उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मुंबई हादरली
अभिजित
November 27, 2008 - 2:59 am
अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात ८० जण ठार..
जवळ जवळ प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर ही बातमी आहे.
मुंबई पोलीस दलाचे तीन मोहरेही यात शहीद झाले. सकाळमध्ये त्यांच्याबद्दल सविस्तर वृत्त आहे.
विलासरावांनी याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. नेहमीसारखा.
अभिजित..
सदर चर्चेवर लोकांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि यापुढे चर्चेला कोणतेही अनिष्ट वळण लागू नये. अफवा पसरू नयेत, चिथावणी मिळू नये यासाठी काही प्रतिसाद अप्रकाशित केले जात असून या चर्चेवरील नवे प्रतिसाद काही काळ राखून ठेवले जात आहेत याची सदस्यांनी नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.
Comments
म्हणजे कुठे?
काही दिसत नाही. तिथेही दहशतवादी कार्यवाही सुरु आहे का?
एरर
Unsupported database type
असे दिसते आहे.
हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.हि घ्या देवनागरी अक्षरे.
आता कृती हवी
अशा घटना घडल्या कि ये रे माझ्या मागल्या प्रमाणे चर्चा, निषेध होतात. काही काळ गेला कि पुर्ववत. पोलिस , शासन यांना जबाबदार धरले जाते. पण असंतोषासमोर जगातील कुठलीही सुरक्षा व्यवस्था ही थिटी पडते ही वस्तुस्थिती आहे. शांतता काळात सतर्क राहणे होत नाही. सुड प्रतिसुड चक्र फिरते आहे.त्यात सगळेच भरडले जाताहेत. कुणी सुपात आहेत तर् कुणी जात्यात. इलाज तात्पुरता होतो पण समस्या कायम राहतात. अर्थात इलाजाचे महत्व हे स्वतंत्र आहेच. त्याची समस्येच्या निराकरणाशी सांगड आहेच. पण ती तात्पुरती सोडवणुक म्हणुन.
१) आपत्कालीन व्यवस्थापन
२) मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन
३) सामाजिक असमतोल
या गोष्टी अशा घटना घडल्या की प्रकर्षाने जाणवतात.
प्रकाश घाटपांडे
धर्म निरपेक्ष
धर्मनिरपेक्ष देशात असली कृती हवी? समान नागरी कायदा अजुन होउ शकला नाही. कृती कसली होणार? मरणाकडे वाटचाल करणारा देश. जगातली सर्वात मोठी लोकशाही जी अतिरेक्यांचे खेळणे आहे. संसदेवर हला झाला त्यांना अजुन फाशी नाही आणि कसल्या कृतीची अपेक्षा करता?
वाईट झालं
धक्क्यांवर धक्के बसले. घरातले सुखरूप आहेत त्यामुळे त्यातल्या त्यात समाधान आहे.
इथले सर्व आणि सर्वांचे नातेवाईक सुखरूप असू दे.
-राजीव.
:(
"त्यांच्या" हाती एके४७ आणि "आपल्या" शूरांकडे लाकडी दांडके नाहितर गावठी पिस्तूल बघून काळजात गलबललं+धस्स झालं + वाईट वाटलं+राग आला+........
एकूणच काहि सुचत नाहि आहे :(
या "थंड" (का मुर्दाड?) समाजव्यवस्थेमुळे आणि त्यातूनच जन्मलेल्या सरकारी धोरणांमुळे गेलेल्या सर्व बळींच्या दु:खात सहभागी आहे
(सुपातला) ऋषिकेश
अगदी असेच
पोलिसांना साध्या गणवेशात काहीही संरक्षण न घेता बंदुका घेतलेले पाहून थक्क व्हायला होते. सीएनएनचा दुवा
किती वर्षे लागणार, सुधारणा व्हायला?
शीर्षक - मुंबई पुन्हा हादरली असे हवे.
शीर्षक - मुंबई पुन्हा हादरली असे हवे.
मार्च १९९३, जुलै २००६, नोव्हे २००८ मुंबई पुन्हा पुन्हा हादरली. यापुढे किती वेळा हादरेल कल्पना नाही.
दरवेळी प्रमाणे पोलीस, राज्यकर्ते यंव करु त्यंव करु, मृतांना नुकसान भरपाईच्या घोषणा इ. इ. मधे सारवासारव होईल.
स्वार्थी राजकारणी, निष्क्रिय पोलीस केवळ आपल्या स्वार्थात मग्न. व खरा विकासीत देश, समाज हे ध्येय कोणापुढेच नाही. परिस्थीती इतक्यात् बदलणार नाही. सर्वच पक्ष व सरकारी संस्था इदं न मम म्हणून ही जबाबदारी टाळतात.२००१ मधे संसदेवर हल्ला झाला असता एक आशा वाटली होती की सर्व राजकीय पक्ष निदान आता तरी दहशतवादाताचा योग्य बिमोड करण्याचे मनावर घेतील पण .... अजुन असे काही हल्ले झाले तर कदाचित ह्या निद्रिस्त सरकारी व्यवस्थेत कोणाला तरी जाग येउन परिणामकारक उपाययोजना होईल अन्यथा गेट् युज्ड् टु इट्, इफ यु हॅव्ह नॉट ऑलरेडी.
सामान्य लोकांना ना कसले अधिकार, ना मतदान करताना लायक पक्ष की जो ही परिस्थीती बदलू शकेल. त्यामुळे केवळ जागरुक रहाणे एकमेकांना मदत करणे इतकेच करु शकतात. पण हे सगळे असे हल्ले टाळायला पुरेसे नाही.
हे असेच घडणार.
इंग्रजांनी आपल्यावर १५० वर्षे राज्य केले व ते भारताच्या दृष्टीने काही बाबत कसे बरे होते, याचा भविष्यात उहापोह होईलच. त्याप्रमाणे दहशतवाद्यांमुळे भारताला सुरक्षाव्यवस्था कशी शिकावी लागली व मजबुत करावी लागली. पुढे मागे पाकिस्तान व दहशतवाद्यांना धन्यवाद् द्यावे लागतील की त्यांच्या मुळेच सुरक्षेबाबत जागरुक झालो.
आता ही परिस्थीती आता बदलायची असेल तर ते काम बहुतेक दहशतवादीच करु शकतील. पुर्वी बॉम्बस्फोट घडवुन आणणे ही एक प्रचलित पद्धत झाली होती. आता हा नव्या जमान्यातील अतिरेकी अजुन विकृत झाला आहे व हल्ले अजुन भीषण होत आहेत. ही काही एखादी दुर्देवी "घटना" नाही हे एक युद्धच आहे हे केवळ अतिरेकीच आपल्या सर्कारी व्यवस्थेला समजवुन देउ शकतील. तुम्ही आम्ही कितीही ओरडलो तरी फारसा उपयोग होणार नाही कोणा शिवराज, कोणा विलास्, कोण्या आबावर. देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय, राजकारण, समाजकारण या सर्व पातळीवर हे युद्ध आपल्याला आज ना उद्या लढावेच लागेल. अमेरिकेवर ९/११ यायची पाळि आली तोवर अमेरिका देखील दहशतवादाबद्दल तितकी जागरुक नव्हती. केवळ आपला फायदा बघत होती. निदान ह्या हल्ल्याने भारताची सुरक्षानीती व कारभार अजुन कार्यक्षम व्हावे ही अपेक्षा.
ही एक दीर्घ काल चालणारे युद्ध आहे व ते आता आपल्याला गंभीरपणे खेळलेच पाहीजे.
....
प्रतिक्रिया देण्याच्या मनःस्थितीत नाही. आपल्या सगळ्यांच्या भावना/विचारांशी सहमत.....
फरक
आत्तापर्यंत मुंबईत झालेले बाँबस्फोट आणि आत्ताचा प्रकार यात फार मोठा फरक आहे. आत्ता जे चालू आहे (अजूनही संपलेले नाही) त्याला युद्ध म्हणणे जास्त योग्य ठरेल.
एनडीटीव्ही दुवा
----
होय.
होय. मी माझ्या निवासस्थानी असता सुमारे १०.३० रा|| वाजता अचानक ध्वम् असा ध्वनि झाला. ओबेरोय् (आतांशा त्यास ट्रिडेण्ट् असे म्हणतात) रेस्टोरेण्ट् जे माझ्या खिडकीतून दृश्यमान आहे, त्याजवळून हा ध्वनि आला. आरंभी वाटले जशी एखादी इमारत कोसळावी तसे. परंतु लगेचच पळापळ पाहिली आणि साक्षात्कार झाला की येथे साक्षात मनुष्याचा हस्तक्षेप असावा. रात्रभर आणि सकाळीही विविध ध्वनि ऐकावयास मिळत आहेत. (पोलिस, इतरेजन, बंदुकांच्या फैरी, उदजनध्वम् इ.इ.इ.)
हेमंत करकरे हे अतिशय सज्जन मराठी गृहस्थ म्हणून अंतर्वर्तुळात प्रसिद्ध होते. त्यांच्या बलिदानाचा शासनाला यथावकाश विसर पडेलच. त्याबद्दल आधीच शासनाचा धिक्कार करतो.
सुदैवाने आम्ही हैयैयो मंडळी सुखरूप आहोत.
हैयो हैयैयो!
उषःकाल होता होता
ही परिस्थिती पुन्हा एकदा उषःकाल होता होता काळरात्र झाली या गाण्याची आठवण करुन देते.
जबाबदार कोण हा प्रश्न सोडवण्यासाठी चिरिमिरी देणार्या आणि घेण्यार्या माणसांनी आत्मपरिक्षण करायला पाहिजे.
कुणाचे तरी प्रसिद्ध वाक्य आठवते...इन डेमोक्रसी पिपल गेट व्हाट दे डिजर्व.
अभिजित...
ता. कर्हाड जि. सातारा.
अगदी खरे आहे
आता फक्त हे मूठभर दहशतवादी दिसताहेत. त्यांच्याबरोबरच किनाऱ्यावर लाच खाऊन सोडणारे कर्मचारी... तपासणी न करणारे कस्टम अधिकारी, सुरक्षा रक्षक सगळ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥