प्रशासनास प्रश्न

माननीय प्रशासक

गेले काही दिवस संस्कृतच्या निमित्ताने बरीच चर्चा झाली. त्यातला एक न आवडलेला भाग म्हणजे एका सदस्याने संस्कृतचा प्रसार करणार्‍या सदस्येच्या खरडवहीत असणारे घराचे चित्र चोरले त्यात संस्कृत असे लिहिलेला क्रॉस लावला आणि ते आपल्या खरडवहीत लावले. क्रॉसचे जाऊ द्या. सदस्येच्या परवानगीशिवाय जसेच्या तसे लावले असते तरीही ते बेकायदेशीर होते. ही कृती निश्चित अनैतिक आणि बेकायदेशीर आहे.

असे असताना आणि अनेक सदस्य ते काढा अशी मागणी करत असताना ते चित्र सुमारे दोन दिवस तसेच होते. शेवटी एकदाचे त्यांनी स्वतःहून काढले आणि आपल्या खरडवहीत

उपक्रमचे संपादक/मालक, आमच्या खरडीतले चित्र काढते की काय असे वाटले होते, पण संपादकांनी सदस्यांच्या भावनेपेक्षा खरडवहीतील सदस्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवल्याबद्दल उपक्रमचे मालक / संपादक यांचे मनःपुर्वक आभार !!!

असा मजकूर लिहिला. आणखी एका संपादिकेने त्यावर

उपक्रमाचे संपादक/मालक यांना कदाचित आपल्या खरडवहीत ढवळा ढवळ करता येत नसावी किंवा त्याकाळात ते गायब असावेत असाही याचा अर्थ होऊ शकतो. :-) अर्थातच, शक्य आहे म्हणून इतरांच्या खरडवह्या आणि व्य. नि. त ढवळाढवळ करणे हे अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे हे निश्चित.

परंतु, सदस्यांनी आपला सारासार विवेक वापरून निर्णय घेणे योग्य वाटते.


अशी प्रतिक्रिया दिली आहे. गैरकायदेशीर लेखनाबद्दल संपादिकेचे लेखन ही प्रशासनाची अधिकृत भूमिका आहे असे समजायचे का? प्रशासनाला कायदेशीरपणापेक्षा चोराच्या अभिव्यक्तिस्वातंत्राबद्दल जास्त काळजी आहे हे खरे आहे का? दुसरे म्हणजे संपादकांना खरडवहीत ढवळाढवळ करता येत नाही हे खरे नाही आणि क्षणभर जरी ते खरे मानले तरी चोराला कडक शब्दात समज द्यायची की त्याच्याबरोबर आपणही अभिव्यक्ति स्वातंत्राचे गोडवे गायचे?

या सर्व बाबतीत प्रशासनाने आपली भूमिका एकदा स्पष्ट करावी ही विनंती.

विनायक

लेखनविषय: दुवे:

Comments

गोंधळी!

ह्या असल्या शंका प्रशासनाला व्यनीतून विचारता येतात.. आणि विचाराव्यात हि अपेक्षा..
सबब हे असले उगाच टाकलेले एका व्यक्तीस उद्देशणारे "चर्चा प्रस्ताव" खरडवही/विरोपात नसतील तर उडवले जावेत ही अपेक्षा आणि विनंती

(दिवाळीतही असले फाल्तू प्रस्ताव बघून वैतागलेला)ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

माझं मत..

ह्या असल्या शंका प्रशासनाला व्यनीतून विचारता येतात.. आणि विचाराव्यात हि अपेक्षा..

सहमत...

सबब हे असले उगाच टाकलेले एका व्यक्तीस उद्देशणारे "चर्चा प्रस्ताव" खरडवही/विरोपात नसतील तर उडवले जावेत ही अपेक्षा आणि विनंती

असहमत! :)
हा प्रस्ताव राहू द्यावा काही दिवस! तेवढीच जरा चर्चा वाचायला मजा येईल.. ;)

दिवाळीतही असले फाल्तू प्रस्ताव बघून वैतागलेला

चालायचंच! दिवाळीत फटाके वाजवायला मज्जा येते रे ऋषिकेशा! :)

असो,

सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा!

दिन दिन दिवाळी,
गाईम्हैशी ओवाळी!

:)

आपला,
(उपक्रमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

ऋषीकेषशी सहमत

ऋषीकेश शी पुर्णतः सहमत आहे. प्रशासक हे काही सातत्याने निरिक्षण करणारे यंत्र मानव नाहीत. उपक्रमचे सदस्यांनी स्वतःहुन तारतम्याने वागावे.
प्रकाश घाटपांडे

मला वाटते

परंतु, सदस्यांनी आपला सारासार विवेक वापरून निर्णय घेणे योग्य वाटते.

हे योग्य आहे. तो प्रकार निषेधार्ह होता हे संपूर्णपणे मान्य आहे. मात्र खरडवहीमध्ये काय लिहावे याचा निर्णय प्रशासनाने घेऊ नये. तरीही अशा सदस्यांना समज मात्र द्यावी. सदस्यांनीही येथील अभिव्यक्तिस्वातंत्राचा गैरफायदा घेऊ नये. तारतम्याने वागावे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

काय बाता मारता शेटजी!!

दुसरे म्हणजे संपादकांना खरडवहीत ढवळाढवळ करता येत नाही हे खरे नाही आणि क्षणभर जरी ते खरे मानले तरी चोराला कडक शब्दात समज द्यायची की त्याच्याबरोबर आपणही अभिव्यक्ति स्वातंत्राचे गोडवे गायचे?

अहो काका, तुम्हाला कसं कळलं की संपादकांना खरडवहीत ढवळाढवळ करता येते ते. तुम्ही होता का आधी संपादक आणि अशी ढवळाढवळ करत होता. तुमचे त्या संस्कृताच्या लेखावर उडवलेले काही प्रतिसाद त्या लेखिकेच्या खरडवहीत आहेत. जर संपादक मंडळ आक्षेपार्ह वाटलेले प्रतिसाद काढू शकते तर लेखिकेच्या खरडवहीत जाऊन काढू नाही का शकत? तसे का नाही केले त्यांनी. तुमची इथे पाठराखण होते असं कुणी म्हणू लागला तर हो!

का काका, तुम्हाला एक न्याय आणि इतरांना दुसरा असं का करायचं.... फारपूर्वी तुम्हीच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक चर्चा टाकली होती नाही का हो आणि आता त्याच अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाने खडे फोडता...कम्माल आहे हो!!

-राजीव.

हा घ्या पुरावा

प्रेषक सरपंच ( रवी, 01/25/2009 - 13:37) .
प्रमोद काका,
तुमच्या आणि इतरांच्या खरडवहीतील बदल मुद्दाम केलेले आहेत.
अश्या सोई देतांना त्याचा असा गैरफायदा घेतला जाईल अशी शंका होतीच. मात्र तसं होईलच अशी अपेक्षा नव्हती. आता मात्र ही सोय देता येणार नाही.
येत्या काळात काही उपाय शोधून तुमच्या खरडवहीला पुर्वीचे रूप देण्याचा प्रयत्न करूया.

तो पर्यंत हे असेच चालेल.


अन्य एका मराठी स्थळावर प्रशासनाने असे बदल केले आहेत याचा पुरावा.

याला पुरावा नाही...

नेट अडाणीपणा असं म्हणतात. उगीचच अफवा पसरवणे असेही म्हणता येईल कारण मिसळपावावर पूर्ण चर्चा वाचली ना काका तर तुम्हाला कळेल की बदल तिथल्या प्रशासनाने केलेले आहेत. साईट कॉन्फिगरेशन बदलले असावे. एकेकाच्या खरडवहीत जाऊन केलेले बदल नाहीत ते आणि असे बदल तर संकेतस्थळ चालक करतातच.

ज्या इंटरनेटचा वापर करता त्याची थोडी माहिती तरी मिळवा हो. हे कसले फुसके पुरावे देता?

- राजीव.

अपसव्यकृत्ये..

या संदर्भात मुक्तसुनीत यांचा अपसव्यकृत्ये हा प्रतिसाद वाचण्यासारखा आहे! इच्छुकांनी अवश्य वाचावा. अर्थात, आग्रह नाही..

असो,

आपला,
(१ ते १२ दिवसांची मर्तिकाची कामे करणारा ब्राह्मण) तात्या शिंत्रे.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

उपक्रमावरची चर्चा मिपावर कशाला?

तात्या उगाच कशाला इकडची भांडणे तिकडे लावता ते कळत नाही. उपक्रमावरची चर्चा मिपावर कशाला आणलीत. एका संकेतस्थळाचे मालक ह्या नात्याने तुम्हाला हे शोभत नाही.

प्रतिसाद पाहिला

प्रतिसाद पाहिला. त्या प्रतिसादात देखिल अनावश्यक गरळ ओकलेलीच दिसली. तुम्ही सगळी लोकं आपापली नळावरची भांडण संकेतस्थळांवर आणुन आमचा वेळ का वाया घालवता?
ह्या प्रकारात सामील सर्वांचाच निषेध करावासा वाटतो.

 
^ वर