भाषा व प्रांत यांवरून भांडत राहिलो, तर............

आपल्याला आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असणे, ही नैसर्गिक गोष्ट आहे; पण ते व्यक्‍त करतांना अन्य भाषिकांचा द्वेष अभिप्रेत नाही. आज आपण मराठी, हिंदी, बिहारी वगैरे शब्द ऐकतो. अन्य भाषांबाबत नकारात्मक द्वेषमूलक भावना निर्माण केली, तर ती उद्या सर्वांनाच घातक ठरेल. आजचा वाद मिटला आणि द्वेषाची मानसिकता तशीच राहिली, तर उद्या कोकणी-मराठी, वऱ्हाडी-मराठी, असेही भेद उफाळून येतील आणि एकदा का नकारात्मक विद्वेषी भावना निर्माण झाली, तर ती सर्वांनाच घातक ठरेल. `भारत हे एक राष्ट्र आहे', ही जाणीव भाषेच्या संदर्भाने विसरलो, तर आपला शत्रू समोर उभा आहेच. आपापसांतील चुरस आणि वैर यांमुळे रक्‍तरंजित अन्यायाची परिसीमा गाठणारा इतिहास विसरून आपापसांत डोकी फोडू लागलो, लाठ्या, तलवारी व बंदुका यांची भाषा वापरू लागलो, तर त्यांतून निर्माण होणारा भावनिक उद्रेक क्षणभर बरा वाटणारा असला, तरीही अंतिमत: तो महाघातक ठरेल. भाषा व प्रांत प्रेमींना आम्ही सामान्य नागरिक हात जोडून विनंती करतो, `द्वेषभावना पेटवून समाजाचा व सामान्य दीनदुबळयांचा घात करू नका. सकारात्मक सेवाभाव ठेवून समाज व अज्ञानी गोरगरीब यांना मार्गदर्शन करणार्‍यांच्या मागे भोळेभाबडे; नेहमी उभे रहातील. त्यामुळे तात्कालिक फायद्याचा विचार न करता जरा भविष्याचा विचार करावा तुम्हाला काय वाटते ?

लेखनविषय: दुवे:

Comments

मोठा देश असल्याचा फायदा

भारत मोठा देश आहे. त्याची साधनसंपत्ती राज्याराज्यात विखुरली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न वेगवेगळ्या राज्यांत होते. आपले प्रांत हे छोटे छोटे देश असते तर कच्चा माल, पक्का माल, सेवा-सेवक, मजूर आपल्याला दुसर्‍या देशांतून आयात करावे लागले असते. ती देवाणघेवाण देशातल्यादेशात आपण करू शकतो हा मोठा फायदा.

प्रत्येक प्रांतातील समृद्ध भाषा टिकवायची, आणखी समृद्ध करायची, त्याच वेळेला जोड-भाषा, व्यापारी भाषा विकसित करायच्या हे कळीचे आहे. प्रांताचा, देशाचा (म्हणजे आपलाच) आर्थिक-संस्कृतिक फायदा दोन्ही समसमान करून घ्यावा.

आपल्या आर्थिक पायांवर आपल्या सांस्कृतिक-भाषिक अस्मितेची कुर्‍हाड होऊ देऊ नये. आपल्या आर्थिक फायद्यापाठीमागे धावताना मातृभाषा वापरण्यात हेळसांड करू नये. आपण वापरली नाही, तर ती कोण वापरणार आहे? आणि आपण मातृभाषा वापरली, तर तिचा लय कदापि होणार नाही.

विविधता आणि अस्मिता

समानता,समता,समरुपता,एकता,एकरुपता,विषमता,विविधता,बहुरुपता, या शब्दांचा शब्दोच्छल करुन आपण आपले विचार मांडत असतो.भांडत असतो. प्रत्येक जण माझे विचार कसे समतोल आहेत, विवेकी आहेत हे अभिनिवेशाने [परंतु तसा अभिनिवेश नसल्याचा आव आणून]सांगतो.जेव्हा आपले विचार दुस-यांना पटत नाहीत त्यावेळी तो समोरच्या माणसाच्या 'आकलनाच्या मर्यादा' बुद्धीचा तोकडेपणा' 'बौद्धिक दिवाळखोरी' इ. विशेषणे लावून, समजून घेण्यासाठी सुद्धा बौद्धिक पात्रता लागते असे म्हणून आपला अहंकार कुरवाळत बसतो. ते स्वाभाविक देखील आहे. जेव्हा एखादी गोष्ट दुस-यासमान नसते त्यावेळी ती सम नाही म्हणजेच विषम आहे हे वास्तव आहे. पण विषमतेला अन्याय, शोषण अशा अर्थाच्या छटा चिकटल्या असल्याने पुरोगामी लोकांना तो शब्द खटकतो.त्याच स्पष्टीकरण देणं अवघड जातं. मग अशी विषमता पचवायला अवघड गेली कि त्याला विविधता म्हणून मोकळ व्हायचं." विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे" असे आपण प्रतिज्ञेत म्हणतो ते यासाठीच.(हॉ हॉ....) भाषिक, प्रांतिक, सांस्कृतिक, भौगोलिक वगैरे विविधतेने नटलेल्या परंपरा असा अभिप्रेत अर्थ असतो.
आता या विविधतेतून आपले स्थान पक्के करण्यासाठी अस्मिता आलीच. आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्न हा स्वाभाविक आहे. सगळ्यांचाच पहिला नंबर, सगळेच हुशार , सगळेच कार्यक्षम, सगळेच श्रेष्ठ , ही गोष्ट व्यवहारात शक्य नाही. खरं तर निसर्गाला देखील ते अभिप्रेत नाही. (म्हणजे निसर्ग या आपल्या आकलनाला) आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी इतरांना कनिष्ठ लेखणे हा मार्ग सोपा असतो. तोच अवलंबला जातो. यातुनच विद्रोह व त्याचे समर्थक तयार होतात.
प्रकाश घाटपांडे

क्या बात है !!!

घाटपांडे साहेब,
प्रतिसाद लै भारी !!!

तरीही 'विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे"

अवांतर :- म्यानमारमधील नैसर्गिक संकटाने प्रा. डॉ जरा अस्वस्थच आहेत.

प्रतिसाद आवडला.

नेमक्या शब्दांत मार्मिक प्रतिसाद दिला आहात. या विषयावर आपले सविस्तर लेखन वाचायला आवडेल.
जयेश

सविस्तर लेखन :(

जयेश,
भाषावार प्रांत रचना आणि त्याचे भयंकर मतभेद पुर्वीही होते आणि आजही 'राज' यांच्या भाषणावरुन,भाषणातील संदर्भावरुन आपणास दिसुन येतील आणि नुकताच परुळेकर यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या होय, हा महाराष्ट्र धर्म आहे या लेखावरुन त्याची कल्पना येईलच. ( तो लेख आपण वाचलाही असेल.)

सदरील विषयावरील विवेचन करता येईल इतका अभ्यास आमचा तरी नाही. पण विविधतेने नटलेल्या,विविध परंपरा असलेल्या भारतीय नागरिकांचे भाषेवरुन नाही झाले तरी वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपराच्या विषमतेमुळे म्हणा वाद हे अपरिहार्य आहेत असे वाटते किंवा राजकारणासाठी/सत्तेसाठी कोणतीतरी विषमता आवश्यक असते किंवा तसे प्रयत्न चाललेले असतात. मात्र आपण भारतीय म्हणुन जेव्हा एखाद्या सार्वजनिक संकटाला सामोरे जातो किंवा जेव्हा भारतीय म्हणुन एकत्र येण्याची गरज असते आणि एकत्र येतोही तेव्हा त्या भारतियांच्या एकात्मतेला कोणतीही विषमता भारतीय माणसाला अलग करत नाही हे तितकेच सत्य आहे.

म्हणुन घाटपांडे साहेब म्हणतात 'निसर्गता: विषमता आहे, किंवा विविधतेत आपले स्थान पक्के करत असतांना अस्मिता आड येते. त्यामुळे समता शक्य नाही असे असले तरी आपण 'विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे, असे म्हटले की मग कोणतेच प्रश्न उरत नाही.

मी का भडकु नये?

मी..
अतिसामान्य घरातला मराठी मुलगा.
१.माझ्या समोर रेल्वेतील कैक पदांच्या नोकर्‍या गेल्या.
(ज्याला मी पात्र होतो, पण मला रेल्वे भरती बद्दल,त्या परिक्शा आणि त्याच्या तारखे बद्दल जाणीव् पुर्वक् अज्ञानी ठेवण्यात आले.)
(हे जाहीर रित्या सिद्ध झाले आहे दोनेक् वर्षांपुर्वी)
२.माझी पालिकेतीलही नोकरी आता जाउ लागली आहे.
३.मी घर् शोधायला गेल्यावर (भाड्याने घ्याय्ला किंवा खरेदीसाठी):-
"मराठी माणसाला द्यायचे नाही असा नियम् आहे." हे फार् मोठ्या प्रमाणात् ऐकावं लागतयं.
४.मी एक् मराठी कोळी आहे, माझ्या बाजुला "त्यांची" वस्ती बनली, मी काय् बोललो नाय्.
पण, परवा चक्क त्यांनी "हा फक्त् आमचा एरिया आहे" असं म्हणुन दम् भरला.(माझ्याच् एरियात,जिथे मी गेली वीसेक् वर्ष राहतोय.)
तरीही, पोटाची खळगी भरण्यासाठी हिम्मत करुन त्यांच्याहुन् मोठ्या आवाजात् मी माझी मच्छी विकु लागलो, तर् ह्यांनी मला
(संघटीतपणे) धरुन चोप दिला. दम भरला आणि हाकलुन लावलं.

अशा प्रकारे आमच्या पोटावर् पाय् आला.
आम्ही उपाशी माणसांनी पण मग ग्रुप करुन कामं करायला सुरुवात् केली.
ह्यांनी अडवल्यावर्, केवळ नाइलाज म्हणुन त्यांच्या भाषेत उत्तर दिलं.
म्हणुन आम्ही खल् नायक्?
मायावती-मुलायम तुमचे हीरो?

सलाम्!
गरीब मराठी माणसाचा संसार उध्वस्त् करुन राष्ट्रिय एकतेचे डोस पाजणार्‍या
समस्त सुख वस्तु मराठी मराठी माणसाला सलाम्!

(वेळेअभावी फारच थोड्या पण महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केलाय.)
उत्तरं मिळतील ह्या आशेत् असलेले,

गरीब, मराठी जन सामान्यांचे मन

भडकु नको रे बाबा!

अरे मित्रा असं भडकू नकोस. विजय मीत हे नेहमी प्रमाणे एखादी चर्चा सुरवात करतात व इतरांना कामाला लावतात. चर्चा सुरू करून ते नंतर गायब होतात.

धक्कादायक

"मराठी माणसाला द्यायचे नाही असा नियम् आहे." हे फार् मोठ्या प्रमाणात् ऐकावं लागतयं.

हे धक्कादायक आहे. विस्ताराने तपशील कळेल का? (इथे वाद वाढवणे अनावश्यक वाटले तर खरडीतून तपशील जाणून घ्यायला आवडेल)

बाकी, सतीशरावांची सहमत.. जास्त चिडू नका .. त्याने फक्त रक्तदाब वाढेल ;)

-ऋषिकेश

 
^ वर