क्षण

मी केनी जी. चा एक क्षण ऐकला आणि मला त्याचे ते संगीत व तो बेहद्द आवडला. तो इतका तरलतेने वाजवतो की ऐकत राहावेसे वाटतो. कुठे हिसका नाही, कुठे स्वरांची उगाच खेचाखेच नाही. वाह जनाब !

Comments

मस्त

मला ही आवडतो. ही धुन सुद्धा छान आहे. मध्ये एकदा बेंगलोरात मी याची एम पी ३ ची चकती घेतली होती. आत्ता सापडत नाहिये :(. खास करुन एकट्याने ऐकताना एक वेगळाच अनुभव येतो. मला हे सुद्धा आवडते जे खाली दिले आहे.

यान्नी

केन्नी प्रमाणे मला यान्नी देखील आवडतो. हे लोकं आपल्या इथल्या काही उस्तादां इतकेच तोडीचे कलाकार आहेत. कला त्यांची स्वतःची आहे.

ह्या विधानाशी पूर्ण असहमत.

कला त्यांची स्वतःची आहे.

मी नव्हे तर माझा मित्र. तसे त्याला शास्त्रीय संगीतातले काही फारसे कळत नाही हे तो मान्य करतो. पण केनीच्या वाजवण्यातील जो कोमल निषाद, शुद्ध गंधार आणि तीव्र धैवत आहे तो बराचसा दक्षिण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अंगाने जातो असे त्याचे ठाम मत आहे.

तो कबुल करतो की तसा त्याला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात फारसा गंध नाही पण केनीच्या संगीतात त्याला मारू बिहाग, केरवा आणि खमाज ह्याची निश्चित् झलक दिसते.

त्याच्या मते केनीने लहानपणी दक्षिण हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे पं. भीमसेन जोशी म्हणून ओळखले जाणारे श्री. बालमुरलीकृष्णन् ह्यांच्या ध्वनिफिती ऐकल्या असाव्यात. त्याशिवाय का त्याला इतके चांगले स्वरज्ञान असेल?
__________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

असेल बुवा

असेल बुवा!! कदाचित त्याला दक्षिणभारतीय संगीतच वाजवायचे असेल ते चुकून काहीतरी वेगळे वाजवले असेल.

 
^ वर