तीन चित्रपट नक्की पाहा

हे तीन चित्रपट नक्की पाहा-

१. खुदा के लिए - पाकिस्तान
२. ओसामा - अफगाण
३. वॉटर - भारत

या तीनही चित्रपटान्मध्ये एक् नवीन समान धागा आढळेल. धर्माच्या नावाखाली जगभरात धर्ममार्तन्ड काय उच्छाद मान्डताहेत आणि त्याची किम्मत सामान्य माणसान्ना कशी चुकवावी लागत आहे, याची कल्पना हे तीन चित्रपट पाहून नक्कीच येते.

लेखनविषय: दुवे:

Comments

खुदा के लिए

ह्यातील 'खुदा के लिए' पाहिला आहे. वेगळे कथानक, नसिरुद्दीन शाहची छोटीशी भुमिका आणि त्याचे कोर्टातील भाषण चित्रपट सार्थकी लावतात. पाकिस्तानी चित्रपट तंत्राच्या बाबतीत मात्र अजुन खूपच मागं आहेत असं वाटतं. छायाचित्रण, अभिनय, पटकथा आणि मुख्य म्हणजे संकलन ह्या सर्व आघाड्यांवर तांत्रिक दृष्ट्या घोटाळा झालेला दिसतो. पण तरीही वर उल्लेखलेल्या गोष्टींमूळे चित्रपट नक्कीच बघण्या सारखा आहे.
-कोलबेर

वॉटर

पाहिला होता. पाहिल्याला अनेक महिने उलटून गेले परंतु चित्रपट आवडला होता हे आठवते. धर्माच्या नावाखाली शोषण करण्याची, विशेषतः दुर्बळ घटकांचे शोषण करण्याची परंपरा ही कोण्या एका धर्माची किंवा संस्कृतीची मालकी नाही. बहुतांश धर्मात हे होतेच.

वॉटरमधील विधवा स्त्रियांचे आश्रम आणि त्यातील भयावह परिस्थिती दाखवलेला काळ सुमारे ८०-१०० वर्षांपूर्वीचा असला तरी ८-१० वर्षांपूर्वी (काळ नेमका नसण्याची शक्यता आहे) या चित्रपटाच्या चित्रीकरणाला झालेला धर्मवेड्यांचा कडाडून विरोध आणि त्यामुळे दिपा मेहतांना गाशा गुंडाळून बहुधा श्रीलंकेत बस्तान हलवावे लागले ही गोष्ट चित्रपटातील समस्ये एवढीच खेदाची आहे.

बाकी, वॉटर हा चित्रपट खरंच पाहण्यालायक आहे. जॉन अब्राहमचा नारायण आणि लिसा रेची कल्याणीही भाव खाऊन जाते.

पाणी

मीही यातला वॉटर पाहिला आहे. चित्रपट छान आहे. काही ठिकाणी पाथेर पांचालीची आठवण झाली. काही शॉट अगदी तसेच वाटतात.

----

 
^ वर