मराठी विकि वर 'माहिती' च नाही?

मराठी विकि वर 'माहिती' च नाही?

उपक्रम या स्थळाची सुरुवात माहितीपूर्ण लेखन या उद्देशा साठी झाली आहे. या मुळे येथे हा विषय चर्चेला घेत आहे.

मराठी विकिवर मी नुकतेच सदस्यत्व घेतले. फेर-फटका मारतांना व कार्य पद्धती समजावून घेतांना अचानक पणे असे लक्षात आले की मराठी विकिपीडिया वर 'माहिती' हे पानच नाही. म्हणजे आहे पण त्यात काहीच नाही!
(त्यामुळे ते लाल रंगात आहे.) जरा धक्काच बसला. मग विचार केला की त्यात काय चला आपणच लिहु. पण लिहायला घेतल्यावर सुचेचना काही.
कारण "माहिती कशाला म्हणायचे" याची संकल्पना डोक्यात काही येईना. नेहमी प्रमाणे 'ज्ञान आणि माहिती वेगळे' वगैरे डोक्यात येवून गेले.
लगेच इंग्रजी विकिही चाळणार होतो आणि अनुवाद करणार होतो. पण मग विचार केला की मराठीतील माहिती साठी सुद्धा मला तिकडेच जावे लागावे?
मी तो विचार सोडून दिला, अगदी तेथे काय आहे ते ही वाचले नाही. कारण तसे काही वाचले की आपले विचार आपले न राहता त्यावर लिखाणाचा ठसा उमटतोच असे वाटले. स्वतःचाच काही आराखडा बनवला पहिजे असे ठरवले.

मग पुढे जावून असे वाटले की "हा तर उपक्रमींच्या हातचा मळ!"
सर्व उपक्रमींनी सांगितले की माहिती म्हणजे काय व का , की सहजतेने हा लेख इथेच संकलित होईल. सर्व प्रतिक्रियांचे माहिती या लेखात रुपांतरण करता येईल.

काय वाटते आपल्याला या 'माहिती' च्या उपक्रमा विषयी?
तुमचे विचार सांगा
माहिती म्हणजे काय व का?

आपला
गुंडोपंत

लेखनविषय: दुवे:

Comments

दुवा

विकिचा त्या माहिती या पानाचा दुवा वर द्यायला
नेहमीच्या धांदरटपणामुळे विसरलो.

माझ्या आठवणी प्रमाणे, मला हा दुवा समाज पृष्ठ पाहतांना सापडला होता.
आपला
गुंडोपंत

माहिती

'माहिती' याचा अर्थ कोणत्याही स्वरुपातील कोणतेही साहित्य असा असून त्यामधे, अभिलेख, दस्तऐवज, ज्ञापने,ई-मेल, अभिप्राय,सूचना,प्रसिद्धीपत्रके,परिपत्रके, आदेश,रोजवह्या,संविदा,अहवाल, कागदपत्रे,नमुने,प्रतिमाने, (मॉडेल) कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील आधार सामग्री......

पाहा : माहितीचा अधिकार अधिनियम,२००५ : अण्णा हजारे यांच्या पुस्तकातील प्रकरण प्रारंभिक मधील (च)'माहिती' याचा अर्थ पृ. क्र. ३

अवांतर : प्रा.डॉ.ला संविदाचा अर्थ कळलेला नाही.

नेमकी

सर,
खरंच नेमकी 'माहिती' दिलीत.

मी विकिवर टाकायचा प्रयत्न करतो...
आपला
गुंडोपंत

ही घ्या माहिती

घ्या माझ्या परिने मी माहिती भरली. बिरूट्यांनी दिलेला प्रतिसादही चिकटवता येईल.

असो, आता तुमच्या माहितीकरता ;-)

आजपासून विकिवर माहिती हा दुवा-शब्द लाल रंगात न दिसता निळ्या रंगात दिसेल

सर्व उपक्रमींनी सांगितले की माहिती म्हणजे काय व का , की सहजतेने हा लेख इथेच संकलित होईल. सर्व प्रतिक्रियांचे माहिती या लेखात रुपांतरण करता येईल.

तुमच्या आयडीया लई झक्कास असतात गुंडोपंत, जाहिरात क्षेत्रात "नव्याने" "शिरा"!

क्या बात है!

घ्या माझ्या परिने मी माहिती भरली. बिरूट्यांनी दिलेला प्रतिसादही चिकटवता येईल.

क्या बात है... मदत मागावी आणि देणार्‍याने ती अशी धाडकन काम पुर्ण करूनच द्यावी! झकासच काम करता बरं का!

सरांची माहिती पण टाकतोच.

तुमच्या आयडीया लई झक्कास असतात गुंडोपंत, जाहिरात क्षेत्रात "नव्याने" "शिरा"!

अरे वा! खुप दिवसांनी माझे कुणी 'आयडीयासाठी' कौतुक केले हो!
मस्त वाटले. मनापासून सांगतो खुप बरं वाटलं.

जाहिरात क्षेत्र सोडल्यानंतर असे कौतुक कुणी केलेच नाही हो!

अशी दाद पण अजून सुचण्यासाठी खुप काही करून जाते, इतकेच म्हणेन!
शेवटी आपल्यासारखी सामान्य माणंसं, बाकी काही नाही, फक्त चार कौतुकांच्याच शब्दांची भुकेली असतात... नाही का?

आपला
आनंदीत
गुंडोपंत

 
^ वर