उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
वात्रटिका:एक स्वतंत्र् साहित्य प्रकार ?
सूर्यकांत डोळसे
May 19, 2008 - 2:03 pm
मी 'वात्रटिका:एक स्वतंत्र् साहित्य प्रकार 'या विषयावर् पीएच्.डी.करण्याचा संकल्प् केलेला आहे.जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती.या विषयावर अगोदर कुणी पीएच्.डी. केली आहे काय?-सूर्यकांत डोळसे
दुवे:
Comments
शुभेच्छा !!!
सूर्यकांतराव,
आपण पीएच.डी साठी 'वात्रटिका: एक स्वतंत्र साहित्य' प्रकार या विषयावर काही संशोधन करु इच्छिता त्यासाठी आपणास शुभेच्छा !!! मराठीत वात्रटिका लिहिणारे कवी मोजकेच असावेत रामदास फुटाणे आणि फ. मु. शिंदे ही दोनच नावे आम्हाला माहित आहे.
मात्र 'वात्रटिका' हा संशोधनासाठी स्वतंत्र साहित्य प्रकार कसा होऊ शकतो ? कवीतेतल्या प्रकारातला तो एक प्रकार. असो, आपण आपल्या मार्गदर्शकाशी या विषयी चर्चा केली नसेल तर चर्चा करा आणि मगच विषय निवडावा असे वाटते.
या विषयावर पुर्वी कोणी संशोधन केले आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर माहित नाही, असेच द्यावे लागेल. आपण ज्या विद्यापीठात संशोधन करत असाल तिथे आतापर्यंत संशोधन झालेल्या विषयाची यादी पाहावयास मिळते, अशी सोय प्रत्येक विद्यापीठात असते.
किंवा विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली इथे त्याची संपूर्ण यादी मिळण्यास अडचण येणार नाही असे वाटते.
आपण डॉ. सदा क-हाडे यांचे संशोधन सिद्धांत आणि पद्धती हे पुस्तक जरूर वाचावे म्हणजे आपल्या संशोधन कार्यास योग्य दिशा मिळेल असे वाटते.
शुभेच्छा!
माझ्या ही शुभेच्छा!
धनंजय ने लिहील्याप्रमाणे गमतीजमती सांगत रहा.
बाकी वर बिरूटे सरांनी सांगितलेल्यांमधे अजून एक नाव म्हणजे - मंगेश पाडगावकर.
वात्रटिका आणि विडंबन यात आपण फरक धरता का?
वात्रटिका / विडंबन
वात्रटिका आणि विडंबन यात आपण फरक धरता का?
वात्रटिका आणि विडंबन या काव्यप्रकारात फरक धरतात. वात्रटिका सामाजिक वास्तवाचा उपहास करणारी आहे. विदूषकाची वस्त्रे नेसून कवीतेला एक नवेच वळन वात्रटिकेने दिले. आपण दिलेल्या आठवणीने 'मंगेश पाडगावकरांच्या' वात्रटिकेनेही एक काळ गाजवला आहे. वात्रटिका, व्रात्यपणे दंभाचे पोट गुदगुल्या करुन फोडते. कुंपणावर बसलेल्यांचा बुरखा फाडते. माणसाला नसलेल्या शेपटीचा शोधे घेते. कधी उपहासातून, कधी उपरोधातून, कधी रोखठोक असा वात्रटिकेचा स्वभाव, तर विडंबन म्हणजे 'जीवो जीवस्य जीवनम' प्रमाणे मुळ कवितेवर आघात आणि विनोदाकडे झुकणारी असा फरक करता येईल असे वाटते. (ढोबळमानाने)
दै.लोकमत आणि सकाळ ,इतरही काही दैनिकांमधुन नवकवींच्या ब-याच वात्रटिका वाचायला मिळतात त्यात 'संजय वरकड' यांचेही नाव घेतले पाहिजे. सूर्यकांत राव अशा अनेक वात्रटिकाकारांचा शोध घेतील आणि त्याच्या काही गमती-जमती आपणासही सांगतीलच !!!
धन्यवाद!
वात्रटीका/विडंबन यातील फरक आणि माहीती बद्दल धन्यवाद!
बाकी पाडगावकरांच्य काही वात्रटिका ह्या आपण म्हणत असलेल्या व्याख्येत (वात्रटिका, व्रात्यपणे दंभाचे पोट गुदगुल्या करुन फोडते. कुंपणावर बसलेल्यांचा बुरखा फाडते...) बसणर्या वाटत नाहीत - त्या जास्त "चावटीका" वाटतात :-)
शुभेच्छा
तुमचा अभ्यास वाढेल तसे आम्हाला विश्वासात घेऊन गमतीजमती सांगत राहा.
वर बिरुटे सरांना पडलेला प्रश्न अनेकांना पडू शकेल. त्याचा दोन अंगांनी विचार करावा
१. प्रबंधाचे नाव "वात्रटिका - एक स्वतंत्र काव्यप्रकार" असे ठेवावे
२. येथे जर "वात्रट"पणाचा अभ्यास करणार असाल - गद्य आणि पद्य वात्रटपणा दोन्ही समाविष्ट असेल, तर "वात्रटिका आणि विनोद : एक स्वतंत्र रसास्वाद" असे काही नावही ठेवता येईल
वात्रटिका:एक स्वतंत्र् साहित्य प्रकार ?
वात्रटिका साहित्य प्रकार नाही तर् काय आहे?तो जर कवितेचा प्रकार नसेल तर् त्याला काय म्हणायचे?
शुभेच्छा
एका चांगल्या कामास आमच्याही शुभेच्छा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी दै.पुण्यनगरी मिळवुन वाचला तर त्यांच्या माहीतीत भर पडेल.
काही प्रश्न
आपला पी एच डी करण्याचा संकल्प अतिशय स्तुत्य आहे.
तरीही काही प्रश्न माझ्या मनात आले आहेत.
मी काही फार शिकलेला माणूस नाही,
त्यामुळे वावगे वाटून घेऊ नये ही नम्र विनंती.
१. आपल्या या संशोधनाने नक्की काय साध्य होईल असे आपणास वाटते?
२. या संशोधनाचा व्यवहारात काय उपयोग होईल हे सांगु शकाल का?
३. समजा आपण या संशोधनासाठी अनुदान मागत आहात, तर ते आपणासच मिळावे म्हणून आपण काय मुद्दे उपस्थित कराल? व का?
४. या संशोधनातून जे काही निष्पन्न होईल त्यातून आपल्या पुढील संशोधनाची दिशा काय असणार आहे?
आपला
अज्ञ आणि जरासा बुचकळ्यात पडलेला
गुंडोपंत