त्याबरोबर हेही पाहायला हवे

आपल्या देशातले सत्ताधीश देशाला महासत्ता करण्याची स्वप्ने पाहात आहेत. पण त्यान्नी खालील मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत-

१. भारतातली विशेष आर्थिक क्षेत्र वा अन्य कारणाने सतत कमी होत जाणारी जमीन्.
२. शेतकर्याची दिशाहीन स्थिती
३. प्रचन्ड विषमता
४. ग्रामीण, शहरी या भेदाबरोबरच मोठी आर्थिक विषमता
यावर चर्चा व्हायला हवी.

लेखनविषय: दुवे:

Comments

महत्वाचे मुद्दे

शील्पाने माडलेले मुद्दे महत्वाचे आहेत यावर चर्चा व्हायला हवी.
सायली

हे बरंय!

नुसतेच चर्चा व्हावी असे म्हणायचे?
आपले पण काही मुद्दे/विचार द्या ना या चर्चेत...

का व्हावी ही चर्चा असं तुम्हाला वाटतं?

आपला
गुंडोपंत

धन्यवाद

धन्यवाद

समक्ष पहिल्याने जाणवलेले मुद्दे

मी गेली ८ वर्षे पत्रकरिता करत असताना राज्यातली खूप खेडी फिरले. रेशीम उद्योग करणार्या सान्गलीजवळच्या शेणोली नावाच्या गावात गेले. तरुणान्च्या या नव्या व्यवसायामुळे हे गाव खूप चर्चेत होते. पण त्या सक्सेस स्टोरीपलीकडे जाऊन मी पहायचे ठरवले. तिथे एका बाईना भेटले. त्या बाईच्या नवर्याने रेशीम उद्योगात हार खाल्ल्याने आत्महत्या केली होती.
पदरात चार मुली , एक तान्हा मुलगा आणि सासूसासर्यान्ची जबाबदरी.
डोक्यावर भलेमोठे कर्ज, अशा परिस्थितीत त्या झुन्ज देत् होत्या.
त्यान्ची जेमतेम दोनच मुले शिकू शकत होती, तिही इतरन्च्या सहकार्यावर.
ते पाहून खूप त्रास झाला.

खेड्यातल्या या परिस्थितीबरोबरच शहरातली सधन कुटुम्बातली सिनेमा पाहयचाय म्हणून क्लास घ्यायला आलेल्या शिक्षिकेला परत पठवणारी मुलेही पाहिली.

भारत आणि इन्डियातला फरक तो हाच.

मन सुन्न होते

नुसते ऐकूनच फार वाईट वाटते, तुम्ही तर या कुटुंबाची फरफट याची डोळीं बघितली आहे...

आपल्या समाजात कर्जाच्या अर्थकारणाचे गणित मनापासून समजलेले नाही.

ग्रामीण बँकेची छोटी-छोटी कर्जे साधारणपणे परत फेडली जातात, असे मी ऐकून आहे. अति-लघु-पतपेढी (मायक्रोक्रेडिट?) संस्था महाराष्ट्रात कार्यरत आहेत का?

(हे कुटुंब दुर्दैवी होते, ते होतेच. पण बाकी तरुण लोकांचा रेशीम-व्यवसाय सफल झालेला दिसला का? की "सक्सेस स्टोरी" अवघीच सुरस-कथा होती?)

फरक

आपली या विषयातली कळकळ जाणवली.
पण खालचे वाक्य मात्र खटकले. असे वातले की तुम्ही एका मोठ्या समुहाला 'लेबल' करून कुचकामी ठरवताय. हे धोकादायक आहे. नाकारण्या पेक्षा यांना स्विकारून जास्त फायदा आहे हे निश्चित!

भारत आणि इन्डियातला फरक तो हाच.
असे तुम्हाला वाटले तरी शहरी तरुण पीढीला याची जराशी जाणीव व योग्य दिशा मिळाली की काय घडू शकते याचे उत्तम चित्रण डॉ. अभय बंग यांनी आयोजित केलेल्या शिबिरात दिसत नाही का?
डॉ अभय बंग (बहुदा निर्माण नावाने) एक कार्यशाळा आयोजित करातात. ही कार्यशाळा एकदा नाही तर अनेक भागात घेतली जाते.
या शिबिरात सहभागी होवून आलेल्या मुलामुलींची मते ऐकल्यावर
इंडीयातून भारताकडे परतु शकणारी एक मोठी पीढी आहे. फक्त योग्य ते मार्गदर्शन आवश्यक आहे याची खात्रीच पटते!

मला वाटते तुमच्या साप्ताहिक सकाळ मध्येच यावर एक लेखमाला सध्या सुरु आहे.
मात्र ग्रामीण व शहरी हा फरक आणि
शहरी, हपापलेला निलाजरेपणा फक्त भारतातच नाही तर जागतिक आहे याची शंकाच नको!
माझ्या अंदाजाने अमेरिकेतही हे चित्र साधारणपणे असेच असावे.

आपला
गुंडोपंत

अनुभव वाचायला आवडतील

सामजीक विषमता काळजी करण्यासारखीच होत चालली आहे. एकी कडे वाढणारी "गर्भदरीद्री" तर दुसरीकडे "नवश्रीमंती" ...
आपण मांडलेल्या प्रस्तावाचा आवाका मोठा आहे. पण (येथे स्वतंत्रपणे लिहीण्यास त्यानिमित्ताने) सुरवात करत आहात तेंव्हा स्वागत.

मी गेली ८ वर्षे पत्रकरिता करत असताना राज्यातली खूप खेडी फिरले.

या संदर्भातील अनुभव वाचायला आणि जमल्यास छायाचित्रे पहायला आवडतील.

असेच

धनंजय, गुंडोपंत आणि विकास यांच्याशी बराचसा सहमत आहे. ग्रामीण भागात बचतगट/मायक्रोक्रेडिट, बदलते/नवे तंत्रज्ञान आणि शिक्षणाचे वाढते पेनिट्रेशन यामुळे काय बदल होत आहेत याची माहिती देता आल्यास चांगले.

अवांतर -
एखाद्या अक्षरावर अनुस्वार देण्यासाठी त्या अक्षरानंतर M टंकावे म्हणजे 'झुंज' लिहिण्यासाठी jhuNja असे टंकावे.
र्‍य लिहिण्यासाठी Rya असे टंकावे. करणार्‍या = karaNaaRyaa, असणार्‍या = asaNaaRyaa

दुरूस्ती

--------------
एखाद्या अक्षरावर अनुस्वार देण्यासाठी त्या अक्षरानंतर M टंकावे म्हणजे 'झुंज' लिहिण्यासाठी jhuNja असे टंकावे.

'झुंज' = jhuMja

धन्यवाद

धन्यवाद
मला अनुस्वार लिहिता येत नव्हता. आता प्रयत्न करेन.

धंदा

भारतात खास करून ग्रामिण भागात कोणी कोणता व्यवसाय करावा याचे विचार घेतल्यास धक्कादायक चित्र समोर येइल. सोम्या करतोय आणि पैसा मिळवतोय म्हणून गोम्याला सुद्धा तेच करायचे असते. सोम्याची क्षमता गोम्याची क्षमता याचा विचारच केला जात नाही.





सर्वान्ची मते पटली

माझे यासन्दर्भातले इतर अनुभव नक्कीच शेअर करेन. त्या गावातल्या इतरान्चा व्यवसाय बरा चालला होता. पण त्यान्च्याही मनात असुरक्षितता होती. ग्रामीण भागातल्या सक्सेस स्टोरीज् काही काळापुरत्याच असतात असे दिसले. कारण उत्साहात सुरू झालेले अनेक प्रयोग अनन्त अडचणीमुळे फसलेले मी पाहिले आहेत.

व्यावसायिक अनिश्चितता

कोणत्याही व्यवसायात अनिश्चितता असतेच. एन्रॉन कंपनी किंवा सिटीबँक सारख्या जगड्व्याळ कंपन्याही जिथे डबघाईला येतात, तिथे शेणोलीतल्या रेशीम उद्योजकांची काय कथा? असो.

कोणत्याही व्यावसायिकाचे नुकसान होऊन त्याला आत्महत्या करावी लागणे ही घटना अत्यंत दु:खद आहे. परंतु इतर 'बर्‍या परिस्थितीतील' रेशीम व्यावसायिकांच्या मनातील साशंकता हीच त्यांच्या यशस्वी होण्यामागची गुरूकिल्ली आहे. सर्वकाही उत्तम चालले आहे असे वाटू लागले तर स्पर्धात्मक बाजारपेठेत त्यांचा व्यवसाय मागे पडेल. बदलत्या परिस्थितीशी सातत्याने संघर्ष हाच या नागड्या अर्थकारणाचा वसा आहे.

कित्येक शतके एकाच प्रकारची संरक्षक विचारसरणी ('ठेविले अनंते...') जनमानसात रुजल्यामुळे आक्रमक व्यावसायिकता नष्ट झाली. नवनव्या विचारांना चालना मिळून त्याप्रमाणे वर्तन करणे नष्ट झाले. भारताला विचार आणि कृती -दोन्ही बाबतीत जडत्व आले.
भारतातील इंडिया आणि भारत ही दरी आर्थिक उदारीकरणामुळे रुंदावत जाण्याचे प्रमुख कारण हेच आहे असे मला वाटते. जागतिक सपाटीकरणाच्या धुमाळीत हे संरक्षक धोरण फोलपटासारखे उडून गेले. ज्यांना नवा विचार कळला ते व्यावसायिक पुढे घुसले.त्या नवनव्या व्यवसायांत सहभागी झालेल्यांची प्रगती झाली.

शेतीचेही तेच! शेती हा व्यवसाय आहे हे आता(तरी) शेतकर्‍यांनी जाणले पाहिजे. व्यवसायाचे नियम, तो चालवण्याची शिस्त आणि त्यातल्या अनिश्चितपणावर मात करण्यासाठी केलेल्या तरतुदी यावर अभ्यास करून शेती केली पाहिजे. भारताकडे शेती उत्पादनांची प्रचंड क्षमता आहे. परंतु जोवर शेतकरी सरधोपट पद्धतीने शेती करत राहील तोवर ही क्षमता पूर्णपणे विकसीत होणार नाही. शेतीतून फायदा होणार नाही. पहिल्या हरितक्रांतीमुळे रासायनिक खतांचा आणि औषधांचा भरमसाट मारा करून शेतकर्‍यांनी उत्पादन वाढवले खरे! पण मूळ जमिनीचा कस कमी झाल्याने शेतीची उपज क्षमता कमी झाली. आक्रमक शेती करताना हे संभाव्य धोकेही लक्षात घेतले पाहिजेत.

जेथेजेथे शेतकरी नवनवे प्रयोग करून आक्रमक शेती-व्यवसाय करत आहेत तेथे त्यांना यश मिळाले आहे याची अनेक उदाहरणे आहेत.
यासाठी अनेक अव्यावसायिक/निमव्यावसायिक संस्था त्यांना मदत करत आहेत. हा व्यवसाय शेतकर्‍यांना फायदेशीर होण्याबरोबरच त्याची कार्यक्षमता (एफीशिएन्सी) वाढायला हवी.

अन्यथा हळूहळू खासगी व्यावसायिकांना शेती हा व्यवसाय करू देण्यास भारताची संभाव्य सरकारे गंभीर विचार करू लागतील.

बेसावध राहू नये

सर्वकाही उत्तम चालले आहे असे वाटू लागले तर स्पर्धात्मक बाजारपेठेत त्यांचा व्यवसाय मागे पडेल.

मला यावरून एक इंग्रजी बोधवाक्य आठवले ते (देवनागरींत) असे :
इफ् यू थिंक् एव्हरीथिंग् इज् गोइंग् ऑन् वेल् यू ऍक्चुअली डोंट् नो व्हॉट् द हेल् इज् गोइंग् ऑन्
किंवा
इफ् समथिंग् कॅन् गो राँग इट् विल्

बोधवाक्ये

इंग्रजी बोधवाक्ये चपखल. दुसरे वाचले होते - सावरकरांच्या भाषेत ' प्रतिकूल तेच घडेल'. पहिले पहिल्यांदा वाचले.
आवडले - पटले तर आहेच!

हे व वि वा प्रॅ थिं म्ह की नि थिं

हे वरचे विचार, वाक्ये प्रॅग्मॅटिक थिंकिंग म्हणायचे की निगेटिव थिंकिंग?
नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा
असेच सगळे म्हणतात असे ऐकले होते बॉ आम्ही तरी.
आत अचानक पणे फक्त वाईट तेच घडणार असे म्हणायचे?

आपला
गुंडोपंत
(लेखक "सूक्ष्म लेखन" करत असतील तर प्रतिसाद पण 'सूक्ष्म' द्यायला काय हरकत आहे?)

पॉझिटीव्ह थिंकिंग

पॉझिटिव्ह थिंकिंगचा अर्थ माझ्या दृष्टीने 'अनुकूल तेच घडेल' असा नाही.
उलट 'प्रतिकूल तेच घडेल' असे गृहित धरून त्यावर मात करण्याची 'उमेद' सोडू नये हे खरे 'पॉझिटिव्ह थिंकिंग'.
वाईट परिस्थितीला चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करत राहण्याची आणि चांगल्या परिस्थितीला वाईट बनू न देता आणखी चांगले बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची मनोवृत्ती हे पॉझिटीव्ह थिंकिंग!

नाहीतर 'मी कोठेही नेम धरला तरी गोळी बरोब्बर निशाणावरच लागेल' असा काहीसा पॉझिटिव्ह थिंकिंगचा अर्थ व्हायचा. ;)

आमच्या भाषेत


सावरकरांच्या भाषेत ' प्रतिकूल तेच घडेल'. पहिले पहिल्यांदा वाचले.


प्रतिकूल तेच घडेल असे समजुन अनुकूलतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. [म्हणजे समजा प्रतिकूल घडले तर गृहित धरलेच होते. अन अनुकूल घडले तर चांगलेच आहे ना चला प्रयत्न वाया नाही गेले]
प्रकाश घाटपांडे

अचुक भाष्य

विसुनानांनी शेती हा व्यवसाय म्हणुन स्वीकारताना काय घेतले पाहिजे हे सांगितले आहे. आपण तो श्रावणातल्या कहाण्यांसारखा टिकवून ठेवण्याचा 'वसा' म्हणुन पाह्तो
प्रकाश घाटपांडे

नक्की द्या

आपले अनुभव वेगळे आहेत. ते नक्कीच शेअर करा,
वाट पाहतो आहोत,

उत्साहात सुरू झालेले अनेक प्रयोग अनन्त अडचणीमुळे फसलेले मी पाहिले आहेत.
असे होते खरे. मी पण पाहिले आहेत असे प्रयोग.
वाईट वाटते.
आपला
गुंडोपंत

धन्यवाद

धन्यवाद

शंका

आपला पहिला मुद्दा आहे तो जरा विस्ताराने सांगाल का?
विशेष आर्थिक क्षेत्रामुळे जमीन कशी काय कमी होते बॉ? जमीन पाण्याचा स्तर वाढून जमीन कमी होते हे एक वेळ पटते. पण विशेष आर्थिक क्षेत्रामुळे जमीन कशी काय कमी होते?





शेतीयोग्य जमीन

बहुधा त्यांना शेतीयोग्य जमीन असे म्हणायचे असावे, असे वाटते.

तसे असेल तर ठिक आहे

तसे असेल तर ठिक आहे. नाहितर वेगळाच अर्थ निघतो आहे.





लागवडीखालची जमीन्

लागवडीखालची जमीन मोठ्या प्रमाणावर सेझसाठी घेतल्यामुळे तिथे अन्नधान्याची लागवड नाही. इमारती उभ्या राहिल्या आहेत. तिथे पुर्वी होणारे अन्नधान्याचे उत्पादन आता होत नाही.
क्रुपया सेझसन्दर्भात अभ्यास करा.

 
^ वर