व्यक्‍तीमात्राचे जीवन सुंदर व सार्थ करण्यासाठी ज्योतिषशास्त्र आवश्यक - ज्योतिषालंकार श्री.श्री. भट

ज्योतिषशास्त्र हे गणित व पदार्थ विज्ञान आहे. कालज्ञान या मानवी स्वभाव, सामर्थ्याचे विज्ञान, तंत्रज्ञान व व्यावहारिक उपयोग यांत रूपांतर करण्याचे ते शास्त्र आहे. आयुष्याचे गणित जुळवण्यासाठी सृष्टीतील नियमांशी, नियतीशी ताळमेळ व सूर मिळवून व्यक्‍तीमात्राचे जीवन सुंदर आणि मुख्यत: सार्थ करण्याचा मानवाने केलेला अद्‌भुत व तितकाच प्रत्ययकारी प्रयत्‍न म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे.

पुण्याच्या खालोखाल डोंबिवली हे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात आहे. संस्कृती रक्षणाचे काम आम्ही करतच आहोत; पण त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. देश व काल हे ज्योतिषाशी संबंधित असते, तर निमित्त हे आपल्याला आवडत्या गोष्टींशी संबंधित आहे. आपल्या भारतात आयुर्वेद व ज्योतिष हे दोनच मौल्यवान ठेवा आहेत. आपली संस्कृती टिकवण्यासाठी जुन्या गोष्टी तरुण पिढीला दाखवल्या पाहिजेत. आज तरुण पाश्चात्त्य संस्कृतीकडे अधिक वळत आहेत. त्यांना आयुर्वेद व ज्योतिष समजवण्याची आवश्यकता आहे. संस्कृती टिकवून ठेवायची असेल, तर ज्योतिषशास्त्राचा परिचय करून द्यायला हवा. ज्योतिष हा विषय शाळेत अभ्यासासाठी घेणे नितांत गरजेचे आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

संस्कृती म्हणजे नेमके काय?

संस्कृती रक्षणाचे काम आम्ही करतच आहोत;

हे काम तुम्ही कसे करता? यासाठी आपली संस्कृती कोणती याची व्याख्या कशी ठरवली जाते?

संस्कृती टिकवून ठेवायची असेल,

संस्कृती टिकवण्यासाठी नेमके काय करायला हवे?

संस्कृती टिकवून ठेवायची असेल, तर ज्योतिषशास्त्राचा परिचय करून द्यायला हवा.

मुळात ग्रह तार्‍यांवरून आलेले ज्योतिषशास्त्र आपले की परदेशातून उचललेले याबाबत कोणी स्पष्टीकरण देईल काय?

"च"

आपल्या भारतात आयुर्वेद व ज्योतिष हे दोनच मौल्यवान ठेवा आहेत.

दोन?

बाकी हजारो वर्षांचा इतिहास ते अगदी एकाच वेळेस दहा उपग्रह सोडण्याचा विक्रम करणारे वर्तमान म्हणजे काहीच नाही की काय?

शिवाय त्यातील ज्योतिषशास्त्र जसे लोकांसमोर आणले जाते त माझ्यासकट प्रत्येकाला मौल्यावान वाटत असलेच अशातला भाग नाही हा एक वेगळाच मुद्दा.

आपल्या वरील लेखनातील काही विधाने वाचताना सावरकरांचे अशा अर्थाचे विधान आठवते : आम्ही इतिहास घडवायचे काम करणारे आहोत, लिहायचे इतर करतील (मतितार्थ).

तेच मला आपण लिहीलेल्या संदर्भात संस्कृतीबद्दल बोलावेसे वाटते - आपण संस्कॄती (त्यातील चांगला भाग) नक्कीच जतन करावी. पण उद्याच्या पिढीला आजची पिढी ही सांस्कृतिक ठेवा वाटावी असे आपण नक्की काय करतोय? साधे पहा मोहेंजेदरो, हरप्पा आदी भाग जेंव्हा उत्खननात मिळाल तेंव्हा एक नगररचना दिसली आणि आमचे पुर्वज किती ग्रेट होते वगैरे आपण म्हणू शकलो/शकतो. आता देव न करो आणि काही होवोत पण उद्या डोंबिवली आणि इतर कुठलीही शहरे अशीच हजारो वर्षांनी उत्खननात मिळाली तर कुठले नगररचना शास्त्र दिसणार आहे? आणि तेंव्हा काय दिसायचे ते दिसूदेत आपण थोडेच तिथे "ह्या जन्मातील/ह्या जाणिवेने असू? त्या दृष्टिने भविष्य (भारतिय सर्वच शहरीकरणाचे) एक गडद अंधार आहे....आणि दुर्दैवाने वर्तमानात संस्कृती काय तयार होत आहे त्याचा विचार केला तर आमच्या समोर केवळ येते ते "डोंबिवली फास्ट"...

अरे वा !!!

संस्कृती रक्षणाचे काम आपण करीत आहात आपणास भेटुन आनंद झाला.

ऋषींचे विचार, आर्यांची विजुगिषु वृत्ती आणि पाश्चात्यांचे बुद्धीप्रामाण्य याची सांगड नाही का घालता येणार संस्कृती टिकवण्यासाठी ?
की आयुर्वेद आणि ज्योतिषशास्त्रामुळेच संस्कृती टिकु शकते ? खरं तर आम्हाला कळलं नाही पण खूलासा होईल इतर प्रतिसादातुन आणि आपल्या विवेचनातुन.

>>ज्योतिष हा विषय शाळेत अभ्यासासाठी घेणे नितांत गरजेचे आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन सुंदर होईल आणि त्यांना संस्कृतीची गोडी लागत असेल तर चांगली गोष्ट आहे.
त्याचबरोबर त्याच्याकडे पोट भरण्याचे साधन म्हणुन पाहावे असे आमचे मत आहे !!! ;) ( ह. घ्या. )

उत्तम प्रतिसाद

बिरुटेसरांच्या प्रतिसादास पूर्ण सहमती.

ज्योतिषाच्या गाभार्‍यात

"ज्योतिषाच्या गाभार्‍या"त आम्हाला श्री श्री भट भेटले . त्यांनी आम्हाला "खाद्य" पुरवले म्हणुनच आम्ही गाभार्‍याकडे जाणार्‍या लोकांसाठी "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी......" लिहू शकलो.
प्रकाश घाटपांडे

देवमासा!

श्री. विजय मीत,
नमस्कार!

आपले विचार वाचले. लिहीताना आपण अगदी भरभरून आल्या सारखे लिहिले आहे. (अशा पद्धतीने जर आंतरजालावर लिहाल तर शब्द-वाक्यांची चिरफाड होऊन 'विच्छेदन अहवाल' आपणांस सोपवला जाईल.)

लेखाचा विषय जर 'ज्योतिषास्त्राला' शालेय शिक्षणात स्थान मिळावे ह्या हेतूने लेख लिहिला आहे कां? तसं जर असेल तर, 'पूण्याचा','डोंबिवलीचा' उल्लेख कशासाठी केला आहे? सध्यातरी 'ज्योतिषास्त्राचे' शिक्षण किती जणांचे उदरनिर्वाहाचे साधन होउ शकते?

सध्याचं युग 'शुद्रयुग'- शुद्रांच युग आहे. 'मनापासून काम करणं' व फावल्या वेळात मनोरंजन करणं' हे या युगातील सुखानं जीवन जगण्याचे मार्ग आहेत. जो समाज आपला फावला वेळ जितका सत्कारणी लावेल तो समाज तितका 'वरचा स्थर' गाठेल.

ज्योतिषशास्त्र ह्या युगात कुठे बसेल ते सांगावे.

भारतीय संस्कृतीचा भाग कधीपासून?

ज्योतिषशास्त्र (ऍस्ट्रोनॉमी अश्या अर्थाने) आणि फलज्योतिष (ऍस्ट्रॉलॉजी अश्या अर्थाने) यातील फरक लक्षात घेता फलज्योतिष भारतीय संस्कृतीत कधीपासून समाविष्ट झाले यासंबंधी ऐतिहासिक माहिती देता येईल काय?

बाळबोध (कु)शंका

>>ज्योतिषशास्त्र हे गणित व पदार्थ विज्ञान आहे.
ज्योतिष शास्त्रातील दोन भाग ज्योतिष गणित आणि फल् ज्योतिष, यापैकी आपण नक्की कुठ्ल्या भागा बद्दल बोलत् आहात ते कळलं
तर् बरं होइल.ज्योतिष गणित (ज्यात कालमान,तिथी शोधन् कार्य वगैरे,ज्यामध्ये अवकाशस्थ गोलांच्या गतीचे मापन अचुक् केलेले असते
(ज्यात फारसा "भविष्य" शोधनाचा प्रयत्न नसतो.)) हे उपयुक्त शास्त्र आहे,वादच नाही.

पण "फल् ज्योतिष" (भविष्य वेध किंवा तोडगे-उपाय)हे "...गणित व पदार्थ विज्ञान आहे." हे कोण कसं म्हणु शकतं?
वि़ज्ञानाच्या कुठल्या नियमांनी ते सिद्ध झाले आहे?
(विज्ञान त्रिसुत्री:- प्रयोग, निरिक्षण,निष्कर्ष)

>> कालज्ञान या मानवी स्वभाव, सामर्थ्याचे विज्ञान, तंत्रज्ञान व व्यावहारिक उपयोग यांत रूपांतर करण्याचे ते शास्त्र आहे.
कुठला व्यावहारिक उपयोग बॉ?
समजा झालच तुम्हाला आम्हाला तथाकथित कालज्ञान आणि कळलच की परवा साठ्यांच्या घरात जन्माला आलेलं कार्टं आहे
हिटलर नाय तर मोगॅम्बोचा अवतार, आणि उद्या चालुन हे कार्टं पृथ्विवर लै उत्पात कर्नारेय्.
तर् काय् तुम्ही त्याची लहानपणीच "वाट" लावुन टाकाल का हो?

>>आयुष्याचे गणित जुळवण्यासाठी सृष्टीतील नियमांशी, नियतीशी ताळमेळ व सूर मिळवून व्यक्‍तीमात्राचे जीवन सुंदर आणि मुख्यत: सार्थ करण्याचा मानवाने केलेला अद्‌भुत व तितकाच प्रत्ययकारी प्रयत्‍न म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे.
कळलं नाही म्या पामरास हे विधान. कृपया सोदाहरण सांगु शकाल का "आयुष्याचे गणित जुळवण्यासाठी सृष्टीतील नियमांशी.."
नक्की कुठल्या नियमांशी कशा प्रकारचा ताळमेळ?

संस्कृती रक्षणाचे काम आम्ही करतच आहोत; पण त्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
सहकार्य म्हणजे नक्की कसं ते सांगितलं तर् बरं होइल्.
सहकार्य म्हणजे केवळ आपल्या मोहिमेतला सहभाग ही असु दशकते.
आर्थिक मदत ही असु शकते.
किंवा नुसती आपल्याला पाठिंबा/मान्यता ही असु शकते.
ह्यातील नक्की कुठली अपेक्षित आहे.

>> आपल्या भारतात आयुर्वेद व ज्योतिष हे दोनच मौल्यवान ठेवा आहेत.
अगदी बरोब्बर. कारण उर्वरीत गोष्टी जसे की तत्वज्ञान,बीज गणित,भुमिती,विविध कला(त्या शास्त्रांनुसारच ६४
का किती तरी प्रकारच्या म्हणतात त्या)शिल्प कला,स्थापत्य शास्त्र,युद्ध कला,संगीत,वात्सायनाचे काम शास्त्र ह्या "मौल्यवान" नसुन "अमुल्य" आहेत्. आहेत असे आपल्याला म्हणायचे असावे.(किंवाअ आम्ही आपले स्वतःच्या सोयीसाठी तसे मानतो.)
ह. घ्या.

त्यांना आयुर्वेद व ज्योतिष समजवण्याची आवश्यकता आहे.
का म्हणुन? आयुर्वेद ठीक आहे,निरोगी आयुष्यासाठी आवश्यक आहे.
पण ज्योतिष कशासाठी?(तेही सालं सर्वांना काय साठी? इथे आधिच क्रमिक गणित जमत न्हाइ आणि हे
त्या गणिताचा मोठा भाउ माथ्यावर् मारायला निघालेत.)
ज्योतिष हा विषय शाळेत अभ्यासासाठी घेणे नितांत गरजेचे आहे.
ज्योतिष कशासाठी?(तेही सालं सर्वांना काय साठी? इथे आधिच क्रमिक गणित जमत न्हाइ आणि हे
त्या गणिताचा मोठा भाउ माथ्यावर् मारायला निघालेत.)

अवांतर बाळबोध शंका:-
१. हल्ली मानव परग्रहावर् जात आहे.काही काळात तिथे पिकनिक स्पॉट ही बनतील.
ह्या काळात जर् तिथे एखाद्या बालकाचा जन्म झाला समजा मंगळावर्(नाय् तर चंद्रावर), तर् कुंडलीत काय
पृथ्वी मांडणार आहोत का? (अवकाशात, स्पेस शटल मध्ये जन्म झालेल्या बालकांचे काय?)
२. बालकाचा जन्म होताना, चंद्र ज्या राशीत असेल ती म्हणे त्याची चांद्र रास.
अहो पण जर जन्मच चंद्रावर झाला , तर काय काय बघणार आहात तुम्ही?

आपलेच,
अति सामान्यांचे मन.
(साठ्मंचे नाठाळ कार्टे)

 
^ वर