उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन!
शैलेश
March 16, 2007 - 1:49 am
ओम् नमस्ते श्रीगणेशा । विद्याघना तू ज्ञानप्रकाशा ।
प्रारंभी स्मरितो अविनाशा । परमेशा कार्यसिद्धिसी ।।
कोणत्याही मंगल कार्याची सुरूवात करतांना श्रीगणेशाला वंदन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्याला अनुसरून मी उपक्रम या सुंदर संकेतस्थळास सुयश चिंतितो. मराठी भाषेतील संकेतस्थळांमध्ये तंत्रज्ञानादृष्टया एक प्रगत सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपक्रमच्या प्रशासकांचे हार्दिक अभिनंदन!
कोणत्याही भव्य कार्याची सुरूवात ही प्रथम पावलानेच होते. उपक्रमाचे पहिले पाऊल डौलात पडत आहे. दिवसेंदिवस या संकेतस्थळाची प्रगती होवो आणि उपक्रमींना (उपक्रमच्या सदस्यांना) हे संकतेस्थळ सुखदायक होवो हीच अपेक्षा आणि शुभेच्छा!
स्नेहांकित,
शैलेश
दुवे:
Comments
श्लोक
श्लोक गणेशस्तवन या संतसत्पुरूषांनी लिहिलेल्या स्तोत्रातून घेतला आहे.
प्रतिसादाची सोय चांगली दिसते.
स्नेहांकित,
शैलेश
धन्यवाद!
शुभेच्छांबद्दल धन्यवाद शैलेश!
शुभेच्छा!
सहमत, शुभेच्छा!
आनंदाचे डोही आनंद तरंग...
नमस्कार.
'उपक्रमा' चे अभिनंदन. आमचा येथील वावर आम्हाला स्वतःला आणि इतरांना आनंददायक ठरेल अशी आशा करतो!
सन्जोप राव
हेच..
'उपक्रमा' चे अभिनंदन. आमचा येथील वावर आम्हाला स्वतःला आणि इतरांना आनंददायक ठरेल अशी आशा करतो!
हेच म्हणतो!
आपला,
(उपक्रमी आणि उपद्व्यापी) तात्या.
गणेशवंदनेसोबत
गणेशवंदनेसोबत बिस्मिल्लाह करतो. वेगवेगळ्या जाती-पथांचे, धर्मांचे, विचारसारणींचे हजारो सक्रिय सदस्य ह्या संकेतस्थळाला लाभो!
चित्तरंजन
नमस्कार
नमस्कार मंडळी,
माझा मराठाची बोलू कवतुके | तरी ते अमृतातेही पैजा जिंके ||
ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन ||
नुकतेच आमचे मित्र श्री. विसोबा खेचर ह्यांच्या मार्गदर्शनामुळे ह्या संकेतस्थळाचे सभासद झालो आहोत.
संकेतस्थळ फार सुंदर झालेले आहे. त्याबद्दल ह्या संकेतस्थळाच्या प्रशासक आणि तंत्रज्ञ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
ह्या संकेतस्थळावर लोकशाही तत्वांचा अवलंब होईल आणि इतर संकेतस्थळाप्रमाणे प्रशासकांची मनमानी आणि मुजोरीपणा माय मराठीच्या मूळावर न येता, सर्व मराठीप्रेमी सुखाने नांदतील आणि भांडतील अशी अपेक्षा आहे.
आपला,
(मराठीप्रेमी) धोंडोपंत
स्वागत..
आदारणीय कविवर्य धोंडोपंत,
आपलं उपक्रमवर स्वागत आहे..
उपक्रमराव,
नवीन असल्यामुळे धोंडोपंतांना सदर प्रकटन कुठे लिहायचं हे बहुधा नीटसं कळलेलं दिसत नाही. आपण कृपया त्यांचं प्रकटन योग्य ठिकाणी हालवाल का?
तात्या.
संकेतस्थळ फार सुंदर झालेले आहे
संकेतस्थळ फार सुंदर झालेले आहे, खरडवही व समुदाय ही संकल्पना आवडली.
भावी वाटचाली साठी शुभेच्छा !!
आपलाच,
राज जैन
मनःपूर्वक धन्यवाद्
'उपक्रम' विषयी शैलेश यांनी जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तीच सर्व सदस्यांची असणार हे नि:संशय. खरोखर 'उपक्रम'च्या प्रवर्तकांचे कार्य अभिनंदनीय आणि प्रशंसनीय आहे.हे मोठ्या बुद्धिमत्तेचे काम आहे.त्यानी ही सुविधा निर्माण करून विनामूल्य उपलब्ध करून दिली हे मराठी भाषकांवर मोठे उपकारच आहेत. मराठी भाषेच्या प्रगतीला त्यामुळे काही अंशीं तरी हातभार लागेल.उपक्रम प्रवर्तकांचे आभार मनावे तेव्हढे थोडेच.
आता या संकेतस्थळावरील सर्व लेखनाचा विशिष्ट उच्च स्तर राखण्याचे उत्तरदायित्व आपणा सर्व सदस्यांवर आहे.या स्थळाला उत्तरोत्तर अधिकाधिक सदस्य लाभतील हे निश्चित.
......... यनावाला
धन्यवाद! / लक्षात ठेवण्यासारखे
धन्यवाद!
हे सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आणि आचरणात आणण्यासारखे आहे.
नमस्कार
नमस्कार
आजच मी नविन Join झाले आहे
नविन सभास द म्हणुन !
लहानपणी पाटीवर लिहताना भिति वाटलि तशीच वाटत आहे आणि चुका पण होत आहेत
तरी सगळलांना विनंती आहे की "न घाबरता आणी मन घट्ट् करुन माझे ले़खन वाचावे"
कळावे
लोभ असावा!
आश्विनी
अश्विनी
:))
पल्लवी
साहाय्य
नव्या सदस्यांना "साहाय्य" मधील माहिती उपयुक्त ठरेल.
आपलाही नमस्कार्.
उपक्रम वर् यायला मला आवडेल,मुक्तपणे मराठी माणसाचा विचार जशाच् तसे मांडता यावा यासाठी उपक्रम् चे दरवाजे सताड उघडे राहतील् या अपेक्षेने मी येथे आलो आहे.आणि उपक्रम् ने आमच्यासाठी हे व्यासपीठ् उपलब्ध् करुन् दिले,त्या निर्मात्याचे(नाव् माहीत् नाही)मनापासुन् आभार्...येथे ही मराठीचा सर्वोत्तम अविष्कार् घडतो.तेव्हा येथे आलेच् पाहीजे असे आग्रहाने निमंत्रण् देणारे साहित्यीक, उपक्रम चे दर्शन् घडविणारे विसोबा खेचर उर्फ् तात्या अभ्यंकर् यांचे मनापासुन् आभार् मानतो आणि माझे आभार् प्रदर्शन् थाबवतो. जय् हींद् जय् महाराष्ट्र्.