनवता येईल.

माहिती देण्यासाठी च्या संकेतस्थळाबद्दलचे प्रश्न या आधीच उपलब्ध असलेल्या पर्यांयामुळे सुटले असे मानावयास हरकत नाही.

 
^ वर