उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मासिके व पुस्तके
निनाद
November 1, 2008 - 11:51 pm
मासिके व पुस्तके
आजच मला आलेल्या दुव्यानुसार मराठी मासिकांसाठी माय इ मॅगेझिन्स हा दुवा उपलब्ध झाला आहे.
येथील नवी व जूनी सर्व मासिके जालावरच वाचता येतात. मात्र आपल्याला उतरवून घेता येत नाहीत.
दुवा: http://www.myemagazines.com/
तसेच मराठी व इंग्रजी पुस्तकांसाठी
ग्रंथायन या संस्थेने आता आंतरजालावर सेवा सुरु केली आहे.
त्यांचा दुवा पुढील प्रमाणे
ग्रंथायन: http://www.granthayan.com/marathi/services.aspx
या दुव्यावर त्यांनी लेखकांना संपुर्ण आर्थिक पारदर्शकतेची हमी दिली आहे. मला वाटते हा लेखकांसाठी मोठा आधार आहे. अन्यथा लेखकांना किती आवृत्त्या नक्की निघाल्या आणि खपल्या हे अनेक प्रकाशकां कडून कधी कळतच नाही.
आशा आहे की ग्रंथायन आणि माय इ मॅगेझिन्स हे इतर भारतीय भाषांमध्येही विस्तारेल आणि ते उद्याचे ऍमेझॉन असेल.
दुवे:
Comments
अतिसुंदर
आम्हाला ही कळत नाही. मानधनाचा कधी विषयच निघाला नाही मनोविकास कडे. अर्थात आम्ही ही गेलो नाही. त्याचा करारनामाही झाला नाही. अशीच तोंडी परवानगी. आपले उपक्रमावरील ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... मला ग्रंथायन वर दिसले. चला लोकांपर्यंत पोहोचत आहे याचेच समाधान.
प्रकाश घाटपांडे
अनेक आभार!
वा! अतिशय उपयुक्त दुवा! अनेक आभार!! :)
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
प्रकाशन व्यवसाय
दोन्ही दुव्यांबद्दल आभार.
ग्रंथायनवर दिसले की ते पुस्तक प्रसिद्धी आदीसाठी १०००० रूपये शुल्क घेतात. यावरून एक प्रश्न पडला की इतर प्रसिद्ध प्रकाशन संस्थांचा कारभार नक्की कसा चालतो?