हे सन्केत स्थळाच्या प्रसारासाठी

नमस्कार..

अगदि नुकतेच सभसदत्व घेतले आहे.
बहुतांश लेख वाचून झाले आहेत. एवढ्या माहितिपूर्ण सन्केत स्थळ मराठीत पाहून फारच आनंद झाला.
मात्र एक गोष्ट सुचवाविशी वाटली:-

१.एवढ्या सुरेख सन्केत स्थळाचा अजूनही प्रसार करता येणार नाहि का?
२.जसे की माझे (माजि)वर्ग मित्र आजही सम्पर्कात राहण्यासाठी orkut वगैरे मधील communities चा आधार घेतात.
जर त्यांच्या पर्यंत हे सन्केत स्थळ पोहोचले तर निश्चितच ते ह्याचे सभादतत्व घेतील.
३. असे झाल्यास समाजातील फार मोठा तरूण वर्ग मराठीचा वापर माहिती जालावर करु लागेल.

४.मी स्वयम् तर यथा शक्ति प्रयत्न करेनच पण कल्पना सुचवाविशि वाटते आहे.

जर आपण(सम्पादक मंडळ)विविध अभियान्त्रिकी आणि science महाविद्यालयातील विविध स्पर्धा प्रायोजित केल्या,
तेथे आपल्या ह्या स्तुत्य "उपक्रमा"ची माहिती जनते पर्यंत पोहोचवली, तर आपला जनाश्रय वाढिस लागेल......
(असे वाटण्याचे कारण एवढेच कि आमचे शिक्शण संपून सुमारे दीड दोन वर्षे झालि असली तरीही प्रत्यक्शात
एका देशाहून दुसर्‍या देशात व्य. नि. करताना आम्ही रोमन लिपी मध्ये टन्कित केलेली मराठीच वापरतो!(वापरत् होतो.)
म्हन्जे एकमेकांशी व्यक्त होण्यासाठी आम्हास मराठीच सोयीची वाटते,पण मार्ग मिळत नव्हता.
)

..अर्थात हा केवळ एक विचार
......प्रत्यक्श मोहिम राबविण्याचा प्रस्तुत लेखकास काहिही अनुभव नाही
पहिलाच प्रयत्न असल्याने शुद्ध् लेखनातील चुकांबद्द्ल् क्शमस्व (काही शब्द टंक करणे जमत नाहियेत,जसे की "क्शमस्व"
ह्याबद्दल् पुनश्च् आपणा सर्वांन्चा मी "क्शमस्व" आहे. )
आपलेच...
सर्वसामान्यांचे मन.

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वागत!

तुमचे स्वागत. तुम्ही मांडलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत.

जाहिरातीची प्रत्यक्ष मोहीम राबवणे कठीण असते, हे अनुभवांती. पण म्हणून त्याला फळ येणार नाही असे नव्हे. तुम्हाला रस असल्यास तुम्ही असा पुढाकार निश्चित घेऊ शकता. तुम्ही नुकतेच शि़क्षण संपवून बाहेर पडला असल्याने वडिलकीच्या नात्याने असे सुचवण्याचा धीर केला :-)

तसेच मौखिक प्रसारही उपयुक्त असतो. मी देखील सं. स्थळावर स्नेह्यांनी सांगितले म्हणूनच येऊ लागले. त्यामुळे मौखिक प्रसाराचा उपयोग होतो हे नक्की. स्नेह्यांमध्येही योग्य व्यक्ती आणि वेळा बघून सांगता येते. याचा कमी पण निश्चित फायदा झालेला पाहिला आहे.

:)

पहिलाच प्रयत्न असल्याने शुद्ध् लेखनातील चुकांबद्द्ल् क्शमस्व

ओक्के! नो प्रॉब्लेम! क्षमा केली...! :)

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

हे

अगदि नुकतेच सभसदत्व घेतले आहे.
बहुतांश लेख वाचून झाले आहेत.

बहुतांश लेख वाचून झाले आहेत हे वाचून बरे वाटले!
म्हणजे आपला चांगलाच अंदाज आला आहे की इथे आम्ही काय करतो ते.
असा गृहपाठ केल्याबद्दल अभिनंदन!

आता चर्चांमध्येही या... तावातावाच्या चर्चा करायला फार मजा येते..

आपला
गुंडोपंत

स्वागत!

स्वागत!
कल्पना उत्तम आहे पण येथील बहुतांश सभासद नोकर्‍या वगैरे करून (संपादकांसकट सगळे) उपक्रमावर येत असल्याने हे करणे तितकेसे व्यवहार्य वाटत नाही.
असो तुमची जर या अंगाने मदत होणार असेल तर उपक्रमरावांना कळवावे :)

याशिवाय तोंडी प्रचार आम्ही सगळे करत असतोच तसा तुम्हीही करावा. त्याहूनही मुख्य म्हणजे वेळ मिळेल तसा चर्चेत सहभाग घ्यावा आणि या भाजणीत सगळ्यात मुख्य म्हणजे आपणाला ज्या विषयाबद्दल माहिती आहे /हवी आहे त्याबद्दल इथे आवर्जून लिहा.

पुन्हा एकदा स्वागत!

-ऋषिकेश

प्रसार

गुगलवर शोधक नजरेने पहाणार्‍या लोकांना हे संकेतस्थळ आपोआप मिळते. संकेतस्थळाची प्रकृती पहाता येथे येणारे लोक हे काही वैचारिक खाद्य मिळावे अशा हेतूनेच येतात. वैयक्तिक साखळीतूनच् याचा सुदृढ प्रसार होईल.
प्रकाश घाटपांडे

हे संकेतस्थळ

गुगलवर शोधक नजरेने पहाणार्‍या लोकांना हे संकेतस्थळ आपोआप मिळते.

साहेब,
पण मुळातच ही मराठी सन्केतस्थळे पहिल्या दहा मध्ये येण्यासाठी काही करता येणार नाही का?
म्हणजे शोधक नजरेने पाहण्यापेक्षा थेट ती समोरच दिसल्यास लोक आपसूकच तिथे येणार् नाहित का?
(मला वाटते, ह्या पूर्वी उपक्रमावर ह्याची चर्चा झाली आहे... )

आपलेच
(मराठी चा माहिती जालावर प्रसार करण्याची इच्छा असणारे ) मन

हो

(मला वाटते, ह्या पूर्वी उपक्रमावर ह्याची चर्चा झाली आहे... )

मीच तो!
पहिल्या दहा मध्ये येण्यासाठी काही करता येणार नाही का?

असे व्हायला हवे म्हणून ओरडणारा.... ;))
आपला
गुंडोपंत

मान्य, पण...........

आपण ओरडत आहात हे छान!(म्हणजे कोणितरी ह्याचा विचार करीत आहे म्हणून)....
पण मुख्य अडचण दिसते आहे ती म्हणजे
ऋषिकेश रावांनी बोलल्याप्रमाणे:-
".. पण येथील बहुतांश सभासद नोकर्‍या वगैरे करून (संपादकांसकट सगळे) उपक्रमावर येत असल्याने हे करणे तितकेसे व्यवहार्य वाटत नाही. "

माझ्या माहिती नुसार आपण मारलेल्या हर एक टिचकि मागे सन्केत स्थळाच्या मालकास उत्पन्न मिळते.
म्हणजेच हे सन्केत स्थळ हि व्यावसायिक तत्वावर चालवणे शक्य असले पाहिजे.
एकदा व्यवसाय म्हणून स्विकारल्यावर, त्याला पूर्ण वेळ देउन् काम् करणे शक्य असावे...
आणि मग त्या अन्तर्गतच "गुण वर्धन"(value addition in a web site) एक व्यक्ति केवळ हेच काम करील.
"हे सन्केत स्थळ गूगल वर अधिकाधिक यावे म्हणून काम करणे,इतर features add करून स्थळाला आकर्षक बनविणे.इत्यादि"

केवळ हौशी म्हणून काम केल्यास या मर्यादा येणार.(परिणामी भाषा प्रसारालाही ह्या मर्यादा येणार.)

आमच्या गावकडील भाषेत् हौशी काम् म्हणजे
"आलं मनाला तर् गेलं शेनाला..
नाय् तर टोपलं टाकून् बसलं उन्हाला..."

(शेन सारवणे = गावकडील् "काम करणे" ह्याला समानार्थी वाक्प्रचार्! )
( उन्हाला बसणे = गावकडील् "आरामात बसणे" ह्याला समानार्थी वाक्प्रचार्!)

(मराठी "नेट भाषा" बनलेली बघण्याची आकांक्षा असलेले )मन.....

गुगलने

माझ्या माहिती प्रमाणे ह्या किंवा या सारख्या इतर संकेतस्थळांवर कुठलीही जाहिरात दिल्या जात नसल्यामुळे तुम्ही आम्ही दिवसभर कितीही टिचक्या मारल्या तरी दहा पैसे सुध्दा संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाला मिळणार नाहित. खरं तर या विषयावर आधीच चर्चा झालेली आहे ती शोधा व वाचा.

आता राहिलं गुगल. गुगल मधे देवनागरीत शोधल्यास तो शब्द उपक्रम, मिसळपाव किंवा मनोगतावर असेल तर तसे समोर येते. मात्र ह्या तिन्ही संकेतस्थळांच्या नावात किंवा त्यांच्या मेटा टॅग मधे कुठेच मराठी हा शब्द प्रकर्षाने येत नसल्यामुळे मराठी शब्द दिल्यास ही संकेतस्थळे अग्रक्रमात येत नाहित. मात्र एखादा शब्द जो येथे खुपदा किंवा प्रकर्षाने लिहीला गेला असेल , तो शोधला असता ही संकेतस्थळे समोर येतात. जसे नीलकांत हा शब्द गुगल मधे द्या आणि बघा : -)

याचा अर्थ ही संकेतस्थळे शोध सुचीत आहेत मात्र अग्रक्रमात नाहीत. ती अग्रक्रमात येण्यासाठी तुम्ही काही सुचवू शकाल का?
येथे एक करता येईल की जेवढे सदस्य आपापला ब्लॉग लिहीतात त्यांनी आपल्या ब्लॉगवर या संकेतस्थळांचा दुवा द्यावा. त्यामुळे सुध्दा या संकेतस्थळांना फायदा होईल.

संकेतस्थळ प्रचारासाठी तुम्ही तुमच्या ईमेल च्या शेवटी या संकेतस्थळांचे पत्ते देऊ शकता.
मराठी आविष्कार होईल असे वॉलपेपर तयार करून त्यावर संकेतस्थळाचा पत्ता देता येईल व ते लोकांना पाठवा.
अनेक मराठी कट्टे आहेत, ऑर्कूट, फेसबुक, याहू ग्रुप्स, गुगल ग्रुप्स आदींवर तेथे विशेष चर्चा सुरू करता येईल. अनेकानेक मराठी फोरम आहेत तेथे स्वाक्षरी म्हणून या संकेतस्थळांची नावे देता येतील.

येथील अनेक सदस्य सुध्दा संकेतस्थळ प्रचारासाठी मार्ग सुचवू शकतात.

नीलकांत

सर्वांना मनः पूर्वक धन्यवाद!

सर्वांना मनः पूर्वक धन्यवाद!
आपण सर्वांनी दखल घेतल्यबद्दल "मन" आभारी आहे!

(भरून पावलेले ) मन

देवनागरी

आपण जर देवनागरी लिपिमधे गुगल, गुरुजी ( भारतीय गुगल ) वर शोध् घेतला तर कोणतेही मराठी संकेत स्थळ प्रथम ५ मधे येते.

असहमत

क्षमस्व!
मी आपल्याशी सहमत नाही.(मीच काय येथील् दिग्गजही ह्यच्याशी सह्मत नाहीत म्हणूनच तर ह्यावर मोठी चर्चा घडून् आली होती.)
आत्ताच मी "मराठी" हा शब्द टन्कीत करून पाहीला google.com var पण उपक्रम,मनोगत,मिसळपाव ह्यापैकी कोणाचेहि नाव पहिल्या दहात नव्हते.

जन सामान्यांचे मन

 
^ वर