दिवाळी अंक २००८ - समुदाय सहभाग - छायाचित्रे
नमस्कार उपक्रमींनो,
दिवाळी अंकाची घोषणा झाल्यावर एक विचार आला की येथे समुदाय आहेत. तेथे खास करुन समविचारी अथवा एकसारख्या आवडी निवडी असलेले सदस्य एकत्र येतात. जर अंकामध्ये समुदायाचा सहभाग झाला तर? मग म्हटलं येथे छायाचित्रण - प्रकाशचित्रण समुदायाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तर आपण उपक्रमावर एखादा प्रयोग करुन पहायला काय हरकत आहे? हा विचार काही सदस्यांना सांगितला असता त्यांच्या उत्साहवर्धक प्रतिक्रिया आल्या. तर, विचार असा आहे की,
उपक्रमी सदस्यांनी आपली काही छायाचित्रे अंकासाठी पाठवावीत. त्यामधील काही छायाचित्रांचे परीक्षण समुदायातले निवडक तज्ञ करतील आणि निवडक चित्रे अंकामध्ये समाविष्ट केली जातील. हा उपक्रम निव्वळ एक प्रयोग म्हणुन करायचा विचार आहे. चित्रे निवडताना तज्ञांचा विचार लक्षात घेतला जाईल. जर आपण पाठवलेले चित्र अंकात नाही आले तर आकस नसावा हि नम्र विनंती. ज्या सदस्यांना यामध्ये स्वारस्य असेल त्यांनी आपली छायाचित्रे खालील मसुद्याप्रमाणे पाठविण्याविषयी मला व्य. नि. मार्फत कळवावे.
मसुदा:
- आपण काढलेले छायाचित्र
- शक्य असल्यास त्यासोबतचा तांत्रिक विदा
- छायाचित्रा बद्दल थोडक्यात माहिती: जसे की, हेच चित्र का काढले? कुठे काढले? इत्यादी...
Comments
छान कल्पना
कल्पना छान आहे. चित्रे किती तारखेच्या आत पाठवायची ते पण सांगा.
तसेच चित्रे कश्या स्वरुपात पाठवायची ही पण माहिती येथेच् दिलीत तर उत्तमच होईल.
-
ध्रुव
+१
सहमत
अधिक माहिती
दिवाळी अंकासाठी लेखन पाठवायची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. आपण सुद्धा तिच धरुन चालु.
चित्रे पाठवताना शक्य त्या स्वरुपात पाठवा. अंकात समाविष्ट करायचे ठरल्यास मग नुसता दुवा सुद्धा चालायला हरकत नाही.
अंतिम तारीख
अंकासाठी अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे.
समुदायातल्या चित्रांचे संकलन करण्यासाठी अंतिम तारीख २ ऑक्टोबर असावी. नाहीतर शेवटच्या दिवशी चाणक्य यांची फार घाईगडबड होईल.
असेच
सुंदर कल्पना. शक्य तितक्या लवकर पाठवतो.
----
कल्पना चांगली आहे.
आवडली.
किती?
जास्तीत जास्त किती छायाचित्रे पाठवावीत्?
+१
आज हेच मनात आले. तसेच मला असेही वाटते की छायाचित्रात फारसे बदल न करता लोकांनी पाठवावीत. अथवा बदल केलेली छायाचित्रे व बदल न केलेली असे दोन भाग पाडावेत. तसेच चित्रे पाठवताना शक्यतो मोठ्या आकारात (full resolution) चित्रे (हवे तर प्रताधिकार टाकून) द्यावीत.
कळावे
-
ध्रुव
चित्रांची संख्या
जास्तीत जास्त ३ चित्रे पाठवा.
चित्र कसे पाठवायचे?
नमस्कार..
मी नुकतीच उपक्रमची सदस्य झाली आहे.चित्र कसे पाठवायचे? याबाबत माहीती द्या.
माहिती
चित्रे पाठवण्या बद्दलची माहिती व्य. नि. ने दिली आहे.
उत्साही सहभागा बद्दल धन्यवाद.
दिवाळी अ॑कासाठी फोटो पाठविले
नमस्कार,
मी काढलेले फोटो दिवाळी अ॑कासाठी पाठवित आहे.आपला उपक्रम स्तुत्य आहे.शुभेच्छा.
तज्ञ मंडळी..
त्यामधील काही छायाचित्रांचे परीक्षण समुदायातले निवडक तज्ञ करतील
चित्रे निवडताना तज्ञांचा विचार लक्षात घेतला जाईल.
ही निवडक तज्ञ मंडळी कोण आहेत ते समजू शकेल का?
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
कशासाठी
कशासाठी?
उत्सुकता...
एक उत्सुकता म्हणून...!
तात्या.
--
मिपाच्या समृद्ध कलादालनात फुलपाखरांच्या काही अप्रतीम प्रकाशचित्रांची नुकतीच भर पडली आहे!
उत्सुकता
मग उत्सुकता थोडी तशीच ठेवा. कळेल नजीकच्या भविष्यात.
वाट पाहू..!
मग उत्सुकता थोडी तशीच ठेवा. कळेल नजीकच्या भविष्यात.
थोडे आधी कळले असते तर बरे झाले असते.
असो, आम्ही वाट पाहू..!
आपला,
(प्रकाशचित्र तज्ञ मंडळी कोण आहेत हे नजिकच्या भविष्यात कळणार आहे म्हणून उत्सुकतेने नजिकच्या भविष्याची वाट पाहणारा!) तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
या प्रतिसादाखालील काही प्रतिसाद अप्रकाशित केलेले आहेत. सदस्यांनी आपापसातील प्रतिसादांच्या देवाणघेवाणीसाठी खरडवही किंवा व्य. नि. यांचा वापर करावा. - संपादन मंडळ.