उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
संस्कृत आणि सुभाषिते
शरद
May 31, 2008 - 4:19 pm
संस्कृत आणि सुभाषिते :
संस्कृत सुभाषिते आठवतांना नीती शतक, वैराग्य शतक वा भक्ती रचना या पलिकडे काही नाहीच ! मला तर
कामिनी काय कांतारे कुच पर्वतदुर्गमे
मा संचर मन:पान्थ! तत्रास्ते स्मर तस्कर: ! किंवा
या पाणिग्रहलालिता, सुसरला,तन्वी,सुवंशोद्भवा
गौरी,स्पर्श्सुखावहागुणवती नित्यं मनोहारिणी !
सा केनापि हता,तया विरहितो गन्तुं न शक्तोsस्म्यहं
"रे भिक्षो! तव कामिनी?" "न हि न हि! प्राणप्रिया यष्टिका !!
असलच काही काही लक्षात राहिले आहे.
समित्पाणी
काही मजकूर संपादित. लेखनप्रस्ताव टाकताना त्यात सदस्यांवर अनावश्यक टिका येणार नाही याची कृपया काळजी घ्यावी. - संपादन मंडळ
दुवे:
Comments
छेकापन्हुती
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. शरद यांनी दिलेले दुसरे सुभाषित म्हणजे छेकापह्नुती अलंकार आहे.
संस्कृत अपह्नुतीचा अर्थ (सर्वसाधारण ):
"अहो,भटजीबुवा, म्हणजे तुमच्या सौभाग्यवती का?"
" नाही नाही. माझी काठी."
......या छेकापन्हुतीत पुढील प्रमाणे श्लेष आहेत:
पाणिग्रहण--लग्न; हातात धरणे.
सुसरला---सरळ स्वभावाची,अगदी सरळ.
तन्वी---सडपातळ बांध्याची; बारीक
सुवंशोद्भवा---चांगल्या कुळात जन्मलेली; उत्तम प्रकारच्या बांबू पासून बनवलेली.
गौरी---गोरीपान; पांढरी
स्पर्शसुखावहा---सुखद स्पर्श असलेली.
गुणवती---सद्गुणी, जिला दोरी बांधली आहे अशी.(खुंटीला अडकवून ठेवण्यासाठी.)
मनोहारी----सुंदर
*****
मराठीतील एक छेकापह्नुती आठवते.दोन सख्यांचा (मैत्रिणींचा) संवाद आहे:
"अंबरगत कधी पयोधरांते उघडुनी पळतो दुरी , म्हणावे सांग काय गे तरी "
"तो नंदाचा पुत्र काय गे,सांग कन्हैया हरी ।"
"नव्हे गे , मारुत मेघोदरीं "
इथे ’अंबर’ आणि ’पयोधर’ या शब्दांवर श्लेष आहे.
************
.......
मस्त! | छेकापह्नुती?
मस्त आहे! आणखी उदाहरणे असतील तर द्या.
छेकापह्नुतीचा शब्दशः अर्थ काय आणि हा शब्द कसा तयार झाला असावा?
मराठी छेकापह्नुतीचा अर्थ समजला नाही.
अंबर पयोधर - अर्थ
द्व्यर्थी श्लोक -
अंबर - आकाश किंवा वस्त्र
पयोधर - ढग किंवा स्तन
मला वाटते अर्थ स्पष्ट झाला असावा.
धन्यवाद!
अर्थ स्पष्ट झाला, धन्यवाद :) पयस् चा अर्थ दूध असाही आहे हे लक्षात आले नाही.
समुद्रवसने....
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.शरद यांनी दिलेल्या दुसर्या सुभाषिताचा अर्थ लावण्यासाठी "समुद्रवसने देवी...." हा प्रातःस्मरणीय श्लोक आठवा
अर्थही द्यावा
कृपया अर्थही द्यावा.
एक सुभाषित
मला दोन्ही ओळींत सारखीच अक्षरे असलेले पण प्रत्येक ओळींत फोड वेगवेगळी केल्यामुळे वेगवेगळा अर्थ असलेले एक सुभाषित आठवते. ते असे :
तमाखुपत्रं राजेंद्र भज मा ज्ञानदायकम् |
तमाखुपत्रं राजेंद्र भज माऽज्ञानदायकम् ||
पहिली ओळ :
संधीची फोड - तम् आखुपत्रं राजेंद्र भज मा ज्ञानदायकम् . शब्दार्थ - तम् आखुपत्रं = त्या गणपतीला, भज=भक्ति कर, मा=लक्ष्मी (धन), दायक=देणारा
अर्थ - हे राजेंद्रा, धन व ज्ञान देणार्या त्या गणपतीची तू भक्ति कर.
दुसरी ओळ :
संधीची फोड - तमाखुपत्रं राजेंद्र भज मा अज्ञानदायकम् . शब्दार्थ - तमाखुपत्रं = तंबाखूचे पान. भज=नादी लाग, मा=नको, अज्ञान=ज्ञानाचा अभाव
अर्थ - हे राजेंद्रा, अज्ञान देणार्या (निर्माण करणार्या) तंबाखूच्या पानाच्या नादी तू लागू नको (सेवन करू नको).
आखुपत्रं
या शब्दाचा अर्थ काय?
'आखुपत्र' चा अर्थ
या शब्दाचा अर्थ काय?
आखु म्हणजे उंदीर. पत्र म्हणजे वाहन. आखुपत्र म्हणजे उंदीर हे ज्याचे वाहन आहे तो, म्हणजे गणपति.
आणखी एक दीर्घयमक कडवे
यथा नयति कैलासं नगं गानसरस्वती ।
तथा नयति कैलासं न गंगा न सरस्वती ॥
यथा-तथा = ज्याप्रकारे-त्याप्रकारे
नयति = नेतो/नेते
कैलासम् = कैलासाला (कैलासापाशी या अर्थी)
नगम् = पर्वताला (पर्वतापाशी या अर्थी)
गानसरस्वती = संगीताचे ज्ञान
न गंगा न सरस्वती = गंगाही नाही, सरस्वतीही नाही
ज्या प्रकारे कैलास पर्वताशी संगीताचे ज्ञान नेते, त्या प्रकारे कैलासापाशी गंगाही नेत नाही, सरस्वतीही नेत नाही.
आणखी एक
तातेन कथितं पुत्र, पत्र लिख ममाज्ञः
न तेन लिखितं पत्र, पितुराज्ञा न लङ्न्घिता |
(वडिलांनी सांगितले, मुला माझ्या आज्ञेनुसार पत्र् लिही. त्याने पत्र लिहिले नाही आणि वडिलांची आज्ञादेखिल मोडली नाही.)
तातेन कथितं पुत्र, पत्र लिख ममाज्ञः
नतेन लिखितं पत्र, पितुराज्ञा न लङ्न्घिता |
(नतेन = नम्रपणाने)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.