लोड-शेडिंगचा असाही उपयोग!

"B"

मागे एकदा असेच (नेहमीप्रमाणे) लोड-शेडींग चालू होते त्यावेळी कॅमे-याशी खेळता खेळता स्वतःच्याच नावाचे अद्याक्षर तयार केले! ... कंदिलाच्या ज्योतीपासुन!!
लोड-शेडिंगचा सदुपयोग! :)

- भालचंद्र

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त...

सुरेख चित्र...

-
ध्रुव

सहमत

मस्त कल्पनाही.

भारनियमन असा शब्द वापरावा.

कृपया भारनियमन या शब्दाचा वापर करावा.

मस्त प्रयोग

मस्त प्रयोग केला आहे.





मस्त

सदुपयोग आवडला. यालाच मराठीत ल्याटरल थिंकिंग म्हणत असावेत. :)
बाय द वे कंदिल फिरवण्याचा वेग किती होता? की शटर स्पीड आणि वेग ऍडजस्ट केला?
----

मस्त +१

आणखी थोडी माहिती द्यावी राव.

(मला वाटते कंदील फिरवलेला नाही, कॅमेरा फिरवला आहे.)

कॅमेरा

मला वरचे चित्र दिसत नाहीये पण काय असावे हे प्रतिसादांवरून लक्षात येतेय..

शटर स्पीड कमी असताना कॅमेरा न हलता फिरवणे ही फार अवघड गोष्ट आहे. वरती कंदील असं म्हटलं आहे..हा प्रयोग मी उदबत्ती घेऊन केला होता..

अभिजित...

मस्त्

'A'-ग्रेडचे चित्र :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

धन्यवाद!

>>सदुपयोग आवडला. यालाच मराठीत ल्याटरल थिंकिंग म्हणत असावेत
:D:D:D !

>>बाय द वे कंदिल फिरवण्याचा वेग किती होता?
>>(मला वाटते कंदील फिरवलेला नाही, कॅमेरा फिरवला आहे.)

बरोबर! कॅमेरा फिरवला आहे. कंदिल नाही. कंदिल फिरवायला गेलो असतो तर मी पण छायाचित्रामध्ये आलो असतो! :)
थोड्याश्या प्रयत्नांनी कॅमेरा बरोबर "बी" आकारात फिरवता येतो!

आता जरा तांत्रिक माहिती!

सदरहू चित्र माझ्या स्वस्तात मस्त कॅनन पॉवरशॉट ए-४०० नामक पॉइंट-अँड-शूट कॅमे-यातुन घेतलेले आहे.

शटरस्पीड : ६ सेकंद ( हो! थोड्याश्या करामती करुन असल्या सामन्य कॅमे-याचा स्पीड सुद्धा इतका होउ शकतो)
अपर्चर : ५.६ (हे माझ्या हातात नव्हते!)
आय एस ओ: ५० (हो हेही खरे आहे! इतका कमी आय एस ओ देणारा सज्जन मला परत कधी सापडला नाही!)
एक्पोजर बायास : +२
मिटरींग : पॅटर्न
फ्लॅशः कशाला पाहिजे?

प्रोस्ताहनाबद्दल धन्यवाद!

- भालचंद्र

बिग बी

वा! बिग बी आवडला :)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

 
^ वर