आपल्याला काय वाटते ?

आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?
आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?
आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?
आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?आपल्याला काय वाटते ?

Source : SSRF

लेखनविषय: दुवे:

Comments

अरेरे!

त्या पोरीकडून असे बालीश चाळे करवून घेण्यापेक्षा काहीतरी अधिक चांगले करता येतील. त्यासाठी जपानी हॉरर चित्रपट पाहण्याचा सल्ला या सर्वांना देता येईल.

ती मुलगी खरंच पिडित असेल तर मात्र चांगल्या डॉक्टरकडे न्या रे तिला.

आपली
(मांत्रिक नं.१) प्रियाली

आणखी खोलात -

प्रियालीशी सहमत.
आणखी खोलात शिरता असे आढळून आले की हे SSRF म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून 'दैनिक सनातन प्रभात'चे सर्वेसर्वा श्री. (स्वयंघोषित हिज होलीनेस) डॉ. (पूर्वाश्रमीचे हिप्नोथेरपिस्ट) जयंत बाळाजी आठवले यांचे अपत्य आहे.
इंटरनेटवरही बुवाबाजी!! काय म्हणावे या लोकांना!!

घाटपांडेसाहेब, अंनिसला आयते गिर्‍हाईक आहे. बघा जरा यांच्याकडे. ;)

वैज्ञानिक मुलामा

सदर मुलगी ही मनोविकाराने पिडीत आहे. तिला मांत्रिकाची नव्हे तर मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. अध्यात्मिक संशोधन येथ उपयोगाचे नाही. आम्हाला हा वैज्ञानिक मुलामा असलेली अंधश्रद्धा वाटते.या पार्श्वभुमीवर अनिल अवचटांचे "धार्मिक "हे पुस्तक वाचण्यासारखे आहे.
प्रकाश घाटपांडे

असे असेलच असे नाही ;-) ....

सदर मुलगी ही मनोविकाराने पिडीत आहे.

असे असेलच असे नाही. ही कदाचित जाहिरातही असू शकेल पण मग जाहिरात करायची झाली तर चांगल्या कल्पना घेऊन करावी.

उदा.
१. शहारूखच्या जन्नतमध्ये भूतबाधा, आठवल्यांना पाचारण
२. अमिताभची रामू वर्माच्या भूताकडून सुटका, केवळ आठवल्यांचा प्रभाव
३. विवेक ओबेरायच्या मानगुटीवरील अभिनयाचे भूत उतरले, रसिकांचा आठवल्यांना सादर प्रणाम.

किंवा, सदर मुलीला घेऊन जाहिरात करायची झाल्यास

१. आठवले घरात एकटेच आहेत पण खुडबूड ऐकू येते. क्यामेरा इथून तिथून फिरून छतावर जातो तिथे ती मुलगी छताला पालीसारखी चिकटलेली असते. (साभारः द मेसेंजर्स)
२. आठवले घरात एकटेच आहेत. कपाटातून आवाज येतो, कुतूहलाने ते कपाट उघडतात, आत ती मुलगी अंगाचं मुटकुळं करून विकट हास्य करत असते. (साभारः द ग्रज)
३. आठवले घरात एकटेच आहेत. दरवाज्यावर टकटक होते, आठवले दरवाजा उघडतात. बाहेर कोणी नाही. ते वैतागून दरवाजा बंद करतात आणि मागे वळतात. ती मुलगी केसांच्या झिंज्यांसह त्यांच्याकडे लुच्च्या नजरेने पाहात आहे. (साभार: द ग्रज)

गेला बाजार द एक्झॉर्सिस्टमध्येही यापेक्षा चांगल्या कल्पना मिळतील.

सर्वांनी ह. घ्या

आई....

आई गं..........
हे लोक बघ् ना ग कसं करतायतं...
हे किनई मला किनी खोटं खोटं घाबलवताहेत..
पन मला पण माहितिए,तुमी छगल छग्ल खोट दाखवता.
आमि नाय घाबरत जा.....
ठेंगा..

छोट्याशा बालकाचे मन

हा हा हा

व्हिडीयो फीती च्या उत्तरार्धात ते मांत्रीक / भुत, "जयुकाका चला ना खेळायला. संध्याकाळ झाली मग रात्र होईल. मग दोघांना कामावर जायचे आहेच" ;-) असा वेळेवर खेळुया असा आग्रह धरते आहे असे वाटते. [आवाज बंद करुन पहा]

पण काही म्हणा अशी मंडळी आहेत म्हणून अंनिस आहे त्याचे बरे वाटते.

माझे मत - शारिरिक इजा टाळावी

भगवे कपडे घातलेली पहिली मुलगी आहे, ती लडाबडा लोळताना स्वतःला इजा करून घेऊ शकते - डोके टेबल-खुर्चीला आदळू शकते. शिवाय मध्येच तिचा हात विजेच्या एका केबलमध्ये आडकण्याची शक्यता होती. अशा प्रकारची इजा टाळण्यासाठी योग्य ती काळजी घरच्यांनी घ्यावी. फर्निचरच्या कोपर्‍यांना रबराच्या मऊ लाद्या चिकटवाव्यात. अशीच काळजी व्हिडियोचित्रण करणार्‍याने घ्यावी. व्हिडियोची केबल फरशीवर लोळू देऊ नये.

हिरवे कपडे घातलेल्या बाईंचे वागणे शारिरिक इजा करणारे नाही. माझ्या खिडकीत कोणी अनोळखी व्यक्ती अशी वागली असती तर मला आश्चर्य वाटले असते, आणि थोडी काळजी वाटली असती. तरी गजाच्या आत बसलेल्या व्यक्तीला ते वागणे फारसे विचित्र वाटत नाही असे दिसते. त्यामुळे हिरवे कपडेवाल्या बाईंचे तसे वागणे त्या प्रसंगी सामान्य असावे असे वाटते. संदर्भ माहीत नसल्यामुळे याबाबत माझे अधिक काही मत नाही.

काय वाटते? | रिपोर्ट ऍब्यूज

काय वाटते?

१. हा अतिशय आक्षेपार्ह व्हिडीओ असलेला चर्चाप्रस्ताव शक्य तितक्या लवकर काढून टाकावा असे वाटते.
२. तथाकथित हिज होलीनेस बुवाच्या आणि त्याच्या समर्थकाच्या आपल्या स्वार्थासाठी लहान मुलींना वापरण्याच्या हालकटपणाची कीव करावीशी वाटते.
३. स्पिरिच्युअल हीलर (होलीxx!) बुवांना आपली अद्भुत शक्ती वापरून आपला संदेश थेट न पोचवता यूट्यूब सारख्या ख्रिश्चन लोकांनी चालवलेल्या, आधुनिक ('सनातन' च्या विरुद्ध) साधनाचा वापर करणे भाग पडावे याचे आश्चर्य वाटते.

सदस्यहो, सदर व्हिडीओ यूट्यूबवर "शॉकिंग अँड डिस्गस्टिंग" असा फ्लॅग करावा अशी विनंती.

हा विषय काढून टाकण्याबद्दल असहमती

नवीन यांच्या भावना मी समजू शकतो. (शॉकिंग अँड डिस्गस्टिंग). आणि , युट्युब वर हे चढवणार्‍यांचा प्रचारकी हेतुसुद्धा लक्षात येतो. पण मला असे वाटते की या निमित्ताने इथे थोडी ज्ञानवर्धक चर्चा झाली तर हा विषय इथे चालू राहू द्यावा. मुख्य म्हणजे , या प्रश्नांची मानसशास्त्रीय, सामाजिक बाजू , अंधश्रद्धा , त्यांचे निर्मूलन, ते निर्मूलन करण्याच्या चळवळीबद्दल साधकबाधक विचार या सगळ्यांची देवाणघेवाण होऊ शकते.

थोडक्यात विडियो चढविणार्‍याच्या प्रचारकी हेतूंविषयी निषेध नोंदवावा आणि याबाबतीतील संभाषण चालू ठेवावे.

सहमत आहे

मुक्तसुनित यांच्या भुमिकेशी सहमत आहे. आपल्याला न पटणारे विचार येउच देउ नये ही भुमिका बौद्धिक दंडेलशाहीची ठरेल. त्यापेक्षा त्याचा वैचारिक प्रतिवाद करणे हे विवेकी.
प्रकाश घाटपांडे

हमम.. | जाहिरातबाजी

तुम्हाला काय वाटते? असे १६ वेळा (!) विचारल्याने मला जे वाटले ते सांगितले. या विषयावर चर्चा जरूर व्हावी.

ह्या सनातनवाल्यांचे स्वतःचे संकेतस्थळ आहे, प्रकाशने, स्वतंत्र प्रचारयंत्रणा आहे. शिवाय यूट्यूब वगैरेचा वापरही करू लागल्याचे दिसते. इतके असून मराठी संकेतस्थळांचा जाहिरातबाजीसाठी 'वापर' होत असेल तर काय करावे याविषयीही चर्चा झाल्यास उत्तम!

१६ वेळा विचारणे ....

.... याचे कारण , माझ्या मते इंग्रजी शब्दांचा वापर १०%हून अधिक असू नये यासाठी आहे.

मला वाटते...

चित्रगुप्त पापपुण्याचा हिशेब करण्यात मग्न असताना कदाचीत एखादे भूत त्याची नजर चुकवून पळालेले असेल :-)

भूतांचा जन्म- एक तर्क

चित्रगुप्त पापपुण्याचा हिशेब करण्यात मग्न असताना कदाचीत एखादे भूत त्याची नजर चुकवून पळालेले असेल :-)
हा हा हा .. हे शक्य आहे.

पूर्वी रेल्वे आरक्षणासाठी रांगा असत. मग त्यांनी टोकन पद्धत सुरु केली. कर्वेरस्त्यावरच्या कार्यालयात आपला क्रमांक किती वेळाने येणार आहे ते पाहून मध्येच आपली कामे, चहा-बिडी, टवाळक्या करुन पुन्हा रांगेत येवून उभे राहता येत असे. तशीच सोय चित्रगुप्ताच्या दरबारी आहेसे कळते. अधुनिकीकरणाचे वारे थेट स्वर्गाला भिडले आहेत असे म्हणतात. तर काय, रोज इतकी माणसे मरतात आणि त्यांचा हिशेब ठेवण्याचा काउंटर एकच. मग टोकन पद्धत चालू झाली. नुकतेच मेलेले लोक मग आपला क्रमांक दोन महिन्याने येईल वगैरे पाहून टंगळमंगळ-चहाबिडी-टवाळक्या यांसाठी मृत्यूभूमीवर येवू लागली आहेत. यातले काही विडीओज चित्रगुप्ताला इमेल ने पाठवूया...या प्रकारांना आळा बसतो का पाहू.

विनंती -टंगळमंगळ करायला आलेल्या माणसांनी आणि भूतांनी हलकेच घ्यावे. आणि आमच्या खिडकित येवू नये. खिडकीला गज नाहित..जाड काच आहे. तेथे बसायची सोय नाही.
कळावे.
-- लिखाळ.

अजून एक

काहीतरी चर्चां तयार करून त्यात असले "चित्र" (फित) देऊन काही न लिहीता चर्चाकार "गुप्त" झाले.

 
^ वर