छायाचित्र टीका ४

या शनिवारी-रविवारी राजमाची किल्ल्यावर जाऊन आलो. जरा आराम करायला टेकलो असता संध्याकाळी समोर हे चित्र दिसले. मग काय लगेच कॅमेर्‍यात कैद केले. याचेही परखड रसग्रहण व्हावे यासाठी आपल्यासमोर ठेवतो आहे.

फोकल लेंथः ८ मीमी
एफ नंबरः ५.६
एक्स्पोजर टाईम(शटर स्पीड) १/६४० सेकंद
एक्स्पोजर कंपेन्सेशन(स्टेप): ०(शून्य)

(सोनी डीएससी ड्ब्लू ५ कॅमेरा)

अभिजित

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम चित्र

आवडलेले काही मुद्दे :
१. झाडांची सिल्हुएट जवळजवळ कृष्णधवल आल्यामुळे फांद्यांच्या चित्रविचित्र आकाराकडे लक्ष जाते.
२. झाडांच्या फांद्यांच्या वक्राकृतींमध्ये वैविध्य आहे.
३. उजवीकडील झाडाच्या जवळजवळ स्रळ उभ्या बुंध्याने, आणि क्षितिजरेषेच्या जवळजवळ आडव्या रेषेने वक्राकृती फांद्यांना चौकट प्राप्त होते.
४. डावीकडे सूर्य आहे, याची कल्पना येते, ती उत्कंठावर्धक आहे. तो सूर्य फोटोच्या आत घेतला असता तर त्याने फोटोवर राज्य केले असते. तो फोटोच्या बाहेर ठेवल्याने रसपोषण होते. तो फोटोत घेण्याचा मोह टालला याबद्दल ++

(येथील फोटो पिक्सेलेटेड दिसतो [रंगांचे चौकोनी ठिपके दिसतात], पण मूळ फोटोत ते दिसत नसावेत, याबद्दल नि:शंक आहे.)

पिक्सेलेटेड

येथील फोटो पिक्सेलेटेड दिसतो [रंगांचे चौकोनी ठिपके दिसतात]
हे काही मला दिसले नाही. पिक्सेलेटेड म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे? noise का?
-
ध्रुव

मलाही

मलाही पिक्सलेटेड दिसले नाही.

मग एलियसिंग म्हणा

मधल्या झाडाच्या सगळ्यात वरच्या आडव्या फांद्या बघितल्या तर बारीक आडव्या रेषा दिसतात : कदाचित माझा स्क्रीन असेल...

खरे आहे..

पिकासावरची लिंक वापरुन हे चित्र इथे दिले आहे. मोठ्या आकाराचे चित्र एकदम संपूर्ण चित्र पाहिले जात नाही आणि मग ते परिणामकारक वाटत नाही. मूळ चित्रात मधले झाड शार्प आहे. मूळ चित्रसुद्धा ३ मेगापिक्सेल सेटींगला काढले आहे.

अभिजित...
पाण्याची खोली तपासून तर उड्या कोणीही मारेल..जो न बघता उडी मारतो त्याचेच डोके फुटते. ;-)

छान चित्र...

चित्र मस्तच आहे याबद्दल काहीच शंका नाही. वरती धनंजय यांनी सांगीतलेल्या जवळजवळ सर्व गोष्टींशी सहमत.
मला वाटलेले काही मुद्दे-
१. चित्राला चांगली चौकट असती तर चित्र जास्त खुलले असते असे वाटते. चौकट टाकणे हे वास्तविक छायाचित्रकाराच्या वैयक्तिक आवडीनिवडीवर आहे असे माझे मत आहे. त्यामुळे चौकटीची रंगसंगती कशी असावी याबद्दल तुम्हालाच ठरवावे लागेल. मला या चित्राला पांढरी आधी व नंतर काळी चौकट द्यायला आवडले असते.
२. चित्रातले उजवीकडचे मोठे झाड आहे, ते फारच हतबल एकाकीपणाची भावना देत आहे. ते मला भावले. ते झाड खालून वरपर्यंत आले असते तर अजून् आवडले असते.

कळावे,
-
ध्रुव

चित्र आवडले.

चित्र खरोखरीच आवडले.

चित्र आवडले

बाकिच्यांचा मतांशी सहमत!

पण चित्रात रंगांची कमतरता प्रकर्षाने जाणवली. अश्या चित्रांमध्ये आकाशाची भुमिका फार महत्वाची असते. इथले निरभ्र आकाश काहीसे सपक वाटते. चित्र कृष्णधवल करुन बघीतले आहे का?

*अर्थात हे मत व्यक्तिगत आवडीनुसार हे वे.सां.न.

झाड-वीज आणि चित्र

माला उजवीकडील आकाशाला भिडणारे झाड फार आवडले. खरंतर ते बघून वीज काळी असती तर अशी दिसली असती असे क्षणभर मनात चमकून गेले..
बाकी चित्र मात्र ओके ओके वाटले..

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

छान

छान आहे चित्र.

अवांतर - जमल्यास सप्टें नंतर परत एकदा ह्याच जागी जाउन फोटो काढ अभिजीत! हिरवेगार !!

सुंदर

सुंदर चित्र. धनंजय यांच्याशी बराचसा सहमत. माझ्या मते उजव्या बाजूचे झाड एकदम कडेला आले असते तर आणखी उठाव आला असता. चित्रात तीन मुख्य झाडे दिसतात. एक सूर्याजवळचे, दुसरे मधले आणि तिसरे उजवीकडचे. सर्वात उजव्या कडेला जी झाडी आहे ती टाळता आली असती तर चित्रात अधिक उठाव आला असता.
अर्थात ही वैयक्तिक मते आहेत. (चूभूद्याघ्या) चित्र उत्तमच आहे.

----

सहमत आहे

आता माझ्या लक्षात नाहीये की एकदम उजवीकडे मोठे झाड होते की झाडी होती. पण ती तिथे नसती आणि चित्रातले उजवीकडचे मोठे झाड जरा अजून उजवीकडे घेता आले असते तर चित्र अजून खुलले असते.

सर्वांना धन्यवाद..

अवांतरः सुर्याकडच्या डाव्या बाजूच्या झाडाला पाने आहेत. पण जसजसे सुर्यापासून दूर जाऊ तसे झाडे अभिक भकास होत गेली आहेत ;-) हे अर्थातच नंतर सुचलेले विचार..

अभिजित...
पाण्याची खोली तपासून तर उड्या कोणीही मारेल..जो न बघता उडी मारतो त्याचेच डोके फुटते. ;-)

ठिक

धनंजय यांच्या सूर्य इत्यादी काहि मतांशी सहमत.. तसेच रंगांचा अभाव या कोलबेर यांच्या मताशी सहमत.

सोनेरी कड आणि त्या बाहेर काळी चौकट असती तर चित्र उठावदार झाले असते असे वाटले.
--लिखाळ.

 
^ वर