ज्योतिष्यांनो >>

ज्योतीष्या बद्दल अनेक चर्चा अनेक ठीकाणी असतात. उपक्रम वर् सुधा आहेत.
या चर्चेचा विषय निवडताना सुची मधे 'थेतांड/ अंधश्रद्धा " असा पर्याय न् दिस्ल्याने मी" विरंगुळा " निवडले आहे.

ज्योतीश्यांनो, तुमच्या पारंपारीक थोतांडात "नवग्रहां" मधे प्रुथ्वी कुठेच दिसत नाही असे का ? जर लाखो कि.मी. अंतरा वरचे अस्तित्वातच नसलेले राहु व केतू तुमच्या जगण्या . असण्या . हसण्या.. मरण्या वर प्रभाव दा़खवू शकतात , तर , ज्या प्रुथ्वी वर तुम्ही उभे आहात तिचा उल्ले़ख सुद्धा पत्रीकेत का नसावा ?

चंद्र आणि सुर्य हे ग्रह आहेत असा अनादि अस्लेला पुर्वग्रह् तुम्ही आता तरी दुरूस्त का करीत नाही ? भुलथापा मरताना तरी काळाचे भान ठेवा !
पोटापाण्या साठी या जगात इतर अनेक उद्योग आहेत, पण शरीरविक्रीय व् ज्योतीषी या पैकी जास्त जुना कोणता असावा ते विचारवंतांनी ठरवल्यास बरे !

लेखनविषय: दुवे:

Comments

बराचसा सहमत.

आणखी एका चर्चेत दिलेला बराचसा प्रतिसाद (जो इथे लागु होइलसे वाटते) तो देत आहे.

ज्योतिष शास्त्रातील दोन भाग ज्योतिष गणित आणि फल् ज्योतिष, यापैकी आपण नक्की कुठ्ल्या भागा बद्दल बोलत् आहात ते कळलं
तर् बरं होइल.ज्योतिष गणित (ज्यात कालमान,तिथी शोधन् कार्य वगैरे,ज्यामध्ये अवकाशस्थ गोलांच्या गतीचे मापन अचुक् केलेले असते
(ज्यात फारसा "भविष्य" शोधनाचा प्रयत्न नसतो.)) हे उपयुक्त शास्त्र आहे,वादच नाही.

पण "फल् ज्योतिष" (भविष्य वेध किंवा तोडगे-उपाय)हे "...गणित व पदार्थ विज्ञान आहे." हे कोण कसं म्हणु शकतं?
वि़ज्ञानाच्या कुठल्या नियमांनी ते सिद्ध झाले आहे?
(विज्ञान त्रिसुत्री:- प्रयोग, निरिक्षण,निष्कर्ष)

ज्योतिषाबद्दल बाळबोध शंका:-
१. हल्ली मानव परग्रहावर् जात आहे.काही काळात तिथे पिकनिक स्पॉट ही बनतील.
ह्या काळात जर् तिथे एखाद्या बालकाचा जन्म झाला समजा मंगळावर्(नाय् तर चंद्रावर), तर् कुंडलीत काय
पृथ्वी मांडणार आहोत का? (अवकाशात, स्पेस शटल मध्ये जन्म झालेल्या बालकांचे काय?)
२. बालकाचा जन्म होताना, चंद्र ज्या राशीत असेल ती म्हणे त्याची चांद्र रास.
अहो पण जर जन्मच चंद्रावर झाला , तर काय काय बघणार आहात तुम्ही?
३.माणुस उपग्रह सोडुन् र्‍हायलाय् अवकाशात.
त्यांना पण् स्थान् मिळणार का कुंडलीत?

आपलेच,
अति सामान्यांचे मन.
(साठ्यांचे नाठाळ कार्टे)

शब्दार्थाचा थोडा घोटाळा

एखाद्या शब्दाचा अर्थ बदलतो, तेव्हा काळजीपूर्वक संदर्भ बघून अर्थ लावणे हेच बरे.

"ग्रह" शब्दाचा अर्थ आकाशात तार्‍यांच्या संदर्भात हलणारी वस्तू. पुढे हाच शब्द इंग्रजीतल्या "प्लॅनेट" शब्दाला प्रतिशब्द म्हणून पुढे केला गेला. योग्य संदर्भ लावला नाही तर तुम्ही म्हणता तसे अभाविक विनोद होतात.

ज्योतीश्यांनो, तुमच्या पारंपारीक ... "नवग्रहां" मधे प्रुथ्वी कुठेच दिसत नाही असे का ?
पृथ्वी ही आकाशातल्या तार्‍यांच्या संदर्भात हलणारी वस्तू नाही, त्यामुळे ती ग्रह नाही.

जर लाखो कि.मी. अंतरा वरचे अस्तित्वातच नसलेले राहु व केतू
राहू आणि केतू हे गणितज्योतिषाचे अत्यंत स्तुत्य शोध आहेत. "ते अस्तित्वात नाहीत" म्हणजे काय ते तुमचे म्हणणे समजले नाही. राहू-केतूंशी युती झाली (आणि त्याचे नेमके गणित मांडता येते) तेव्हा सूर्यचंद्रांची ग्रहणे होतात.

तुमच्या जगण्या . असण्या . हसण्या.. मरण्या वर प्रभाव दा़खवू शकतात , तर ,
हा फलज्योतिष्याचा भाग आहे. या बाबतीत तुमचा प्रश्न ठीक आहे.

ज्या प्रुथ्वी वर तुम्ही उभे आहात तिचा उल्ले़ख सुद्धा पत्रीकेत का नसावा ?
पुन्हा शब्दांची थोडी गडबड. पत्रिका ही आकाशाचा "स्नॅपशॉट" नकाशा असते. आकाशाच्या कुठल्याच नकाशात पृथ्वी दिसत नाही. त्यामुळे गणितज्योतिष्याचा हा दोष नाही. फलज्योतिष्याच्या बाबतीत तुमचा प्रश्न ठीक आहे.

चंद्र आणि सुर्य हे ग्रह आहेत असा अनादि अस्लेला पुर्वग्रह् तुम्ही आता तरी दुरूस्त का करीत नाही ?
शब्दाचा अर्थ बदलला तर जुना अर्थ वेगळ्या संदर्भात कार्यरत राहातो. सूर्य आणि चंद्र तार्‍यांच्या संदर्भाने आकाशात हलणारे असतात. ते आजही या अर्थाने ग्रहच आहेत. इथे दुरुस्तीची काही गरज नाही. फक्त "ग्रह"चा अर्थ संदर्भासह घ्यावा इतकी काळजी सर्वांनी घेतली पाहिजे.

भुलथापा मरताना तरी काळाचे भान ठेवा !
:-) हा एक चांगला व्यावहारिक सल्ला आहे. (पण वरच्या वाक्याच्या संदर्भात प्रस्तुत नाही.)

पोटापाण्या साठी या जगात इतर अनेक उद्योग आहेत, पण शरीरविक्रीय व् ज्योतीषी या पैकी जास्त जुना कोणता असावा ते विचारवंतांनी ठरवल्यास बरे !
पूर्वीच्या काळी गणितज्योतिष्यांना उदरभरणासाठी फलज्योतिष्य सांगावे लागत असे. त्यांच्या पैकी काही जणांनी याबाबत (खाजगी पत्रांमध्ये) कुरकुर केल्याचे कुठेतरी वाचले आहे.

जातकांनो>>>

जातकांनो / वाचकांनो अधिक काय बरे बोलणार ? ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...... प्रश्नोत्तरातून सुसंवाद च्या निमित्ताने http://mr.upakram.org/node/1065 येथे बोलून झाले आहेच. आणी आत्ता धनंजयाने मांडले आहेच.
मी पृथ्वी दाखवतो ना कुंडलीत ! चौकटीतील मध्यबिंदू ही पृथ्वी आहे. ज्या कॅमेरातून फोटो काढला तो कॅमेरा फोटोत कुठे आहे ? असे विचारण्यासारखे आहे. ज्योतिषातील सिद्धांत , संहिता आणी होरा या त्रिस्कंधात्मक भागातील होरा किंवा फलज्योतिष हा भाग विवादास्पद आहे.
प्रकाश घाटपांडे

अरे!

अरे बापरे!!
इथे परमाणू स्फोट झालेला दिसतो. ;)
चला २५ शब्दांच्या पुढे जाणे झाले आहे,
हे ही नसे थोडके! ;)))

आपला
गुंडोपंत

फलज्योतिषाचा शास्त्रीय आधार तपासणार” – डॉ. नारळीकरांचा पुढाकार.

“ सर्व प्रकारच्या ज्योतिषांना प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन!
या शीर्षकाने दि 12 मे 2008 ला डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अंनिस व पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्र विभाग, आंतरविद्यापीठ खगोल शास्त्र व खगोल भौतिकी केंद्र (आयुका) यांनी नवी चाचणी विकसित केली असून त्या मधून संख्या शास्त्रीय पद्धतीने फलज्योतिषाच्या यशाची शक्यता तपासण्यात येणार आहे. कोणताही पूर्व ग्रह न बाळगता येण्याऱ्या उत्तराचे आम्ही संख्याशास्त्राच्या आधारावर विश्लेषण करणार आहोत. ज्योतिषींकडून आलेल्या 40 उत्तरांच्या अचुकतेचे प्रमाण 90 टक्कयापेक्षा अधिक असेल तर फल ज्योतिषाला शास्त्र म्हणून जाहीर करण्यात येईल. 70 टक्क्या पर्यंत उत्तरे अचुक आली तर आणखी अभ्यास करण्यात येईल.
डॉ. नारळीकर म्हणाले फलज्योतिषाला शास्त्रीय आधार नाही असे जरी विज्ञानवाद्यांचे मत असले तरी ते शास्त्रीय दृष्टया सिद्ध होणे आवश्यक आहे. या संबंध परदेशात अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आपल्या देशातील फलज्योतिषाचा प्रसार आणि सर्व सामान्यांच्या आयुष्यातील त्याचे स्थान पाहता भारतासाठी अशा पद्धतीची चाचणी असावी असा विचार माझ्या मनात अनेक वर्षे होता. पुणे विद्यापीठाचा संख्याशास्त्र विभाग, आयुका, अंनिसच्या माध्यमातून कोणताही पूर्वग्रह न ठेवता ही चाचणी तयार करण्यात आली असून सर्व प्रकारचे फलज्योतिषी अणि संस्थांना या चाचणीमधे सहभागी होण्याचे आवाहन मी करतो. या चाचणी मधून प्रत्येक ज्योतिषाला किंवा संस्थेला 40 मुलांच्या पत्रिका अथवा पत्रिका तयार करण्यासाठी आवश्यक माहिती पुरवण्यात येईल चाचणी देणाऱ्यांनी फक्त त्यापैकी कोणत्या पत्रिका हुषारांच्या आणि कोणत्या पत्रिका मतिमंद मुलांच्या आहेत हे ओळखून दाखवावे. (सकाळ दि १३ मे २००८)

या वार्तेवर माझे विचार फलज्योतिष शास्त्रींच्या विचारार्थ मांडत आहे.
1. ही परिक्षा का? - सध्या दोन्ही (महाराष्ट्र व अखिल भारतीय) अंनिसंकडे प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणताही हातखंडा प्रयोग नाही. डॉ. जयंत नारळीकरांना हाताशी धरून लाखो रुपयांची बक्षिसाची बोली न करता फुकटात ज्योतिषशास्त्राला बदनाम करण्याची संधी मिळवण्याकरिता, पुणे विद्यापीठाला व आयुकासारख्या संस्थांना त्यात गोवून लेखी बदनाम करण्याची ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.
2. परराष्ट्रातील ज्योतिषांना तेथील विज्ञानवाद्यांनी जर चीतपट करून त्यांचे ज्योतिषशास्त्र शास्त्र नाही असे म्हणावयाला भाग पाडले असेल तर भारतीय ज्योतिषांना त्यांच्या (वैदिक) ज्योतिष शास्त्राला मुद्दाम वेगळे चीत करण्याची गरज काय? मात्र अंनिसचे प्रथमपासून तसे धोरण असल्यांने त्यांची चाल आपण समजू शकतो. पण या तऱ्हेचा ‘छळ’ डॉ. नारळीकरांना करण्याचे काही विशेष कारण असावे. अंधश्रद्धा निर्मूलन उर्फ जादूटोणा अघोरी विद्या प्रथा निर्मूलन कायदा सध्या मेलेलाही नाही पण जीवंतही नाही असा कोमात गेलेल्या अवस्थेत असल्याने त्याला प्राणवायू देण्यासाठी ही मोहीम हाती घेणे अंनिसच्या जीवन-मरणा इतके हातघाईवर आलेले प्रकरण आहे.
3. ही परिक्षा घेण्याचा यांना अधिकारच काय?
ही परीक्षा ज्या संस्थेतर्फे, ज्या प्रख्यात व्यक्तींच्या देखरेखीखाली केले जाणार आहे, त्यांनी ‘ज्योतिष’ हे शास्त्र तर नव्हेच मात्र ‘थोतांड’ आहे असे सिद्ध केल्याचे दावा मांडणारी पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. अशांनी ही ज्योतिषांची परिक्षा पुर्वग्रह न ठेवता करणार असल्याचे सांगणे म्हणजे मनी मावशीने उंदराला मी सध्या ‘उपवास’ करत आहे म्हणून तुला मुळीच खाणार नाही असे आश्वासन देण्यासारखे आहे.
4. ज्या पुणे विद्यापीठाने ज्योतिषशास्त्राला शैक्षणिक दर्जा देण्यास ठाम नकार दिला आहे, त्या विद्यापीठातील संख्याशास्त्र विभाग या परिक्षेचा निकाल ठरवणार (की लावणार?) असल्याने ही परिक्षा खरोखरच निःपक्षपाती असणार कि नाही याची सर्वसामान्यांना कल्पना आहे. मात्र ही चाल उलट पडून ज्या सामान्य लोकांचे मत परिवर्तन करण्यासाठी हा खटाटोप केला जात आहे, ते सामान्य लोक ज्योतिष शास्त्राच्या आणखी जवळ करण्याची शक्यता आहे. भले ज्योतिष शास्त्र असो वा नसो ज्या ज्योतिषांच्यामुळे आम्हाला मानसिक व भावनिक आधार मिळतो त्यांना नष्ट करणाऱ्या संस्था व प्रसिद्ध व्यक्तीं बाबतचा आदर कमी होऊन त्यांच्या अन्य क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल आमच्या मनात एक प्रकारची अढी बसवण्याची कामगिरी या परीक्षेमुळे नक्की होणार आहे.
५) पुर्वी गावागावातून वादविवाद करून विजयपत्रे मिळवून हत्तीवरून फिरून दरारा व प्रसिद्धी मिळवली जायची त्याचीच ही आधुनिक आवृत्ती आहे.
ज्योतिषांना विनंती –
१) ही परिक्षा हा एक सापळा आहे. जे ज्योतिषी वैयक्तिकरित्या खोट्या व तात्कालिक लोकप्रियतेच्या आमिषाला बळी पडतील त्यांच्यामुळे ज्योतिष शास्त्राचे हसे होईलच पण भविष्यकाळात अन्य भारतीय (हिंदू) विद्या उदा. आयुर्वेद, योगासने, अध्यात्म व अन्य शास्त्रे, यांच्यावर हल्ला करण्यासाठी विरोधकाना धारदार शस्त्र मिळाल्यासारखे होईल.
२) हे आव्हान ज्योतिषशास्त्राला आहे. त्यामुळे त्याला संस्थांतर्गत उपाय योजना करून तोड काढली पाहिजे. त्यासाठी सर्व ज्योतिषशास्त्र संचलन करणाऱ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील संस्थांनी एकत्र येण्याची ऐतिहासिक गरज निर्माण झाली आहे. वैयक्तित मतभेद वा मतांतरांना आत्ता स्थान नाही. या निमित्ताने एक संयुक्त समिती स्थापन करून ह्या आव्हानाला एकत्रित व कायमचे बंद करायला हवे आहे.
३) महाराष्ट्राबाहेरील चौबे-पांडे, त्रिवेदी, श्रीमाली टाईप उत्तर भारतीय ज्योतिषी अशा आव्हानांना तात्काळ बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. कारण त्यांना समोरील पक्ष किती बनेल व धूर्त आहे याची नीट कल्पना नाही. मात्र मराठी लोकांना विरोधकांचे छक्केपंजे चांगलेच ज्ञात आहेत.
४) हुशारी हा निकष लावण्यातील त्यांची ‘हुशारी’ लक्षात घेण्यासारखी आहे. ८० टक्केवाला ढ, ९० टक्केवाला बरा व फक्त गणितात १०० गुण मिळवणारा खरा हुशार असे म्हणून ‘मार्कशीट’ वरून हुशारीची प्रतवारी करून / पाडून ज्योतिषीय अंदाज खोटे पाडण्यासाठी खेळी म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो.
५) या ऐवजी असे निकष असावेत की जे तात्काळ व प्रत्यक्ष पडताळता येतील शिवाय ज्योतिषशास्त्रातही त्याची पडताळणी करण्यासाठी विशिष्ट असे आडाखे उपलब्ध असतील. (सहज सुचले म्हणून - आंधळा, पाय वा अन्य अवयव तुटका, पोलिओ, पांढरे कोडवाला व्यक्ती)
६) जो जिंकेल त्याला काय मिळणार?
अंनिस आणि पार्टी ही परिक्षा जिंकणार हे ठरवून ठेवलेले उत्तर असल्याने ‘ज्योतिषाचा धंदा कायदेशीररित्या बंद करावा’ ही अट स्वाभाविकपणे मान्य करायला लावणे ही त्यातली मेख आहे. ९० टक्यांखाली उत्तरे बरोबर आली तर ती लढाई ‘अनिर्णित’ झाली असून जोवर अंनिसकडून तिचा ‘निकाल’ लागत नाही तोवर ती खेळली पाहिजे, असा धर्मराजाला शेवटपर्यंत द्यूत खेळायला भाग पाडणारा व त्याला पुरते नागवले जाण्याला प्रवृत्त करणारा हा आधुनिक शकुनीमामांचा घाट आहे.
७) पण याही परिस्थितीत ज्योतिषांनी ही परिक्षा जिंकली तर?
अशी अट घालता येईल - अंनिस व त्यांच्या विचारांच्या जगातील सर्व संस्थांतर्फे ‘पराजयपत्र’ दिले जावे. शिवाय यापुढे अन्य कुठल्याही प्रांतात, नव्हे जगात कुठेही जर कोणी अशी परिक्षा करण्याची शक्कल काढेल तर त्याला डॉ. नारळीकर व डॉ. दाभोलकर त्यांच्या अखत्यारीतील सर्व ज्योतिषशास्त्र विरोधी संस्था जातीने ज्योतिषशास्त्राच्या बाजूने लढतील व ज्योतिष ‘शास्त्र’ कसे आहे याचे प्रात्यक्षिक करून त्यावेळच्या विरोधकांची तोंडे बंद करतील. असा लेखी ‘कबूलनामा’ त्यांनी द्यायला हवा. तसे काही न करता जर ही परिक्षा केली जाणार असेल तर ती क्रिकेटच्या कसोटी सामन्याप्रमाणे एक न संपणारी मालिकाच ठरेल.
८) भविष्य काळात जर सर्व अटी मंजूर झाल्या तर अशा परिक्षेसाठी प्राचार्य अद्वयानंद गळतगे. मु. पो. भोज. जि. बेळगाव. कर्नाटक. पिन – ५९१२६३. (फोन ०८३३८-२९३३९९ व मो. ०९८८६६७८१८३) यांना अन्य पंचांसमावेत नियुक्त केले जावे. ते पंच बनण्यासाठी अत्यंत लायक असण्याची दोन कारणे आहेत.
१. पूर्वी सांगलीत गिरिश शहांच्यातर्फे अशा तऱ्हेच्या ज्योतिष शास्त्राच्या कसोटीसाठी प्रा. अद्वयानंद गळतग्यांनी पंच म्हणून काम करण्याचे उत्स्फूर्तपणे मान्य केले होते. ‘त्यावेळी डॉ दाभोलकरांनी शहांना आव्हान देऊन पलायन केले’ असे वर्णन त्यांनी त्यांच्या ‘विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन’ या अंनिसच्या फसलेल्या मोहिमांवर आधारित पुस्तकात केले आहे.
२. प्राचार्य अद्वयानंद गळतग्यांनी १२-१३ वर्षापूर्वी डॉ. नारळीकरांना शास्त्रीय कसोटी करण्याला आवाहन करण्यासाठी लागोपाठ पाच सविस्तर पत्रे पाठवून मनधरणी केली होती. (ती पाचही पत्रे ‘बोध अंधश्रद्धेचा’ पुस्तकात समाविष्ट आहेत) त्यावेळी त्यांनी दाद दिली नव्हती. कदाचित त्यामुळे त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली असेल. कारण आता ते म्हणतात की बऱ्याच काळापासून त्यांच्या मनात असे करण्याचे घाटत होते!
समस्त ज्योतिषशास्त्रींच्या विचारार्थ.

शशिकांत ओक

 
^ वर