कोसळलेला सेन्सेक्स काय दर्शवतो?

३० सप्टेंबरच्या "टाइम्स ऑफ इंडिया"त प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून असे दिसून येते की एप्रिल २००७ मध्ये १२४५५ वर असलेला सेन्सेक्स जानेवारी २००८ मध्ये २१००० च्या जवळ पोचला आणि नंतर सप्टेंबर २००८ अखेरीस पुन्हा १३००० च्या खाली घसरला. आज महाराष्ट्र् टाइम्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताप्रमाणे आता तो १२००० च्याही खाली गेला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तांत पुढे म्हंटल्याप्रमाणे या वर्षी गुंतवणूकदारांचे एकूण ३४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनांना नैसर्गिक आपत्ति म्हणता येणार नाही. तो आर्थिक धोरणांतील दूरदृष्टीच्या अभावाचा परिणाम असावा. केंद्रीय अर्थखात्याच्या ज्या निर्णयांमुळे सेन्सेक्स ९ महिन्यांत ९००० ने वाढून २१००० च्या जवळ पोचला ते निर्णय त्यांच्या दूरगामी परिणामांचा विचार करून घेतले नसावेत असे माझ्यासारख्या शेअर बाजारांत उलाढाल न करणार्‍याला वाटते. यावरून एकतर केंद्रीय अर्थमंत्रालय शेअरबाजाराबाबत अनभिज्ञ असावे किवा या उलाढालींत गुंतवणूकदारांच्या नुकसानीमुळे ज्यांचा फायदा झाला त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी तसे निर्णय घेतले असावेत. निश्चित काय झाले हे समजण्यासाठी याबाबत अर्थमंत्र्यापासून सर्वांची चौकशी व्हावी.

आपणांस काय वाटते?

लेखनविषय: दुवे:

Comments

माझं मत..

माझं मत -

सेन्सेक्स वाट्टेल तसा चढणे अणि नंतर कोसळणे ही बाजाराच्या बाबतीतली नेहमीचीच तेजीमंदीची बाब! निदान मला तरी त्यात काही विशेष वाटत नाही...

हे चक्र असेच सुरू असते आणि राहणार..

माझ्यासारख्या सामन्य गुंतवणुकदारांनी सेन्सेक्सकडे लक्ष न देता इन्डिव्हिज्युअल समभागांकडे, त्यांच्या वित्तीय/बाजारीय आकडेवारीकडे लक्ष देऊन त्यांच्या खरेदी-विकीचा विचार करावा...

याचं कारण असं की सेन्सेक्स म्हणजे काही सगळा बाजार नव्हे. तो फक्त बाजारातील काही ठराविक समभागांचे प्रतिनिधित्व करतो. परंतु बाजारात असे शेकडो समभाग असतात की ज्यांचे मूल्यमापन हे सेन्सेक्स वाढला आहे किंवा कमी झाला आहे यावर ठरत नाही..!

असो,

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

शंका

परंतु बाजारात असे शेकडो समभाग असतात की ज्यांचे मूल्यमापन हे सेन्सेक्स वाढला आहे किंवा कमी झाला आहे यावर ठरत नाही..!

एखादे उदाहरण दिलेत तर् उत्तम.

अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

नेहमींची तेजी की सूज?

सेन्सेक्स वाट्टेल तसा चढणे अणि नंतर कोसळणे ही बाजाराच्या बाबतीतली नेहमीचीच तेजीमंदीची बाब! निदान मला तरी त्यात काही विशेष वाटत नाही...

हे चक्र असेच सुरू असते आणि राहणार..

९ महिन्याच्या कालावधीत सेन्सेक्स ७० टक्क्यांनी वाढणं ही नित्याची तेजीमंदीची बाब म्हणता येणार नाही. ही निरोगी वाढ नसून सूज आहे हे जाणकारांच्या लक्षांत यायला हवं होतं. दूरदर्शनवरील चर्चेत भाग घेणारे अर्थतज्ज्ञ, विश्लेषक किंवा अर्थविषयांवर स्तंभलेखन करणारे स्तंभलेखक, यापैकी कुणीही सरकारला किंवा गुंतवणूकदारांना तशी जाणीव करून दिल्याचे स्मरत नाही. सर्वजण आर्थिक "प्रगति"बद्दल समाधान व्यक्त करीत होते.

असे म्हणतात की

भारतीय समभाग बाजार हा Operator Driven आहे. बाजार भाव केव्हा, किती असावा ही ती मंडळीच ठरवतात. इतकेच नव्हे तर सरकार कोणाचे यावे, रहावे की पडावे इ.इ. हीच मंडळी ठरवतात. असे असताना कोणाकोणाची चौकशी कोण करणार?

ह्यावरून आठवले, एकदा केम्प्स कॉर्नरवरून जाताना माझे एक काका म्हणाले होते की भारताची खरी सत्ता इथे राहणार्‍या लोकांच्या हातात आहे. सरकारे केवळ कठपुतळ्या आहेत.

स्पष्टीकरण

मी भारतीय शेर बाजारात अजून उतरलो नाहीये, पण हा माझ्या जिज्ञसेचा विषय आहे.
तुमच्या प्रतिसादाबद्दल (शेर्‍याबद्दल ;-) मला कुतुहल आहे - जरा विस्तार करून सांगता का?

परत

कोसळलेला सेन्सेक्स काय दर्शवतो?

कोसळलेला सेन्सेक्स बाजार परत वर जाणार आहे हेच दर्शवतो.

जे खाली येते ते वर जाऊ शकते. जे वर असते ते खाली येऊ शकते.

आपला
गुंडोपंत

पोकळ आशावाद?

कोसळलेला सेन्सेक्स बाजार परत वर जाणार आहे हेच दर्शवतो.

तुम्ही शेआर्स मध्ये गुंतवणूक् केली असेल तर शुभेच्छा. पण सध्या तरी (खरे तर जानेवारी २००८ पासून) तसे दिसत नाहीये.

छे छे


तुम्ही शेआर्स मध्ये गुंतवणूक् केली असेल तर शुभेच्छा.

छे छे
त्यासाठी पैसे हवेत ना?
असो मी आपला मनातल्या मनात गुंतवणूक करणारा माणूस...
पण गेली अनेक वर्षे (बाजाराचे) आकडे पाहतो आहे. जर तुम्ही तुमच्या नशीबाने २००७ साली शेयर्स मध्ये पैसे घातले असतील तर काय करणार? बोंबला आता ज्याने सला दिला होत तो पण झोपलाच असणार...!!
मात्र आत्ता बाजार १०००० खाली असतांना शेयर्स घेतले असतील मजा असावी असे वाटते.

शेयर बाजार यात नशीब हा भाग अपरिहार्यपणे येणार/येतो.
कारण २००७ साली, मला तरी येथे एकाही प्रयत्नवादी महाभागाने येथे "बाजाराची वेगवान वाटचाल चांगली वाटत नाही, आपले पैसे बाजारातून काढून घ्या"
असे सांगितल्याचे आठवत नाही. तेंव्हा कुठे जातात ही तोंड वर करून ट्यंव ट्यंव करणारी मंडळी कुणास ठाऊक!

आपला
(कोणतीच गुंतवणूक नसल्याने निवांतपणे उन खात बसलेला!)
गुंडोपंत

मनातल्या मनात गुंतवणूक

मी आपला मनातल्या मनात गुंतवणूक करणारा माणूस...

करणार्‍या पंतकाका आणि इतर गुंतवणूकदारांसाठी फायदेमंद असा आभासी गुंतवणूक खेळ. ह्या खेळाने आपले अंदाज ताडून पाहता येतात, ते पण एकही भोकाचा पैसा न गुंतवता.
*
*
*
________________________________________________________
सुन्दरी च सरला च मधुरा च एषा भाषा, आगच्छन्तु, आगच्छन्तु, आस्वादयन्तु ।

तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तित्तित्तारा, तोम् ।।

चांगला

खेळ चांगला आहे.
आमच्या तात्याने पण असे खेळ नेकदा येथे आणले होते. मजा यायची ते बघायला...
पण हल्ली तो असले खेळ खेळत नाही बहुदा...

आपला
गुंडोपंत

पडले परत!

आज पडले परत मार्केट...
म्हणजे अत्ता आहे त्यापेक्षा पन खाली जाईल की काय असे दिसतेय.
मला तर वाटते की हल्ली फक्त अमेरिकन चार्टच पहावा...
कारण बी एस इ तर फक्त अमेरिकन बाजार जे काय करतात तेच इकडे करतांना दिसतो.

तुम्हाला काय वाटते?

आपला
गुंडोपंत

मुंशेबा!

आता मुंशेबा पडला की मग अशेबा पडतो. हल्ली उलटी गंगा आहे. :)

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

पडीक

निर्देशांक १०,००० पाशी साधारण १८ महिने घुटमळेल असा गुरुवर्यांचा होरा आहे.

 
^ वर