कोळ्याचे जाळे

कधी वाटते आपले शत्रू कोळ्यासारखे आहेत - त्यांचे जवळजवळ अदृश्य जाळे दूरवर पसरले आहे.
कधी अगदी उलट वाटते - जाळे विणले आहे आपल्या संरक्षकांनी, त्यांना पकडण्यासाठी. पण जाळ्याच्या वेड्यावाकड्या विणीमधून ते निसटत आहेत.
इतक्या विरोधाभासी उपमा सुचवणे चित्रविचित्र निसर्गच जाणे, आणि त्या सुचणे कुढणारी कल्पनाशक्तीच जाणे.

alternate
कोळ्याचे जाळे

एक्सिफ माहिती :
कॅमेरा : कॅनन पावरशॉट एस.एक्स. १०० आय.एस
एक्स्पोझर : १/२५ (प्रतिमा स्थिर करणार्‍या भिंगामुळे असल्यामुळे हे जमले!)
छिद्रमान : f/४.३
केंद्रीभवन लांबी : ६० मिमि
आय.एस.ओ. : २००

लेखनविषय: दुवे:

Comments

तर कधी कधी

सुंदर छायाचित्र...

कधी वाटते आपले शत्रू कोळ्यासारखे आहेत - त्यांचे जवळजवळ अदृश्य जाळे दूरवर पसरले आहे.
कधी अगदी उलट वाटते - जाळे विणले आहे आपल्या संरक्षकांनी, त्यांना पकडण्यासाठी. पण जाळ्याच्या वेड्यावाकड्या विणीमधून ते निसटत आहेत
.

तर कधी कधी वाटू शकते की इतके छान जाळे विणून त्यात कोळ्याचीच तर अडकून फसगत झालेली नाही ना...

एका कोळियाने...

विणलेले हे जाळे आणि त्याचा हा फोटो मस्तच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

छान

चित्र आणि त्यामागचे विचार दोन्ही सुंदर. इथे डॉकिन्स आठवले.

"Impressed as we may be by the caddis house, we are nevertheless, paradoxically, less impressed than we would be by equivalent achievements in animals closer to ourselves. Just imagine the banner headlines if a marine biologist were to discover a species that wove large, intricately meshed fishing nets, twenty dolphinlengths in diameter! Yet we take a spider web for granted, as a nuisance in the house than as one of the wonders of the world."

--The Selfish Gene, pp. 239.

------------------------------------------------------------------------------------------------

मैं हूँ उनके साथ,खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

कभी नही जो तज सकते हैं, अपना न्यायोचित अधिकार
कभी नही जो सह सकते हैं, शीश नवाकर अत्याचार
एक अकेले हों, या उनके साथ खड़ी हो भारी भीड़
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

निर्भय होकर घोषित करते, जो अपने उदगार विचार
जिनकी जिह्वा पर होता है, उनके अंतर का अंगार
नहीं जिन्हें, चुप कर सकती है, आतताइयों की शमशीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

नहीं झुका करते जो दुनिया से करने को समझौता
ऊँचे से ऊँचे सपनो को देते रहते जो न्योता
दूर देखती जिनकी पैनी आँख, भविष्यत का तम चीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

जो अपने कन्धों से पर्वत से बढ़ टक्कर लेते हैं
पथ की बाधाओं को जिनके पाँव चुनौती देते हैं
जिनको बाँध नही सकती है लोहे की बेड़ी जंजीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

जो चलते हैं अपने छप्पर के ऊपर लूका धर कर
हर जीत का सौदा करते जो प्राणों की बाजी पर
कूद उदधि में नही पलट कर जो फिर ताका करते तीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

जिनको यह अवकाश नही है, देखें कब तारे अनुकूल
जिनको यह परवाह नहीं है कब तक भद्रा, कब दिक्शूल
जिनके हाथों की चाबुक से चलती हें उनकी तकदीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

तुम हो कौन, कहो जो मुझसे सही ग़लत पथ लो तो जान
सोच सोच कर, पूछ पूछ कर बोलो, कब चलता तूफ़ान
सत्पथ वह है, जिसपर अपनी छाती ताने जाते वीर
मैं हूँ उनके साथ, खड़ी जो सीधी रखते अपनी रीढ़

-- हरिवंशराय बच्चन

काच

अमराठी व्यक्तीने हे चित्र काचेच्या तावदानावर आपटलेल्या दगडाप्रमाणे वाचले.

याहुन जास्त सुंदर फोटो घ्यायला जमला असता

धनंजय यांना याहुन जास्त सुंदर फोटो घ्यायला जमला असता असे वाटते खरे.

अवांतर - माझ्या एका बाल्टीमोरच्या डॉक्टर मित्राने हा कोळी जाळे फोटो पाहीला असता तर बहुदा अशी कॉमेंट् आली असती - कोळ्याचे जाळे फाटले असल्याने फोटोचा फोकल पॉइंट बदलला आहे, जसे पाण्यात एका बिंदु पासुन तरंग गोलाकार मोठा होतो तसे कोळी मधे व ते बाजुला मोठे जाळे आले असते तर अजुन आकर्षक दिसले असते. निदान पटकन तेवढे जाळे स्वता विणुन किंवा कोळ्याला सांगुन मग तो फोटो घ्यायला हवा होता. (मी तर पटकन व्हॅक्युम क्लिनरने कोळ्याच्या जाळ्यात अडकलेले ते पांढरे डागसदृष् जळमट देखील काढले असते.) माझ्याकडे कोळ्याचे जाळे विणणारे धागे व सुई आहे. कोणास माहीती पाहीजे असल्यास पुण्यात कुठे मिळते ते सांगीन. आशा आहे की कोळ्याच्या पुर्वपरवानगीने फोटो प्रकाशित. ;-) कृ. ह. घ्या.

ज ब री!!!

ज ब री!!!
खल्लास हाणला रे सहजा!!

आपला
गुंडोपंत

माझा बाल्टीमोरचा एक डॉक्टर मित्र

सहज यांचा बाल्टीमोरचा डॉक्टर मित्र आणि माझा बाल्टीमोरचा एक डॉक्टर मित्र हे दोन्ही वेगेवेगळे दिसतात.
माझ्या बाल्टीमोरच्या डॉक्टर मित्राने हा कोळी जाळे फोटो पाहीला असता तर बहुदा अशी कॉमेंट आली असती ;) -

हे चित्र कातरल्यावर जितके चांगले दिसते, तितके न कातरता चांगले दिसले नसते. कातरण्याचा निर्णय उत्तम.

एका बाजूला कोळी असलेला फोटोच मला योग्य वाटतो - या बाबतीत सहज यांच्याशी असहमत.

जाळे फाटले असल्याचा भास मलाही झाला - या बाबतीत सहज यांच्याशी सहमत. पण हा प्रकार भलताच कठिण आहे. इतका नैसर्गिक फोटो घेताना न फाटलेले परफेक्ट गोलाकार जाळे येऊ शकत नाहीत. जाळ्याचा कोणता भाग सर्वात कमी "फाटलेला" हा निर्णय करावा लागतो.

फोकस बदलून कोळी डाव्या एक तृतियांश बिंदूवर केंद्रित केला असता तर बरे झाले असते, असे मला वाटते. माझ्या मते तरी जाळ्याचे नैसर्गिक वाटणे आणि जाळ्यात एका विविक्षित ठिकाणी कोळीही असणे हे चित्राचे मुख्य आकर्षण आहे. जाळ्यात असलेले पांढरे डाग आऊट-ऑफ-फोकस झाले तर चांगलेच आहे - शिवाय उजव्या खालच्या कोपर्‍यात चित्र ओव्हर एक्स्पोज झालेले आहे हे लक्षात येणार नाही.

सर्वांनीच हलकेच घ्यावे.

:) माझाही एक बाल्टीमोरचा मित्र

माझ्याही एका बाल्टीमोरच्या मित्राने हा फोटो पाहिला असता तर म्हणाला असता की, कोळ्याचे जे पाय दिसतात तितके ते स्पष्ट येण्यासाठी कोळ्याला फोटोच्या मधोमध घेतले पाहिजे होते, म्हणजे त्यामुळे जाळ्यात दिसत असलेले गाठ मारावे तसे ते जे डाग दिसत आहे ते दिसले नसते. चित्राचे रिझोल्युशन पाहता ऐंगल ( अ वर अर्धचंद्र कसा द्यायचा ) आणि फोकस लेन्थ वाढवला असता तर चित्र अधिक खूलून दिसले असते. तसे चित्र ङाव्या बाजूला कातरले तर चित्र अधिक सुंदर दिसले असते. सारांश चित्र सुंदर काढले आहे. ;)

-दिलीप बिरुटे
(बाल्टीमोरच्या मित्राचा फॅन)

.

छायाचित्र अजून शार्प जमले असते असे वाटते.
-
ध्रुव

कल्पना

सदर जाळे हे होस्टेल मध्ये कॉटच्या वरती झाल्यास मी ते जाणीव पुर्वक जतन करी. त्यात डास अडकत. कोळी तो अडकलेला डास कसा साठवत असे हे बघण्यासारखे असे. त्याचा फोटो काढला असता तर किती बरे झाले असते असे वाटुन जाते.
कोळी आपल्याला चावला तर आपला स्पायडरमॅन व्हावा अशी सुप्त इच्छा मनात असणारा
प्रकाश घाटपांडे

 
^ वर