छायाचित्र टीका २७

Exposure

असेच एकदा एक्स्पोजरशी खेळताना काढलेले हे चित्र! बघा आवडते का!

खरतर ह्यात सुधारणेला खुप वाव आहे! ते खालचे ऑलिव्ह बरोबर केंद्रस्थानी नाही आले. आणि आजुबाजुचा पिवळा प्रकाशरेषासुद्धा बरोबर गोलाकारात फिरली असती तर अजुन मजा आली असती (पण मला हे मान्यच करावे लागेन की ते काही आपल्याला जमले नाही बुवा!!!)

Exposure : 10 sec
Aperture : 5.6
ISO : 1600

-भालचंद्र!

लेखनविषय: दुवे:

Comments

दोन...

दोन विषय एकाच चित्रात पकडण्याचा प्रयत्न वाटला.
फिरणारा प्रकाश, व खालचे ऑलिव्ह अश्या दोन्ही गोष्टी एकाच चित्रात आल्यामुळे दोन्हीची मजा गेली आहे. कदाचित एकच subject ठेवला असता तर मस्त दिसले असते.

चित्राबद्दल कसे काढले हे जरा सविस्तर सांगता येईल का?
-
ध्रुव

चित्र

शरद
चित्र दिसत नाही.
शरद

हे बघा...

या पत्त्यावर बघा...

आणि नाहीच दिसले तर भालचंद्ररावांना दुसरीकडे कुठेतरी चित्र चढवायला सांगा :)
-
ध्रुव

चित्र

शरद
दिसु लागले की ! ध्रुव यांच्याशी सहमत. काय करावयाचे होते व कसा प्रयत्न केला ते कळले तर काय झाले असावे याचा
अंदाज लगेल.
शरद

 
^ वर