चित्र सुरेख आहे. आभाळातल्या रंगीत ढगांच्या लाटांना मॅच करणार्या आणि वाहत्या पाण्याचा फील देणार्या लहरी आणि १/३ चा २-३ ठिकाणी पाळला गेलेला नियम यामुळे उठावदार झाले आहे.
आभाळातल्या रंगीत ढगांच्या लाटांना मॅच करणार्या आणि वाहत्या पाण्याचा फील देणार्या लहरी आणि १/३ चा २-३ ठिकाणी पाळला गेलेला नियम यामुळे उठावदार झाले आहे.
चित्र आवडले. नियम तर पाळलेले आहेतच पण काँपोसिशन पण योग्य आहे. बसलेले दोन लोक चित्राला पूरक आहेत. ते दोघे नसते तर चित्र कदाचित इतके आवदले नव्हते.
आयएससो - ४०० वापरण्यचे कारण? मला वाटते आयएससो अजून खाली असते तर चित्रात नॉईज आला नसता. (कदाचित आत्ता लहान आकाराचे चित्र बघत असल्यमुळे असे दिसत आहे.)
आकाशाचे पाण्यात मिसळलेले रंग आणि तलावासमोर एकांतात बसलेले जोडपे यामुळे चित्र एकदम झकास जमले आहे. या चित्रावर् टिका करणे अजिबात शक्य नाही बुआ आपल्याला. ;)
गुंडोपंताना का आवडले नाही काही कळले नाही बॉ. कारणे दिली असती तर बरे झाले असते.
या टीका मालिकेतली सगळी चित्र अगदी झकास आहेत. बहुतेक 'तद्दन घासलेल्या' काँबिनेशन आणि विषयाची नाहीत. वरूण ची इतर चित्रे पाहिली तर चटकन कळते की हा चांगला छा.चि.कार आहे.
मग इतक्या चांगल्या टीकामालेत, इतक्या सुमार घासून गुळगूळीत झालेल्या काँबिनेशन चे चित्र, आणि ते ही वरूणने टाकावे?
मावळणारा सुर्य, पाणी रंगलेले आकाश आणि एक जोडी...
च्यामारी एक लाख वेळा तरी घासले गेलेले काँबिनेशन आहे हे.
वेगळेपणा... वरूणचा नेहमीचा वेगळेपणा कुठे आहे साहेबा?
अगदी ग्लॉसी कागदावरचे पोस्टर वाटते. चित्रांच्या, फ्रेम विकणाऱ्यांच्या दुकानात मिळते ना (ज्यावर एखादे कोटेशन असते) तसे. ह्या चित्राची मोठी आवृत्ती बघायला आवडले. एकंदर छान आहे.
चित्र छान आहे.. पण अश्या प्रकारचे चित्र इतक्यावेळा पोस्टरवर, कार्डांवर, प्रत्यक्ष काढलेल्या चित्रांमधे पाहिले आहे की हे (असे) चित्र रोजचेच झाले आहे.
आणि त्यामुळे कीतीही छान असली तरी अशी चित्र "खास" वाटत नाहीत (दिवाने आम-- दिवाने खास मधला खास)
(कोलबेररावांच्या खास चित्रांचा चाहता)ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आभार.
फ्रेम्स च्या दुकानात दिसते अगदी तसेच काहिसे रोमँटीक कंपोजिशन बनवायचे असे मनात ठेवुनच हे काढले होते. चित्र आवडो अगर न आवडो निदान तो हेतू तरी सफल झाला असावा असे वाटते. :)
उजवीकडे नदीवरची नाव/जहाज फ्रेममधल्या फोटोत नसता. शिवाय जोडप्यापैकी पुरुषाचा टीशर्ट आडव्या पट्ट्यांचा आहे. मुद्दामून पोस्टर बनवण्यासाठी काढलेल्या फोटोमध्ये एकरंगी शर्ट निवडला असता, आणि आयएसओने/प्रकाशछिद्राने/पडद्याच्या वेगाने मनुष्याकृती पूर्ण काळ्या (सिल्हुएट) केल्या असत्या. ते न करून कोलबेर यांनी या चित्रावर आपली छाप ठेवली आहे.
दोनच दिसणारे पाय हे वैशिष्ट्य (बाईने पाय घडी करून बाकावर/पुरुषाच्या मांडीवर ठेवले आहेत) - हा तपशील पोस्टरसाठी पोझ केलेल्या चित्रात आला नसता. असे काही तपशील घेतल्यामुळे हे चित्र फ्रेमच्या दुकानातल्या चित्रांपेक्षा थोडे मिष्किल आहे.
(काही सुधारणा म्हणावीच तर नदीवरची बोट नसती, काही वेळ वाट बघितल्यानंतर म्हणा, तर आवडले असते.)
Comments
सुरेख

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच
आभाळातल्या रंगीत ढगांच्या लाटांना मॅच करणार्या आणि वाहत्या पाण्याचा फील देणार्या लहरी आणि १/३ चा २-३ ठिकाणी पाळला गेलेला नियम यामुळे उठावदार झाले आहे.
असेच म्हणतो. चित्र आवडले.
----
वाह!
अशी पोस्टर विकायला ठेवली असतात तसे वाटले. म्हणजे एकदम प्रोफेशनल!!
छ्या!
इतका फालतू नि पकावू फोटोही तू काढशील अशी
आजिबात अपेक्षा तुझ्या कडून नव्हती आणि नाही!
गुंडोपंत
चित्र
चित्र आवडले. नियम तर पाळलेले आहेतच पण काँपोसिशन पण योग्य आहे. बसलेले दोन लोक चित्राला पूरक आहेत. ते दोघे नसते तर चित्र कदाचित इतके आवदले नव्हते.
आयएससो - ४०० वापरण्यचे कारण? मला वाटते आयएससो अजून खाली असते तर चित्रात नॉईज आला नसता. (कदाचित आत्ता लहान आकाराचे चित्र बघत असल्यमुळे असे दिसत आहे.)
-
ध्रुव
आयएसओ
मूळ चित्रात नॉइज नाही आहे..(इथे लो रेज टाकले आहे त्यामूळे वाटत असावे!).संध्याकाळची वेळ असल्याने प्रकाश थोडा अपुरा असल्याने आयएसओ वाढवला.
छान
आकाशाचे पाण्यात मिसळलेले रंग आणि तलावासमोर एकांतात बसलेले जोडपे यामुळे चित्र एकदम झकास जमले आहे. या चित्रावर् टिका करणे अजिबात शक्य नाही बुआ आपल्याला. ;)
गुंडोपंताना का आवडले नाही काही कळले नाही बॉ. कारणे दिली असती तर बरे झाले असते.
- सूर्य.
अरे!
अरे! असं काय कर्रताय सूर्यराव?
या टीका मालिकेतली सगळी चित्र अगदी झकास आहेत. बहुतेक 'तद्दन घासलेल्या' काँबिनेशन आणि विषयाची नाहीत. वरूण ची इतर चित्रे पाहिली तर चटकन कळते की हा चांगला छा.चि.कार आहे.
मग इतक्या चांगल्या टीकामालेत, इतक्या सुमार घासून गुळगूळीत झालेल्या काँबिनेशन चे चित्र, आणि ते ही वरूणने टाकावे?
मावळणारा सुर्य, पाणी रंगलेले आकाश आणि एक जोडी...
च्यामारी एक लाख वेळा तरी घासले गेलेले काँबिनेशन आहे हे.
वेगळेपणा... वरूणचा नेहमीचा वेगळेपणा कुठे आहे साहेबा?
आपला
गुंडोपंत
चित्र आणि कविता
शरद
मला तर आरती प्रभुच आठवले
जाहला सूर्यास्त राणी खोल पाणी जातसे
दूरचा तो रानपक्षी ऐल आतां येतसे !
समित्पाणी
ग्लॉसी कागदावरचे पोस्टर
अगदी ग्लॉसी कागदावरचे पोस्टर वाटते. चित्रांच्या, फ्रेम विकणाऱ्यांच्या दुकानात मिळते ना (ज्यावर एखादे कोटेशन असते) तसे. ह्या चित्राची मोठी आवृत्ती बघायला आवडले. एकंदर छान आहे.
हेच
हेच म्हणतो... एखदी मराठी कविता/गझल टाकल्यास खरच खुप् छान वाटेल.
असेच
चित्तरंजन आणि चाणक्यांशी सहमत.
तसेच, हे स्थळ कोणते ते ही कळेल का?
मिसिसिपी नदीचा काठ तर नव्हे
एक शंका
बाकावर व्यक्ति २ आहेत आणि पाय दोनच?
३.१४१५९...
बाकावर व्यक्ति २ आहेत आणि पाय दोनच?
ती पाय दुमडून/मांडी घालून बसली असावी :)
----
स्थळ
अगदी बरोबर मिसिस्सीप्पीचाच काठ!
चित्र छान पण...
चित्र छान आहे.. पण अश्या प्रकारचे चित्र इतक्यावेळा पोस्टरवर, कार्डांवर, प्रत्यक्ष काढलेल्या चित्रांमधे पाहिले आहे की हे (असे) चित्र रोजचेच झाले आहे.
आणि त्यामुळे कीतीही छान असली तरी अशी चित्र "खास" वाटत नाहीत (दिवाने आम-- दिवाने खास मधला खास)
(कोलबेररावांच्या खास चित्रांचा चाहता)ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे
मोठ्या आकारातील चित्र
प्रतिक्रिया देणार्या सर्वांचे आभार.
फ्रेम्स च्या दुकानात दिसते अगदी तसेच काहिसे रोमँटीक कंपोजिशन बनवायचे असे मनात ठेवुनच हे काढले होते. चित्र आवडो अगर न आवडो निदान तो हेतू तरी सफल झाला असावा असे वाटते. :)
हेतू सफल
असे फोटो स्व-शिक्षणासाठी काढावेतच!