उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
या पेक्षा जास्त नकोच!
गुंडोपंत
April 17, 2008 - 3:40 am
मित्रहो आणि मैत्रिणींनो,
आपण बघताच की, उपक्रमावर चांगले नाही तरी किमान बरे तरी लेख यावेत म्हणून संपादक (म्हणजे कोलबेराच्या भाषेत मुत्तव्वे!) जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत.
मात्र अशा वेळी काहि सदस्य मात्र खुश्शाल ढापाढापी करून दोन उतार्यांमध्ये एक वाक्य आपले घुसडून लेख लिहिण्याचा आव आणत आहेत.
"अरे लिहायचेच आहे तर स्वतःचे लिहा ना... दुसर्याचे कशाला ढापता?" असा संतप्त सवाल मी त्यांना करू इच्छितो. अरे! आवच आणायची तर त्यासाठी आधी लेखनाचा जुलाब व्हावा लागतो. आव नंतर...
थोडक्यात उपक्रमावर लेख लिहितांना काही अपवादात्मक स्थिती वगळता १०% पेक्षा जास्त साहित्य संदर्भ म्हणून वापरलेले नसले पाहिजे असा नियम येथे यावा असा ठराव मी मांडू इच्छितो.
आपल्याला काय वाटते?
तसेच अपवादात्मक स्थितीची व्याख्या काय असावी?
तापलेला
गुंडोपंत
दुवे:
Comments
अपवादात्मक
जी स्थिती प्रतिकात्मक नाही ती अपवादात्मक. जेव्हा एखादी स्थिती ही आपल्याला अनुकूल असेल तर ती प्रतिकात्मक आणी प्रतिकूल असेल तर अपवादात्मक . आपण केली तर ती 'स्ट्रॅटीजी 'इतरांनी केली कि 'लबाडी'. असो
खालील बाबी मान्य असायला हरकत नसावी
१) आपल्याला आवडलेले इतरांचे साहित्य हे चर्चेचा प्रस्ताव म्हणुन द्यावे
२) आपल्या लेखनातील महत्वाच्या मुद्द्यांवर संदर्भ साहित्याचे दुवे/उल्लेख द्यावे
३) लोककथा, म्हणी ,वाक्यप्रचार, प्रवाद, समजूती इ.चे संदर्भ हे लिखाणात उमटतच असतात. त्याचे संदर्भ द्यायचे झाल्यास "कुठे तरी वाचल्याचे आठवते" 'ऐकीवात आहे' " अशी समजूत आहे" असे द्यावे लागतील.
४) कुठलेही साहित्य स्वयंभू असत नाही. त्यामागची प्रेरणा, विचार हे इतरांकडून घेतले असतात.अहो आपण स्वतःच इतरांच्या प्रयत्नातून घडलेलो/बिघडलेलो असतो.
५) तटस्थ , त्रयस्थ, स्वतंत्र या कल्पना सापेक्ष आहेत.
प्रकाश घाटपांडे
हो ना
हो ना... मान्य आहे म्हनून उद्या तुमच्या पुस्तकातले उतारे मी मधे मधे एकेक वाक्य टकून येथे दिले तर ते माझे लेखन् असेल का?
नाहीच!
सगळे विचार आपल्याच *गणातून पडायला आपण काही व्यास नाही!
माझे इतकेच म्हणणे आहे की, ढापाढापीला लगाम घाला... विचार दुसर्याचे असतील ना. पण त्यावर चर्चा करा.
तेच, तसेच कशाला देता?
आपला
गुंडोपंत
उपक्रमाची स्पष्ट धोरणे
उपक्रमाची धोरणे स्पष्ट आहेत. काय लिहावे, काय नको.
एक तर दुसरीकडचा लेख जसाच्या तसा छापु नयेच. फार तर लिंक द्यावी व काय चर्चा अपेक्षित आहे ते स्पष्ट करावे व स्वःता चर्चाप्रस्तावकाने भाग घ्यावा. उगाच टाकुन पळुन जाउ नये.
गुंडोपंत अलिकडे असे कळले आहे की बातम्या वाचुन [उपाय/ उच्चपदस्थांकरता पळवाट] फक्त रक्त सळसळवण्यात तुमचा धर्म शाबित होतो. म्हणुन तुम्ही कृपया तापु नका फक्त रक्त भरपुर सळसळु द्या. गर्व करायला तितक पुरेस आहे.
हे
उपक्रमाची धोरणे स्पष्ट आहेत. काय लिहावे, काय नको.
हे खरे नाही. यावर पुर्वीही गदारोळ झाला आहे. धोरणे अस्पष्टच आहेत.
व्याख्याही नाहीत.
पण जसे वर दिलेल्या सुधारणा करत करत धोरणे स्प्ष्ट होवू लागतील असे वाटते.
एक तर दुसरीकडचा लेख जसाच्या तसा छापु नयेच. फार तर लिंक द्यावी व काय चर्चा अपेक्षित आहे ते स्पष्ट करावे व स्वःता चर्चाप्रस्तावकाने भाग घ्यावा. उगाच टाकुन पळुन जाउ नये.
वा क्या बात कही! १००% मान्य!
गुंडोपंत अलिकडे असे कळले आहे की बातम्या वाचुन [उपाय/ उच्चपदस्थांकरता पळवाट] फक्त रक्त सळसळवण्यात तुमचा धर्म शाबित होतो.
नाही हो साहेब! फक्त रक्त सळसळवण्यात तुमचा धर्म शाबित होतो? काहीतरीच काय राव?
मी या बिनडोक बातम्या वाचून चळेन असे वाटावे तुम्हाला?
आणि गर्व नाही हो... कसलाच गर्व नाही... मीच तर सांगत असतो की मी अतिशय सूमार बुद्धीचा माणूस आहे.
गर्व करण्याची बुद्धी तर हवी ना....
आपला
गुंडोपंत
धोरणे स्पष्ट आहेत
>हे खरे नाही. यावर पुर्वीही गदारोळ झाला आहे. धोरणे अस्पष्टच आहेत.
व्याख्याही नाहीत. पण जसे वर दिलेल्या सुधारणा करत करत धोरणे स्प्ष्ट होवू लागतील असे वाटते.
धोरणे भरपुर स्पष्ट आहेत. लोक मात्र सोयीनुसार अर्थ लावुन गैरफायदा घेत आहेत. उपक्रमावर येणार्या लोकांकडून आमजनते पेक्षा नक्कीच जास्त जबाबदारीने वागायची अपेक्षा धरली गेली तर फारसे वावगे नसावे.
उपक्रमाकडून अंमलबजावणीत मात्र जरा ढीलेपणा जाणवतो. मग लोकांना वाटते की वेगवेगळा न्याय लावला जातोय म्हणुन गदारोळ. अर्थात उपक्रमपंतांना त्यांचे इतर व्यवहार सांभाळून हे करणे कठीण जात असावे. तरीही संपादक मंडळाने जरा जास्त कार्यक्षमता दाखवावी असे वाटते.
पुरेशी स्पष्ट
मला वाटते इथली धोरणे 'पुरेशी' स्पष्ट आहेत. काही मूलभूत गोष्टी वगळता त्यांचा अर्थ लावण्याची जबाबदारी सदस्यांच्या सदसद्विवेकबुद्धीवर सोडली आहे हे बरे आहे. याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो हे खरे असले तरी उपक्रमावरील सदस्य ते होऊ देत नाहीत असे दिसून येते :)
युक्ती आवडली.. पण
धोरणे स्पष्ट आहेत परंतू नेमकी अथवा निसंदिग्ध नाहित असे वाटते.
त्यामुळेच प्रत्येक जण हवा तसा अर्थ लाऊ शकतो. कोणताहि नियम बनवताना तो "संपूर्ण" बनवताच येणार नाहि हे मान्य. परंतू बनवलेल्या नियमांत चूक/त्रुटी/पळवाट दिसताच ती बुजवण्याचं कामही झालं पाहिजे.
त्यासाठी उपक्रमरावांनी नियम बनविणार्यांची आणि त्यांची अंमलबजावणीसाठी एक मंडळ नेमावे असे सुचवू इच्छितो. असे स्पष्ट आणि निसंदिग्ध नियम जर उपक्रमाच्या "हेडर" (मराठी?) मधे टाकले तर प्रत्येक नवा सभासद ते वाचू शकतो.
बाकी १०% ची युक्ती आवडली.. पण टक्केवारी काढायची कोणी आणि कशी?
-(ह्या व अश्या अनेक सुचनांचे काय होणार आहे हयाची कल्पना असूनही मत मांडणारा निष्काम कर्मयोगी) ऋषिकेश
सहमत
सहमत आहे. याचबरोबर विनाकारण प्रक्षोभक लेखन करणार्या लेखकांवर मर्यादा याव्यात असेही माझे मत आहे.
हे स्विकारले जावे
उपक्रमावर लेख लिहितांना काही अपवादात्मक स्थिती वगळता १०% पेक्षा जास्त साहित्य संदर्भ म्हणून वापरलेले नसले पाहिजे हा धोरणाचा भाग व्हावा असे मनापासून वाटते.
याचबरोबर विनाकारण प्रक्षोभक लेखन करणार्या लेखकांवर मर्यादा याव्यात असेही माझे मत आहे.
हे मान्य! असे व्हावेच! पण सकारण प्रक्षोभक असेल तर...? तर यावे!?
आपला
गुंडोपंत
सकारण प्रक्षोभक
विनाकारण प्रक्षोभक लेखन येऊ नये म्हणजे सकारण प्रक्षोभक लेखन यावे असे नाही. ही कायद्यातील पळवाट झाली. ;-) दुर्दैवाने, उपक्रमावर काही लोकांकडून तिच पाळली जात आहे.
असो, एखाद्या ताज्या बातमीवर लिहिलेला लेख (जसे खैरलांजी प्रकरणानंतर लगेच आलेला) लोकांच्या भावना भडकवू शकतो किंवा प्रक्षोभक ठरू शकतो. याबाबत, अधिक खुलासा उपक्रमांनी इतर चर्चेत केला आहेच तेव्हा म्या पामराने अधिक काय बोलावे? :-)
प्रक्षोभक लेखन आणि भावना भडकणे!
कोणत्याही प्रकारच्या प्रक्षोभक लेखनामुळे अस्वस्थ होऊन भावना भडकल्या...... असे इथे उपक्रमावर घडल्याचे मी तरी अजून पाहिलेले नाही. कुणी जरी असे लेखन केले तरी ते १) न वाचणे,दूर्लक्ष करणे २) वाचले तरी त्यात प्रतिक्रिया न देणे ३) द्यावीशी वाटली तरी भाषेत संयतपणा राखणे हे करता येऊ शकते.
इथले सदस्य समंजस आहेत अशी माझी धारणा आहे आणि तसाच आजवरचा अनुभवही आहे. तेव्हा एखाद्याने असेच लेखन जाणीवपूर्वक केल्यास त्याला इथे अपेक्षित प्रतिसाद मिळणार नाही आणि आपोआप असे लेखन न करण्यास तो प्रवृत्त होईल. तसेही इथले लेखन जर प्रसिद्धी लायक नसेल तर इथले प्रशासक त्याबाबतीत योग्य ती कारवाई करतील ह्याचीही खात्री आहे. तेव्हा अशा गोष्टींवर आपली शक्ती आणि वेळ फुकट घालवण्यात काय अर्थ आहे?
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
प्रक्षोभक लेखन आणि संकेतस्थळाची प्रतिमा
१. प्रक्षोभक लेखन हे भावना भडकवण्यासाठीच केले जाते. सध्या उपलब्ध वाचकांच्या भावना भडकत नाहीत म्हणून भविष्यात तसे होणार नाही हे खात्रीलायक सांगता येत नाही.
२. अशाप्रकारचे लेखन वारंवार होत राहणे आणि सदस्यांनी इतर काही चांगले वाचन-लेखन करण्यापेक्षा अशा चर्चांवर वेळ वाया घालवणे हे त्यांच्या भावना भडकण्याचे नसले तरी विनाकारण चाळवल्याचे लक्षण नव्हे काय? नसल्यास काही विशिष्ट लेखनाला आलेले प्रतिसाद तपासून पाहता येतील.
३. ज्या संकेतस्थळावर वारंवार अशाप्रकारचे लेखन प्रसिद्ध होते ते संकेतस्थळ आपली विश्वासार्हता किंवा सदस्यांची रूची गमावून बसण्याची शक्यता असते. मी स्वतः सनातन धर्माच्या संकेतस्थळावर विनोदी बातम्या वाचण्यासाठी जाते. माहितीपूर्ण, उपयुक्त किंवा वेळ कारणी लावण्यासाठी जात नाही. तसेच, तेथे रोज जावे असेही मला वाटत नाही. उपक्रमाचे तसे होऊ नये असे जरूर वाटते.
सहमत
१,२,३ सहमत आहे
प्रकाश घाटपांडे