मराठी साहित्य विषयक माहिती कुठे मिळेल?

मित्रांनो आणी विद्वान हो,
रिसर्च साठी माझ्या मित्राला "मराठी साहित्य का उद्भव और विकास", "मराठी साहित्य का इतिहास" आणि "मराठी के ५०० प्रसिद्ध लेखों की सूची एवं उनका विवेचन" ह्या विषयावर माहिती हवी आहे. कुणाला जालस्थला वर विशिष्ट माहिती असल्यास किंवा लिंक माहीत असल्यास कृपा करून पुरवावी. माहिती हिन्दीत असल्यास अति उत्तम, नसल्यास मराठीत पण चालेल... ह्या विषयांवर काही महत्वपूर्ण पुस्तके मिळत असल्यास त्यांना विकत घेण्याचे स्थान किंवा जालस्थला वरून विकत घेण्यासाठी त्याची लिंक असल्यास देण्याची पण कृपा करावी...

लेखनविषय: दुवे:

Comments

नंदनचा ब्लॉग

मराठी साहित्यविषयक काही उत्तम लेख, रेकमेंडेशन नंदनच्या ब्लॉगवर वाचायला मिळतील. याशिवाय अंतर्नादसारखी नियतकालिके वेळोवेळी पुस्तकांविषयी माहिती देत असतात. (http://www.manogat.com/node/8244)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मराठी वाड्मयकोश

ग. रा. भटकळ फाउंडेशनने प्रसिद्ध केलेला आहे.

ह्याचे तीन खंड आहेत. पहिला "आरंभापासून १९२० पर्यंतचा कालखंड", दुसरा "१९२० ते आजतागायत" व तिसरा "वाड्मय व समिक्षा व्यवहारातील संज्ञ्या-संकल्पना". संपादक: जया दडकर, प्रभा गणोरकर, वसंत आबाजी डहाके व सदानंद भटकळ.

पॉप्युलर प्रकाशन येथे हे मिळावेत, मी अनेक वर्षांपूर्वी पहिला खंड तेथून घेतला आहे.

 
^ वर