उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
बजाज या कंपनिच्या मोटार सायकली.
अभय पाटील
May 5, 2008 - 7:27 am
आजच्या स्पर्धेच्या युगात बजाज या कंपनिने बरीच मजल मारली आहे पण मला असे जाणवले कि ही कंपनि फक्त स्पर्धे मधे पुढे आहे.
क्वालिटी च्या बाबतित नाहित. हो असे बोलण्याचे कारण हि असेच आहे, बर्याच विचारविनीमया नंतर मी बजाज पल्सर २०० सी सी
घेतली पण मी आता गाडी च्या कार्यकुशलते वर खुश नाही. कारने अशी की , २०० सी सी असुन गाडीची कार्यकुशलता ( पर्फोंमंन्स् )
तसा साधारणच आहे.
तरी मला तुम्हा लोकांचे अनुभव जाणुन घ्यायचे आहेत.
दुवे:
Comments
हमारा बजाज
बुलंद भारत की बुलंद तसवीर, हमारा बजाज, हमारा बजाज... हि बजाजची जाहिरात ज्यांनी पाहिली आहे त्या सर्वांना अजुनही लक्षात असेल. हे लिहायचे कारण असे की बजाजच्या गाड्यांचा खप हा त्यांच्या विपणनामुळे जास्त होतो. बजाजने आजवर अनेक गाड्या काढल्या आणि बंद केल्या. खास करून एकदम टुकार गाड्या म्हणजे बजाज रेव, सफायर, स्ट्राइड, विंड १२५. अशा अनेक गाड्या आहेत ज्या आल्यानी गेल्या. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. पण बजाजच्या गाड्यांमध्ये पल्सर हा एकमेव प्रकार डोळे झाकून विकत घेण्यासारखा आहे. मी जुनी १५० चालवली आहे. ती खुप आवडली होती. तसेच आत्ता सुद्धा २०० चालवतो आहे. ती सुद्धा खुप आवडली आहे. मला तरी २०० ची कार्यकुशलता योग्य वाटली. हा! एखादा गियर अजुन असता तर आवडले असतेच. पण २०० ची कामगीरी समाधानकारक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. हल्ली हिरोहोंडा बजाजच्या पावलावर पाउल ठेउन जाते आहे असे हि आमचे वैयक्तिक मत आहे.
तुम्ही कार्यकुशलतेला कोणते मापदंड घेतले आहेत का एक मुद्दा लिहिलात तर पुढे सविस्तर लिहिता येईल.
खरे आहे,
आता हिच जाहिरात पाहा ना... कल्पकतेचा अद्वितीय नमुना आहे -
_____________________________________________
स्वातंत्र्याचा सण, दारात रांगोळी, श्रृंगारली आळी, झगमगे || तोरणे, पताका, सांगती डोलून स्वातंत्र्याचा दिन, उगवला || स्वातंत्र्यासाठी या, आम्ही काय केले? पूर्वज श्रमले, तयासाठी ||
बजाज चा नवीन शोध...
बजाज कंपनिच्या मोटारिंचे आता पुन्हा नवीन पर्रव सुरु झाले .... म्हणे काय तर..... यांनी २०० सी सी बंद केली आणी १८० सी सी ला २०० सी सी साऱखा चेहरा दिला.
आणी "फासटेस्ट् इंडीयन" या नावा खाली २२० सी सी च्या गाडी ची "यमपी यफ आय" प्रणालि काढुन त्या जागी २०० सी सी चा कार्बोरेटर लावला.
अशी आहे आपल्या स्वदेशी गाडीचची नवी कार्यकुशलता.... याला प्रगती म्हणावी की .....