उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टीका - १३
लिखाळ
June 26, 2008 - 9:58 am
नमस्कार,
छायचित्र टीका उपक्रमात प्रथमच सहभाग घेत आहे. कृपया आपला अभिप्राय कळवावा ही विनंती.
सांज रंग |
चित्र सायंकाळी खिडकित उभे राहून घेतले आहे. कसे वाटले? पुढल्या वेळी काय सुद्धारणा कराव्यात?
कॅमेरा - निकॉन कूल पिक्स एस ४, १०पट ऑप्टिकल झूम.
बहुधा ६ मेगा पिक्सेल वर काढला असवा.
फोकस आपोआप.
--लिखाळ.
दुवे:
Comments
आ?
चित्र इतके लहान का बरे दिसते आहे?
मोठे चित्र आणण्यासाठी काय करावे?
मी मूळ चित्र कोरल मध्ये घालून त्याला चौकट केली. मग त्याचे जेपेग फाईल केली आणि फ्लिकरवर टाकली. हे सर्व करताना चित्राचा आकार लहान झाला असेल का?
आता काय करु?
-- (प्रश्नांकित) लिखाळ.
रंग
रंग खलास आला आहे.
ढगांचे जे तिरपे फॉर्मेशन झाले आहे ते जबरी दिसत आहे. चिर अजून मोठे दिसले तर भारी वाटेल.
चित्र फ्लिकर वर टाकले असेल तर चित्राच्या वर (फ्लिकर मध्ये) ऑल साईज असे बटन आहे. ते दाबुन चित्राची लिंक घेता येईल. ईथे चित्र मोठे असेल तरच मोठे संगणकावर उतरवता येईल.
-
ध्रुव
मोठे चित्र
ध्रुव,
मोठे चित्र निवडून त्याचा दुवा उपक्रमपंतांना पाठवला आहे. ते संपादित करतील तर मोठे चित्र लगेच पाहता येईल.
येथे तोच् दुवा देतो आहे.
--लिखाळ.
छान
आकाशाचे रंग खासच आले आहेत. ध्रुव यांनी सांगितल्याप्रमाणे मोठे देता आले तर छान होईल.
----
आभार
वर पुन्हा डकवले आहे. पहावे.
कमी-जास्त काय वाटते ते सांगा.
--लिखाळ.
सुरेख रंग
सुरेख रंग आणि खालील झुडुपेही छान!
आपला
गुंडोपंत
(एक चीनी म्हण: ज्याला जे माहिती झालेले असते ते दुसर्याला सांगत नाहीत, आणि जे त्याबद्दल बडबडत असतात त्यांना ते माहितच नसते!)
छानच
चित्र छानच .एक्झिफ टाकले असते तर बरे झाले असते.(प्रकाश) चित्र घेण्या अगोदर कॅमेराच्या सेटिंगचे व्यवस्थापन कसे करावे यावर् मार्गदर्शन केले तर बरे होईल.
अवांतर- है का नाई आम्हाला बी आता उली उली समजाया लाग्लयं!
प्रकाश घाटपांडे
:-)
अवांतर- है का नाई आम्हाला बी आता उली उली समजाया लाग्लयं!
घाटपांडेसाहेब..हे वेगळं लिहायची काय गरज होती. ;-)
अभिजित...
माम्माजी...कुर्ते मे रहना सिखो|
- इति इंदरजित चढ्ढा
प्रकाशचित्र आवडले
अतिशय गहिर्या रंगांचे प्रकाशचित्र.
शिवाय घराच्या खिडकीतून काढलेल्या या छायाचित्रात कोणतीही कृत्रिम गोष्ट (उदा. खांबावरील तारा इ.) आली नाही हे विशेष!
अवांतर : भारतातील शहरी भागात असे दृश्य आता जवळजवळ गायबच झाले आहे. "कहीं दूर..."
छान
मोठे केल्यावर छान दिसते आहे. आकाशाचे रंग विशेष.
चित्रात मुख्य विषय काहीच नाही, जसे की झाड वगैरे आणि मोकळी जागा भरपूर. हे विशेष रोचक वाटते. त्यामुळे राहूनराहून नजर परत ढगांच्या रंगाकडे जाते.
----
अप्रतिम
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखीले सुंदरतेचे रूप महा............
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
आभार
प्रतिक्रियांसाठी सर्वांचे आभार.
गुंडोपंत,
आभार..चिनी म्हण सुद्धा मस्तच :)
घाटपांडेसाहेब,
विवरण जेवढे मला माहित होते तेव्हडे लिहिले. कॅमेरा स्वयंचलित असल्याने ऍपरचर, शटरस्पीड बाबत मला काही करता येत नाही. स्वारस्यासाठी आभार.
विसुनाना,
मी जर्मनीमध्ये राहतो, येथे जमिनीखालून तारा आहेत.
राजेंद्र,
अभिप्रायाबद्दल आभार.
ऋषिकेश,
फारछान ओळी लिहिल्यास.. फोटो खाली असेच काही लिहावे वाटते.
--लिखाळ.
थोडी सुधारणा
सगळेजण आकाशाच्या रंगांबद्दलच बोलत आहेत. मात्र नजर उजव्या फांद्याकडे जाते असं वाटतंय. त्या फांद्या एकतर नको होत्या किंवा झाडाच्या खोडापर्यंत दिसायला हव्या होत्या बहुधा. बाकीच्यांना काय वाटतं? डाव्या बाजूला नक्षीदार पिलर सारखे काहीतरी दिसतंय ते काय आहे? त्यामुळे चित्र डावीकडे सरकवता आले नसावे.
-सौरभदा.
होय..
सौरभदा,
आपण म्हणता ते बरोबर आहे. उजवीकडच्या झाडाचे खोड आले असते तर त्या फांद्या अचानक उगवल्यासारख्या वाटल्या नसत्या..पण चित्राचा पुढचा सर्व भाग झुडपांचा आहे आणि त्याच सारखे ते झाड असल्याने, ते झाड अचानक मध्ये येते आहे असे मला फोटो काढताना वाटले नाही. म्हणून ते चुकटीसाठी घ्यावे असे ठरवले. तसेच डावीकडे जो पुलर आहे तो इमारतीचाच आहे. तो टाळता आला नाही.
प्रतिसादाबद्दल आभार.
--लिखाळ.