मराठी अभ्यास परिषद - वार्षिक अंक स्पर्धा.

मराठी अभ्यास परिषद या संस्थेच्या वतीने महाविद्यालयांच्या वार्षिक अंकाची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा २००७ साली प्रकाशित करण्यात झालेल्या अंकासाठी आहे. या स्पर्धेसाठी शहरी आणि ग्रामीण असे दोन विभाग पाडण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी १००० आणि ५०० रुपये अशी दोन पारोतोषिके ठेवण्यात आली आहेत. स्पर्धकांनी ३१ मार्च पर्यंत अंक पाठवावेत. इच्छुकांनी विजया चौधरी, इ-५०३, गार्डन व्हू, राधिका सहकारी संस्था, पर्वतीनगर, सिंहगड मार्ग, पुणे-३० या पत्त्यावर अथवा ०२०-२४२५०५५९ येथे अधिक माहिती मिळावावी.

स्त्रोत : लोकसत्ता दिनांक १९.०३.०८.

अवांतर : ही संस्था मागच्या २५ वर्षापासून कार्यरत आहे. वरील स्पर्धा मागच्या वर्षापासून घेण्यात येत आहे. या संस्थेतर्फे "भाषा आणि जीवन" असे त्रेमासिक प्रकाशित करण्यात येते. अध्यक्ष प्रा. प्र. ना. परांजपे, कार्यवाह डॉ. निलीमा गूंडी आहेत.

उपक्रमावर या आणि अश्या उपक्रमाचे हार्दिक स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. कृपया आपणही अश्या असंख्य उपक्रमाची नोंद आणि ओळख करून द्यावी अशी नम्र विनंती.

 
^ वर