उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
उपक्रमावरील मॉडरेशनचे निकष
धोंडोपंत
April 9, 2007 - 3:23 pm
नमस्कार,
उपक्रमावरील मॉडरेशनचे निकष काय आहेत हे जाणून घ्यायची इच्छा आहे. एखाददोन बोलीभाषेतल्या शिव्या चालतील की नाही.
कारण उपक्रमाचा खटाटोप संवाद घडवून आणणे हा आहे. किमान आम्ही तरी तसे समजत आहोत. अशा संवादात अस्सल बोलीतली वाक्ये आली तर त्यावर आक्षेप आहे का?
प्रशासकीय धाकाचे रुपांतर काय होते हे इतर मराठी संकेतस्थळांच्या वाजलेल्या दिवाळ्यातून आपल्याला सर्वांना माहित आहे.
इथे मनमोकळे वातावरण रहावे.जे लोक बोलायला, काही सांगायला आसुसलेले आहेत त्यांना प्रशासकीय बडग्यामुळे तोंड शिवण्याची वेळ येऊ नये, असे वाटते.
याचा अर्थ एकमेकांची आयमाय काढायची असा नाही. पण् बोलीभाषेतील रूढ शब्दप्रयोगावर प्रशासनाची खुन्नस असू नये, असे आमचे मत आहे.
उपक्रमावर मत आणि विचारस्वातंत्र्य आहे म्हणून इथे मजा आहे, हे वेगळे सांगणे न लगे.
धोंडोपंत
दुवे:
Comments
विनंती
बोलीभाषेचे ह्या संकेतस्थळाला वावडे नाही. पण लेखन आक्षेपार्ह आहे की नाही हे वाचल्याशिवाय सांगता येणार नाही. सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखनाचे सर्वमान्य संकेत पाळणारे लेखन ह्या संकेतस्थळावर व्हावे अशी अपेक्षा आहे. उथळ चर्चा, लेख, प्रतिसाद, वाक्ये शक्यतो टाळण्याचे प्रयत्न करून मदत करावी, ही पुन्हा विनंती. संपादकीय संस्कार किंवा काटछाट हा एक नाइलाज असतो, हे समजून घ्यावे.
उपक्रम या संकेतस्थळाची निर्मिती ज्या उद्दिष्टांसाठी झाली आहे त्यांच्यापासून दूर जाता येणार नाही. इतर प्रकारच्या लेखनासाठी अनेक संकेतस्थळे आहेत.
प्रतिसाद
संपादक ३ महाशय,
आपला जलद प्रतिसाद नेहमीसारखाच सुखावणारा आहे.
परंतु आपल्या वरील विधानावर मला तिव्र आक्षेप आहे. उपक्रमा व्यतिरिक्त स्थळे आहेत हे सुचवणे नुसतेच हास्यास्पद नसून अतिशय उद्धट पणाचे (रुड)लक्षण आहे. उपक्रमाच्या उद्दिष्टांशी देखिल मिळते जुळते असणारे 'मराठी विकि' (मराठीतून महितीचे आदान प्रदान इ.इ.) नावाचे संकेतस्थळ उपलब्ध आहे,तेव्हा उपक्रमावर 'दुसरा काहीच पर्याय नसल्याने' लोक लिखाण करतात हा गैर समज नसावा. तरीही 'उपक्रम'ला सदस्य आणि लिखाण भरभरून मिळते ह्याची कारणे उघड आहेत. ..
व्यवस्थापनाने इथली धोरणे उद्दिष्ट्ये काहीही ठरवावीत त्याबद्दल तक्रार करू शकत नाही. परंतु हि धोरणे पटत नसल्यास 'दुसर्या संकेतस्थळांवर जा' हा अनाहुत सल्ला कृपया देऊ नये. आधीही एकदा असे उद्गार व्यवस्थापनाकडून आल्याने आज हे परखडपणे मांडावेसे वाटले. कोणतेही संकेतस्थळ यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापनाने अतिशय काळजीपुर्वक शब्द वापरवेत असे वाटते.
(उपक्रम सभासद)
वरूण
उध्दटपणा ???
परंतु आपल्या वरील विधानावर मला तिव्र आक्षेप आहे. उपक्रमा व्यतिरिक्त स्थळे आहेत हे सुचवणे नुसतेच हास्यास्पद नसून अतिशय उद्धट पणाचे (रुड)लक्षण आहे.
आम्हाला उपक्रमरावांच्या विधानात उद्धटपणा जाणवला नाही.
याचे कारण असे की, त्यांनी उपक्रम आणि इतर यातील फरक दर्शवला आहे. "आमच्याकडे अमूक गोष्ट मिळत नाही पण बाजारात इतर ठिकाणी ती विकली जाते" या आशयाचे हे विधान आहे. असो.
उपक्रमराव,
अत्यंत शीघ्रतेने तुम्ही लोकांच्या म्हणण्याची दखल घेता, ते म्हणणे तुम्हाला पटले, न पटले तरी त्याची दखल घेतल्याचे संकेत लगेच देता, ही बाब उपक्रमींसाठी सुखावणारी आहे.
तुमचे हे "रिस्पाँडिंग नेचर" असेच शाबूत ठेवा. नाहीतर काय होतं की, सभासद प्रशासनाकडे अनेक वेळा संपर्क साधूनही, त्या प्रशासकाच्या तोंडून एक शब्दही येत नाही.
जणू काय तो संकेतस्थळ उपलब्ध करून सभासदांवर उपकार करतोय अशी त्याची वृत्ती असते. अशा माजोरड्या वृत्तीने सभासद दुरावतात आणि त्या संकेतस्थळाचा उकिरडा होतो.
तुमच्या शीघ्र प्रतिसाद देण्यामुळे उपक्रमाचे तसे होणार नाही, असे आम्हाला वाटते.
शेवटचा मुद्दा बोलीभाषेचा....
आमचे आराध्य दैवत श्री. सुरेश भट यांनी म्हटले आहे की, सर्वसामान्य माणूस ज्या भाषेत बोलतो ती खरी भाषा.....
हे म्हणणे १००% खरे आहे असे आम्हाला वाटते. संवाद साधतांना लोक नको त्या औपचारिकता पाळत बसले तर संवाद निरस होतो.
आम्ही आधीच म्हटले आहे की कोणीही कोणाची आयमाय काढू नये. एकमेकांना शिव्या देणे आणि इतर सभासदांचा उपमर्द करणे, याचे समर्थन आम्ही कदापि करणार नाही.
पण बोलताबोलता, रूढ शब्दप्रयोगांचा वापर केला तर त्यावर आडकाठी नसावी. आपण मित्रांसमावेत जसा संवाद साधतो, तसा संवाद येथे व्हावा. त्यावर औपचारिकतेचा बलात्कार होऊ नये असे आम्हाला वाटते.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
वरुण यांच्याशी सहमत
हे विधान अव्यावसायिक आहे. उपक्रमावरील इतर चर्चा व उपक्रमाबाहेरील चर्चामध्ये संकेतस्थळ हे वन स्टॉप सोल्युशन प्रकारचे असावे असे मत अनेकांनी व्यक्त केले होते. उपक्रमावर आल्यानंतर इतर कोणत्याही संकेतस्थळाला भेट देण्याचे प्रयोजन राहू नये अशा सुविधा उपक्रमाने द्याव्यात.
इतर संकेतस्थळांना स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर तिथेही या सुविधा दिल्या जातीलच. मात्र दुसरीकडे आहे म्हणून आमच्याकडे मिळणार नाही हा प्रकार अयोग्य वाटतो.
(उपक्रम सभासद) योगेश
मगरूर अन् मुजोर..
सार्वजनिक संकेतस्थळांवरील लेखनाचे सर्वमान्य संकेत पाळणारे लेखन ह्या संकेतस्थळावर व्हावे अशी अपेक्षा आहे.
हे सर्वमान्य संकेत कोणते ते कळतील का? की आपण मालक म्हणून आपल्याला मान्य असलेले संकेत??
उथळ चर्चा, लेख, प्रतिसाद, वाक्ये शक्यतो टाळण्याचे प्रयत्न करून मदत करावी, ही पुन्हा विनंती.
एखादी चर्चा, प्रतिसाद, लेख उथळ आहेत किंवा नाही हे कुणी ठरवायचे? आपण मालक आहात म्हणून आपण ते ठरवणार? स्पष्टपणे सांगितलंत तर बरं होईल!
इतर प्रकारच्या लेखनासाठी अनेक संकेतस्थळे आहेत.
वरूणरावांशी सहमत! माझ्यामते हे अत्यंत मगरूर अन् मुजोर विधान आहे. ही मगरूरी मालकी हक्कावरून आली आहे असे वाटते! इतर प्रकारच्या लेखनासाठी अनेक स्थळे आहेत हे सांगून एका अर्थी आपण सभासदांना बाहेरचा रस्ता दाखवत आहात असे वाटते!
असो! उपक्रमची चिंता वाटते इतकेच याक्षणी म्हणू शकतो..!
तात्या अभ्यंकर.
सहमत..
परंतु आपल्या वरील विधानावर मला तिव्र आक्षेप आहे. उपक्रमा व्यतिरिक्त स्थळे आहेत हे सुचवणे नुसतेच हास्यास्पद नसून अतिशय उद्धट पणाचे (रुड)लक्षण आहे.
वरूणशी सहमत!
कोणतेही संकेतस्थळ यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापनाने अतिशय काळजीपुर्वक शब्द वापरवेत असे वाटते.
जाऊ द्या हो वरूणराव. मटामध्ये लेख आला त्याचा हा परिणम असावा!
तात्या.
जरा थांब!
प्रशासकीय धाकाचे रुपांतर काय होते हे इतर मराठी संकेतस्थळांच्या वाजलेल्या दिवाळ्यातून आपल्याला सर्वांना माहित आहे.
जरासा थांब धोंड्या! कुठल्याही संकेतस्थळावर अशीच जर प्रसासकीय मगरूरी सुरू राहिली तर ते संकेतस्थळ मातीस मिळण्यास फारसा वेळ लागणार नाही. कुठलिही हुकमशाही फार काळ टिकत नाही असे आम्ही नेहमी म्हणत असतो!
असो! उपक्रमची काळजी वाटते. उपक्रमला शुभेच्छा!
तात्या अभ्यंकर.
पुरे आता! व्यवस्थापनाला विनंती
व्यवस्थापनाला विनंती की हा प्रतिसाद निदान काही काळ येथे ठेवू द्यावा आणि नंतर त्याला केराची टोपली दाखवावी. तो व्यक्तिगत रोखाचा आहे हे मला मान्य आहे आणि तो येथे असता कामा नये तरीही कोणीतरी हे बोलणे भाग आहे असे वाटते.
तात्या,
आपण गेल्या अनेक महिन्यांपासून असे का वागता आहात त्यावर थोडा शांतपणे विचार करा. मनोगताच्या प्रशासनाने आपल्यावर अनेक प्रकारे निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला, उपक्रमावरही तेच होत आहे. दोन्ही व्यवस्थापनाचा एकमेकांशी संबंध असावा असे वाटत नाही तर मग तुमच्या प्रतिसादांवरच गदा का येते?
प्रशासनाने/ व्यवस्थापनाने कोणती धोरणे ठेवावीत हा प्रशासनाचा/ व्यवस्थापनाचा प्रश्न, तो थोडावेळ् बाजूला ठेवू पण या रोजच्या वादावादीत तुम्ही स्वतःला कोठे हरवून बसला आहात यावर थोडा विचार करा. बोलीभाषेतील शिव्या (त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद/ संवाद म्हणा हवं तर) लिहिता लिहिता तुमच्यातील प्रतिभावंत लेखक नाहीसा झाला आहे. शिंत्रे गुरुजींपासून अर्धवट राहिलेले (की सालसपासून) लेख पूर्ण न करता तुमचे लेखन एकांगी होत आहे याचा कधी विचार केलात का?
लोकांनी तुमच्या प्रतिभेवर, सहज मोकळ्या भाषेवर प्रेम केले, या शिव्यांवर नाही हे मी नक्कीच सांगू शकते. तुम्ही लिहिता तेव्हा मनापासून स्वानंदासाठी लिहिता असे मागे म्हणाल्याचे आठवते. गेल्या किती महिन्यांत तुम्हाला तो आनंद मिळाला आहे?
शास्त्रीय संगीतावर समुदाय तुम्ही सुरू केलात, त्यात किती लेख टाकलेत? ती तुमची ओळख असावी, शिवराळपणा नाही असे मनापासून वाटते. माझ्यासारख्या "ढ्" माणसांसाठी शास्त्रीय संगीतातील बाराखडीपासून सुरुवात करा. बसंतचं लग्न सारखी मालिका उत्कृष्ट आहे कारण ती संगीतातील अनभिज्ञ वाचकांनाही पकडून ठेवते, ती तुमची प्रतिभा.
इतक्या दिवसांत तुम्ही वेगळा प्रयत्न का नाही केला? वेगळे लेख का नाही टाकले?
तात्या तुम्ही माझे मित्र म्हणणारे तुम्ही मनोगतावरून जाताना मागे का नाही आले? 'तू भांडण काढ, अन्याय सहन करू नकोस' असे चढवणारे मित्रच असतील असे नाही हे तुम्ही जाणताच.
हा प्रतिसाद वाचून तुम्हाला राग आला तरी हरकत नाही पण ही जी रोजची वादावादी तुम्ही सुरू ठेवली आहे त्यापेक्षा काही वेगळे करून पाहा आणि चांगल्या लेखांसाठी लोकप्रिय व्हा.
प्रियाली
प्रश्न
.
ह्यासाठी आपण 'व्यक्तिगत निरोप' ही सुविधा का वापरली नाहीत ह्याचे कारण समजु शकेल का? तुम्ही तात्यांना दिलेल्या सल्ल्या/काउन्सिलींग विषयी माझ्यासारख्या सभासदांना रस नाही.. कारण आम्ही येथे माहितीच्या आदान प्रदानासाठी येतो आणि हेच उपक्रमाचे उद्दिष्ट आणि धोरण पण आहे.
कारण
व्यक्तिगत निरोपच का मला याहू! निरोप्याही वापरता आला असता परंतु हा प्रतिसाद उपस्थित सर्वांनी जाहिर वाचावा असे मला वाटले. मला जे वाटते ते बरोबर असेलच असे नाही.
मला मान्य आहे. मला ज्या व्यक्तींनी तो वाचावा हे अपेक्षित होते त्या सर्वांनी तो वाचला आहे. व्यवस्थापनाने तो उडवून द्यावा.
आभारी आहे
आपल्या अतिजलद स्पष्टिकरणाबद्दल आपला अत्यंत आभारी आहे. परंतु "ज्या व्यक्तींनी तो वाचावा हे अपेक्षित होते त्या सर्वांनी तो वाचला आहे. व्यवस्थापनाने तो उडवून द्यावा" हा मुद्दा अजिबात पटला नाही कारण हीच वृत्ति कोणत्याही सार्वजनिक संकेतस्थळाच्या स्वास्थ्यासाठी वाईट असते असे वाटते.
असा निकाल आहे का?
अशा प्रकारचा निकाल भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे काय? असा कायदा संसदेने पारित केला आहे काय? मग मुद्दा लावून धरणे, कीसपाडूपणाही वाईटच असावा:)
सर्वोच्च न्यायालय?
वरील वृत्ती मधुन, 'काहीही लिहावे, व्यवस्थापानाच्या लक्षात येइपर्यंत बरेच जण वाचून घेतातच आणि नंतर लिखाण उडवले काय किंवा ठेवले काय..' असा विचार दिसतो. ह्यालाच आज काल 'कट अँड रन' असेही म्हणतात. बहुसंख्येने सदस्यांनी ह्या मार्गाचा अवलंब केल्यास सार्वजनिक लिखाणाच्या कोणत्याही स्थळासाठी ते वाईटच आहे..असे मला वाटते. वरील प्रतिसादामध्ये देखिल..'असे वाटते' मध्ये लेखकाला वाटते असे अभिप्रेत आहे 'सर्वोच्च न्यायालयाला' नव्हे. राहता राहिला मुद्दा कीस पाडण्याचा..तर कीस पाडणे हा प्रकार एकतर्फी नसतो आणि 'कट अँड रन' इतका संकेतस्थळास घातकही नसावा.
सहमत
मात्र प्रतिसाद उडवणे किंवा ते संपादित करणे हे केवळ प्रशासकांच्या एकट्याच्या मर्जीवर असू नये.
रेडिफ मेसेज बोर्ड प्रमाणे अनेक संकेतस्थळांवर प्रत्येक संदेशावर "रिपोर्ट अब्युझ" असा एक पर्याय दिलेला असतो. जर एखाद्या संदेशावर अमुकतमुक इतकी मते आली तर तो नष्ट किंवा संपादित केला जावा.
हे तंत्रज्ञान उपक्रमावर देणे किती अवघड वा सोपे आहे याची कल्पना नाही.
(डेमोक्रॅटिक) योगेश
म्हणजे आम्ही प्रातिनिधिक की काय? ;)
जरी ह्या प्रतिसादात व्यक्तिगत रोख असला, तरी उपक्रमाच्या सर्व प्रतिसादकांसाठी तो मार्गदर्शक ठरेल असे मला वाटते. त्यामुळे तो प्रतिसाद संपादकांनी उडवू नये, असे माझे मत आहे.
सर्कीटराव,
अहो प्रियालीजींच्या प्रतिसादातील व्यक्तिगत रोख आमच्यावर होता. पण आपण म्हणताय की तो सर्व प्रतिसादकांसाठी मार्गदर्शक होता, म्हणजे आम्ही प्रातिनिधिक ठरलो नाही का?
ठीक आहे! सर्व प्रतिसादींचे प्रतिनिधि होणे आम्हास मान्य आहे. आम्ही निवडणूकीला उभे राहू! ;)
आपला,
तात्या वाजपेयी!
प्रियाली, तुझं म्हणणं खरं आहे..
आपण गेल्या अनेक महिन्यांपासून असे का वागता आहात त्यावर थोडा शांतपणे विचार करा. मनोगताच्या प्रशासनाने आपल्यावर अनेक प्रकारे निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला,
खरं तर मला त्याचंच खूप वाईट वाटलं. मनोगतावर मी अगदी मनापासून प्रेम केलं होतं. आजही करतो.
दोन्ही व्यवस्थापनाचा एकमेकांशी संबंध असावा असे वाटत नाही तर मग तुमच्या प्रतिसादांवरच गदा का येते?
तोंड फाटकं असून मोकळं सोडायची सवय आहे. त्यामुळे प्रतिसाद लिहितांना मागचापुढचा विचार केला जात नाही. ही माझी चूक असावी असं तुझा प्रतिसाद वाचल्यानंतर मनापासून जाणवतंय! कबूल करतो..:)
पण या रोजच्या वादावादीत तुम्ही स्वतःला कोठे हरवून बसला आहात यावर थोडा विचार करा. बोलीभाषेतील शिव्या (त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद/ संवाद म्हणा हवं तर) लिहिता लिहिता तुमच्यातील प्रतिभावंत लेखक नाहीसा झाला आहे.
खरं आहे. मान्य करतो..
शिंत्रे गुरुजींपासून अर्धवट राहिलेले (की सालसपासून) लेख पूर्ण न करता तुमचे लेखन एकांगी होत आहे याचा कधी विचार केलात का?
नाही केला.
इतक्या दिवसांत तुम्ही वेगळा प्रयत्न का नाही केला? वेगळे लेख का नाही टाकले?
याचं माझ्याकडे उत्तर नाही..
हा प्रतिसाद वाचून तुम्हाला राग आला तरी हरकत नाही
खरंच राग आला नाही. उलट एवढ्या आपुलकीनं समजावलंस याचं खरं तर खूप बरं वाटलं!
पण ही जी रोजची वादावादी तुम्ही सुरू ठेवली आहे त्यापेक्षा काही वेगळे करून पाहा आणि चांगल्या लेखांसाठी लोकप्रिय व्हा.
जरूर!
प्रियाली मी तुझा अत्यंत आभारी आहे. चुकलंच माझं..
उपक्रमराव,
अन्य एका संकेतस्थळावरचा राग उगीचंच आपल्यावर काढला.. चुकलं माझं!
क्षमस्व...
;)
तात्या अभ्यंकर.
सहमत
केशव
इतर प्रकारच्या लेखनासाठी अनेक सन्केत स्थळे आहेत, असे सुचवून आपण काय साधलेत? पटत असेल तर घ्या नाहीतर जा असे म्हणणारी एक शहरविशेशी जमात आहे. आपण त्याच शहरातले का? [ फोडले कि नाही एका नवीन वादाला तोन्ड ? ]
संस्कार
मिलिंदजी,
आपले विचार १००% पटले. परंतु वरील प्रस्तावातुन धोंडोपंतांना इथं लिहिताना 'एखादी शेलकी शिवी' लिहिली गेली तर चालेल का? हा प्रश्न अभिप्रेत आहे असं वाटते,ना की इथल्या लिखाणाचा भर शिव्यांवर असावा का? तसं असल्यासच आपले स्पष्टिकरण योग्य आहे अन्यथा लिहिताना एखादी शिवी (शेलकी) वापरणे आणि त्यावरच भर असणे ह्यात फरक आहे असे वाटते... (नुकतेच आपल्या लिखाणात देखिल 'भाड्या' ही शिवी वापरलेली आढळली परंतू त्याचा अर्थ आपण 'दुर्बळ' आहात असा अजिबात होत नाही.)
शिव्यांबद्दल एक समाजशास्त्रीय मत
सुसंस्कृत समाजात शिव्या देणे योग्य समजत नाहीत. पण समाजशास्त्रज्ञांच्या मते शिव्या हा माणूस सुसंस्कृत होण्याच्या मार्गावरचा एक महत्वाचा टप्पा आहे.
कसा?
कारण शिव्यांमुळेच माणूस दगडांच्या ऐवजी शब्दांनी भांडायला शिकला.
क्या बात है..
पण समाजशास्त्रज्ञांच्या मते शिव्या हा माणूस सुसंस्कृत होण्याच्या मार्गावरचा एक महत्वाचा टप्पा आहे.
वा! वा! अत्यंत महत्वाची माहिती.. ;)
कारण शिव्यांमुळेच माणूस दगडांच्या ऐवजी शब्दांनी भांडायला शिकला.
क्या बात है..
आपला,
(सुसंस्कृत होण्याच्या मार्गावर असलेला!) तात्या.
बोलीभाषा
धोंडोपंत,
शिव्या हा प्रकार फक्त बोली भाषेतच असतो. बोलीभाषेतल्या शिव्या आणि छापील भाषेतल्या शिव्या असा भेद माझ्यातरी ऐकिवात नाही. त्यामुळं बोली भाषेतल्या शिव्या चालतील का? ह्यात काय अभिप्रेत आहे ते समजले नाही.
एका वाक्यावर फालतू वाद
एकंदर आम्हाला फालतू वाद घालण्यात मजा येते.असे वाद घालण्यापेक्षा प्रत्येकाने उपक्रमासाठी १-२ मस्त लेख दिल्यास किती चांगले होईल? उपक्रमाने असा वाद घालणाऱ्यांनाच संपादनाची जबाबदारी देऊन मोकळे व्हावे. वर्गात जास्त मस्ती करणाऱ्याला जसे 'मॉनिटर' बनवतात तसे.
मी धोंडोपंतांशी सहमत आहे. "आमच्याकडे अमूक गोष्ट मिळत नाही पण बाजारात इतर ठिकाणी ती विकली जाते" या आशयाचे हे विधान आहे.
विसोबा, वाद घालण्यांतून वेळ मिळाला तर दर आठवड्याला एखाद्या रागाबद्दल त्याच्या सौंदर्यस्थळांसकट माहिती द्यावी, ही विनंती.
एखादे संकेतस्थळ यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ व्यवस्थापनाची असते काय? सदस्यांनी केवळ व्यवस्थापनाचे तथाकथित दोष काढून त्यांचे अवाजवी भांडवल करावे काय?
चित्तरंजन
विचाराधीन..
विसोबा, वाद घालण्यांतून वेळ मिळाला तर दर आठवड्याला एखाद्या रागाबद्दल त्याच्या सौंदर्यस्थळांसकट माहिती द्यावी, ही विनंती.
आपली विनंती आमच्या विचाराधीन आहे. 'अभिजात संगीत आणि आजची तरूण पिढी' या विषयावर एखादा लेख लिहिण्याचे मनात आहे.
तात्या.
मायबाप सभासद!
एकंदर आम्हाला फालतू वाद घालण्यात मजा येते
मराठी माणूस! Can't help..;)
उपक्रमाने असा वाद घालणाऱ्यांनाच संपादनाची जबाबदारी देऊन मोकळे व्हावे. वर्गात जास्त मस्ती करणाऱ्याला जसे 'मॉनिटर' बनवतात तसे.
आम्हाला उपक्रमचा मॉनिटर व्हायला आवडेल..;)
एखादे संकेतस्थळ यशस्वी करण्याची जबाबदारी केवळ व्यवस्थापनाची असते काय?
मुळीच नाही. इन फॅक्ट, ती बरीचशी सभासदांचीच असते. आणि, केवळ आणि केवळ मायबाप सभासदांमुळेच एखाद्या संकेतस्थळाची शोभा असते, हेदेखील व्यवस्थापनाने लक्षात घ्यावे, लक्षात ठेवावे!
सदस्यांनी केवळ व्यवस्थापनाचे तथाकथित दोष काढून त्यांचे अवाजवी भांडवल करावे काय?
नक्कीच करू नये. पण व्यवस्थापनानेही अधिकधिक निर्दोष राहण्याचा प्रयत्न करावा असेही वाटते! ;)
असो, आता अधिक वाद घालत नाही. प्रियालीजींना प्रॉमिस केलं आहे! ;)
आपला,
(मॉनिटर!) तात्या.
'कंटेट इज किंग'
केवळ आणि केवळ मायबाप सभासदांमुळेच एखाद्या संकेतस्थळाची शोभा असते, हेदेखील व्यवस्थापनाने लक्षात घ्यावे, लक्षात ठेवावे!
हे खरे, पण शोभा करणाऱ्या सभासदांपेक्षा/सभासदांकडून शोभा वाढविणारे लेखन व्हायला हवे.:):) 'कंटेट इज किंग' हे माझे ठाम मत आहे. माझ्यासाठी एखाद्या संकेतस्थळावर होणाऱ्या लेखनाचा (ह्यात प्रतिसादही आले) दर्जा हा सक्रिय सदस्यांच्या संख्येपेक्षा महत्त्वाचा.
चित्तरंजन
१००%
चित्तरंजनरावांशी १०१% सहमत.
१००% पुरे
अनावश्यक, व्यक्तिगत रोख असणारा प्रतिसाद अप्रकाशित करण्यात् आला आहे - उपसंपादक
बापू
पंत
पंत,
या लेखावर फार उशीरा प्रतिक्रिया द्यायला आलोय.
आपल्या विचारांशी मी सहमत आहे. जरा दोन चार शेलक्या शिव्या हाणल्याशिवाय लिहिण्याबोलण्यात चव येत नाही.
त्या सर्किटाचे लेखन अधूनमधून शिव्या वापरतो म्हणून चविष्ट असते.
बापू
कार कराव या नशीबाला.
अनावश्यक, व्यक्तिगत रोख असणारा प्रतिसाद अप्रकाशित करण्यात् आला आहे - उपसंपादक
"इतर प्रकारच्या लेखनासाठी अनेक संकेतस्थळे आहेत."
आमचा एखाद्या पोरीत जीव गुंतला रे गूंतला, की कोणी तरी सांगतेच की तीचं कोणाशी तरी चालू आहे,सर तुम्ही जरा पुढे कुठेतरी चान्स घ्या .!
असतं दुर्दैव एक एकाचं...(अन तात्या प्रियालींच्या प्रतिसादाशी थोडा सा सहमत )
आपला दुर्दैवी.
उपक्रमी.
जाऊ द्या हो बिरुटे साहेब,
अनावश्यक, व्यक्तिगत रोख असणारा प्रतिसाद अप्रकाशित करण्यात् आला आहे - उपसंपादक
येत्या काही कालावधीतच आपण 'मिसळपाव डॉट कॉम' हे ललितलेखन, काव्य, शिव्याओव्या, गजाली, यांना वाहिलेलं 'मिसळपाव डॉट कॉम' हे संकेतस्थळ तयार करतो आहोत.
मराठीच्या भाषेच्या भवितव्याबद्दल चिंता, शुद्धलेखन-व्याकरण आदींवर रटाळ आणि न संपणारी चर्चा या सारख्या चर्चांना तेथे पूर्ण बंदी असेल!;)
'प्रशासक', 'संपादक', 'उपसंपादक' या आयडी ऐवजी तिथे 'तिखट तर्री', 'रस्सा बनवणारा', 'कांदा चिरणारा', 'झणझणीत', 'शँपलपाव' यासारखे आयडी प्रशासनाकरता राखीव ठेवलेले असतील! प्रशासकीय कार्यभार असलेल्या वरील सर्व मंडळींची नांवे, त्यांच्यातील बदल, इत्यादी सर्व गोष्टी जाहीर केल्या जातील!
तात्या.
अरे आता पुरे करा रे
अरे आता पुरे करा रे !!
बिचार्या उपसंपादकांची कामे वाढवू नका.
उपक्रमरावांनी स्पष्ट केलाय की बोलीभाषेतले शब्द चालतील. फक्त त्याचा रोख वैयक्तिक नको.
आजपर्यंत उपक्रमावर सर्वात जास्त अभिप्राय या लेखाला मिळालेत त्यावरून सांगतो.
(भांडकुदळ) बापू
सदर प्रतिसाद संपादित करण्यात येत आहे. कृपया, व्यक्तिगत रोखाचे लिखाण टाळावे, त्यासाठी खरडवहीचा वापर करावा. सर्व सदस्यांकडून सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद! - उपसंपादक.
सर्कीटराव
सर्कीटराव,
कृपया मला "बापूसाहेब" वगैरे मोठी मोठी संबोधने चिकटवू नका.
मी नुसता "बापू" आहे तो बरा आहे. "बाप्या" म्हटलेत तरी चालेल. असो.
मला फकत या लेखाला मिळालेला " ओव्हरव्हेल्मींग रिस्पॉन्स" निर्देशित करायचा होता.
इतर लेखांना याहून जास्त अभिप्राय मिळाले असतील तर ती चांगली गोष्ट आहे.
पण चित्तरंजन म्हणतो ते खरं , आपल्या लोकांना इतर गोष्टींपेक्षा भांडणात रस जास्त आहे.
बापू
सहमति
इतर प्रकारच्या लेखनासाठी अनेक संकेतस्थळे आहेत.
सहमत आहे, आपले सभासद चुकिचे आहेत.