दहशतवाद्यांचे बदलते स्वरुप

गेल्या शतकातील भारतातील मुस्लिम दहशतवादी हे अशिक्षित, गरीब होते. त्यावेळी समाजशास्त्रज्ञांनी म्हटले होते की गरीबीमुळे पैश्याच्या आमिषाला भुलून तसेच मदरश्यातील मौलवींच्या कडव्या विचारसरणीला भुलून हे दहशतवादी अशी कृत्ये करायला तयार होतात. सरकारने त्यांना योग्य शैक्षणिक सुविधा व रोजगार दिला तर असे दहशतवादी तयार होणार नाहीत.

मात्र आज नेमकी उलट स्थिती आहे. जे आझमगड दहशतवाद स्रोत आहे तिथे आखातातील प्रचंड पैसा आहे. सध्या पकडलेले बहुतेक दहशतवादी उच्चशिक्षित आणि मोठ्या प्रमाणात पगार घेणारे तरुण आहेत.

असे वाटते की ह्या नव्या स्वरुपाचे समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून विश्लेषण होणे गरजेचे आहे कारण हे दहशतवादी मानवतेचे शत्रु आहेत.

आपल्याला काय वाटते?

(अपेक्षा इतकीच की कंधमालचा विषय मधे आणून ह्या गंभीर विषयाला फाटे फोडू नयेत. त्यासाठी हवा तर वेगळा चर्चा विषय काढावा.)

लेखनविषय: दुवे:

Comments

मोठा विषय

शतक म्हणजे तुम्हाला १९०१ ते २००० असे म्हणायचे आहे असे समजून सुरुवात करतो.
सर्व प्रथम, दहशतवादी कोणाला म्हणायचे, राष्ट्रद्रोही कोणाला म्हणायचे आणि त्याची व्याख्या कोणी करायची हे माहित असेल तर लिहिणे बोलणे सोपे होईल.
सुरुवात म्हणून एक नेहमीचा मुद्दा मांडतो. भारताचा धर्मनिरपेक्ष असल्याचा विचार हा दहशतवादाच्या मुळाला खतपाणी घालणारा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा उच्चशिक्षित मुसलमान होतेच.
मला वाटतं की आपण दहशतवादी कोणाला म्हणायचे ते पहिला ठरवू. माझ्यामते आपले राजकारणी लोकं हेच सर्वात मोठे दहशतवादी आहेत.





दहशतवादी शब्दाची व्याख्या

गुगल वर शोधली तर बरेच काही हाती आले. त्या व्याख्यांप्रमाणे पहायला गेले तर राजकारणी मंडळी त्यात बसत नसावीत. तज्ज्ञांनी ह्यावर अधिक प्रकाश टाकावा.

असो. तुम्हाला ह्या चर्चेचा रोख 'न्यायालयाने राज ठाकरेंना दहशतवादी संबोधले' त्याकडे तर वळवायचा नाही ना?

राज बच्चा

अजिबात नाही. राज बिचारा यात बच्चा आहे. राज महाराष्ट्राच्या विषयांपुरताच सीमीत (सिमी संघटनेत नव्हे.) आहे, असे त्याचे म्हणणे आहे. त्याचे देणे घेणे फक्त मराठी सोबत आहे. बाकीचे मुद्दे त्याला वर्ज आहेत :) .
दहशतवाद हा जागतिक प्रश्न आहे जो भारत पाकिस्तानच्या निर्मितीपासून भोगतो आहे.
आपण जागतिक आणि भारतीय असा वेगवेगळा विचार केला तर भारतासाठी व्याख्या थोडी वेगळी होईल. भारतात दहशतवाद हा प्रामुख्याने पाकिस्तान धार्जिणा आहे. त्यामुळे शिक्षण हा भाग त्यात येईल असे वाटत नाही. धर्मवेडे हे धर्मवेडेच. मग अशिक्षित असो वा अतिशिक्षित. भारतातल्या कोणत्या प्रकारच्या मुस्लिम समाजाला पकडायचे हे गरजे नुसार पाकिस्तानात ठरवले जात असावे. सुरुवातीला तुम्ही म्हणता तसे गरिब अशिक्षित पकडले. पण ते पकडले गेल्यावर धोका जास्त. मग दाऊद आणि बांधव. पण ते ही पकडले गेल्यावर धोका. कारण हे लो़कं पकडले गेल्यावर गुन्हेगार आणि दशतवादी असा दुहेरी सापळा भारत रचणार. ९/११ नंतर अमेरिकेत सुशिक्षित मुस्लिम दहशतवादी हि योजना कमालीच्या यशस्वीरित्या राबवता आली आणि त्याचे जगभर पडसाद उमटले. सुशिक्षित लो़क सुसंस्कारीत असतात असा हे गोड गैरसमज जगभर आहे. त्याचा कोणी फायदा नाहीच उठवला तर नवल. ते ही खुप हुशार आहेत. पण त्यांची ध्येयं मात्र धर्मप्रेरित आहेत. जर माझ्यासारखा एक अतिशय सर्वसामान्य भारतीय हे समजू शकतो तर आमच्यावर राज्य करणारे राजकारणी समजू शकत नसतील? म्हणूनच ते खरे दहशतवादी. सिमीवरची बंदी उठवण्याची वकिली करणारे लालु, मुलायम, रामविलास हे कोण आहेत? राजकारणी आणि धर्मवेडे एकत्र असल्या शिवाय एवढ्या बेमालुमपणे एवढे हल्ले होणे अशक्य आहे. भारतातील आगामी निवडणुकांची हि पुर्व तयारी आहे.





दहशतवादी

मुळात दहशतवादी तयारच का होतात हा एक मोठा विषय आहे चर्चेचा.





दृष्टिकोना चा फरक !!!

आपण ज्यांना दहशतवादी म्हणतो त्यांना कुणी ना कुणी "हीरो" समजतात, इंग्रजांच्या वेळी भगतसिंह ह्यांना इंग्रज दहशतवादी म्हणायचे, पण आपण भारतीय त्यांना देशभक्त म्हणतो, तसेच आयरिश लोकं त्यांच्या लोकांना हीरो समझतात पण ब्रिटिश लोकं त्यांना दहशतवादी समझायचे... सध्या आपण यासीन मलिक ह्याला दहशतवादी समजतो, पण समजा उद्या काश्मीर वेगळा झाला तर मलिक ला काय दर्जा मिळेल... तर जसं चाणक्य म्हणाले कि "दहशतवादी कोण?... ह्याची परिभाषा नक्की झाली पाहिजे..." ह्याच्याशी सहमत...

http://sureshchiplunkar.blogspot.com

दहशतवादी कोण?

जगातील अनेक समाजशास्रज्ञांनी दहशतवादी शब्दाची स्पष्ट व्याख्या केलेली आहे. त्यात क्रांतिकारकांना सुस्पष्टपणे वगळलेले आहे. मात्र भगतसिंहांना आणि यासीन मलिकला एकाच पंक्तीत बसविणे चूक आहे. कारण इंग्रज हे भारतासाठी उपरे आहेत आणि काश्मिरसाठी भारत हा कधीच उपरा नव्हता. भारताचे काश्मिर अभिन्न अंग आहे हे पुरातन ग्रंथातील उतार्‍यांमध्ये वेळोवेळी येते (आठवा : कैलास, मानसरोवर). एव्हढेच नव्हे तर यासीन ज्या पाकिस्तानच्या जीवावर उड्या मारत आहे तिथे एकेकाळी राजा दाहिर सारख्या हिंदु राजांचे / भारतीयांचे राज्य होते. पैसा आणि शस्र ह्यांच्या जोरावर सत्य बदलता येत नाही.

दहशतवादी कोण ह्या व्याख्येसाठी, कृपया मी वर दिलेला दुवा पुन्हा वाचावा आणि प्रतिसाद नव्याने द्यावा.

 
^ वर