उपक्रम दिवाळी अंक २००८

यावर्षी उपक्रमाचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे. विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे. उपक्रमाचा दिवाळी अंकही असाच वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी सर्व उपक्रम सदस्यांना आवाहन आहे की त्यांनी एक किंवा अधिक लेख दिवाळी अंकासाठी पाठवावेत.

लेखांचे विषय आणि प्रकार
भाषा, अर्थकारण, वाणिज्य, व्यवस्थापन, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, शिक्षण, संस्कृती, कला, क्रीडा, चित्रपट, पर्यावरण, प्रवास, व्यक्तिमत्व, साहित्य व साहित्यिक, राजकारण इ. कोणत्याही विषयावर अनुभव, अनुवाद, आस्वाद, प्रवासवर्णन, बातमी, माहिती, विचार, व्यक्तिचित्र, संदर्भ, स्फुट, कोडी/तर्कक्रीडा, पानपूरके (वरील विषयांवरील थोडक्यात पण रंजक माहिती, घटना, 'तुम्हाला हे माहीत आहे का?' वगैरे) अश्या प्रकारचे लेखन पाठवावे. सर्व उपक्रमींनी आपल्या आवडीच्या आणि अभ्यासाच्या विषयावर एक किंवा एकाहून अधिक लेख/लेखमालिका पाठवल्यास एक वैविध्यपूर्ण अंक बनू शकेल!

लेख पाठवताना

  • कृपया या अंकासाठी उपक्रमाच्या लेखनविषयक धोरणात बसणारे लेखनच पाठवावे.
  • सदस्यांनी एकाहून अधिक लेख पाठवण्यास हरकत नाही.
  • उपक्रमाच्या सदस्य नसलेल्यांचे उपक्रमाच्या धोरणात बसणारे लेखन त्यांच्या अनुमतीने पाठवण्यासही हरकत नाही.
  • लेखन प्रताधिकार कायद्याचा भंग करणारे किंवा उपक्रमावर किंवा इतरत्र पूर्वप्रकाशित झालेले नसावे.
  • लेखन ६ ऑक्टोबरच्या आधी पाठवावे.

लेखनाविषयी मार्गदर्शन

  • लेख साधारणपणे किमान ५०० शब्दांचा असावा. (यथोचित अपवाद वगळता)
  • लेख मोठा असेल तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन भागात प्रकाशित करणे शक्य आहे.
  • पारिभाषिक शब्दांच्या बरोबर मूळ शब्द देवनागरी आणि रोमन लिपीत कंसात द्यावा.
  • आवश्यक तेथे संदर्भ, दुवे वगैरे द्यावेत.
  • आवश्यक तेथे चित्रे, आकृत्या, छायाचित्रे, तक्ते द्यावेत. याविषयी कोणतीही संपादकीय मदत लागल्यास कळवावे.
  • स्वतःविषयी थोडक्यात माहिती द्यावी, शक्य असल्यास छायाचित्रही. (वैकल्पिक)

लेखन upakramdiwali @ gmail . com या पत्त्यावर पाठवावे. लेखन टेक्स्ट स्वरूपात किंवा थेट विरोपात चिकटवून पाठवावे. लेखनाची एक प्रत स्वतःजवळही ठेवावी. उपक्रम दिवाळी अंकाविषयी सर्व पत्रव्यवहार दिवाळी अंक या सदस्यनामाशी करावा.

अंकनिर्मिती (मुद्रितशोधन, संपादन इ.), अंकाची सजावट, मुखपृष्ठ, चित्रे याबाबतीत सहभागी होण्याची इच्छा असेल तर आपले स्वागत आहे.

तेव्हा झटपट लिहायला लागा आणि वरील सूचनांप्रमाणे शक्य तितके लेखन पाठवा! आपल्या उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे!

कळावे, लोभ असावा,
उपक्रम दिवाळी अंक २००८

लेखनविषय: दुवे:

Comments

शुभेच्छा

उपक्रमाचे हे नवे पाऊल स्वागतार्ह आहे. दिवाळी अंकासाठी शक्य तेवढी सर्व मदत माझ्याकडून मिळेल. :))


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच म्हणतो

असेच म्हणतो





उत्तम उपक्रम!!

चांगला दणदणीत दिवाळी अंक निघो ही शुभेच्छा! माझ्याकडूनही शक्य तेवढी मदत होईल.

मुखपृष्ठावर दिवाळी अंकाची घोषणा आहे तिला चौकट घालून अधिक उठावदार आणि लक्षवेधक करता येईल का?

शुभेच्छा!

माझ्याकडून पण शुभेच्छा! स्तुत्य "उपक्रम"!

शुभेच्छा

कृतीशील शुभेच्छा!
प्रकाश घाटपांडे

सुचना

एक सुचना..
दिवाळी अंक आणखी मोहक होण्यासाठी इथल्या मातब्बर छायाचित्रकारांनी काढलेली चित्रे सुद्धा असावीत.





अनेक शुभेच्छा

उत्तम उपक्रम!

सुन्दर कल्पना आहे

माझी यामधे अंकाची सजावट, मुखपृष्ठ, चित्रे याबाबतीत सहभागी होण्याची इच्छा आहे, पुढे तसे कळवा.

माझ्या मन:पुर्रवक शुभेच्छा.

दिवाळी अंकाला भरघोस हार्दिक शुभेच्छा!!!

दिवाळी अंकाला भरघोस हार्दिक शुभेच्छा!!!
प्रकाश घाटपांडेंप्रमाणे माझाही कृतिशील पाठिंबा.

+१

आगे बढो !
लागेल तशी मदत करायला उत्सुक !

+१

आगे बढो !
लागेल तशी मदत करायला उत्सुक !

शुभेच्छा !!!

उपक्रमसेठ,

दिवाळी अंकाच्या उपक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वा!

वाचून आनंद झाला. अनेक शुभेच्छा.
सहभाग गृहित धरावा :)

ऋषिकेश

आजी आजोबांच्या वस्तू

एकापेक्षा अधिक लेख टाकता येतील म्हणजे तुझ्या डोक्यातला लेख टाकच पण आजी-आजोबांच्या वस्तू मालिकेतील एखादा फक्कड लेखही येऊ दे.

अरे वा

दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!
राधिका

शुभेच्छा!

माझ्यादेखील! चांगला दणदणीत दिवाळी अंक निघो!

-सौरभदा

=========================

असेच

दिवाळी अंकासाठी अनेक शुभेच्छा.
----

शुभेच्छा..!

चांगला दणदणीत दिवाळी अंक निघो ही शुभेच्छा!

प्रियालीशी सहमत....!

उपक्रमाच्या दिवाळी अंकाला आमच्या व्यक्तिगत व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकोत्तम भरघोस शुभेच्छा!

आम्ही सदर दिवाळी अंकासाठी एखादा संगीत विषयक लेख निश्चित पाठवू! वाचकांना तो आवडेल अशी आशा वाटते! अभिजात संगीताच्या एखाद्या मैफलीचे वर्णन/परिक्षण चालेल का?

भाषा, अर्थकारण, वाणिज्य, व्यवस्थापन, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, शिक्षण, संस्कृती, कला, क्रीडा, चित्रपट, पर्यावरण, प्रवास, व्यक्तिमत्व, साहित्य व साहित्यिक, राजकारण इ. कोणत्याही विषयावर अनुभव, अनुवाद, आस्वाद, प्रवासवर्णन, बातमी, माहिती, विचार, व्यक्तिचित्र, संदर्भ, स्फुट, कोडी/तर्कक्रीडा, पानपूरके

वर आपण जी यादी दिली आहे त्यात 'व्यक्तिचित्र' हा शब्द आहे. दिवाळी अंकातील लेखाकरता उपक्रमाला कुठल्या प्रकारची व्यक्तिचित्रं अपेक्षित आहेत याबाबत अजून काही स्पष्ट खुलासा केल्यास बरे होईल. माझ्या अंदाजाप्रमाणे ललित सहित्यात मोडणारे व्यक्तिचित्र उपक्रमाला अपेक्षित नसावे. तरीही एकदा स्पष्ट खुलासा केल्यास बरे होईल!

असो, अभिजात संगीतविषयक एखादा लेख आणि वरील खुलासा झाल्यास एखादे व्यक्तिचित्र असे दोन लेख उपक्रमाच्या दिवाळी अंकाकरता आम्ही अगदी अवश्य पाठवू, नव्हे ते आम्हांस आवडेल! :)

आमच्यातर्फे आणि आमच्या मिसळपाव परिवारातर्फे उपक्रमाच्या दिवाळी अंकाला पुनश्च् एकदा शुभेच्छा!

अवांतर -
१) दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर कोण मंडळी आहेत ही माहिती मिळाल्यास बरे होईल!
:)
२) 'पानपुरके' हा शब्द आवडला! :)

आपला,
(उपक्रमी) तात्या अभ्यंकर.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

उत्तराच्या अपेक्षेत..

वर आपण जी यादी दिली आहे त्यात 'व्यक्तिचित्र' हा शब्द आहे. दिवाळी अंकातील लेखाकरता उपक्रमाला कुठल्या प्रकारची व्यक्तिचित्रं अपेक्षित आहेत याबाबत अजून काही स्पष्ट खुलासा केल्यास बरे होईल. माझ्या अंदाजाप्रमाणे ललित सहित्यात मोडणारे व्यक्तिचित्र उपक्रमाला अपेक्षित नसावे. तरीही एकदा स्पष्ट खुलासा केल्यास बरे होईल!

असो, अभिजात संगीतविषयक एखादा लेख आणि वरील खुलासा झाल्यास एखादे व्यक्तिचित्र असे दोन लेख उपक्रमाच्या दिवाळी अंकाकरता आम्ही अगदी अवश्य पाठवू, नव्हे ते आम्हांस आवडेल! :)

उत्तराच्या अपेक्षेत...

तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

व्यक्तिचित्रांबद्दल

उपक्रमाच्या दिवाळी अंकाला आमच्या व्यक्तिगत व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे अनेकोत्तम भरघोस शुभेच्छा!

मनःपूर्वक धन्यवाद!

दिवाळी अंकातील लेखाकरता उपक्रमाला कुठल्या प्रकारची व्यक्तिचित्रं अपेक्षित आहेत याबाबत अजून काही स्पष्ट खुलासा केल्यास बरे होईल. माझ्या अंदाजाप्रमाणे ललित सहित्यात मोडणारे व्यक्तिचित्र उपक्रमाला अपेक्षित नसावे. तरीही एकदा स्पष्ट खुलासा केल्यास बरे

बरोबर आहे. ललित साहित्यात मोडणारी व्यक्तिचित्रे अपेक्षित नाहीत. व्यक्तिचित्रांमध्ये असामान्य व्यक्तिमत्त्वांचे कर्तृत्व, त्यांचा जीवनप्रवास, कौशल्ये/संशोधन आणि त्यासाठी घेतलेले कष्ट या आणि अश्या गोष्टींवर भाष्य करणारा माहितीपर लेख अपेक्षित आहे.

'पानपुरके' हा शब्द आवडला! :)

धन्यवाद! पानपूरकांसाठी आपल्या आवडीच्या/अभ्यासाच्या विषयावरील मनोरंजक माहिती थोडक्यात द्यावी.

आणखी शंका/प्रश्न/माहितीसाठी आमच्या दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.-

आभार..

खुलाश्याबद्दल अनेक आभार...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

दिवाळी अंकासाठी

संपादक उपक्रमी,
दिवाळी अंकासाठी हार्दीक शुभेच्छा!

वा!

उत्तम उपक्रम. दिवाळी अंकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. अंकासाठी शक्य तेवढी मदत करण्यास उत्सुक आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

असेच

म्हणतो. कार्यबाहुल्यामुळे प्रत्यक्ष मदत करणे अवघड आहे, तथापि लेखन पाठवण्याचा प्रयत्न करतो.
अंकाला शुभेच्छा.
सन्जोप राव

धन्यवाद!

आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

आपले लेख शक्य तितक्या लवकर वर उल्लेखलेल्या विरोप पत्त्यावर पाठवावेत म्हणजे अंकनिर्मितीच्या कामात मदत होईल. लेखासोबत आपल्या आवडीच्या/अभ्यासाच्या विषयावरील मनोरंजक पण थोडक्यात माहिती पानपूरके म्हणून पाठवावीत.

आणखी शंका/प्रश्न/माहितीसाठी आमच्या दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.

ग्रंथ परिचय – विज्ञान अणि चमत्कार

ग्रंथ परिचय –

विज्ञान अणि चमत्कार

लेखक - प्राचार्य अद्वयानंद गळतगे. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. ५९१२६३.

फोन ०८३३८-२९३३९९
मोबा - ०९८८६६७८१८३.
भानामतीचे खेळ कोण करते? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का ? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो ? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान ?

या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे? बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय? क्वांटम सिद्धांताने आधुनिक भौत शास्त्रीय चिकित्सेची दालने कशी उघडी केली आहेत?
विज्ञान आणि अध्यात्माचा मेळ कसा बसवावा? परामानसशास्त्राने केलेल्या संशोधनाची ओळख व महत्व काय? अशा अनेक कूट प्रश्नांच्या उत्तरांचे समग्र भांडार म्हणजे विज्ञान अणि चमत्कार हा ग्रंथ आहे. प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या आधीच्या विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान आणि बुद्धिवाद या ग्रंथाच्या विष्लेषणातून निर्माण होणाऱा हा ग्रंथराज आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

६६४ पानांच्या या भारी भक्कम ग्रंथाच्या प्रस्तानवनेत या ग्रंथाच्या उद्देशाबाबात त्यांनी म्हटले आहे की भौतिकवादी विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार असत्य (किंवा अशक्य) ठरतात... कारण त्या शास्त्राच्या मर्यादेत ते कदाचित ते घडत नसतील, पण त्या शास्त्राच्या मर्यादेबाहेर घडतात की नाही हे त्या मर्यादेत राहून कसे कळणार? किंवा ठरवणार? त्या साठी ती मर्यादा ओलांडून बाहेर आले पाहिजे. कारण त्या शास्त्राच्या बाहेर काम करणारी अनेक शास्त्रे आहेत. भौतिकवादी शास्त्रज्ञ, भौतिक शास्त्राबाहेर जगच अस्तित्वात नाही असे म्हणू शकणार नाहीत. त्यांनी असे म्हणणे म्हणजे एखाद्या विहिरीतील बेडकांनी विहिरीच्या बाहेर पाण्याचे जगच अस्तित्वात नाही असे म्हटल्यासारखे आहे.. हा ग्रंथ वाचकांना या संकुचित दृष्टीच्या बेडकाच्या विहिरीतून बाहेर काढून विशाल अतींद्रीय सागराचे दर्शन घडवतो. ते वाचकांनी कुतुहल व करमणूक म्हणून नव्हे तर गंभीरपणे शास्त्रीय, अभ्यासू वृत्तीने पाहावे, अनुभवावे. यातून वाचकाला नवी वैज्ञानिक दृष्टी प्राप्त झाली तर लेखकाला या ग्रंथलेखनाचे सार्थक झाल्याचे समाधान होईल.

जे डोळ्यांना दिसते ते दृष्य भौतिक जगच काय ते खरे असे समजून त्या जगाच्या नियमाच्या शोधालाच विज्ञान म्हणायची चूक मोठमोठे शास्त्रज्ञ करत असतात. ही त्यांची वैज्ञानिक अंधश्रद्धा आहे. ज्याप्रमाणे एखादा आंधळा आपल्याला दिसत नाही म्हणून प्रकाशच अस्तित्वात नाही असे म्हणू शकत नाही, त्या प्रमाणे अतींद्रीय दृष्टी नसलेला मनुष्य – भले तो कितीही मोठा शास्त्रज्ञ असेल – लिंग देह, मनोदेह, बुद्धिदेह, आत्मा हे डोळ्यांना दिसत नाहीत म्हणून अस्तित्वाच नाहीत असे म्हणू शकणार नाही. तसे म्हणणाऱ्यांना अदृष्य पातळीवरील त्या देहाचे भौतिक जगात सुद्धा कसे दृश्य़ परिणाम घडून येतात, अनुभवायला मिळतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्व आंधळ्या भौतिकवादी शास्त्रज्ञांना सुद्धा मान्य करावे लागते.

पदार्थविज्ञान, भूत, भानामती, परामनोविज्ञान, (दैवतशास्त्र) ब्लॅक – व्हाईट जादू आणि ब्रह्मविज्ञान या तिन्हीचा वरवर पाहता परस्परांशी संबंध नाही, नव्हे ती एकमेकांना धिक्कारताना दिसतात परंतु या तीनही शास्त्राना एकत्र आणण्याचा चमत्कार प्रस्तूत ग्रंथात विज्ञानामुळेच शक्य झाला आहे. गळतगे यांनी या शास्त्रांची नाळ परस्परांशी निसर्गतःच कशी जोडली गेलेली आहे हे सिद्ध गेले आहे.

परिचय कर्ता -

विंग कमांडर शशिकांत ओक

ए - ४, ४०४ गंगा हॅमलेट हौ. सो. विमाननगर, पुणे. ४११ ०१४.
मोबाः ०९८१९०१०४९

संबंध काय?

या प्रतिसादाचा आणि दिवाळी अंकाचा संबंध काय?

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

बहुधा

बहुधा `गलती से मिष्टेक हो गया` :)

मुदतवाढ

नमस्कार!

उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

अजूनही ज्यांना लेख पाठवायचा आहे पण शक्य झाले नाही त्यांच्यासाठी या रविवारपर्यंत (१२ ऑक्टोबरपर्यंत) मुदत वाढवण्यात आली आहे! फक्त आपल्या लेखनाचा विषय आणि अंदाजे शब्दसंख्या निरोपातून कळवावी म्हणजे नियोजनास सोपे पडेल.
तेव्हा झटपट लिहायला लागा आणि लवकरात लवकर लेखन पाठवा!

शंका/प्रश्न/माहितीसाठी आमच्या दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा

शुभेच्छा!

आज बर्‍याच दिवसांनी येथे रेंगाळलो. मनापासून शुभेच्छा!

 
^ वर