संगणकासाठी संस्क्रुत

संगणकासाठी संस्क्रुत भाषा सर्वात योग्य आहे असे म्हणतात. ते कसे, यावर कोणी प्रकाश टाकेल काय ?
तसेच या विषयी कुठल्या नामवन्त कंपन्या संशोधन करत आहेत , ठाउक आहे काय?

ता.क. "संस्क्रुत " नीट कसं लिहायचं ? "स्क्रू" चांगला वाटत नाही :):)

लेखनविषय: दुवे:

Comments

पोट भरते ती भाषा !

जावा, सी, सी++, याच भाषा आज जगतातील बहुतंशी जनतेची पोटे डायरेक्ट् इन्डायरेक्ट्ली भरत आहेत.
संस्क्रुत ही नामशेष झालेली , केवळ सरकारी धोरणामुळे शाळा, कौलेजेस, विद्यापीठे नामक म्यु़झीयम्स मधे जतन केली जात आहे.केवळ अपवाद म्हणून नगण्य प्रमाणात काही विशिष्ट कुटंबां मधे
जाणिव पुर्वक वापरल्या जाते.

जास्ती ब्लौगींग करणे मनुष्याला कर्महीन, निरर्थक आणि पोकळ बनवते.

लै भारी !!!

संस्क्रुत ही नामशेष झालेली , केवळ सरकारी धोरणामुळे शाळा, कौलेजेस, विद्यापीठे नामक म्यु़झीयम्स मधे जतन केली जात आहे.केवळ अपवाद म्हणून नगण्य प्रमाणात काही विशिष्ट कुटंबां मधे जाणिव पुर्वक वापरल्या जाते.

असेच म्हणतो. :)

पूर्वी या म्हणण्यात अधिक तथ्य/हशील होते

संस्कृतातले व्याकरण थोडेफार संगणक-प्रणाली (प्रोग्रॅम) असल्यासारखे लिहिले गेले आहे.

त्यामुळे नैसर्गिक भाषा विश्लेषणासाठी ती उपयोगी पडली असती, कारण विश्लेषणाचे काम करणारी प्रणाली आधीच तयार आहे. त्याला फक्त नवीन जे काही काम असेल त्यासाठी उप-प्रणाली जोडावी लागली असती.

"नैसर्गिक भाषेत प्रणाली लिहिली पाहिजे" या तत्त्वाला आजकाल फारशी प्राथमिकता नाही. कित्येक उत्तम आणि कार्यक्षम प्रणाली "कृत्रिम" भाषेत लिहिलेल्या आपल्या उपयोगी येतात. (कृत्रिम भाषा म्हणजे बेसिक, सी, जाव्हा, वगैरे.) त्यामुळे आताच्या संगणकक्षेत्रात संस्कृत शिकून थेट फायदा होत नाही.

पाणिनींची प्रणाली फार कल्पक आहे - एक अचाट कलाकृतीच म्हणा ना. "प्रणालीचा एक उत्तम नमुना" म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला खचित रस वाटावा. पाणिनींच्या प्रणालीचा या तर्‍हेचा अभ्यास "परिभाषेंदुशेखर" या ग्रंथात झालेला आहे. पण त्यातली भाषा प्राचीन विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे, संगणकाच्या आजच्या तांत्रिक भाषा शिकलेला बावचळून जाईल.

आधुनिक प्रणालींशी ती प्राचीन प्रणाली समांतर खुलवून दाखवण्यासाठी दोन्ही विषयात गम्य लागते. यासाठी वैयाकरण आणि संगणकतज्ज्ञ शिक्षिका एकच हवी - अशी दुहेरी पंडिता सापडणे फार कठिण.

आपले

धनंजयराव,
आपले विवेचन उत्तम आहे.
माझ्या दुर्दैवाने मला पाणिनीच्या व्याकरणाचे काही ज्ञान मिळाले नाही. (व जेंव्हा मिळत होते तेंव्हा आम्ही टवाळ्क्या करत होतो!)
आत या संगणकीया भाषा शिकणे म्हणजे अचानक पणे परग्रहावरच्या लोकांशी गाठ पडल्यासारखे वातते. तेंव्हा दोन्ही गोष्टी खुंटल्या!

आपण व दिलेला "परिभाषेंदुशेखर" हा ग्रंथ आज मराठीमध्ये उपलब्ध आहे का?
असल्यास प्रकाशक आदि माहिती देवू शकाल काय?

किंवा अश्या ग्रंथांची यादी दिलीत तरी मी आपला ऋणी राहीन.

आपला
गुंडोपंत

परिभाषेन्दुशेखराचा मराठी अनुवाद

नागपूरचे रा.ब. वाडेगांवकर यांनी केलेल्या परिभाषेन्दुशेखराच्या मराठी अनुवादाची प्रत माझ्यापाशी आहे. हे पुस्तक दुर्मिळ असावे.
---
प्रकाशनवर्ष : १९३६
शीर्षक : नागेशभट्ट कृत परिभाषेन्दुशेखराचें विस्तृत विवरणासह व प्रक्रियेसह मराठी भाषांतर
अनुवादक व प्रकाशक : रा. ब. नारायण दाजिबा वाडेगांवकर
मुद्रक : म्यानेजर, श्रीराम प्रिंटिंग प्रेस, नागपूर
---

तरी त्याची प्रत (किंवा प्रती) पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ग्रंथालयात उपलब्ध आहे (आहेत), ते मी बघितलेले आहे.

कीलहॉर्न यांचा इंग्रजी अनुवाद बहुतेक मोठ्या विद्यापीठांच्या ग्रंथालयांत उपलब्ध आहे, दुकानांत प्रती विकतही मिळतात, असे वाटते.
डिजेटल लायब्ररी ऑफ इंडिया च्या या दुव्यावर संस्कृत पाठ्य उपलब्ध आहे, पण मला ते माझ्या संगणकावर उतरवण्यात अपयश आले.

हा ग्रंथ पाणिनींचा नाही - याचे लेखक नागेशभट्ट (किंवा नागोजिभट्ट) हे १७५०-१८५० या काळातले. पण ग्रंथाचा विषय आहे पाणिनींच्या "अष्टाध्यायी" ग्रंथातील परिभाषा. हा वाचायला घेण्यापूर्वी पाणिनींच्या मूळ ग्रंथाची, म्हणजे अष्टाध्यायीची , बर्‍यापैकी ओळख असल्यास बरे. नागोजिभट्टांनी हा मुद्दाम दुर्बोध केलेला नाही, इतकेच काय, शक्य तितका सुगम करायचा प्रयत्न केलेला आहे. तरीही जरा कठिणच आहे.

ध्यानात असावे, की हा ग्रंथ वाचून संस्कृत भाषा शिकण्यास काहीही मदत होत नाही. पण पाणिनींच्या प्रणालीच्या गुंतागुंतीच्या बांधणीचा अभ्यास करण्यासाठी हा ग्रंथ अपरिहार्य आहे.

एक शंका

आधुनिक प्रणालींशी ती प्राचीन प्रणाली समांतर खुलवून दाखवण्यासाठी दोन्ही विषयात गम्य लागते. यासाठी वैयाकरण आणि संगणकतज्ज्ञ शिक्षिका एकच हवी - अशी दुहेरी पंडिता सापडणे फार कठिण.

आपण शिक्षक/शिक्षिका असे न म्हणता शिक्षिका हा शब्द वापरला आहे. हे जाणीवपूर्वक केले आहे का? अर्थात तसे करायला हरकत नाही. कारण शिकवण्यासाठी लागणारी कौशल्ये स्त्रियांकडे जास्त असतात असा सर्वसाधारण समज आहे. तो बरोबर आहे असे माझेही व्यक्तिगत मत आहे. पण तरीही आपण का लिहिले हे जाणून घेण्यासाठी हे विचारले आहे.

असेच पण नेमके असे नाही

मला ज्यांनी शिकवले त्यांच्यापैकी शिक्षक आणि शिक्षिकाही उत्तम होत्या. पण शिक्षकाचा सामान्य उल्लेख करायची वेळ आली, की सवयीने तो सामान्य उल्लेख मी पुंल्लिंगातच करत असे. हे तथ्याशी विसंगत आहे. (मराठी व्याकरणाशी सुसंगत असेनाका.)

सामान्य उल्लेखात कुठलेही लिंग वापरणे असंदर्भ आहे. पण मराठीत काही वाक्यांत लिंग वापरावेच लागते. किंवा ते टाळण्यासाठी फारच द्राविडी प्राणायाम करावा लागतो.

तो द्राविडी प्राणायाम टाळून, शिक्षकांच्या बाबतीत तरी तथ्याशी प्रामाणिक राहाण्यासाठी, मी आलटून-पालटून स्त्रीलिंग आणि पुंल्लिंग वापरतो. (इंग्रजीत मात्र लिंग-विरहित उल्लेख त्यातल्या त्यात सहज होतो. तिथे तशी भाषा वापरतो.)

सहमत/साहाय्य

"नैसर्गिक भाषेत प्रणाली लिहिली पाहिजे" या तत्त्वाला आजकाल फारशी प्राथमिकता नाही. कित्येक उत्तम आणि कार्यक्षम प्रणाली "कृत्रिम" भाषेत लिहिलेल्या आपल्या उपयोगी येतात. (कृत्रिम भाषा म्हणजे बेसिक, सी, जाव्हा, वगैरे.) त्यामुळे आताच्या संगणकक्षेत्रात संस्कृत शिकून थेट फायदा होत नाही.

सहमत आहे.

कौशिक,
वरील-उजव्या कोपर्‍यात असलेल्या "साहाय्य" या दुव्यावर टंकलेखन साहाय्य, संपादन सुविधा इ. विषयी अधिक माहिती मिळेल.

प्रयोग

कौशिकराव जरा प्रयोग करून पाहा बरे.
समजा नुसता आर दाबण्या ऐवजी शिफ्ट + आर असे दाबून संस्कृत असे लिहिता येते का ते.

आपला
प्रयोगशील
गुंडोपंत

ढिला स्क्रू

असे लिहा SanskRuta = संस्कृत. संगणकासाठी इंग्रजीच उत्तम भाषा आहे हो - हो/नाही, शून्य/एक अशी भाषा.... संस्कृत जगातल्या १% लोकांना येत नाही आणि संगणक गल्लोगल्ली सर्वांना येतो. समन्वय कसा साधणार बॉ?

- राजीव.

विचार करण्यामागे तुमचा हेतु काय ?

संस्कृत ही आपली प्राचिन भाषा होती. भाषा काळानुसार बदलत असतात. जुनं ते सोनं असं लोक म्हणतात. पण, ते बोलणे ही एक भावना असते. म्हणून काही काळाच्या मागे तर जाणे होणार नाही. उत्क्ररांती मुळे मानवी मेंदूचा विकास जसा होत जाईल, तस तसा जी भाषा तो बदल तोलून धरू शकेल तिच भाषा उपयोगाची व म्हणून सोयीची होणार. 'संगणकासाठी संस्क्रुत' असा विचार करण्यामागे तुमचा हेतु काय आहे ते कळू शकेल कां?

पाणिनी

पाणिणी जगातला आद्य वैयाकरणी. त्याचे जन्मगाव पाकिस्तानात आहे, त्यामुळे पाकिस्तानी त्याला 'आपला' मानतात आणि जागतिक व्याकरणविषयक परिषदांत भाव खातात. आणि आपल्यातले काही संस्कृत ही मृतभाषा आहे असे मानतात, यापेक्षा दुर्दैव ते काय?--वाचक्‍नवी

पोट भरण्यासाठी भाषा?

ही अत्यंत अधम कल्पना आहे. पोटात काटे भरूनसुद्धा पोट भरू शकते. पोटापलीकडे काही आहे हे आपण समजतो म्हणूनच आपण माणूस आहोत, नाहीतर जनावरे आणि आपण यांत फरक तो काय? आज आयुर्वेद, पातंजलीचे योगशास्त्र शिकायचे असेल तर संस्कृत येणे अनिवार्य आहे. मला एक संस्कृत पंडित एकदा म्हणाले होते की " पाणिनी सोप्या रीतीने शिकायचा असेल तर आधी थोडे जर्मन शिकून घ्या." जर्मन भाषेत पाणिनीचा इतका सखोल अभ्यास झाला आहे तितका देशी भाषांत नाही. म्हणजे जर्मन भाषेचा हाही एक उपयोग!
नवी संगणक भाषा तयार करू शकतील असे थोडेच संगणकतज्ज्ञ जगात असतील, त्यांतल्या एखाद्याला संस्कृत येत असेल ही शक्यता कमीच. पण ते न येताही पाणिनीने केल्याप्रमाणे पहिल्या वाक्याचे पहिले अक्षर आणि शेवटच्या वाक्याचे अन्त्य अक्षर यांनी बनलेला शब्द, मधल्या सर्व वाक्यांच्याऐवजी वापरण्याने संगणकीय भाषा फारच संक्षिप्त करता येतील ही शक्यता आहे.--वाचक्‍नवी

तुमची मते पुरेत

संस्कृत बद्दल शास्त्रद्न्यांचे काय म्हणणे आहे?? ते कुणी सांगितलच नाही. !!!!
प्रत्येक जण आपलंच घोड पुढे दामटवतोय :):):)

अन्य लोकांची, शास्त्रज्ञांची मते -दुवे

या दुव्यावर मते नाहीत, पण या बाबतीत काम करणार्‍या डॉ. गिरिनाथ झा यांच्याबद्दल माहिती आहे. त्यांना तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता:
त्यांचे काम : दुवा१
त्यांची माहिती : दुवा२

 
^ वर