छायाचित्र टीका २४: स्पर्श

एका लहानग्याने हातावर धरलेले फुलपाखरु

कॅमेरा : कॅनन डिजीटल रेबेल ३५०ड
ऍपर्चर ५.६
शटर १/१००
आयएसओ १००

लेखनविषय: दुवे:

Comments

फार सुंदर फोकस

खेळकर विषय. फोकसची कमाल. कातडीवरची रेतीचे कण छान दिसतात.

(अवांतर : असे कॅलेंडरवरचे पर्फेक्ट फोटो मला थोडे कंटाळवाणे वाटतात. अत्यंत सुरेल "एलेव्हेटर म्यूझिक" सारखे. पण ही बहुतेक माझ्यातली तीव्र असूया बोलते आहे. दुर्लक्ष करावे.)

माझेही हेच मत

परफेक्ट फोटो. तुमच्या छायाप्रकाशरंग-चित्रीकरणाला तोडच नाही.

पण आऊट ऑफ फोकस कृत्रिम वाटणारी पार्श्वभूमी, काळी जाड चौकट यामुळे चित्र मृतवत वाटले.

हेच...

कोलबेर तुमच्या चित्रीकरणाला खरंच तोड नाही! चित्र आवडलं नि लहानग्याच्या बोटांवरच्या ठशांच्या रेषा पण आवडल्या.
मात्र दरवेळी चौकटीचा एवढा अट्टहास कशासाठी बुवा? जर चित्र भिंतीवर लावायचं असेल तरच (अगदी कमी जाडीची) फ्रेम करावी असं मला वाटतं. अर्थात हे माझे वैयक्तिक मत झाले. मात्र मागच्या आयफेल टॉवरची चौकट देखील बिलकूल आवडली नाही. डोळ्यांवर येत होती. (दुसरे वैयक्तिक मत!) :)
सौरभदा-

फारच सुंदर

फोटो जवळून काढला आहे की काढून मग जास्त चांगला बनवला आहे? धनंजय म्हणतात तसे फोकसची कमालच आहे. :) उपक्रमावर तुमच्या चित्रांचे प्रदर्शन होऊन जाउदेत एकदा. :)





मस्त

एकदम मस्त फोटो!!..
कमालीचा शार्प फोकस! .. त्या लहानग्याच्या हातवरची मातीही मस्त आलीय!!

सुरेख!

-भालचंद्र

सुपर्ब्

सिम्प्ली सुपर्ब !! फोटो सुंदर आला आहे. फुलपाखराचा असा फोटो घेणे अवघड कारण फोटो काढेपर्यंत ते उडुन जाण्याचा संभव अधिक.
चाणक्य म्हणतात त्याप्रमाणे एक प्रदर्शन होऊनच जाउद्या.

- सूर्य.

सुंदर आवर्ती रचना

अरे वा वा कोलबेरराव !
फार छान नेटका फोटो. मस्त स्पष्टता.
नजर बोटांवरुन वर जाते,नंतर येणारे फुलपाखराचे पंख आणि पुन्हा गोल फिरुन बोटे... पुन्हा एक आवर्तन करण्याचा मोह नजरेला होतो..रचना फार मस्त जमली आहे.... अभिनंदन.
--लिखाळ.

क्लासच

हे फुलपाखरू कसं काय हातावर बसलं बॉ? याची कथा वाचायला आवडेल.
फोटु क्लासच :)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

सुंदर फोटो

फोटो सुंदरच आहे. पण चौकटीचा अट्टाहास का? फोटोशॉपचा वापर केला आहे का? आन् ती पाकोळी कुडाल्लि ? म्हजी आस कि बागेतली कि समुद्र किनार्‍या वरची ? ते रेतीचे कन दिस्तायत म्हनु न म्हन्ल.
(अज्ञानी शंकेखोर)
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

फोटोशॉपचा (विशेष) वापर केलेला नाही. पाकोळी बागेतलीच तिथल्याच रोपट्या खालची माती.

अप्रतिम

फोकस, चित्र, फुलपाखरु सगळेच अप्रतिम. फारच सुरेख. १०/१० गुण :)

चौकटीचा अट्टाहास का - यावर असे वाटते की चौकट ही छायाचित्राला खुलवते. पण मला स्वत:ला जाड चौकट आवडत नाही.

-
ध्रुव

आभारी आहे

आवर्जुन प्रतिसाद नोंदवणर्‍या सर्वांचे आभार!

 
^ वर