सूर्यग्रहण

Eclipse

आत्ताच झालेल्या सूर्यग्रहणाचे हे छायाचित्र!

-- भालचंद्र!

अजुन काही छायाचित्रे इथे उपलब्ध आहेत :
http://physics.unipune.ernet.in/~bspujari/Solar%20Eclipse/

लेखनविषय: दुवे:

Comments

खूपच सुंदर.

भालचंद्र राव

खूपच सुंदर.
इकडे बंगळूरात ढगाळ हवामानात आणि पडणार्‍या पावसात माझी ग्रहण पाहण्याची इच्छा वाहून गेली होती.

तुम्ही दिलेल्या या छायाचित्रामुळे ती पूर्ण झाली...हे छायाचित्र तुम्ही कोठून घेतलेत? कारण महाराष्ट्रात हे ग्रहण दिसणार नव्हते...

खूप खूप धन्यवाद
(खगोलप्रेमी )सागर

धन्यवाद

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
हा फोटो पुण्यातुनच घेतलाय (अचुकपणे सांगायचे झाले तर पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील एक खिडकी!) आणि ग्रहण दिसणार असे जाहीरसुद्धा झाले होते (हे पहा). :)

धन्यवाद!
-भालचंद्र!

माझी माहिती चुकीची होती तर...

अच्छा... म्हणजे माझी माहिती चुकीची होती तर...

मला वाटते मी पंचांगातला नकाशा पाहिला असल्यामुळे हा घोळ झाला असावा....

(अचुकपणे सांगायचे झाले तर पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील एक खिडकी!)

अशी ठिकाणे मला पण खूप आवडतात... खास करुन पुणे विद्यापीठ म्हणजे ज्ञानाचा समुद्रच :)

परत एकदा धन्यवाद
सागर

नकाशा पाहण्यात चूक

भालचंद्रराव,
माझी नकाशा पाहण्यात चूक झाली होती.
मी दाते पंचांग एकदम घाई घाईत पाहिल्यामुळे हा घोळ झाला...
हे खग्रास सूर्यग्रहण होते... आणि मी जो नकाशा पाहिला तो जाने.२००९ मधे होणार्‍या खंडग्रास सूर्यग्रहणाचा पाहिला होता...
त्यात पुणे व जवळपास सगळ्या महाराष्ट्रात हे ग्रहण दिसणार नाहीये... म्हणून हा अस्थानी प्रश्न विचारला गेला.
चूक माझीच होती. असो...
पण तुमच्या लिंकवरील सगळी छायाचित्रे पाहिलीत...

अगदी सुंदर आहेत... तुम्ही खरेच नशीबवान आहात एवढी सुंदर खिडकी तुम्हाला मिळाली...

(अवास्तव कामाच्या व्यापामुळे खगोलशास्त्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेला) सागर

छान आहे...

छान आहे.
-
ध्रुव

अरे वा एकदम सुंदर!

तेजोनिधि लोहगोल!

चतुरंग

सुंदर चित्र

सुंदर चित्र!..

- ऋषिकेश

सुंदर

मला हे चित्र सर्वात जास्त आवडले.
अभिजित...
ता. कर्‍हाड जि. सातारा.

 
^ वर