माझी माऊ

माझ्या मोबाईलने मी माझ्या माऊचा फोटो काढला आहे. त्या माऊच्या विषयी आपण इथे सविस्तर वाचू शकता.

हा मोबाईल सोनी एरिक्सन डब्ल्यु २०० आय आहे ज्यात व्हीजीए गुणवत्तेचे फोटो काढता येतात.

दुवे:

Comments

छान

छान आहे मऊ...
अगदी अशाच रंगाची एक चादर आमच्याकडेही होती.
व्हीजीए गुणवत्तेचे फोटो म्हणजे काय असते?

आपला
गुंडोपंत

मला

व्हीजीए गुणवत्तेचे फोटो म्हणजे काय असते?

फारशी कल्पना नाही. कारण मी मोबाईल खरेदीला गेले तेव्हा मी फोटोचे विभेदन (resolution) किती असेल असे विचारले तेव्हा विक्रेती म्हणाली की फारसे नसेल कारण सर्वसाधारण मोबाईल व्हिजीए गुणवत्तेचेच फोटो काढू शकतात.

अगदी अशाच रंगाची एक चादर आमच्याकडेही होती.
Great minds have similar accessories ;)
___________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

छान

छान आहे माऊ...

बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

छान

माऊ आवडली!

----

तुम्ही म्हणता

ते खरे आहे, माऊ छानच आहे माझी. पण इतरांकडून तिचे कौतुक ऐकले की मुठभर मांस चढल्यासारखे वाटते. मनात गुदगुल्या होतात.

ता.क. परत आत्ता पाहिले तर माऊच्या डाव्या डोळ्यात दिव्याचे प्रतिबिंब दिसते.
___________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

माऊला अंघोळ

माऊला अंघोळ घालून थोडीशी टाल्कम पावडर आणि लिपस्टीकही लावलेली दिसते. माऊची नखं वेळच्या वेळी साफ करून नेल-कटरने कापून, तासून काढलेली दिसतात. अशी माऊ आवडणारच सर्वांना. मलाही आवडली.

- राजीव

आणि ;-)

आय-लाईनर पण लावलेले आहे. छे बुवा, यु नो, हल्ली आमची पार्लरवाली इतकी महाग झालेली आहे की मांजराच्या पेडिक्युअरसाठी ७०० रुपये लावते. धिस इज सो मीन, आय टेल यू.
_________________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

अफलातून निरिक्षणशक्ती

मानले बुवा आपल्याला... :) :D

पण माझा सर्फचा कारखाना नाही. ;)
_______________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

गमतीदार

माऊ गमतीदार वाटली...

फोटू आवडला

मी रुढार्थाने मार्जारप्रेमी खरतर पाळीवप्राणीप्रेमी - नाहि
तरी माऊचा फोटू आवडला

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

आवडला

माहितीपूर्ण लेखांच्या गर्दीत माऊचा गोंडस फोटो मनाला थोडा विसावा देतो.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

गोंडस

गोंडस आहे मनीमाउ. गावी असताना चुलीत राखेत जाउन बसायची. चुल पेटवताना पहाटे उठायची. साप विंचुपण मारायची. रात्री पांघरुणात येउन पायवर वेटोळे करुन झोपायची.मनी आणी सखी अशा मायलेकी होत्या. पण मला बाबा भुभुच जास्त आवडते.
(भुभार्डा)
प्रकाश घाटपांडे

माऊ चा फोटो

छान् आहे माऊ...
उत्क्रुश्ट फोटोग्रफी...

महेश काळे.
चलतदुरध्वनी ९८८१५०८२५६,९७६६५३८७१५
विरोप काले.महेश@गिमैल्.कोम् [kale.mahesh@gmail.com]

माऊ छानच आहे.

माऊ छानच आहे. माझीही अशीच छान माऊ होती. तिची आठवण झाली. माऊचा फोटोही छान आहे.
असेच मान्जरान्चे चान्गले फोटो काढत राहा.

छान,

माऊ छानच आहे...परंतु थोडीशी हडकुळी वाटली. बहुधा, उंदीरबिंदिर फारसे खात नसावी!

मीदेखील एक काऊ पाळला आहे.. हा त्याचा फोटो -
कसा वाटला ते अवश्य सांगा...

आपला,
(काऊमाऊप्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

तात्यानुं, तुमचा काऊ आवडला.

भलताच राजबिंडा दिसतो आहे. त्याचा रुबाब तर पाहण्याजोगा आहे. उद्या माझ्यातर्फे
काऊला दोन घास जास्त घाला. असा काऊ तुमच्याकडे आहे ह्याचा हेवा वाटतो.

जगात काऊ हाच पक्षी पाळायला सर्वांत सुखदायी आहे असे वाटते.
______________________________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।

^ वर