श्रेष्ठ कोण -धर्म ,विज्ञान का निसर्ग

मानवजन्म ही नैसर्गिक प्रक्रीया आहे .माणुस जन्माला आल्यावर त्याला माहीत असते का त्याचा धर्म कोणता ,जात कोणती ते ? तर नाही. जसाजसा तो मोठा होत जातो त्याला कळु लागते . आपल्या धर्माबाबत. मानवाने आपल्या तल्लख बुद्धीने निरनिराळे शोध लावले. त्याप्रमाणे आपल्या राहणीमानात बदल केले.तरी पण श्रेष्ठ कोण हा प्रश्न उरतोच कारण प्रत्येक माणसाला धर्म आहे. त्याबरोबर विज्ञानाची जोड आहे.प्रत्येक जण निसर्गात वावरतो.

प्रत्येक धर्म हा मानवनिर्मित आहे. विज्ञान(तंत्रज्ञान) ही मानवनिर्मित आहे. निसर्गातिल प्रत्येक घटकाच्या मागे विज्ञान आहे. जन्मानंतर मृत्यु हे नैसर्गिक आहे ते कोणी थांबवू शकत नाही. तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली तरी विज्ञान सर्व गोष्टींवर मात करू शकत नाही. निसर्गाच्या प्रकोपापुढे सर्व काही समान आहे(उदा. धरणीकंप, चक्रिवादळे,इ) .

मला वाटत निसर्ग श्रेष्ठ . आपणास काय वाटत.

आपला

कॉ.विकि

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत्

मला सुद्धा निसर्गच् श्रेष्ठ वाटतो. बाकी सर्व गोष्टी स्वतःच्या स्वार्थासाठी बनवल्या.

अयोग्य तुलना

ही तुलनाच मुळात अयोग्य आहे.

मल्लिका शेरावत चांगली की मल्लिकार्जुन मन्सूर? या प्रकारचा हा प्रश्न आहे.

बापू

मानवनिर्मित?

प्रत्येक धर्म हा मानवनिर्मित आहे.

जगातल्या दोन सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या धर्मांच्या विचारसरणीनुसार त्यांचे धर्म हे प्रेषितामार्फत साक्षात देवानं निर्मिले आहेत..

तिन्ही..

तिन्ही गोष्टी आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत असे वाटते.
जन्मानंतर मृत्यू हे नैसर्गिक आहे. पण हा प्रवास सुखकर होण्यासाठी धर्म आणि विज्ञानाची मदत होते. या दोन्ही गोष्टी मानवनिर्मित असल्या तरी या दोन गोष्टींशिवाय माणसाची प्रगती होणे शक्य नाही. धर्माच्या नावखाली आज हिंसाचार चालत असला तरी मुळात प्रत्येक धर्माची स्थापना ही मानवाला सुसंस्कृत, विचारी बनविण्यासाठी केली असावी.
विज्ञानाने माणसाला अनेक सुविधा दिल्या. अर्थातच या दोन्ही गोष्टींचा उपयोग फक्त चांगल्या कारणांसाठी केला जावा असे अपेक्षित आहे.

 
^ वर