वर्ल्ड स्पेस शौकीन

काय आपण वर्ल्ड स्पेस शौकीन आहात ?
मी ३ वर्षां पासुन आहे.
कधी कधी फरीश्ता फार बोअरीग वाटु लगले आहे.
सुरभी मधे विविधता कमी असते असे वाटते.

लेखनविषय: दुवे:

Comments

अज्ञान

काही कळले नाही - गूगलवर शोध घेतल्यास कळेलही, पण तुमचे सूक्ष्म लिखाण वाचून आपण कशाला मुकतो आहोत ते नक्की कळले नाही. :-)

हा हा हा!!

पण तुमचे सूक्ष्म लिखाण वाचून आपण कशाला मुकतो आहोत ते नक्की कळले नाही. :-)

सही निरिक्षण आहे चित्राताई.
आपले परमाणुराव सुक्ष्म लिखाणात वाकबगार आहेत यात शंका नाही.
अधून मधून ते आपल्याला असे गार करून टाकतात यातही वाद नाही!
आपला
गुंडोपंत

माझा गूगलवरून केलेला अंदाज

...वर्ल्ड स्पेस हे भारतातील एक रेडीओ स्टेशन् /चॅनल् असावे. त्यावर सुरभि नावाचा मराठी कार्यक्रम असावा. फरिश्ता म्हणजे काय देव जाणे.

(अर्थात हा केवळ एक अंदाज आहे ! खरे उत्तर काही भलतेसलतेच् असायचे !) :-)

वर्ल्ड स्पेस

वर्ल्ड स्पेस ही प्रादेशिक भाषेत जगाच्या काना कोपर्‍यात रेडियो प्रक्षेपण पोहोचवणारी संस्था आहे.

मराठी भाषिकांची संख्या जगभर पसरत चालल्याने, तसेच त्यांच्याकडे असलेले पैसे ही वाढत चालल्याने शोभा डे यांच्या प्रमाणेच अचानक एके दिवशी वर्ल्ड स्पेसला साक्षात्कार झाला की,

अरे! मराठी मध्येही रेडियो हवा!
मग सुरभी हे सॅटेलाईट रेडियो चॅनल अवतीर्ण झाले.

यासाठी आपल्याला एक महागडा रेडियो घ्यावा लागतो असे कळते.
मात्र त्याची मासीक फी वगैरे पण आहे का याची काहीच कल्पना नाही बो आम्हाला.
परमणुरावच यातले काही सांगु शकतील असे वाटते.

असो मराठीत जगात कूठेही (?) ऐकु येणारे एक रेडियो केंद्र आहे याचेच समाधान.
भलेही ही कल्पना मराठी माणसालाच न सुचो!

आपला
गुंडोपंत

अधिक माहीती >>

वर्ल्ड स्पेस >सोपी ओऴख >
गांधी गीरी चे प्रसारण करणारी विद्या बालन "लगे रहो .." मधे ज्या रेडीओ मधे आर.जे. चे काम करते ती खरो़खर अस्तीत्वात असणारी कंपनी.
गुण >
१. उपग्रहा मार्फत ४५ च्यानल्स् डिटीएच प्रक्शेपण बहुतांशी संपुर्ण प्रुथ्वी वर + १० च्यानल्स नेट वर.
२. २४* ३६५ अव्याहत उपलब्ध
३.सिडी स्टिरिओ क्वालीटी रिसेपशन
४. नो जाहीराती !
५. बहुतांशी सर्व भारतीय भाषां करीता सेपरेट चैनल्स.
६. डोंगर, दर् या, वाळवंट, समुद्र,जंगल, गाव, खेडे, चार चाकी वाहने कुठेही चालतो.
७.काही च्यानेल्स् ची नांवे >गंधर्व > शास्त्रीय संगीत, श्रुती: कर्नाटकी संगीत , सुरभी> मराठी , सोनार : बांगला, उमंग : गुजराथी..आणि अर्थात् सर्वात जास्त ऐकली जाणारी > फरीश्ता : जुनी हिंदी ,झंकार > तरूणांचे नवे हिंदी म्यु़झिक च्यानेल.

जता जाता ..
आज किशोरी आमोणकरांच्या वाढदिवसा बद्द्ल "गंधर्व "वरती खास कार्यक्रम सुरू आहे.. सुंदर सादरी करण.. आत्ता .."सहेला रे.. .".लागले आहे .

हुरळून जाऊ नका !
हार्ड वेअर > १५००-१२,०००
दर साल प्रीपेड > १८००रु.

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

ओह!

चांगली माहिती आहे की.. पण खरेच, तुमच्या लहानशा लेखाने (!) गूगलवर शोध घेतल्याशिवाय कळत नाही. पण धन्यवाद. हार्डवेअर कसले काय वगैरे माहिती दिल्यास ज्यांना या रेडिओत रस असू शकेल ते निदान विकत घेण्याचा विचार तरी करतील.

आणि हे इतके सूक्ष्मात जाऊ नका बुवा, परमाणू असलात म्हणून काय झाले? :-)

वर्ल्ड स्पेस संपर्क नंबर >

बिएसेनेल् वरून् १८००४२५५४३२
या नंबर वर संपर्क साधुन आपण रेडिओ चा जागतीक आनंद घेण्या साठी ग्राहक बनु शकता.

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

 
^ वर