दशावतार व उत्क्रांतिवाद
दशावतार आणि उत्क्रांतिवाद
दशावतारांचा क्रम आणि उत्क्रांतिवाद यांच्यामध्ये विलक्षण साम्य आढळते.
अवतार पृथ्वीवरील जीवांची उत्पत्ती
१] मत्स्य प्राथमीक जीव पाण्यात निर्माण झाले
२] कुर्म . पाण्यातील प्राणी जमीनीवर येवू लागले व भू-जल दोन्हीवर संचार
३] वराह केवळ जमीनीवर वावरणारे प्राणी
४] नृसिंह चतुष्पाद व द्विपाद प्राण्यांमधिल अवस्था
५] वामन पूर्ण विकसित न झालेला [बटू] मनुष्य
६] परशुराम सुरवातीची अविकसित हत्यारे [परशु] परंतु नगर-बांधणी,सैन्य वगैरेंची
सुरवात
७] श्रीराम पूर्ण विकसित मानव [मर्यादापुरुषोत्तम ]
८] श्रीकृष्ण निसर्गावर व ऊर्जेवर स्वामित्व -पूर्णावतार [विश्वदर्शन]
९] बुध्द करुणादि उच्च मानसिक भावनांचे महत्व उमगले
१०] कलंकी सर्वविनाश [व पुनर्निर्माण ?]
समित्पाणी
Comments
बरोबर
मीही हे पूर्वी ऐकलेले आहे.
साम्य
साम्य आहे त्याबद्दल नवल वाटल्यास ठीक. पण यावरून प्राचीन भारतात उत्क्रांतीचा शोध डार्विनच्या आधीच लागला होता असा निष्कर्ष काढल्यास ते मात्र चूक.
----
मग काय बरोबर?
डार्विन दशावतारांच्या आधी होऊन गेला आणि त्याची कॉपी मारून दशावतार तयार केले वगैरे?
साम्य आहे त्याबद्दल नवल वाटल्यास ठीक. पण यावरून प्राचीन भारतात उत्क्रांतीचा शोध डार्विनच्या आधीच लागला होता असा निष्कर्ष काढल्यास ते मात्र चूक.
साम्य असण्याच्या कारणांवर मत द्यायचे सोडून आपल्याला अपेक्षित मतांवर चर्चा व्हावी यासाठीच हा प्रतिसाद दिला गेला आहे असे वाटते. मग नवल तरी वाटणे ठीक का आहे?
अभिजित...
पाण्याची खोली तपासून तर उड्या कोणीही मारेल..जो न बघता उडी मारतो त्याचेच डोके फुटते. ;-)
सध्या
आधुनिक विज्ञानात असलेले बरेचसे शोध आपल्या पूर्वजांना आधीच माहित होते असे बरेचदा म्हटले जाते. याची बक्कळ उदा. आहेत. ब्रम्हदेवाचा १ दिवस = आपली हजार वर्षे म्हणजेच सापेक्षता सिद्धांत किंवा ब्रम्हास्त्र म्हणजेच अणुबाँब इ. तसा प्रकार इथे होऊ नये ही अपेक्षा आहे. बाकी चर्चा ज्या दिशेने जायची त्याच दिशेने जाते हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे.
मग नवल तरी वाटणे ठीक का आहे?
ठीक का नसावे? ;-)
----
दशावतावरील लेख
मनोगताच्या दिवाळी अंकात आनंदघन (आनंद घारे) यांनी याच संदर्भात दशावतारावर एक समग्र आणि अतिशय सुंदर लेख लिहिला होता. तो येथे सापडेल.
शंका
"सक्षम (सशक्त नव्हे) जाती तरतील" हा डार्विनच्या सिद्धांताचा गाभा. हा दशावतारात कुठे दिसून येतो?
उत्क्रांतिवाद?
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१] मत्स्य प्राथमिक जीव पाण्यात निर्माण झाले.
हा विष्णूचा अवतार.म्हणजे त्या पूर्वी विष्णू होता. म्हणजे लक्ष्मी होती.ती सागरमंथनाच्या वेळी वर आली. तिच्यासह धन्वंतरी, कामधेनू,ऐरावत,रंभादि देवांगना,उच्चै:श्रवा (घोडा) इ. रत्ने वर आली. कशाला काही मेळ?
४] नृसिंह चतुष्पाद व द्विपाद प्राण्यांमधिल अवस्था
नृसिंह अवतार झाला तेव्हा हिरण्यकशिपू राजा होता, त्याच्या राण्या होत्या, प्रह्लाद होता,प्रजा होती.ते सर्व द्विपाद होते. मग मधली अवस्था कुठली?
५] वामन पूर्ण विकसित न झालेला [बटू] मनुष्य
...पण त्यावेळी बळी राजा होता.तो मोठा पराक्रमी होता. त्याची प्रजा होती. यज्ञ याग करणारे ऋषी होते.ते सर्व अविकसित होते काय?
यातून निष्कर्ष काय काढावा?
थोडेफार साम्य आहे हे खरे (या साम्यातही यनावालांनी दाखवून दिलेल्या त्रुटी आहेतच) पण यातून काय निष्कर्ष काढावा असे तुम्हाला वाटते?
दशावतार् आणि उत्क्रांतिवाद्
शरद
१] मनोगतमधील लेख मी वाचला नव्हता. सर्व साधारण वाचन असणाऱ्या कोणालाही या दोन
गोष्टींमधील साम्य लक्षात येण्याजोगे आहे. मी कोणताही नविन शोध लावल्याचा दावा करत
नाही.
२] आपल्या पूर्वजांना उत्क्रांतिवाद माहित होता असे मी म्हटलेले नाही.खरे म्हणजे मी काहीच
म्हटलेले नाही. थोडेसे साम्य दाखविल्यावर टिंगल करणारे हलके फ़ुलके प्रतिसाद अपेक्षित
होते.
३] ही पश्चातबुध्दी नव्हे. मनोरंजनाचा उद्देश ठेवून लेख "विरंगुळा" ह्या सदरांत टाकलेला आहे.
४] ह्या माफ़क अपेक्षेप्रमाणे नविन प्रतिसाद मिळतील काय? [कां मीच सुरवात करूं?]
समित्पाणी
नवीन शोध
कोणतेही वाचन पूरक होण्यासाठी उपलब्ध माहितीचे दुवे देणे ही उपक्रमावरील सर्वसामान्य पद्धत आहे. त्याप्रमाणे मी दुवा दिला. त्यात आपण शोध लावले असे सांगण्याचा हेतू नाही. मनोगतावरील लेख अनेकांनी वाचलेला नसेल त्यांना कदाचित ही चर्चा पाहून तो लेख वाचण्याची इच्छा होऊ शकेल. तसेच, चर्चाप्रस्तावक जेव्हा चर्चा टाकतो तेव्हा त्याला प्रतिसाद देणारे सदस्य हे केवळ त्याच्याशीच संवाद साधत असतात असे मानण्याचे कारण दिसत नाही. हा दुवा केवळ चर्चाप्रस्तावकासाठी दिलेला नसून या चर्चेवर टिचकी मारणार्या सर्वांसाठी दिलेला आहे.
"विरंगुळा"
शरद नमस्कार!
आपल्याला जसे हे एक साम्य दिसते तसे मलाही प्रश्न होते. सगळ्याच गोष्टींची उत्तरे सापडत नसतात.
महर्षी व्यासांच्या आधी या भारत देशात विविध भागात विखूरलेल्या र्हूषी मूनींकडे शिष्य परंपरेने आणि पिताकडून मूलाकडे विविध ज्ञान कवितेच्या माध्यमात होते. हे सर्व गूढ ज्ञान अनेंक र्हूषींकडे जरी मोखोद्गत होते तरीही त्यात बराचसा भाग ईतिहासाचा, काही भाग ज्योतिषास्त्राचा तर काही भाग आर्युवेदाचा असा तर काही भाग कुंडलिनी जागृत करणार्या योगविद्येचा होता. हे एकत्रित माहीती व्यासांनी एका ठिकाणी आणून संकलित केली. त्यातून त्यांनी चार वेद व काही ग्रंथ लिहिले.
हे सर्व ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावे त्याचा प्रसार व्हावा या उद्देशांने त्यांनी त्यांना त्याकाळात जसे पटले तसे जोडून दशावताराची संकल्पना मांडली असावी. त्यामूळे गूढ ज्ञान व ईतिहास व एक गोष्ट असे मिश्रण झाले होते. ह्या पृथ्वीवर जेव्हां फक्त पाणिच पाणि होते तेव्हा निसर्गाने पहिला जीव पाण्यातच प्रकट झाला. तो सूष्म जीव म्हणजे मासा नव्हे. पण जेंव्हा सामान्य जनतेपर्यंत निसर्गाच/ विष्णूचं विराट रूप पोहचवायचं तर त्याला समजेल असंच उदाहरण द्यायला हवं. म्हणून पहिला जीव 'मासा' म्हणजे जलचर प्राणि. त्या नंतर उभयचर, जमिनीवर चालणारे, व ह्या विकासातून शेवटचा प्राणि - मानव. मानव म्हणजेच - वामन. पण त्या काळात नियतीच्या मनात काही वेगळेच होते म्हणून जे जसे लिखाण स्फूरत गेले तस तसे व्यासांनी लिहीले. कारण तो काळ बदलला होता. व्यासांच्या मते कलयुग सुरू झाले होते. त्यांच्या लिखाणातून 'भक्तियोग' जन्माला यावा हिच नियतिची ईच्छा असावी. आणि त्यातूनच महाभारत व त्यानंतर रामायण रचले गेले.
वामन म्हणजेच मानव हाच विष्णुचा, 'अव्यक्त प्रकृति' चा प्रकट झालेले शेवटचे रूप. ह्या रुपात शाररीक बदल होणार कि नाही हे आता सांगता येत नाही. परंतू मानवाची ईच्छा आकांक्षा दिवसेंदिवस वाढत जाण्यातूनच माणूसपण व त्यानंतर माणूस खाणारी वृत्ति वाढत जाईल असं दर्शविणारी सांकेतिक रुप दशावतारातून सांगण्यात आली असावीत. पण तसं थेट सांगण योग्य नव्हतं. नसावं. त्यांचा क्रम ही नियतीनेच बिघडवला असावा. राम वा कृष्ण हि ऐतिहासिक माणसेच. गीता व्यासांनीच रचली असावी.
आपण ज्या बारा राशीं ची चिन्हं पाहतो. मग भले त्याला चंद्र राशी म्हणो वा सुर्य राशी म्हणो. पण त्यांना जी चिन्हं दिली गेली आहेत त्यात एक वेगळेपण जाणवते. त्यातील काही राशी कुंभ, कन्या, मिथुन, तुला, धनु, सिंह वेगळे अर्थ दाखवितात. कुंभ अमृताचा संकेत दाखवते, कन्या कुमारी तरूणीचे, मिथुन -प्रणयक्रिडेचे, तर तुला - अर्धनारिनटेश्वराचे, धनू - जनावरात माणसाचे परिवर्तन (क्लोनिंगमूळे किंवा मानवाचा जनावरांशी शरिरसंबंध ठेवण्यातून जन्माला येणार्या जीवांचे ) होण्याचे व शेवटी सिंह - नृसिंह.
असो. हा सर्व माझ्या कल्पनांचा विस्तार आहे.
'ह्या माफ़क अपेक्षेप्रमाणे नविन प्रतिसाद मिळतील काय?' असं आपणं लिहिलं म्हणून लिहावसं वाटलं.