संयामक हवा
जरा लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणा ना. पण संस्कृत विभागासाठी अतिशय कठोर संयामक हवा / हवी ह्या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. जो / जी सत्वहीन, टवाळ अवांतर प्रतिसाद वेळच्या वेळीच काढून टाकेल किंवा ज्याच्या / जिच्या चाळणीतून आल्या शिवाय कोणताही प्रतिसाद प्रसिद्धच होणार नाही. जो / जी टरफलं, फोलकटं टाकून केवळ अर्थगर्भ प्रतिसादच प्रसिद्ध करेल.
हे विशेषत्वाने लिहायचे कारण की इतर विभागांशी मला विशेष घेणे देणे नाही, मात्र संस्कृत विभागाच्या प्रमुखांचे अस्तित्वच जाणवत नाही. सुमारे १०-१२ दिवसांपूर्वी मी पल्लवीताईंना एक विसंगत, अर्थहीन प्रतिसाद नजरेखालून घालावा अशी विनंती केली होती मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया तर दूरच आज पर्यंत त्या व्य.नि. ची पोचपावती सुद्धा नाही.
असे अनेकानेक अनुभव आहेत. ते लिहिले तर पुन्हा नवे वाद निर्माण होतील. तरी उपक्रमवाल्या काकांना विनम्र विनंती की त्यांनी ह्या माझ्या म्हणण्यावर गांभीर्याने विचार करावा.
कळावें,
लोभ आहेच तो दिसामाजी वृद्धिंगत व्हावा ही अपेक्षा.
Comments
वरील लेखातील
पहिल्या परिच्छेदातील सत्वहीन हा शब्द कृपया सत्त्वहीन असा वाचावा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
संयामक?
कठोर संयामक, चाळणीतून आलेले प्रतिसाद वगैरे गोष्टी उपक्रमावर होतात असे वाटत नाही आणि भविष्यातही होऊ नये अशी अपेक्षा आहे.
टीकात्मक प्रतिसादांना संस्कृतप्रचुर दूषणे देऊन काही साध्य होणार नाही. ज्यांना खरेच संस्कृत भाषेचे संवर्धन व्हावे असे वाटते त्यांनी अश्या प्रतिक्रियांकडे प्रगल्भतेने आणि मोकळ्या मनाने पाहणे आणि सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. नाहीतर अपेक्षेहून उलटा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
उपक्रमावर विविध विचारांच्या लोकांमध्ये प्रगल्भ चर्चा झाल्या आहेत, मतभेदही योग्य पद्धतीने व्यक्त केले/प्रतिसादले जातात आणि भविष्यातही हे असेच राहावे अशी एक उपक्रमी म्हणून इच्छा आहे.
सहमत आहे
कठोर संयामक, चाळणीतून आलेले प्रतिसाद वगैरे गोष्टी उपक्रमावर होतात असे वाटत नाही
सहमत आहे. उपक्रमावर असलेले लेखनस्वातंत्र्य तसेच रहावे असे वाटते. येथे हुकूमशाही नको.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सहमत..
टीकात्मक प्रतिसादांना संस्कृतप्रचुर दूषणे देऊन काही साध्य होणार नाही. ज्यांना खरेच संस्कृत भाषेचे संवर्धन व्हावे असे वाटते त्यांनी अश्या प्रतिक्रियांकडे प्रगल्भतेने आणि मोकळ्या मनाने पाहणे आणि सकारात्मक प्रतिसाद देणे आवश्यक आहे. नाहीतर अपेक्षेहून उलटा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
नवीनरावांशी सहमत आहे...
आपला,
(संस्कृतप्रेमी) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
माझे मत
मला सदर विषयावर उपक्रमावर दिले गेलेले प्रतिसाद हे एक विशिष्ठ भुमिका मांडणारे म्हणूनच योग्य वाटाले. एखादी भुमिका माझ्याविरुद्ध आहे..म्हणून तिला चाप बसवा हे अजिबात पटले नाहि.
म्हणून माझ्यामते ऋजु म्हणतात तसल्या कोणत्याही चाळणीची गरज वाटत नाहि. प्रत्येकाने इथे मत मांडावे.. व स्वतःच्या स्टाईलमधेच मांडावे..
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
पण
असे होत नाही असाच अनुभव अनेकदा आला आहे आणि संस्कृतप्रचुर दूषणे मी तरी दिल्याचे मला आठवत नाही. तुम्हाला सर्व जग जर पिवळे दिसत असेल तर स्वत:ला काविळ झाली आहे हे तुम्ही खुशाल समजावे.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
अवांतर -
असे होत नाही असाच अनुभव अनेकदा आला आहे आणि संस्कृतप्रचुर दूषणे मी तरी दिल्याचे मला आठवत नाही. तुम्हाला सर्व जग जर पिवळे दिसत असेल तर स्वत:ला काविळ झाली आहे हे तुम्ही खुशाल समजावे.
मला एक कळत नाही की संस्कृतचे प्रचारक आणि प्रसारक अवघ्या दुसर्या वाक्यातच भांडायला का उठतात? :)
असो, अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व..
आपला,
(भांडखोर महोमहोपाध्याय) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
हे मात्र खरं आहे.
संस्कृतचे प्रचारक आणि प्रसारक अवघ्या दुसर्या वाक्यातच भांडायला उठतात? :)
ह्या चर्चेचा अर्थ काय?
पल्लवीताईंवर अविश्वास दर्शक ठराव आहे का हा? तो असा जाहीर मांडायचा काही पायंडा आहे का? तुम्ही संपादक मंडळाकडून तशी परवानगी घेतली आहे का? मला एका सदस्याने दुसर्या सदस्यावर असे जाहीर ताशेरे ओढणे गैर वाटते.
तुम्ही हे उपक्रमपंतांना का नाही लिहले आधी? संपादक मंडळाला? तुमच्या मते तुम्हाला जे अयोग्य वाटते ते लगेचच्या लगेच काढायचेच की काय?
"कावीळ झाली असेल तुम्हाला". असा प्रतिसाद ठेवण्याचा की उडवण्याच्या लायकीचे आहेत?
हा चर्चाप्रस्तावच आवडला नाही. कारण प्रतिसाद स्वातंत्र्यावर, संयामकांवर, उपक्रमाच्या संपादक मंडळावर नाहक टिका आहे असे वाटते. उपक्रमपंतांनी हा चर्चाप्रस्ताव उडवून टाकावा अशी मागणी केली तर गैर नाही. कोण्या एका सदस्याला पाहीजे तसेच व तेच लेखन राहीले पाहीजे हा हट्ट ह्या जमान्यात हास्यास्पद आहे. इतरांची मतेही महत्वाची आहेत.
इतर विभागांशी मला विशेष घेणे देणे नाही - अहो निदान चर्चेसाठी तरी सर्वांना समान न्याय हे तत्व मान्य करायला पाहीजे की नको?
तुमच्या कुण्या संस्कृत स्नेह्याने कुठेतरी एक सुवचन वाचले / लिहले होते ना? "मी जगाला बदलु शकत नाही स्वःताला मात्र बदलु शकतो." बघा बोध घेता येतोय का.
काही मजकूर संपादित. - संपादन मंडळ
सहमत आहे
सहमत आहे!
कर्मठता आणि संस्कृत भाषा या गोष्टी हातात हात घालूनच का येतात हो नेहमी? ;))
आवांतरः आपणच एखादे उपक्रमा सारखे संस्थळ का काढत नाही खास संस्कृत भाषेतले?
आपला
गुंडोपंत
हेच,
कर्मठता आणि संस्कृत भाषा या गोष्टी हातात हात घालूनच का येतात हो नेहमी?
हेच विचारतो!
गुंड्याभाऊंनी लाखमोलाचा प्रश्न विचारला आहे..!
आपला,
(पळीपंचपात्रात खडबड करणारा कर्मठ ब्राह्मण) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
काही प्रश्न
हा स्नेही कोण? तो संस्कृत कसा काय? तो माझा स्नेही असे तुम्हाला कोणी सांगीतले? मी तर वरील वाक्य पहिल्यांदाच वाचले.
काही मजकूर संपादित. उपक्रम हे व्यक्तिगत स्वरुपाची वादावादी करण्याचे स्थान नाही याची कृपया नोंद घ्यावी. अशाप्रकारच्या प्रतिसादांसाठी खरडवही किंवा व्यक्तिगत निरोपांचा वापर करावा. - संपादन मंडळ.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
पल्लवीताई कोण?
पल्लवीताई कोण? या समुदायाच्या निर्मात्या का? त्यांना आणि इतर समुदाय निर्मात्यांना समुदाय नियंत्रणासाठी कोणतेही विशेषाधिकार नाहीत असे वाटते. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला प्रतिक्रिया देत नाही तेव्हा खालीलपैकी एक कारण प्रामुख्याने असण्याची शक्यता असते.
१. तो कार्यबाहुल्यामुळे व्यग्र असतो.
२. तुम्हाला पोचपावती देणे महत्त्वाचे समजत नाही. (आपल्या काही विशेष खरडींना माझ्याकडून उत्तर न येणे येथे मोडते)
यापेक्षा संस्कृतविषयक चर्चा करणार्यांनी संस्कृतचे संवर्धन कसे होईल केवळ याचकडे लक्ष दिले तर त्यांना विसंगत विधाने दिसणार आणि भासणार नाहीत असे वाटते. आपल्याला पुन्हा पुन्हा सांगून ना आपण सुलभ संस्कृताचे पाठ येथे देत ना प्राण्यांच्या सुभाषितांचे अर्थ देत.
असो, असल्या संयामकापेक्षा प्रत्येकाने संयम बाळगून काम होण्यासारखे आहे आणि पहिला संयम लेखकाने बाळगायचा असतो. आपल्या लेखाला पूरक, सहमत आणि असहमत प्रतिक्रिया येणार याची जाणीव ठेवून.
सहमत..
यापेक्षा संस्कृतविषयक चर्चा करणार्यांनी संस्कृतचे संवर्धन कसे होईल केवळ याचकडे लक्ष दिले तर त्यांना विसंगत विधाने दिसणार आणि भासणार नाहीत असे वाटते.
सहमत आहे!
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
करेक्ट
संस्कृतविषयक चर्चा करणार्यांनी संस्कृतचे संवर्धन कसे होईल केवळ याचकडे लक्ष दिले तर त्यांना विसंगत विधाने दिसणार आणि भासणार नाहीत असे वाटते.
सहमत आहे.
अमान्य
हे असे नियमन एका विशिष्ट मर्यादेपलिकडे उपक्रमावर होऊ नये, एवढेच वाटते. उपक्रमावर ललित लेखन करण्यास तसा प्रतिबंध आहे, पण इतर कुठचेही व्यासंगी लेखन करण्यास / टवाळही प्रतिसाद देण्यास कुठचाही मज्जाव असू नये. प्रतिसाद वा लेखन व्यक्तिगत आकसपूर्ण नको, एवढा एक नियम पुरेसा आहे, असे मला वाटते. चांगल्या टवाळीतही विचारांना चालना मिळते, असा अनुभव आहे, आणि मला असे प्रतिसाद आवडतात!
संस्कृत विभाग आणि इतर विभाग यातही नियमांमध्ये फरक करावा असे मला वाटत नाही. ते सर्व सारख्याच मापाने तोलले जावे.
इथले
सर्व प्रतिसाद वाचले. वाचून आश्चर्य वाटले. सर्व प्रतिसाद एकच अर्थ ध्वनित करीत आहेत असे वाटते.
इतर वेगळी मते इथून उडली का? असे असायला खरे तर माझी काही हरकत असायचे कारण नाही पण सहज एक गोष्ट आठवली.
भारतातील भाजप सरकार जेव्हा नव्या निवडणूकीत गेले आणि काँग्रेस सरकार आले तेव्हा एका पत्रकाराने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना छद्मीपणे विचारले, विरोधी पक्षात बसताना कसे वाटत आहे? त्यावर त्या अनुभववृद्ध योग्याने सांगीतले की "समर्थ विरोधी पक्ष हे सशक्त लोकशाहीचे लक्षण आहे, आमच्यासारखा उत्तम विरोधी पक्ष असणे ही भारताची गरज आहे".
मात्र उपक्रम पंताना जर असे वाटत नसेल तर काय बोलायचे? त्यांचे मत त्यांनाच लखलाभ असो बापडे.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
याहून वेगळी मते आलीच नाहित
याहून वेगळी मते आलीच नाहित.. अजूनतरी एकमताने आपले निवेदन बरखास्त झाले असे दिसते.. असो होते असे कधी कधी !
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
मला वाटते,
आपली माहिती अपुरी आहे. मी स्वत: इथे कठोर नको पण निपक्षपाती संयामक हवा असा प्रतिसाद टाकलेला होता.
तो उपक्रमच्या अलिखित नियमाप्रमाणे २-३ तासांत उडवला गेला. असे इतरांचे पण उडवले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपक्रमवर कौल घ्यायची पद्धत असती जर जास्त बरे झाले असते.
काही मजकूर संपादित. उपक्रमावर लिहिताना एकमेकांवर आरोप होणार नाहीत याची कृपया, काळजी घ्यावी. वाक्ययोजना करताना सतत इतरांवर चिखलफेक करणे हे उपक्रमाचे धोरण नाही. अश्याप्रकारची विधाने आणि प्रतिसाद अप्रकाशित केले जातील याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.
_______________________________________________
भो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे ।
वक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् ।।
आश्चर्य कशाचे?
याचे आश्चर्य वाटून घेण्यापेक्षा आपलेच काहीतरी चुकत नाही ना यावर विचार करा ऋजुकाका.
उपक्रम पंतांचे मत इथे दिसले नाही मला तर मग त्यांना कशाला खेचताय उगीच? त्यांनी तुमची चर्चाही प्रकाशित ठेवली आहे आणि लोकांचे प्रतिसादही. तेव्हा त्यांच्या नावाने शिमगा करण्याऐवजी तुम्हीच आपली पद्धत बदलून बघा. सर्वांच्याच फायद्याचे होईल.
- राजीव.
सहमत..
याचे आश्चर्य वाटून घेण्यापेक्षा आपलेच काहीतरी चुकत नाही ना यावर विचार करा ऋजुकाका.
सहमत आहे...
उपक्रम पंतांचे मत इथे दिसले नाही मला तर मग त्यांना कशाला खेचताय उगीच? त्यांनी तुमची चर्चाही प्रकाशित ठेवली आहे आणि लोकांचे प्रतिसादही. तेव्हा त्यांच्या नावाने शिमगा करण्याऐवजी तुम्हीच आपली पद्धत बदलून बघा. सर्वांच्याच फायद्याचे होईल.
सहमत आहे.. उपक्रम प्रशासनावर केल्या गेलेल्या नाहक चिखलफेकीचा मी तीव्र निषेध करतो..!
आपला,
(उपक्रमी) तात्या.
--
संस्कृत भाषा जगसि कळेना
म्हणोनी नारायणा दया आली हो,
देवाजीने परि घेतला अवतार
म्हणति ज्ञानेश्वर तयालागी हो!
शिमगा आणि चिखलफेक
सर्वप्रथम मी हे नोंदवू इच्छितो की उपक्रम व उपक्रमपंत ह्यांच्या बद्दल माझ्या मनात तीव्र आदर आहे. जाहीरपणे तर नाहीच नाही पण मी खाजगीत उदा. खरडवही, व्य.नि. सुद्धा त्यांच्याबद्दल वावगा शब्द कुठेही बोललो असेल तर ते वरील थोर मंडळींपैकी कोणीही दाखवून द्यावे.
आता आपण माझ्या विधानाकडे वळू. मी असे म्हटले आहे की उपक्रमपंतांना असे वाटत नसेल तर... ह्याचे कारण जर एकाच प्रकारचा अर्थ ध्वनित करणारे प्रतिसादच रहात असतील तर मला वाटते की उपक्रमपंतांनी स्वत: ह्यात लक्ष घालायला हवे.
ह्याचे कारण संस्कृत मध्ये म्हटले जाते "राजा कालस्य कारणम्". राजा हाच एका विशिष्ट काळामध्ये घडणार्या घटनांना जबाबदार असतो. स्वत: टिळकांनीसुद्धा ब्रिटिशांना हेच सांगितले होते असे वाचल्याचे स्मरते आणि न्याय हा राजाकडेच मागायचा असतो. इतरांकडे नव्हे. असो.
आता आपण शिमगा शब्द पाहू -
जो होळीच्या दिवशी रात्रभर शिव्यांचा कार्यक्रम चालतो तो शिमगा. माझ्या एका ओळीने रात्रभराचा शिमगा कसा बुवा होतो? आणि आपली मते आपल्याकडेच राहू द्यात ह्यात शिवीगाळ कुठला? असेच वाक्य स्वत: राधिकाबाईंनी एका ठिकाणी उपक्रमवर लिहिले होते हे लक्षात घ्यावे ही विनम्र विनंती. त्या इतक्या सालस आणि सभ्य आहेत की कोणीही त्यांच्यावर असे आरोप करणार नाही. मग माझ्यावरच असे आरोप का बरे? वोन्काकाका मी तुमचे काय बरे बिघडवले आहे?
दुसरा शब्द चिखलफेक -
हा शब्द अयोग्य कसा ह्याबद्दल वर सविस्तर विवेचन केलेच आहे. मात्र मला सदर लेखकाचा अजिबात राग नाही. माझ्यावरचा त्यांचा जुना राग निघाला आहे इतकेच.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
संस्कृतस्य महिमवर्णनेन नास्ति साधितम् । सततसंभाषणेन तस्य जीवनं स्थिरम् ।।
चर्चेशी संबंधीत नसणारा काही भाग संपादित केला आहे. व्यक्तिगत स्वरुपाच्या लेखनासाठी व्य. नि. किंवा खरडवही यांचा वापर करावा. - संपादन मंडळ.