उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र टीका ३
वैद्य
May 31, 2008 - 4:34 am
ध्रुव ह्यांनी सुरू केलेल्या ह्या छान उपक्रमामध्ये आणखी एक चित्र टाकत आहे.
अमेरिकेतल्या स्मोकी माउंटन भागात केड्स् कोव्ह ह्या भागाला भेट देताना हे पाडस अगदी जवळ दिसुन आलं थोडं थोडं करत अगदी जवळ जाऊन ह्याचे चित्र टिपता आले.
काय आवडले काय नाही आवडले हे आवर्जुन सांगावे.
ऍपर्चर : ५.६
शटर स्पीड : १/५००
आय एस् ओ : २००
ह्या उपक्रमात जाणकारांनीच भाग घ्यावा असे नाही.छायाचित्रांची आवड असणार्या सगळ्यांनी आपले परखड मत द्यावे.
दुवे:
Comments
असा जेवताना
असा जेवताना कोणाचा फोटो काढु नये. चांगला येत नाही.
;-)
फोटो मस्त...पण.....
फोटो फारच जव्वळ गेल्यासारखा वाटला. छायाचित्रकाराला पाडसाच्या डोळ्यातले भाव टिपायचे आहेत का ?
मला नाय आवडला राव, म्हणजे फोटोची इतकी क्लियरीटी असतांनाही मजा नाही घेता आली.
(छायाचित्रांतलं काही कळत नाही,फक्त पहिल्याच नजरेत मनाला आनंद देणारं चित्र सुरेख असं आमचं ढोबळ मत )
येस् सर!
ये हुई ना बात! हे सदर अश्या परखड मत प्रदर्शनासाठीच आहे.
वा!
किती सुंदर फोटो आहे! मस्तच!
राधिका
फ्रेमिंग
थोडे चांगले करता आले असते. पाडसाचा उभट चेहरा आता जो सर्वसाधारणपणे फ्रेमच्या डाव्या भागातच खालपासून वरपर्यंत गेला आहे, तो किंचीत डायगोनली पसरला असता, तर अधिक चांगले झाले असते, असे मला वाटते.
'ह्या उपक्रमात जाणकारांनीच भाग घ्यावा असे नाही.छायाचित्रांची आवड असणार्या सगळ्यांनी आपले परखड मत द्यावे'. ह्या तरतूदीचा फायदा घेउन हे लिहीले आहे.
फ्रेमिंग
म्हणजे चित्र काढताना कॅमेरा थोडा डावीकडे पॅन करायला हवा होता असेच ना?
अगदी अवश्य! धन्यवाद.
असेच (थोडेफार)
कॅमेर्याचा रोख असा असता की त्या पाडसाची लांबलचक मान फ्रेमच्या डाव्या, खालील कोपर्यातून निघून सर्वसाधारणपणे उजव्या वरच्या कोपर्याच्या निकट गेली आहे, तर ते कॉंपोझिशनच्या दृष्टिने अधिक चांगले दिसले असते.
वर (थोडेफार) म्हटले ते अशासाठी की चलतचित्र कॅमेराच पॅन होतो, (त्याची मूवमेंट डावीकडून उजवीकडे अथवा उजवीकडून डावीकडे होते). स्थिर कॅमेरा 'पॅन' होत नाही. पण हे झाले पेडॅंटिक नीटपिकींग.
पॅनींग
स्थिरचित्र कॅमेरा देखिल ट्रायपॉडवर ठेवून पॅन केला जातो. काही वेळेला लाँग एक्स्पोजर ठेवून कॅमेरा एखाद्या चलत वस्तू (उदा.गाडी) वर केंद्रीत करून पॅन केला जातो. ज्यामुळे गाडी सुस्पष्ट परंतु बाकीचे चित्र धुसर असा खूप छान इफेक्ट बघायला मिळतो. असो..वरील चित्राच्या संदर्भात मला पॅनींगमध्ये कॅमरे थोडा 'डावीकडे वळवणे' असे अपेक्षीत होते.
आवडला.
फोटो जवळुन काढल्यामुळे तो अजुन चांगला आला आहे. कदाचित लांबुन तेवढा आला नसता असे म्या अडाण्याचे मत आहे. मला या चित्रातला क्लोजअप आवडला. आपण चित्रे एडिट करण्यासाठी (नाव लिहीणे वगैरे) कोणते सॉफ़्टवेअर वापरता ?
- सूर्य.
फोटोशॉप/जिम्प
वापरतो.
सावध?
पाडस सावध झाले आहे असे वाटले! बाकीचे अंग दिसत नसल्यामुळे ते पाडस आहे हे पटकन कळत नाही.
मुद्रा टिपण्याच्या दृष्टीने चित्र उत्तम जमले आहे. अशा चित्रांमध्ये बर्याचदा अंगही दिसते, आणि हालचालींमधला डौल/नाजूकपणा. हे एक मी म्हणते तसे चित्र पहा. हे चित्र त्यादृष्टीने वेगळे असल्याने बर्याच जणांना आवडले नसावे.
काहितरी कृत्रिम
काय हवे होते ते नाहि सांगता येणार. पण काहितरी कृत्रिम वाटतंय
कदाचित माझ्या नजरेचा दोष असेल.. पण आपल्या इतर चित्रांसारखं हे थेट भिडलं नाहि...
ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे ;)
अधिक माहिति हवी
एखादे प्रकाशचित्र काढताताना कॅमेराचे सेटींग कसे ठरवले हे साद्यंत लिहिले तर् बरे होईल.
प्रकाश घाटपांडे
सेटींग
पॉईंट ऍन्ड् शूट कॅमेर्यांमध्ये फारसा कंट्रोल नसतो. कॅमेराच सगळे ठरवतो (ऑटो मोड मध्ये). वेगवेगळे मोड्स् (पोर्ट्रेट,लँडस्केप, ऍक्शन इ.इ.) निवडण्याचे मर्यादित स्वातंत्र्य असते पण त्यातही फायनल सेटिंग्ज कॅमेराच ठरवतो.
एस एल आर् कॅमेरे 'मॅमन्युअल मोड' देतात ज्यामध्ये तुम्ही मर्जीनुसार ऍपर्चर/शटर/व्हाईट बॅलन्स/मिटरींग इ.इ. वापरू शकता. प्रसंग काय आहे, चित्रात भर कशावर द्यायचा आहे, कोणती वेळ आहे, घरात आहात की बाहेर इ.इ. गोष्टींवर काय सेटींग निवडायचे ते ठरवले जाते.
क्लोज अप
क्लोज अप चांगला आहे. मुख्य म्हणजे रंगसंगती चांगली दिसते आहे.
क्लोज अप फोटो काढताना कॅमेराचे सेटिंग काय असावे?
सुरेख
छायाचित्र सुरेख. चित्र व फोकस अचूक आहे. (डेप्थ ऑफ फिल्ड) चित्राची खोली पण छान जाणवत आहे. चित्र बहुतेक जमीनीवर झोपुन काढल्यासारखे वाटत आहे. पाडसाच्या चेहर्याच्या उंचीवर जाऊन काढल्यामुळे अधिक प्रभावी वाटत आहे.
काही लोकांसारखे मलाही, चित्र अजून् थोडे दुरून असते तर जास्त आवडले असते. चित्राताईंनी म्हणल्याप्रमाणे पाडस सावध झाल्यासारखे दिसत आहे पण त्याला तुमच्यापासुन धोका नाही हे ते जाणुन असावे. लेन्स कोणती वापरली, चित्र किती फोकल लेंथ वर काढले हे पण कृपया सांगावे. माझ्या माहिती प्रमाणे आपण कॅनॉनचा कॅमेरा वापरता.
-
ध्रुव
लेन्स
लेन्स 'टॅमरॉन टेलेफोटो'..बहुतेक ३०० वर/किंवा जवळपास.
छान
चित्र छान आहे. चित्रामध्ये हरणाचे दोनही कान पूर्ण आले असते तर आवडले असते.. त्याच्या मनेच्या आणि कानाच्या मधून दिसणारा चौथा पाय सुद्धा बर्यापैकी दिसून त्याची उभी राहण्याची लकब मनात ठसली असती. आणि वरील प्रतिसादा कोणी म्हटल्याप्रमाणे चित्र किंचीत दूरून सुद्धा आले असते.
चित्र चांगलेच आहे.. खोली (डेप्थ ऑफ फिल्ड) चांगले टिकले आहे.. मला असे 'टाईट कंपोज' आवडतात..... पण हे चित्र आपल्याच नायगार्याच्या चित्रांसारखे खिळवून ठेवत नाही.
--लिखाळ.
तटी- कृपया चित्राला चौकट कशी करावी, त्याचा प्रिंट साईज कसा बदलावा, चित्राचा मूळ आकार त्याच पटीत कमी कसा करावा इत्यादीचे थोडक्यात मार्गदर्शन सुद्धा करावे ही विनंती. अनेकांना या माहितीचा उपयोग होईल. त्यासाठी नवी चर्चा सुरू केली तरी अनेक तरबेज लोक आपले तंत्रसुद्धा त्यात विशद करु शकतील आणि आमच्या सारख्या नवख्यांना त्याचा फायदा होईल.
चौकट
ह्यासाठी फोटोशॉप मध्ये कॅनव्हस साईज हे फिचर मी वापरतो. चित्राचा कॅनव्हस साईज हव्या तो रंगाने हवा तितका वाढवला की पाहिजे ती चौकट काढता येते.
व्हीडीओ डेमोन्स्ट्रेशन
धन्यवाद!
मतप्रदर्शन करणारर्या सर्वांचे आभार.
हे चित्र साधारण भर दुपारच्या उन्हात काढले आहे. गाडीतुन जात असताना अचानक हे पाडस दिसल्याने फारश्या पूर्वतयारीशिवाय हे चित्र काढले गेले. दुपारच्या उन्हात चित्र कंपोज केल्याने सर्वात मोठे चॅलेंच होते ते प्रखर सूर्यप्रकाशाचे. त्याचा इफेक्ट कमी करण्यासाठी इतके जवळून चित्र काढले. तरीही डोळ्याच्या उजव्या बाजूला आणि पार्श्वभूमी मध्ये थोडेसे ओव्हर एक्स्पोज्ड झाल्यासारखे वाटते. संपूर्ण पाडस फ्रेम मधे बसवून देखिल चित्रे काढली पण प्रखर सूर्यप्रकाशामूळे चित्र मनासारखं येत नव्हत. म्हणून त्याच्या डोळ्यातील भाव टिपण्यासाठी थोडे थोडे पुढे सरकत गेलो, आणि (नशिबाने) पाडस देखिल जागच्या जागीच राहीले, म्हणून हे चित्र काढू शकलो.