डे लाईट सेविंग टाईम म्हणजे ?

डे लाईट सेविंग टाईम म्हणजे काय ? या बद्द्ल जरा सारासार माहीति हवी आहे...
नेमके याचा अर्थ काय आणी भुगोलाशी हे कसे सल्लग्न आहे ? मीत्रानो जरा या बद्दल अधिक माहिति द्या.

लेखनविषय: दुवे:

Comments

डे लाईट सेविंग टाईम

युरोप, अमेरिका आणि जगातील काही अन्य भागांतही वसंत ऋतूच्या दरम्यान घड्याळे रोजच्या वेळेच्या १ तास पुढे करून शरद ऋतूच्या दरम्यान ती एक तास मागे करण्याची पद्धत आहे. असे करण्याची अनेक कारणे सांगितली जातात. तरी, सर्वसामान्य लोकांना आवडणारे मुख्य कारण - उत्तरेकडील भागांत उन्हाळा किंवा चांगले हवामान हे कमी काळ असल्याने या काळात दुपार आणि संध्याकाळच्या वेळी अधिक सूर्यप्रकाश रहावा आणि प्रत्येक दिवसाचा आनंद लोकांना घेता यावा हे आहे. लोक या काळात संध्याकाळचा मोकळा वेळ मैदानांत, बागेत, पार्कांत घालवतात.

बाकी अनेक कारणे दिली जातात जसे, डे लाईट सेविंग टाईम पाळल्याने उर्जेची बचत होते, मानसिक स्वास्थ्य टिकून राहते, गुन्ह्यांचे प्रमाण कमी होते, रस्त्यांवरील अपघात कमी होतात वगैरे वगैरे वगैरे. एका तासाने यांत नक्की किती आणि कसा फरक पडतो त्याची आकडेवारी माझ्याकडे नाही. ही कारणे खोडून काढणारा विदाही उपलब्ध असावाच.

आमच्या राज्यांत काही शेतकर्‍यांकडून ऐकलेली एक गोष्ट म्हणजे - गाईंचे दूध काढताना बाहेर प्रकाश नसेल तर काळोखात त्या दूध कमी देतात. :-) खरे खोटे माहित नाही पण डे लाईट सेविंग टाईमचा आग्रह धरण्यात शेतकर्‍यांचा मोठा भाग असतो. इंडिएनाच्या राज्यात २००६ च्या पूर्वी डे लाईट सेविंग पाळण्याची प्रथा नव्हती. माझ्यामते त्यावेळी ऍरिझोना आणि इंडिएना ही दोन राज्येच ही प्रथा पाळत नव्हते. (चू. भू. दे. घे.) परंतु, २००६ नंतर इंडिएनात DST पाळण्यात येऊ लागला.

व्यक्तिशः, मला हा प्रकार कधीच आवडला नाही. विशेषतः थंडीत दुपारी साडेचारला होणारा अंधार वैताग आणतो आणि उन्हाळ्यात रात्री दहापर्यंत असणारा प्रकाश चकित करतो पण आता सवय झाली आहे.

:)

>व्यक्तिशः, मला हा प्रकार कधीच आवडला नाही. <
मग काय तर ! भारतात फोन करायच्या सर्व वेळा बिघडून जातात.
--लिखाळ.

अमेरिकनांना

मग काय तर ! भारतात फोन करायच्या सर्व वेळा बिघडून जातात.

हो हे तर राहूनच गेलं. अगदी महत्त्वाचं कारण आहे.

पण अमेरिकनांना असा बदल आवडतो असे पाहिले आहे. कालच एक मैत्रिण आनंदाने सांगत होती की "सकाळी उठले तर बाहेर चक्क प्रकाश... इतकं बरं वाटलं." (पण संध्याकाळी ५ वाजता रात्र होणार त्याचं काय?)

थोडक्यात

सकाळी उठले तर बाहेर चक्क प्रकाश... इतकं बरं वाटलं.

थोडक्यात उशीरा उठायला आवडतं. (तेवढंच जास्त वेळ झोपल्यासारखं)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

स्प्रिंगमधे...

थोडक्यात उशीरा उठायला आवडतं. (तेवढंच जास्त वेळ झोपल्यासारखं)

खरं आहे, पण ते फॉलमधे... स्प्रिंगमधे एक तास झोप कमी होते त्याचे काय? :-)

बाकी एक तास मागे - पुढे कधी होतो या बद्दल लक्षात ठेवण्यासाठीचे एक वाक्यः fall back, spring forward.

पाकिस्तानातील प्रयोग

जनरल मुशर्रफ सत्तेवर असताना पाकिस्तानात डेलाइट सेविंग टाइमचा प्रयोग झाला होता (व अजूनही बहुधा तो चालू आहे - पण याबद्दल खात्री नाही) असे पाकिस्तानी वर्तमानपत्रांत वाचल्याचे आठवते.

पाकिस्तानात असे प्रयोग करायला काही कारण/ गरज होती का? मानसिक स्वास्थ्य (जगाचे) ठीक राहावे आणि गुन्हेगारी कमी व्हावी म्हणून तर नसेल. ;-) ह. घ्या.

डेलाईट सेव्हिंग

डेलाईट सेव्हिंग संबधी आमचे काही विचार इथे वाचा!

आसाम

हे वेळेतील बदल मलाही आवडत नाहीत.

पण असेच वडिलांकडून ऐकले आहे की आसाममध्ये सुद्धा (टी) गार्डन टाईम म्हणून असे. तिथेही चार साडेचार नंतर अंधार होतो.

आई शप्पत

च्यायला sssssss.... तुम्हि लोकांनी चक्क विषयाचे धागे दोरे काढले.. कचरा केला...
माहीती बद्दल सर्व जानकारांचे आभार.

 
^ वर