छायाचित्र टीका १६

नमस्कार,

खालील चित्र मी एका सहलीला काढले आहे.
चित्रः नाग - Spectacled Cobra

एक्सिफ: काहीच नाही. चित्र फिल्म कॅमेरा वपरुन काढले आहे. फोकल लेन्ग्थ ३००, कॅमेरा निकॉन एफ एम १०. मॅन्युअल फोकस.

मोठ्या चित्रासाठी येथे बघा

चित्रामध्ये कॉपीराईट सोडुन काहीही बदल नाही.

ध्रुव

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर

डेप्थ ऑफ फोकस, मांडणी, सर्वच

नागाचे चित्र बाजूने घेतले ("आकड्या"चे चित्र काढले नाही) हा उत्तम विचार.

भारी

नागड्या भारी आला आहे!

नाग पंचमी जवळ आल्याचे निमित्त साधून उत्तम चित्र टाकलेत. :)

स्थळ, काळ, वेळ व इतर काही निरिक्षणे दिलीत तर उत्तम राहील असे वाटते!

आपला
गुंडोपंत

स्थळ, काळ, वेळ

स्थळ, काळ, वेळ व इतर काही निरिक्षणे दिलीत तर उत्तम राहील असे वाटते!
बरोबर आहे.
स्थळः रेहेकुरीचे अभयारण्य
काळ: बहुधा जुलै २००७

-
ध्रुव

चित्र

छान आले आहे.

कोठे मिळाला हा नागराज. ?

- सूर्य.

बापरे जपून

साप त्यातुन नाग पाहीला की अंगावर शहारा येतो.

अवांतर - हा थरार बघायला मजा येते

खरं आहे!

ब्राईड अँड प्रिज्युडाइस या ऐश्वर्या राय असलेल्या सिनेमात एक खतरनाक नागिन डांस आहे.
तो पाहिल्या नंतर मी अनेक दिवस झोपेतून दचकून उठत होतो... :))))

आपला
गुंडोपंत

:)

ब्राईड अँड प्रिज्युडाइस हा ऐश्वर्या राय असलेला सिनेमात एक खतरनाक नागिन डांस . आहे. तो पाहिल्या नंतर मी अनेक दिवस झोपेतून दचकून उठत होतो... :))))

(माझ्यामते अनावश्यक असलेला भाग करडा केला आहे ;) )

बाकी वरच्या चित्रातील नागोबा मला डेंजर का बरे वाटत नाहि आहे? एकदम पाळीव वाटतोय

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

पाळीव

बाकी वरच्या चित्रातील नागोबा मला डेंजर का बरे वाटत नाहि आहे? एकदम पाळीव वाटतोय

पाळीव नाही. एका सर्पमित्राने पकडला होता.... दूर होता म्हणून ३०० मि मि लेन्स्ने फोटो घेतला आहे.

-
ध्रुव

सही

चित्र एकदम मस्त आले आहे. मागच्या रंगसंगतीमुळे नाग आणि त्याचा डोळा एकदम उठुन् दिसतो!

एकदम सही! :)

चित्र अगदी सही आहे

पण जपून!

छान

चित्र सही आहे.
सुचवणी : वरचा भाग थोडा कमी करुन चित्रात नागाचे वेटोळे आणखी येऊ दिले असते तर आणखी छान झाले असते.
हे चित्र उभे आणखी उठावदार दिसले असते असे वाटते.

आडवे - सापाभोवतीचे वलय

सापाच्या पार्श्वभूमीने त्याच्याभोवती एक हिरवे/लाल वलय निर्माण केले आहे, ते आडव्या चित्रातच मावते आहे. त्यामुळे मला आडवे चित्र आवडले आहे.

 
^ वर