छायाचित्र परिक्षण २० - गोगलगाय

नमस्कार,
मी जून महिन्यामध्ये आमच्या गावाच्या जवळ एक पक्षीनिरिक्षण केंद्र आहे तेथे गेलो होतो. तेथे रस्त्यावर एक गोगलगाय जात होती. तीचे चित्र घेतले.

बारशाला निघाले....

कॅमेरा - निकॉन कुलपिक्स ४ एस.
फोकस - आपोआप.
मोड- मॅक्रो.

चित्र कसे वाटले ते नक्की सांगा.

लेखनविषय: दुवे:

Comments

फोकस मस्त

रस्त्याचा कठोर ओबडधोबडपणा, गोगलगायीच्या अंगाचा मृदू ओबढधोबडपणा, आणि शंखावरच्या नाजूक रेघा - जवळजवळ स्पर्श केल्यासारखे होत आहे.

रस्त्याच्या बाजूच्या हिरवळीने रंगसंगती (माझ्या दृष्टीने) बिघडते आहे. या चित्रात सर्व रंगसंगती "पार्थीव" ("earth tones") ठेवली असती तर आवडले असते. इतकेच काय, इतकी स्पर्शानुभूती ("टेक्श्चर") असलेली चित्रे कृष्णधवल सुंदर दिसतात.

+१

असेच म्हणतो.

गोगलगाय

मस्तच!

हिरवळ डोळ्यात भरते आहे मात्र. :-(

सुंदर चित्र

धनंजय म्हणतात तसे हिरवळ अनावश्यक. पण रस्ता, फोकस, गोगलगय सही आले आहे.

वा! लिखाळराव अजुन येउ देत.

अवांतर- ते पक्षी कुठले पाहीलेत? ते पण येउ द्यात.

लै भारी

गोगलगायीचे चित्र लै भारी घेतले. आमची नजर शंख आणि गोगलयीवरच खिळली असली तरी हिरवळ सलते आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त

फोकस उत्कृष्ट जमला आहे. नेहेमी पक्षी, प्राणी यांची चित्रे पहायची सवय आहे, गोगलगाय पहिल्यांदाच पाहिली.
(गोगलगायीची चित्रे घेताना ऍडजस्ट करायला भरपूर वेळ मिळत असेल असे वाटते. :) )

----

गोगलगाय

इतकी मोठी गोगलगाय पहिल्यान्दाच पाहते आहे.
गोगलगाय मात्र झ्याक ह

आभार

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभर.
कृष्णधवलचित्र चांगले दिसले असते हे खरेच पण मला त्यातला शंखाचा रंग, तीच्या कातडीचा रंग हे सर्व आहे तसे पहायला जास्त आवडले.
गोगलगायीच्या मागचे हिरवे गवत मला सुद्धा खटकते आहे. चित्र घेतले तेव्हा लक्षात आले नाही. आता चित्र कापून पाहिले पण ते गवत टाळून चित्र चांगले बनवावे इतकी जागा त्यात नाही. असो.
गोगलगाय हळुहळू सरकत असल्याने चित्र घ्यायला वेळ मिळतो हे खरेच :)
अवांतर : पक्ष्यांचे काही फोटो मिळाले आहेत पण प्रदर्शनीय नाहित. तसे काही फोटो मिळाल्यास जरुर येथे टाकेन. आभार.

पुनश्च सर्वांचे अभिप्रायाबद्दल आभार.
--लिखाळ.

थोडासा वेगळ्या बाजूने...

कडेचे गवत टाळण्यासाठी गोगल गाय मध्यभागी घेऊन, तिच्या मागे इन्फिनिटी पर्यंत धूसर होत जाणार्‍या रस्त्याच्या दोन कडा वगैरे छान दिसले असते. रस्त्याच्या दोन रेघांनी सुंदर फील आला असता. बाकी मला तरी गोगल गायीपेक्षा रस्त्याचे टेक्श्चर आवडले. अफलातून!

सौरभदा-

-----------------------------------
Outside a dog, a book is man's best friend, but inside a dog its too dark to read.

आभार

प्रतिसादाबद्दल आभार.
ती गोगलगाय जमिनीलगत असल्याने आणि मॅक्रोमोड असताना फार जवळ जाउन चित्र घेताना ती पुढे सरकत असल्याने थोडी तारांबळ उडत होती. त्यामुळे खरेतर 'पक्ष्याचा डोळा' माझ्या डोळ्यासमोर होता! त्याच्या मागचे झाड नाही. :) आता मला सुद्धा मागची हिरवळ टाळली असती तर चित्र अजून चांगले दिसले असते असे वाटत आहे. पण तेव्हा नेमके लक्षात आले नाही. असो ! पुढल्या वेळेला अजून चांगला प्रयत्न करीन.
--लिखाळ.

 
^ वर