टेक्निकल ऍनालिसिस

शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमावला आहे गेल्या वर्षभरात पण त्यात अभ्यास आणि मुख्य पाया म्हटला तर केवळ फंडामेंटल ऍनालिसिसचाच होता असे म्हणावे लागेल. टेक्निकल ऍनालिसिस करणे आणि फंड्याच्या जोडीने तो वापरून अधिक जागरूक गुंतवणूक करता यावी असे वाटत असल्याने टेक्निकल ऍनालिसिस करणे आता शिकावेसे वाटत आहे. याबद्दल उपयुक्त माहिती ( आणि झालेच तर मार्गदर्शनही ! ) कुठून मिळू शकेल? उपक्रमींपैकी कोणामिथे प्रतिसादात मार्गदर्शन करता आले तर सोन्याहून पिवळेच म्हणावे लागेल.

वेदश्री.

लेखनविषय: दुवे:

Comments

सकाळ

गेल्या दोन आठवड्यांपासून सकाळमध्ये दर सोमवारी किरण जाधव यांचे तांत्रिक विश्लेषण या विषयावर लेख येत आहेत.

पहिला लेख
दुसरा लेख

मला फंडामेंटली तांत्रिक विश्लेषण आवडत नाही. का वगैरे डिटेल सांगता येत नाही.

अभिजित...
कोंबडी पळाली गाण्यावर नाचलं की भरपूर व्यायाम होतो. दमतो माणूस.

स्टॉक चार्ट्स

तांत्रिक विश्लेषणाबाबत प्राथमिक माहिती इन्वेस्टोपीडिया वर मिळेल. अधिक माहिती स्टॉकचार्ट्स वर मिळेल.

मात्र तांत्रिक विश्लेषणाला केवळ अंदाजपंचे आधार आहे असे माझे मत आहे. एक तर तांत्रिक विश्लेषणाचा पाया हा ऐतिहासिक माहितीवरून भविष्याचा अंदाज घेणे आणि 'शेअरच्या किंमतीत त्याचे सर्व गुणधर्म परावर्तित झालेले असतात' अशा प्रकारचा आहे. तांत्रिक विश्लेषणाचे समर्थन करणारे लोक ही पद्धत भावनाविरहित आणि वस्तुनिष्ठ असल्याने उत्तम आहे असे दावे करतात. मात्र कंपन्यांची खरी किंमत ठरवणारे बुक व्हॅल्यू, प्राईस पर अर्निंग, गुडविल, रिटर्न ऑन इक्विटी वगैरे मुद्दे तेथे विचारात घेतले जात नाही.

शिवाय एक मोठी गोची म्हणजे तांत्रिक विश्लेषणाचे ट्रिगर्स हे अगदी मूर्खपणाचे आहेत. त्यांचा 'खरेदी करा' हा ट्रिगर शेअरने किंमतीची वरची पातळी ओलांडल्यानंतर (एक विशिष्ट आकृती तयार होऊन आता तो वरवर जात राहील या ऐतिहासिक माहितीनुसार) दिला जातो. तसेच 'विका' हा ट्रिगर शेअरने किंमतीची खालची पातळी ओलांडल्यानंतर दिला जातो.

त्यामुळे खालच्या किंमतीत खरेदी करा आणि वरच्या किंमतीला विका हे मूलभूत तत्त्व पाळणे अगदी अशक्य होते.

तांत्रिक विश्लेषण हे सट्टेबाजांसाठी कदाचित उपयुक्त ठरतही असेल मात्र सामान्य गुंतवणुकदारांनी त्याकडे लक्ष देऊ नये. 'माल लेके बैठ जाओ' हे सर्वात उत्तम!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हममम...

तांत्रिक विश्लेषणाची अभिजित आणि आजानुकर्ण यांनी दिलेली माहिती पाहता केवळ ऐतिहासिक माहितीवरून (हिस्टॉरिक डेटा) केलेले भविष्याविषयी अनुमान असे कळले. असे असेल तर हे अनुमान बरोबरच असण्याचे काही कारण दिसत नाही. समभागबाजारावर परिणाम करणारे इतर घटक या विश्लेषणात विचारात घेतले जातात का?

>>शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा कमावला आहे
कोण? तुम्ही का? अभिनंदन! :)

आभार

अभिजित आणि आजानुकर्ण,

आपले इतके माहितीपूर्ण प्रतिसाद पाहून आनंद झाला. आपण दिलेली माहिती परतपरत वाचून नीटपणे समजावून घ्यायचा प्रयत्न करेन आता. वेळ काढून उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार.

तांत्रिक विश्लेषण हे सट्टेबाजांसाठी कदाचित उपयुक्त ठरतही असेल मात्र सामान्य गुंतवणुकदारांनी त्याकडे लक्ष देऊ नये. 'माल लेके बैठ जाओ' हे सर्वात उत्तम!

योग्य वेळेला 'माल' उपलब्ध असणे हीच मुख्य मोक्याची गोष्ट आहे, जी गाठता आली तर मिळवले म्हणायचे ! एका दोस्ताचे यासंदर्भातील वाक्य अगदी पटते - मार्केट चढत जाते तेव्हा हाव वाढत जाते आणि मार्केट पडायला लागल्यावर मोक्याच्या वेळी गुंतवायला पैसे उरत नाहीत ! या दोन्हीतून डोकेबाजीने सुटका करू शकलात की शेअरमार्केट तुमचेच आहे नफ्यासाठी *!!! :-)

*अटी लागू !

संगम

फंडामेंटलच्या आधारे गुंतवणूक करायची किंवा नाही हे ठरविणे आणि टेक्निकलच्या आधारे एन्ट्रि-एक्झिटचे टायमिंग साधणे असा संगम साधता येतो असा माझा अनुभव आहे.

(डिसक्लेमर : माझा कल मूलभूत विचारावर अधिक आहे त्यामुळे पद्धती पूर्वग्रहप्रभावित आहेत हे लक्षात घ्यावे.)

बघितलाय प्रयत्न करून !

फंडामेंटलच्या आधारे गुंतवणूक करायची किंवा नाही हे ठरविणे आणि टेक्निकलच्या आधारे एन्ट्रि-एक्झिटचे टायमिंग साधणे असा संगम साधता येतो असा माझा अनुभव आहे.

आज अशाच प्रकारे निर्णय घेऊन एक गुंतवणूक केली आहे. आता एक्झिटचे टायमिंग हेरायचे टेक्निक कितपत झेपतेय बघायचे.. पूर्वग्रहप्रभावित का असेना पण मार्गदर्शक ठरू शकेलसा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद, एकलव्य !

 
^ वर