कंपोजीट छायाचित्र : एक प्रयोग

कंपोजीट म्हणजे ज्यात दोन किंवा अधिक चित्रे एकत्र करुन एक वेगळाच परीणाम साधला जातो अशी चित्रे. इथे दिलेले हे चित्र म्हणजे दोन स्वतंत्र चित्रांचा मिलाफ आहे. भल्या पहाटे लास वेगस वरुन आमचे विमान डेनव्हरला जात असताना आकाशात सुंदर रंग बघायला मिळाले आणि त्याची छबी खिडकीतुन टिपली. ह्या चित्रामध्ये आणखी नाट्यमयता येण्यासाठी एक चंद्राचा क्लोज-अप मिसळून टाकला.

हा प्रयोग कसा वाटला ते अवश्य कळवा!

दुवे:

Comments

छानच्

वाटला. दोन वेगवेगळी चित्रे मिसळली आहेत असे अजिबात वाटत नाही. चित्रात रंग सुद्धा सुंदर आहेत.

- सूर्य.

प्रयोग आवडला

चित्रे बेमालूम शिवली आहेत.

पण मांडणी समजली नाही. वरच्या उजवीकडचा पूर्ण रिकाम्या भागाचा चांगला उपयोग झाला आहे, असे मला वाटले नाही.

आभारी आहे

पण मांडणी समजली नाही. वरच्या उजवीकडचा पूर्ण रिकाम्या भागाचा चांगला उपयोग झाला आहे, असे मला वाटले नाही.

खरंय! विमानाच्या खिडकीतुन चित्रे काढताना मर्यादा असल्याने मनाजोगती मांडणी जमली नाही.

व्वा!

दोन चित्रांचा सुरेख मेळ साधलेला आहे. आवडले. असे कंपोझिट चित्र कसे करावे याबद्दलही थोडक्यात माहिती दिली तर अनेकांना हा प्रयोग करुन पाहता येईल.
उजव्या बाजूच्या रिकाम्या जागेने रसभंग होत नाही असे वाटते. नजर विमानाच्या पंख्यावरून चंद्राकडेच खेचली जात आहे.

-सौरभ.

असेच म्हणतो

>कंपोझिट चित्र कसे करावे याबद्दलही थोडक्यात माहिती दिली तर अनेकांना हा प्रयोग करुन पाहता येईल.

असेच म्हणतो.

बाकी चित्रातील सफाई वाखाण्याजोगी असली तरी एकंदर तो चंद्र [आकार, गडद छ्बी] व लालीमा तितके पटत [रियलिस्टीक] नाही आहेत. अवांतर मला तरी विमानातुन त्या उंचीवर व सकाळी तांबडे फुटताना असा चंद्र कधीच दिसला नाही :-( कोणी खरच पाहीला आहे विमानातुन असा चंद्र?

मस्त !!!

दोन चित्रांचा संगम लै भारी. उजवीकडील वरील बाजू जरा जास्तच रिकामी वाटते.
असे असले तरी रंगसंगतीमुळे तो दोष झाकुन जाईल असे वाटते.

अवांतर : आम्हालाही एका चित्रात दुसरे चित्र बेमालुमपणे मिसळवण्याचे वेड आहे. पण आमची चित्रकला कोणाला आवडत नसल्यामुळे कंपोजीट छायाचित्राचे प्रयोग बंद केले आहेत :(

प्रयोग उत्तम.. मात्र ...

मस्त प्रयोग. चित्रे उत्तम मिसळली आहेत.
मात्र मला वैयक्तीक रित्या हे चित्र फारसे नाहि आवडले.. म्हणजे खाली लाली असताना अचानक निळा रंग चालु होणे वगैरे गोष्टी परिणाम न वाढवत कृत्रिमता वाढवतात असे वाटले.

परंतू असे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी वापरून परिणामकता साधता येईल :) अजून अशी चित्रे बघायला आवडतील.

(विचित्रकार)ऋषिकेश

छान

छान चित्र, कल्पनाही सुरेख. चंद्राचे चित्र बरेच हाय रिझोल्युशन आहे का? नेहेमीचा पौर्णिमेचा पिवळसर चंद्र कदाचित अधिक खुलून दिसला असता.

----

मिसळ बेमालूम

कंपोझिट चित्र तंत्र दृष्ट्या चांगले आहे. बेमालून मिसळ आहे.

पण 'चित्र' म्हणून काही आवडले नाहे. निरस असा विमानाचा पंख, जो पंख आहे हे थोड्या निरिक्षणाने समजले, लाल-निळे कृत्रिम वाटणारे आकाश आणि अश्या आकाशात चंद्र ! हे काही रुचले नाही. अनेकदा पर्वशिखरे, ढगांचे विचित्र आकार, आकाशातले रंग दाखवताना संदर्भ म्हणून विमानाचा पंख येतो. तो तेव्हड्यापुरताच बरा वाटतो. या चित्रात तो पंख काही रस उत्पन्न करत नाही. प्रामाणिक वैयक्तिक मत राग नसावा.
--लिखाळ.

मिलाफ

दोन छायाचित्रांचा मिलाफ छानच,
पण पहाटे आणि पुर्व क्षितीजा वर् असा ( ८०% प्रकाशीत )चंद्र दिसणे कधीच शक्य नाही.
तो पश्चिम क्षितीजा पहाटे असा दिसेल

छान प्रयोग

छायाचित्र मिसळले आहे छानच. रंग सुंदर दिसतायत आणि स्पष्टपणाही आवडला.
मला ह्या छायाचित्राला तुमची नेहमीची जाड काळी बॉर्डर आणि पांढरी बारीक किनार चांगली दिसते आहे असे वाटले. एरवी ती कधीतरी उगाचच कृत्रिमता आणते असे वाटते, पण ह्यात ती रंगांना उठाव आणते आहे.

आभारी आहे!

आवर्जुन प्रतिसाद देणार्‍या सर्वांचा आभारी आहे. नवनविन प्रयोग करायला स्फुर्ती प्रोत्साहनातुनच मिळते.

सौरभदा:

असे कंपोझिट चित्र कसे करावे याबद्दलही थोडक्यात माहिती दिली तर अनेकांना हा प्रयोग करुन पाहता येईल.

फोटोशॉप , जिम्प तत्सम सॉफ्टवेअर मधे दोन्ही चित्रे लोड करुन एका चित्राचा हवा तो भाग कातरुन दुसर्‍या चित्रावर पेस्ट करायचा. नव्या चित्राचा आपोआप नविन लेयर बनतो. खोड रबरच्या सहाय्याने सॉफ्ट ब्रश वापरुन वरचा लेयर खोडायला सुरुवात केली की त्याजागी खालचा लेयर दिसायला सुरु होतो. मनाजोगते कातरणे झाले की आवश्यक वाटल्यास दोन्ही लेयर्स मध्ये वेगवेगळे ब्लेंडींग मोड्स् चा प्रयोग करुन् वापरुन सफाई आणता येते.

ऋषीकेश आणि लिखाळ :

मात्र मला वैयक्तीक रित्या हे चित्र फारसे नाहि आवडले.. म्हणजे खाली लाली असताना अचानक निळा रंग चालु होणे वगैरे गोष्टी परिणाम न वाढवत कृत्रिमता वाढवतात असे वाटले.

निळा रंग हा मूळ चित्रातीलच आहे. (कोपर्‍यातील चंद्र फक्त उधारीचा आहे:) लाल आणि निळा हे अजब काँबीनेशन पहाटे मला खिडकीतुन दिसलं म्हणूनच त्याचा फोटो काढावासा वाटला. रोजच्या पहाण्यात अश्या काँबीनेशनची सवय नसल्याने अकृत्रिम वाटले असावे पण हे जसे दिसले तसेच ठेवले आहे.

पुन्हा एकदा अभिप्राय देणार्‍या सर्वांचे आभार!

आभार

कोलबेर,
कंपोझिट चित्र बनवण्याची सोपी युक्ती सांगितल्याबद्दल आभार. मी नुकतेच एक चित्र असे करुन पाहिले..अक्षरशः ५ मिनिटामध्ये बेमालूम मिश्रण झाले.
माऊस चांगला असेल तर उत्तमोत्तम कसरती करता येतील :)

>आवश्यक वाटल्यास दोन्ही लेयर्स मध्ये वेगवेगळे ब्लेंडींग मोड्स् चा प्रयोग करुन् वापरुन सफाई आणता येते. <
ब्लेंडिग मोड वापरले नाही. नुसते खोडून काम केले. ब्लेंडींग मोड म्हणजे काय?
-- (आभारी) लिखाळ.

मस्त

चित्र थोडेसे कृत्रीम वाटत आहे, पण मस्त आहे. कंपोझिट चित्र कसे करावे याबद्दलची माहिती छान. कधीतरी करून बघावे म्हणतो..

-
ध्रुव

 
^ वर